नाव काढू नकोस चकण्याचे... (विडंबन)

Submitted by विडंबनराव on 25 January, 2013 - 22:31

समीर चव्हाण यांच्या गझलेवरून सुचलेले...

नाव काढू नकोस चकण्याचे..
कोण देणार बील साल्याचे ?

खरडू दे, खरडतो तशा गझला
काय कारण तुला पचकण्याचे....

टुरटुरावेस तू हवे तेंव्हा
हे कशाला निमित्त दाण्याचे

विश्व घोटाळतेच, चढली की..
शोध आता ठिकाण थार्‍याचे

गझल सांडून मोकळे व्हावे
होत नाही निदान झाड्याचे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

हझलकार माहिर दिसतोय.
कारण वृत्त तसे बिकट आहे.

खरडू दे, खरडतो तशा गझला
काय कारण तुला पचकण्याचे

गझलांचा कारखाना काढणा-यांना लागू.
असो, वर खरडु दे हवे वृत्तपूर्तीसाठी.

शेवटी बिल (बील नाही) द्यायला बरेच आहेत.

टुरटुरावेस तू हवे तेंव्हा
हे कशाला निमित्त दाण्याचे

Rofl

विडंबनराव,
समीरशी सहमत. वृत्त गडबडले आहे. नीट लिहा.

>> शेवटी बिल (बील नाही) द्यायला बरेच आहेत. << असे होते होय. मी चकण्याचा अर्थ बनणे असा घेतला होता. त्यामुळे बील चा संबंध असा जाणविला नव्हता. हम्म्म...