यूआयडी आधार कार्ड साठी होणारी अडवणूक टाळा ; ही कागदपत्रे जवळ बाळगा

Submitted by विक्रांत-पाटील on 17 February, 2013 - 04:16

यूआयडी आधार कार्ड साठी होणारी अडवणूक टाळा ; ही कागदपत्रे जवळ बाळगा

अनेकदा आपली अडवणूक होते ती पुरेशी माहिती न ठेवल्यामुळे किंवा कर्णोपकर्णी ऐकलेल्या माहितीची खातरजमा न करता तिच्यावर सरसकट विश्वास ठेवल्यामुळे. सरकार अनेकदा आवाहन करते त्या जाहिराती आपण वाचतही नाही. माझ्या स्वत:च्या अनुभवावरून हे लिहितोय. 'आधार' साठी कंत्राटी मुले असतात; ते फक्त नाव व पत्ता नोंदवून मोकळे होतात. इतर माहिती नोंदविण्याचा कंटाळा करतात. मात्र ई-मेल व मोबाईल क्रमांक जरूर नोंदवून घ्यावेत. एजन्सीच्या माणसाने केलेल्या नोंदी योग्य असल्याची खात्री करून मगच पोचपावती स्वीकारावी. त्याने ई-मेल व मोबाईल क्रमांक लिहिलेले नसल्यास ते त्याला नोंदविण्यास सांगणे. बँक अकाउंट क्रमांकही आधारला नोंदणीच्या वेळीच जोडून घ्यावा.

आधार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :
१. ओळखीचा पुरावा (पीओआय: प्रूफ ऑफ आयडेण्टिटी)
२. रहिवाशी पत्त्याचा पुरावा(पीओए: प्रूफ ऑफ एड्रेस)

आपल्याला फक्त खालील दोनपैकी प्रत्येकाची एकेक झेरॉक्स कागदपत्रे व खातरजमा/­पडताळणीसाठी मूळ (ओरिजिनल) डॉक्युमेंट आणायची आहेत. जर ओरिजिनल जवळ नसतील तर फक्त सक्षम राजपत्रित अधिकारी किंवा पब्लिक नोटरी यांच्याकडून एटेस्टेड असलेली कागदपत्रेही खातरजमा/­पडताळणीसाठी ग्राह्य धरली जातात; ती आणावी लागतील.

ओळखीचा पुरावा (पीओआय) व रहिवाशी पत्त्याचा पुरावा (पीओए) ही दोन कागदपत्रेच महत्त्वाची आहेत. इतर सर्व रकान्यात माहिती नोंदणी एजन्सी भरेल किंवा ती ऐच्छिक आहेत. तरीही रकाना ९ मधील जे बँक अकाउण्ट आधार कार्डशी जोडायचे आहे त्याची माहिती जरूर भरावी. त्यासाठी बँक खाते क्रमांक आणि खाते असलेल्या शाखेचा आयएसएफसी कोड आपणास माहिती असावा. ज्यांच्याकडे बर्थ सर्टिफ़िकेट (जन्मदाखला), एसएसएलसी बुक/­सर्टिफ़िकेट, पासपोर्ट किंवा अ श्रेणीच्या फ़र्स्ट क्लास राजपत्रित अधिकारयाने लेटरहेडवर दिलेला जन्मदाखला या चौघांपैकी एक डॉक्युमेंट असेल त्यांनी रकाना ५ मध्ये वयाचा (एज) तपशील नोंदविताना व्हेरिफ़ाईड (पडताळलेले) बॉक्समध्ये टीक करावे. ज्यांच्याकडे जन्मतारखेची कागदपत्रे नाहीत; पण जन्मतारीख माहिती आहे त्यांनी डिक्लेअर्ड (घोषित) बॉक्समध्ये टीक करावे. ज्यांना जन्मतारीख नेमकी माहिती नाही त्यांनी फक्त अंदाजे वय लिहावे. ज्यांच्याकडे आपल्या घरी जनगणना करायला आलेल्या व्यक्तीने दिलेली एका छोटीसी स्लीप असेल त्या स्लीपरील एनपीआर नंबर (राष्ट्रीय जनगणना रजिस्टर सर्वेक्षण स्लीप क्रमांक) लिहावा.
आधार नोंदणी फॉर्म केवळ एका पानाचा अतिशय सोपा व सुटसुटीत आहे. फक्त माहिती भरताना कैपिटल लेटर्समध्ये अचूक व नेमकी भरावी. फॉर्म जरी एजन्सीच्या माणसाने भरला तरी आपण स्वत: अचूक माहिती नोंदविल्याची खात्री करून घ्यावी. पत्ता, वय व बँक खाते क्रमांक याबाबत विशेष काळजी घ्यावी.
आपण आधार नोंदणीसाठी ही माहिती जरूर लक्षात ठेवावी. इतरत्रही आपणास, आपले मित्र, नातेवाईक, शेजारी, परिचित यांना ती उपयोगी पडू शकते. नेमक्या माहितीअभावी अनेकदा गोंधळ उडतो, फसवणूक होउ शकते. आधार नोंदणीसाठी बाहेरही कुठे एक पैसाही शुल्क लागत नाही. आधार कार्डची नोंदणी कोणीही भारतभर कोणत्याही केंद्रावर करू शकतो; फक्त त्याच्याजवळ ओळखीचा पुरावा आणि जो पत्ता नोंदावितोय घराचा त्याचा पुरावा आवश्यक असतो.
आधार फॉर्म अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केलेलाही चालतो. त्यात नोंदणीच्या वेळी केंद्रावर एजन्सीमार्फत रकाना १ मध्ये जो प्रीएनरोलमेण्ट आयडी (नोंदणी क्रमांक) नोंदविला जातो. तो नंतर आधार कार्डवरही वरच्या बाजूस नमूद करून येतो. जे पूर्वीचे फॉर्म आहेत त्यात हा प्रीएनरोलमेण्ट आयडी छापील असायचा म्हणून सरकारी फॉर्मचीच सक्ती असायची. आता मात्र कोणताही विहित नमुन्यातील फॉर्म चालतो. त्यात प्रीएनरोलमेण्ट आयडी नोंदणी एजन्सी भरून देते.

१) ओळखीचा पुरावा (पीओआय: प्रूफ ऑफ आयडेण्टिटी)
(खालील १८ पैकी कोणतेही एक ज्यावर पत्ता स्पष्ट व पूर्ण नमूद असावा; त्याच पत्त्यावर पोस्टाद्वारे आधार कार्ड पाठविले जाईल.)-
पासपोर्ट, पैन कार्ड, रेशन कार्ड/पीडीएस फ़ोटो कार्ड, व्होटर्स कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी फ़ोटो आयडी कार्ड/ सरकारी कंपनीचे आयडी कार्ड, एनआरईजीएस जॉब कार्ड, नोंदणीकृत शैक्षणिक संस्थेचे आयडी कार्ड, शस्त्र परवाना, फ़ोटो असलेले सरकारी बँकेचे एटीएम कार्ड, फ़ोटो असलेले सरकारी बँकेचे क्रेडिट कार्ड, पेन्शनर्स फ़ोटो कार्ड, फ्रीडम फ़ायटर फ़ोटो कार्ड, किसान फ़ोटो पासबुक, सीजीएचएस/­ईसीएचएस फ़ोटो कार्ड, पोस्ट खात्याने जारी केलेले पत्यासह फ़ोटोआयडी कार्ड, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटोसह राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार यांच्यापैकी कुणीही एकाने लेटरहेडवर दिलेले ओळखत असल्याचे पत्र, राज्य सरकारचे फोटोसह अपंग कार्ड.

२) रहिवाशी पत्त्याचा पुरावा (पीओए: प्रूफ ऑफ एड्रेस) :
(खालील ३३ पैकी कोणतेही एक ज्यावर पत्ता स्पष्ट व पूर्ण नमूद असावा; त्याच पत्त्यावर पोस्टाद्वारे आधार कार्ड पाठविले जाईल.)-
लाईटबिल, टेलिफोनबिल, रेशनकार्ड, पासपोर्ट, सरकारी बँक खात्याचे पासबुक किंवा अकाउंट स्टेटमेण्ट, मतदान ओळखपत्र, सरकारी ओळखपत्र, पाणी पट्टी बिल, घरपट्टी बिल, मालमत्ता कर भरणा पावती, क्रेडिट कार्ड स्टेटमेण्ट, एलआयसी/­इन्शुरन्स पोलिसी, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह बँकेने लेटरहेडवर दिलेले पत्र, आधार कार्ड काढू इच्छिणारया कर्मचारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह नोंदणीकृत नियोक्ता कंपनीने लेटरहेडवर दिलेले पत्र, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह नोंदणीकृत शैक्षणिक संस्थेने लेटरहेडवर दिलेले पत्र, एनआरईजीएस जॉब कार्ड, शस्त्र परवाना, पेन्शनर कार्ड, फ्रीडम फ़ायटर कार्ड, किसान पासबुक, सीजीएचएस/­ईसीएचएस कार्ड, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह खासदार/आमदार/­राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार यांच्यापैकी कुणीही एकाने लेटरहेडवर दिलेले पत्र, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह सरपंचाने ग्रामपंचायतीच्य­ा लेटरहेडवर दिलेले पत्र(फक्त ग्रामीण भागासाठी), आयकर विवरण आदेश, वाहन नोंदणी पुस्तक (आरसी बुक), नोटरी केलेले सेल/लीझ/­रेण्ट करारपत्र, पोस्ट खात्याने जारी केलेले पत्यासह फ़ोटोआयडी कार्ड, राज्य सरकारने जारी केलेले आधार कार्ड काढू इच्छिणारयाचा फोटो असलेले कास्ट किंवा डोमिसाईल सर्टिफ़िकेट, राज्य सरकारचे अपंग कार्ड, एलपीजी गैस कनेक्शन बिल, पत्नीचा पासपोर्ट, वडिलांचा पासपोर्ट(अज्ञान मुलांसाठी फक्त)

आधारचा फॉर्म नंदन निलकेणी यांच्या भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करा.
http://­uidai.gov.in/­images/­FrontPageUpdates­/uid_download/­enrolmentform.pd­f

तुमच्या शहरा, घराजवळील आधार नोंदणी केंद्रांची यादी पाहा -
http://­appointments.uid­ai.gov.in/­easearch.aspx

आधार कार्ड नोंदणीसाठी ऑनलाईन वेळ निश्चित करून (आपोईन्टमेन्ट घेउन) गैरसोय टाळा-
http://­appointments.uid­ai.gov.in/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी आणि गजानन, रेशन कार्ड काय नातेसंबंधाचा पुरावा म्हणून नाही द्यावं लागणार, राहत्या पत्त्याचा पुरावा म्हणून द्यावं लागतं.
उदा. मी राहते त्या घराचं इलेक्ट्रिक बिल/ टेलिफोन बिल माझ्या सासर्‍यांच्या नावाने आहे, तर मी माझ्या पत्त्याचा पुरावा काय द्यायचा?
>>> पण यामधे मॅरेज सर्टिफिकेटचा संबंध कसा येतो????

पत्त्याचा पुरावा म्हणून ईलेक्ट्रिक/टेलिफोन बिल याऐवजी वर हेडरमधे लिस्ट टाकली आहे त्यापैकी कुठलाही कागदपत्र पत्त्याचा पुरावा म्हणून देता येऊ शकतो.. फक्त जो पत्ता पुरावा म्हणून देणार त्याचीच नोंद सरकारदरबारी होणार आणि आधार कार्ड त्याच पत्त्यावर घरी येणार...

गजा,
१. एका स्त्रीचं माहेरच्या नावाने पॅनकार्ड अथवा पासपोर्ट आहे - उदा. सुनंदा देसाई.

२. तिने सुनिल गडकरी नावाच्या माणसाशी लग्न केलंय आणि दोघे जण + सुनिलचे आई-वडील असे सगळे ३५-ए, क्ष सहनिवास इथे राहतात. राहत्या घराचे इलेक्ट्रिक /टेलिफोन बिले/गॅस जोडणी इत्यादी सुनिलच्या वडिलांच्या नावे आहेत.

३. सुनंदाला स्वतःचं नाव बदलायचं नाही आहे.

तिच्या ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट/ पॅनकार्ड ग्राह्य धरता येईल. रहिवासी पत्त्याचा पुरावा तिने काय द्यावा?

प्रश्न गजाला विचारलाय. पण तरीही मीच उत्तर देते. Proud

लाईटबिल, टेलिफोनबिल, रेशनकार्ड, पासपोर्ट, सरकारी बँक खात्याचे पासबुक किंवा अकाउंट स्टेटमेण्ट, मतदान ओळखपत्र, सरकारी ओळखपत्र, पाणी पट्टी बिल, घरपट्टी बिल, मालमत्ता कर भरणा पावती, क्रेडिट कार्ड स्टेटमेण्ट, एलआयसी/­इन्शुरन्स पोलिसी, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह बँकेने लेटरहेडवर दिलेले पत्र, आधार कार्ड काढू इच्छिणारया कर्मचारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह नोंदणीकृत नियोक्ता कंपनीने लेटरहेडवर दिलेले पत्र, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह नोंदणीकृत शैक्षणिक संस्थेने लेटरहेडवर दिलेले पत्र, एनआरईजीएस जॉब कार्ड, शस्त्र परवाना, पेन्शनर कार्ड, फ्रीडम फ़ायटर कार्ड, किसान पासबुक, सीजीएचएस/­ईसीएचएस कार्ड, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह खासदार/आमदार/­राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार यांच्यापैकी कुणीही एकाने लेटरहेडवर दिलेले पत्र, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह सरपंचाने ग्रामपंचायतीच्य­ा लेटरहेडवर दिलेले पत्र(फक्त ग्रामीण भागासाठी), आयकर विवरण आदेश, वाहन नोंदणी पुस्तक (आरसी बुक), नोटरी केलेले सेल/लीझ/­रेण्ट करारपत्र, पोस्ट खात्याने जारी केलेले पत्यासह फ़ोटोआयडी कार्ड, राज्य सरकारने जारी केलेले आधार कार्ड काढू इच्छिणारयाचा फोटो असलेले कास्ट किंवा डोमिसाईल सर्टिफ़िकेट, राज्य सरकारचे अपंग कार्ड, एलपीजी गैस कनेक्शन बिल, पत्नीचा पासपोर्ट, वडिलांचा पासपोर्ट(अज्ञान मुलांसाठी फक्त)

यापैकी कुठलेही एक कागदपत्र असणे पुरेसे आहे. यापैकी काहीच नसेल तर मग नवर्‍याचा अ‍ॅड्रेस प्रूफ आणि मॅरेज सर्टिफिकेट असे देता येईल. पण ते आवश्यक कागदपत्रांमधे कुठे लिहिलेले नसल्याने कर्मचारी ती कागदपत्रे स्विकारतीलच असे नाही....

सुनंदा देसाई माहेरचा पत्याचा पुरावा देऊन आधार कार्ड मागवू शकतात. नंदिनी देसाई यांनी तेच केले होते.

गजानन / नंदिनी,
लग्नापूर्वी मुलीचे नाव 'अअअ क्षक्षक्ष' असेल आणि लग्नानंतर ते 'अअअ ययय' झाले. टेलिफोन बील नवर्‍याच्या
(बबब ययय) नावावर आहे. ते बील अअअ क्षक्षक्ष (लग्नाआधीचे नाव) या व्यक्तीला proof of address म्हणून वापरायचे असल्यास ती त्या पत्त्यावर रहाते आहे कारण ती बबब ययय याची बायको आहे हे नको का सिद्ध करायला? त्यासाठी लग्नाचा दाखला हवा ना मग?

माधव, फक्त टेलिफोन बिल हा एकच पुरावा चालत नाही ना? इतरही कागदपत्रे चालू शकतात. प्रत्येक घरातील प्रत्येक सज्ञान व्यक्तीकडे त्या व्यक्तीच्या नावावर एकतरी प्रूफ ऑफ अ‍ॅड्रेस असलाच पाहिजे असे माझे ठाम मत आहे. म्हणून आम्ही टेलिफोन, ईलेक्ट्रिक मीटर (आमच्याकडे तीन मीटर आहेत. प्र्त्येकाचा एक एक!!) गॅस कनेक्शन इत्यादि घेतानाच घरातील वेगवेगळ्या सदस्यांच्या नावे घेतलेले आहेत.

याव्यतिरीक्त प्रत्येक नवीन शहरात गेल्यावर पोस्ट ऑफिसमधून एक प्रूफ ऑफ अ‍ॅड्रेस बनवून घेणे (दुसरा प्रूफ ऑफ अ‍ॅड्रेस गॅस जोडणीचा असतोच.) हेदेखील काम अवश्य करवून घेतो कारण परमनंट अ‍ॅड्रेस दरवेळेला चेंज करता येत नाही...

मला नंदिनी चा पॉइंट कळला. माधव ती म्हणते आहे बील नावावर नसेल तर ते अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून वापरायचेच नाही. दुसरे पुरावे द्यायचे. एच्डीएफसी किंवा आयसीआय चे बँक स्टेटमेंट अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून चालते का?

तिच्या ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट/ पॅनकार्ड ग्राह्य धरता येईल <<
पासपोर्टवर पत्ता असतो. माझा पासपोर्ट लग्नानंतर रिन्यू जेव्हा केला तेव्हा नवीन पत्ता, बदललेले मॅरिटल स्टेटस, नवर्‍याचे नाव हे सगळे अ‍ॅड झाले (त्याच्याही पासपोर्टवर हे सगळे आहे.) माझे नाव तेच आहे.

रेशनकार्डावर आधीच्याच नावाने नोंद करता येऊ शकते.

रेशनकार्डावर नोंद झालेली नसेल तर (हे मी पासपोर्ट रिन्यूअलच्या वेळेला केले होते) सोसायटीच्या सेक्रेटरीचे सोसायटीच्या लेटरहेडवर, सोसायटीच्या सहिशिक्यानिशी पत्र ग्राह्य धरले जाते.

मंजे, सासरच्या रेशनकार्डवर सुनंदा देसाईचे नाव नसेल आणि पत्त्याचा दुसरा कोणताच पात्र पुरावा नसेल तर तिला लग्नाचे प्रमाणपत्राची आवश्यकता लागेल.

पत्त्याचा दुसरा कोणताच पात्र पुरावा नसेल तर तिला लग्नाचे प्रमाणपत्राची आवश्यकता लागेल. <<
अथवा
सोसायटीच्या सेक्रेटरीचे सोसायटीच्या लेटरहेडवर, सोसायटीच्या सहिशिक्यानिशी पत्र ग्राह्य धरले जाते.

सोसायटीच्या सेक्रेटरीचे सोसायटीच्या लेटरहेडवर, सोसायटीच्या सहिशिक्यानिशी पत्र ग्राह्य धरले जाते. <<< हे माहीत नव्हते.

मंजे, सासरच्या रेशनकार्डवर सुनंदा देसाईचे नाव नसेल आणि पत्त्याचा दुसरा कोणताच पात्र पुरावा नसेल तर तिला लग्नाचे प्रमाणपत्राची आवश्यकता लागेल.
>>>>

मी हेच्च म्हणते आहे गजा Happy त्यासाठी इतका सव्यापसव्य करावा लागला Uhoh
सासरच्या रेशनकार्डावर सुनंदा देसाईचे नाव असले तरी ते फक्त 'सुनंदा' - 'सून' असेच असेल. सुनंदा देसाई असे नसणार Happy

एच्डीएफसी किंवा आयसीआय चे बँक स्टेटमेंट अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून चालते का?>>> वरदा, या प्रायवेट बँका आहेत. तू यापैकी स्टेटमेंट (ब्रँचने अटेस्ट केलेले) घेऊन जा. त्यांनी ग्राह्य धरले तर काही प्रश्नच नाही.

नीरजा, पण हे वरच्या ३३ गोष्टींच्या यादीत नाहीये Uhoh

वर जी यादी आहे, त्यातल्याच गोष्टी चालतात फक्त- असे मला वाटते.

मला नंदिनी चा पॉइंट कळला. माधव ती म्हणते आहे बील नावावर नसेल तर ते अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून वापरायचेच नाही. दुसरे पुरावे द्यायचे. <<< Happy नशीब.....

नीरजा, पण हे वरच्या ३३ गोष्टींच्या यादीत नाहीये>>> + १.

आधारसाठी वॅलिड डोक्युमेंट्ससाठी ही लिंक तपासा - http://uidai.gov.in/images/FrontPageUpdates/valid_documents_list.pdf

ह्या लिंकमधेही Supported PoR Documents containing Relationship details to Head of Family हे नमूद केलेले आहे बरं का! Wink

सासरच्या रेशनकार्डावर सुनंदा देसाईचे नाव असले तरी ते फक्त 'सुनंदा' - 'सून' असेच असेल. सुनंदा देसाई असे नसणार <<
आपण लक्ष दिले नाही तर तसे होते. अन्यथा आपण आडनाव न बदलण्याबद्दल लक्ष ठेवून आग्रह धरू शकतो.
नाव न बदललेल्या मुलींनो लक्षात ठेवा रेशनकार्डाच्या हपिसातल्या लोकांवर. ते नुसतेच पहिले नाव लिहून मोकळे होतात सवयीने आणि मग चुकून जर येऊ नये अशी वाईट वेळ आलीच तर तुमचे रेशनकार्ड आणि बाकीची कागदपत्रे जुळत नाहीत असा प्रॉब्लेम होतो.

मुळात रेशनकार्डावर स्पष्ट लिहिलेले आहे की हे ओळखपत्र म्हणून कुठेही वापरता येणार नाही. त्यावर कुठलेही आयडेन्टिफिकेशन नसते. फोटो नसतो. तरीही आपल्याकडे तेच अनेक ठिकाणी मागितले जाते.

बादवे, पासपोर्ट आणि लायसन्स या दोन्ही गोष्टी अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून चालतात.

ह्या लिंकमधेही Supported PoR Documents containing Relationship details to Head of Family हे नमूद केलेले आहे बरं का! <<< हो, पण ते बंधनकारक आहे का?

पण हे वरच्या ३३ गोष्टींच्या यादीत नाहीये <<
हे म्हणजे? सोसायटी सेक्रेटरीवाले का?
मग माहित नाही. मला पासपोर्टसाठी चालले होते.

बँक स्टेटमेंट चालतंय की अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून. आयटी रिटर्नची डॉक्युमेंटस चालतायत त्या यादीत. तुमचे पत्ता-फोटो असलेले एम्प्लॉयी कार्डही चालणारे.

मग मॅरेज सर्ट कशाला हवंय?

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रं, लायसन्स काढण्यासाठी लागणारी कागदपत्रं, पॅनकार्डसाठी लागणारी कागदपत्र आणि आधार कार्डसाठी लागणारी कागदपत्रं ही वेगळी असतात/ असू शकतात. आपण जे काम करत आहोत, त्याच्या याद्या तपासणे इष्ट.

गजा, बाकी काही नसेल तर Documents containing Relationship details to Head of Family चालतील. बंधनकारक नाहीये. ३३ मधले काहीही द्या.

हो वेगळी असू शकतात हे कळले.
जे खरंतर रिडीक्युलस आहे कारण दोन्ही गोष्टी याच देशातल्या नागरिकाची ओळख व्हॅलिडेट करणार्‍या आहेत. असो.

रहिवासी पुरावा म्हणून नाही चालत लायसन्स. ओळखीचा पुरावा म्हणून चालेल.

मी नवीन दुचाकी घेतली. त्याचं आरटीओतच रेजिस्ट्रेशन करायचं होतं. माझा लायसन्स अर्थात आरटीओनेच दिलेला आहे. तरीही आरटीओला लायसन्स चालत नाही रहिवासी पुरावा म्हणून!

हो, पण ते बंधनकारक आहे का?>>>

गजा Uhoh :अतिशय हताश बाहुली:

तुला आधार नोंदणीसाठी फक्त दोन पुरावे द्यायचे आहेत - १. ओळखपुरावा २. रहिवासी पत्त्याचा पुरावा.

पैकी, पत्त्याचा पुरावा जर तुझ्या नावावर नसेल किंवा तुझं राष्ट्रीयीकृत बँकेत खातं नसेल, मतदान ओळखपत्र नसेल तर तुला नातेसबंध सिद्ध करणारी कागदपत्रे द्यावी लागतील.
म्हणजे लाईट बील/ टेलिफोन बील इत्यादी तुझ्या बायकोच्या नावाने असेल तर त्या बिलासोबत तुला मॅरेज सर्टीफिकेट द्यावं लागेल. किंवा तुझ्या आई/ वडिल/ भाऊ इत्यादींच्या नावे असेल तर बिलासोबत रेशन कार्डाची कॉपी द्यावी लागेल.

येस रेशनकार्डावर फक्त पहिले नाव आहे. ह्म्म ते सोसायटीचं लेटर आणि बॅन्क स्टेटमेंट असं दोन्ही नेऊन पहाते. थॅन्क्स सगळ्यांना.

वरदा: परत एकदा: कृपया कोणते प्रूफ्ज चालतील हे तपासा. त्यासाठी याद्या नीट वाचा. सोसायटीचे पत्र वरच्या यादीत आहे का? असेल तरच चालेल. बँक सरकारी आहे का? तरच त्याचं स्टेटमेन्ट चालेल.

http://uidai.gov.in/images/FrontPageUpdates/valid_documents_list.pdf इथल्या लिंकच्या १-१८ आणि १-३३ पैकी दोन्ही याद्यांमधे आहे ड्रायव्हिंग लायसन्स.

माझ्या नावावर अशी कुठलीच अ‍ॅसेट (व्हेइकल, घर किंवा तत्सम) नसल्याने एवढ्यातलं माहिती नाही. पासपोर्टच दिलेला आहे मी सगळीकडे बहुतेक वेळेला.

येस रेशनकार्डावर फक्त पहिले नाव आहे. <<
मग पहिलं ते बदलून पूर्ण नाव करून घे.

ड्रायव्हिंग लायसन्स मात्र दोन्ही याद्यांमधे आहे. की तो मलाच दिसतोय?

Pages