द्विमात्रिक गझल...

Submitted by अ. अ. जोशी on 30 January, 2013 - 00:04

गझलेसाठी सर्वात लहान बहर काय असू शकतो याचा विचार करीत असताना सुचलेली गझल...

धड
पड

फळ
वड

सर
गड

नर
नड

पर
जड

हस
रड

कुल
कड

फुल
झड

चुक
दड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सतीशजी,
>>> एक मात्री स्वरकाफियांची गझलही होईल की......... <<<

असे होवू शकत नाही. कारण मराठी गझलेत "अ" हा स्वरकाफिया अजूनपर्यंत मान्य झाला नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ती गझल अर्थहीनच असेल, यात तीळमात्रही शंका नाही. Sad

दुसरी गोष्ट म्हणजे ती गझल अर्थहीनच असेल, यात तीळमात्रही शंका नाही. <<<

Proud मग तिला तीळमात्रिक गझल म्हणावे

***** मी अतिलहान बहरात गझल लिहिली म्हणून लोकांनी ती लाईटली घेतली असे मला वाटते. अर्थ समजून न घेता कोणी "जबाबदारीचे भान"ही समजावले. म्हणून त्यांच्या करिता हे सर्व......

धड
पड
यात "धड आणि "पड" याचे वेगवेगळे अर्थ घेतले आहेत. एक म्हणजे "धडपड" अशा अर्थाने आणि दुसरा म्हणजे मध्यंतरी भारतीय जवानाचे फक्त "धड"च "पड"लेले आढळले होते, तो. आणखी म्हणजे, धड हे पडण्यासाठीच असते. आणि आणखी एक म्हणजे पडायचेच असेल तर धडपणे पड.

फळ
वड
"वडाची वडफळे झडल्यावर कावळे उडून जातात" असे वाक्य मराठीत वापरले जाते. याचा अर्थ असा आहे की, एखाद्याकडून आता आपला फायदा होणार नाही असे लक्षात आले कि लोक त्याला सोडून जायला लागतात.

सर
गड
"गड" "सर" करणे आणि "सरसर" सर करणे अशा दोन साध्या अर्थांनी.

नर
नड
मध्यंतरी एका बसमध्ये एका महिलेवर अत्याचार झाला. आणि पूर्वीपासूनच "नडणे" हा शब्दप्रयोग सर्वांनाच माहित आहे. जो "नर" असेल त्याने नारीला "नड"णे हे अजूनही अनेक कॉलेजात भूषण मानले जाते. त्या विकृत वृत्तीबद्दल हा शेर....

पर
जड
यात "पर" या शब्दाचे अनेक अर्थ अभिप्रेत आहेत. पहिला अर्थ म्हणजे "दुसरा" किंवा "परका". जो परका असतो तो नेहमीच जड वाटतो अशा अर्थाने. दुसरा अर्थ म्हणजे "श्रेष्ठ". श्रेष्ठत्व येणे ही गोष्ट जड आहे आणि श्रेष्ठ असणारा जड वाटतो, असा एक अर्थ. तिसरा अर्थ म्हणजे, "पंख". पंखात जडत्व आले, म्हणजेच आता भरारी मारता येणार नाही, असा एक अर्थ....

हस
रड
याबद्दल वेगळे काही सांगायला नको.

कुल
कड
"कुल" म्हणजे कूळ. जो तो आपल्याच कुलाची "कड" म्हणजे बाजू घेत असतो अशा अर्थाने...

फुल
झड
"फुल" कितीही सुंदर असले, मोहक असले, गंधयुक्त असले, तरी कधी ना कधी त्याला झडावेच लागते, अशा अर्थाने.....

चुक
दड
"चुक" करून "दड"णे अशा अर्थाने.....

अजयजी:

समीर,
तुम्हालाही गझल कळू नये याचे आश्चर्य वाटते

तुम्हाला काय म्हणायचे हे स्पष्ट आहे.
पण शेर म्हणजे कल्पना नव्हे.
गझलेचा विचार केला तर छोट्या बहर तील बहुतेक गझल निव्वळ प्रयोग म्हणूनच राहतात, हा अनुभव आहे.

धन्यवाद.

समीर

समीर,
>>>
गझलेचा विचार केला तर छोट्या बहर तील बहुतेक गझल निव्वळ प्रयोग म्हणूनच राहतात, हा अनुभव आहे. <<<

याचीच खंत आहे. Sad

गझलेचा विचार केला तर छोट्या बहर तील बहुतेक गझल निव्वळ प्रयोग म्हणूनच राहतात, हा अनुभव आहे.>>>

मी समीरशी सहमत आहे. छोटा बहर हा एक विरंगुळा म्हणून पाहिला जावा असे वाटते.

'माझे तुझ्यावर प्रेम आहे' ह्यातली भावना ह्यातून एक जरी शब्द वगळला तरी व्यक्त होऊ शकणार नाही असे वाटते.

धन्यवाद!

द्विमात्रिक गझल , त्यातही प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट करावा लागतो आहे . याचाच अर्थ केवळ वृत्तात शब्द बसवले कि झाली गझल ! नाही ?

भट साहेब आपल्या बाराखडीत म्हणतात ,

"६. शेर सहज कळावा आणि ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या थेट हृदयात शिरावा, अशी शब्दाची मांडणी असावी. जणू आपण बोलत आहोत, असा शेर असावा. सोपेपणा हे यशस्वी शेराचे रहस्य होय. "

याकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे .
त्यातल्या त्यात
जणु आपण बोलत आहोत असा शेर असावा हे अधिकच महत्वाचे .

Happy

राजीव,
>>>
भट साहेब आपल्या बाराखडीत म्हणतात ,

"६. शेर सहज कळावा आणि ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या थेट हृदयात शिरावा, अशी शब्दाची मांडणी असावी. जणू आपण बोलत आहोत, असा शेर असावा. सोपेपणा हे यशस्वी शेराचे रहस्य होय. "
<<<

हा केवळ कॉपी-पेस्ट केलेला विचार मला कधीपासूनच माहीत आहे. भटांचे थेट बोलणे माहीत आहे. ते कुत्रे हा रदीफ घेऊनही गझल करू शकतात. त्यामुळे त्यावर अधिक बोलणे नको.
तुमचे मत पटले नाही... Sad

@ विजय...
>>> छोटा बहर हा एक विरंगुळा म्हणून पाहिला जावा असे वाटते. <<<

अशामुळेच मराठी गझलकार वाढत आहेत, मात्र, गझल कमी होत चालली आहे आपल्याला जे पटत नाही ते चूक अशा भूमिकेत बरेच गझलकार वावरताना दिसतात. असो. तुमचे म्हणणे पटले नाही. Sad

राजीव,
तुमच्या हझलेवरचे हे प्रतिसाद पहा....

>>>>

अ. अ. जोशी | 1 February, 2013 - 11:12

हा प्रतिसाद तुमच्या लिखाणावर आहे.... पुनश्च

***** पण, हझलेतही गझलेप्रमाणेच ५ शेर हवेत.....
------------------------------------------------------------------------

राजीव मासरूळकर | 1 February, 2013 - 13:01नवीन

अ . अ . जोशी सर ,
सहमत !

भट साहेबांच्या बाराखडीनुसार पाच शेर असावेत , पण आधुनिक मराठी गझलेचे पुरस्कर्ते आता किमान तीन शेरांवर येऊन ठेपले आहेत . तीन शेरांचीही गझल मानणारा मोठा वर्ग आता निर्माण झाला आहे .

<<<<

हे जर तुम्ही मानता, तर उगाच पुन्हा भटांच्या बाराखडीतील वाक्ये कशाला..? "आधुनिक मराठी गझलेचे पुरस्कर्ते" हा शब्दप्रयोग आवडलाय.

स्वरकाफिया असलेली आणि रदीफ नसलेली गझल ही मान्य गझल नसते, कधीच..! अन्यथा...

माझे हसवे
त्याचे रडके

असे प्रकार होतील. त्यामुळे कमी बहरातील गझल ही शक्यतो स्वरकाफियाची नसावी. तसेच, जर सर्वात लहान म्हणजे द्विमात्रिक गझल करायची असेल, तर ती एकाक्षरी नसावीच. कारण, एकाक्षरी गझलेत रदीफ नसणारच आणि स्वरकाफियाच घ्यावा लागणार.

हा सर्व विचार करूनच मी, लहानातला लहान द्विमात्रिक आणि द्विअक्षरी बहर घेतला होता.
त्यामुळे तुमची गझल तंत्रात बसत नाही आहे... Happy

*** या प्रयोगाची टिंगल केली जाणार हे उघडच आहे. ते गृहित धरूनच मी गझल प्रकाशित केली होती.

तुम्ही म्हणताय त्यास खरे मानले तरी या प्रकाराला स्कोप नाही आहे फारसा

एकाक्षरी गझलेत रदीफ नसणारच आणि स्वरकाफियाच घ्यावा लागणार. >>>>>>
मग? तुमचे काय ओब्जेक्शन आहे का ? तुमच्या द्विमात्रिक मधे तरी कुठे आहे रदीफ? तुमचा नवा नियम खपवताना जुन्या स्वरांत काफिया वगैरे नियमाना आपण नावे कशी ठेवू शकता ?

तुमचा मुद्दा आधुनिक असेल तर देवसरांचा व अरविंदजींचा मुद्दा अत्याधुनिक म्हणावाच लागेल तुम्हाला !!!!

टीप : मी वरील चर्चेतील कोणाच्याच बाजूचा नाही मी गझलेच्या बाजूचा आहे याची कृपया नोंद घ्यावी
Happy

वैभव वसंतराव कु...
>>>
मग? तुमचे काय ओब्जेक्शन आहे का ? तुमच्या द्विमात्रिक मधे तरी कुठे आहे रदीफ? तुमचा नवा नियम खपवताना जुन्या स्वरांत काफिया वगैरे नियमाना आपण नावे कशी ठेवू शकता ?
<<<

पहिले म्हणजे Lol
आता एक एक वाक्ये घेऊ...
१) तुमच्या द्विमात्रिक मधे तरी कुठे आहे रदीफ? <<< रदीफशिवाय गझल चालू शकते.
२) तुमचा नवा नियम खपवताना जुन्या स्वरांत काफिया वगैरे नियमाना आपण नावे कशी ठेवू शकता ? <<< माझा नवीन नियम कुठला आहे? "जुन्या स्वरात" म्हणजे काय..?
३) रदीफ नसलेल्या आणि स्वरकाफिया असलेल्या गझलेला मीच काय.. अनेकांचे ऑब्जेक्शन आहे...

हे देवसर कोण..?

वैभवजी,
तुम्ही आता नवीन राहिलेले नाही आहात. तुम्ही सुद्धा इथे गझला देता आणि आम्ही सर्वजण त्या वाचतोसुद्धा आणि प्रतिसादही देतो. त्यामुळे एकदम रागावणे सोडून द्या. विचार करा.