लाल मुळ्याचे लोणचे.

Submitted by सुलेखा on 11 February, 2013 - 00:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल मुळा.
बेडेकर तयार लोणचे मसाला.
चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस.
तेलाची मोहोरी,हिंग घालुन तयार केलेली फोडणी.

क्रमवार पाककृती: 

लाल मुळा बर्‍याच दिवसांनी भाजीबाजारात दिसला.हा मुळा कच्चा सलाद म्हणुन खाता येतो तसेच लोणचे ही छान लागते.फ्रीज बाहेर फार टिकणार नाही. करायला अगदी सोपे असुन वेगळ्या चवीचे हे लोणचे खूपच छान लागते.
मुळा बारीक फोडी चिरुन घ्या.
मीठ ,लिंबाचा रस व लोणचे मसाला आणि फोडी छान हाताने कालवुन घ्या.
वरुन तेलाची फोडणी घाला व मिश्रण पुन्हा एकदा एकत्र करा.
हे लोणचे मुरायची वाट पहायची नाही .त्यामुळे लगेच खाण्यासाठी तयार आहे.
lal mulyache lonache.JPG
पांढर्‍या मुळ्यासारखाच मोठा हा लाल मुळा असतो.

माहितीचा स्रोत: 
माझी वहिनी.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी असा मोठा लाल मुळा कधीच पाहिला नाहीये. लाल मुळे एकदम छोटे छोटे गोल असतात. पातीसकट विकतात. ते कच्चेच खातो आम्ही. असा मुळा कुठे मिळतो?

वसईला / गावाकडच्या भाजीवालीबाई कडे हा मुळा मिळाला.साध्या पांढर्‍या मुळ्यासारखाच लांब व जाड असतो.चिरल्यावर आतुन पांढरा दिसतो.गोल आकाराच्या लहान टुर्निप सारखाच रंग आणि चव असते पण आकारमान मोठे.
साध्या मुळ्याचेही असेच लोणचे करतात.
शलगम हे आकारमानात बीटाच्या सारखे दिसते.शलगम आणि हा मुळा दोन्ही वेगवेगळे.शलगम,फ्लॉवर,हिरवे मटार यांचे मिक्स लोणचे[टिकाऊ असते] करतात.

छान प्रकार. पण हा मुळा मी अगदी क्वचितच मुंबईच्या बाजारात बघितलाय.
इथे एका भाजीचे देठ मुळ्याच्या चवीचे असतात. तेच वापरावे म्हणतोय.

दिनेशदा,
वसई च्या भाजीवालीकडे हा मुळा मिळाला..माठ,आंबट चुका,घोळ,आंबट- गोल बोरं.भाजीची खास हिरवी हरभरा पाने-शेवगा पाने ,सुवा ,मोळी/खारी भाजी अशा दुर्मिळ भाज्या मिळतात.