पीक फॉल मध्ये शॅननडोह व्हॅली(shenandoah valley) एक तरी ट्रेक करावा अशी इच्छा होती...मागच्या ऑक्टोबर मध्ये हा योग जुळून आला.
शॅननडोह व्हॅली बद्दल:
शॅननडोह व्हॅली १५० मैल उत्तर-दक्षिण अशी पसरली आहे. डोंगर रांगा, घनदाट जंगल,विपुल वन्य संपदा, उत्तम हवामान आणि सगळे डोंगर माथे जोडणारा साधारण १०० मैलाचा sky line drive. या कारणामुळेच National Geographic ने या पार्कचा अमेरिकेतील पहिल्या दहात समावेश केला आहे.या व्हॅली बद्दल आणि sky line drive बद्दल इथे लिहिलय.
ओल्ड रॅग माउंटन ट्रेक:
ओल्ड रॅग माउंटन ट्रेक हा पूर्व अमेरिकेतील नावाजलेला ट्रेक, शिखरांवरून दिसणारं अवर्णनीय दृश्य , उंच डोगर रांगा, खोल दऱ्या..एकदम 'बर्ड आय व्हयू' च दिसतो!! हा ट्रेक कठीण श्रेणीत मोडतो कारण २km चे hard rock scramblling म्हणजे नळीच्या वाटेने हरीश्चंद्रगड चढण्यासारखा आहे, ३-४ जागा अगदीच संभाळून चढाव लागत, थोडीशी चूक आणि थेट कडेलोट., एका ठिकाणी तर चक्क १.५ फूट उडी मारावी लागते, ईकडे खरोखर घाबरायला होतं कारण जिथून उडी मारणार तो दगड आणि ज्या दगडावर मारणार तो, असे ते दोन्ही उतरते दगड, तोल गेला तर फक्त १५० फूट खाली. .
आही लूप ट्रेक करायचा ठरवलं जेणे करून दोन्ही वाटा बघून होतील...लूप ट्रेक म्हणजे जायचा आणि यायचा मार्ग भिन्न पण सुरवात आणि शेवट एकच. चढताना ६km चा रिज ट्रेल ने जायचं त्यात २km च rock scramblling होत आणि उतरताना सॅडल ट्रेल वरून 'विकली हॉलो फायर रोडला' यायचं आणि तेथून कार पार्किग पर्यंत. हा परतीचा प्रवास ८.५km. बहुतांश ट्रेकर्स असाच लूप ट्रेक मार्ग पसंत करतात.
प्रची १: Sky Line Drive वरून दिसणारा ओल्ड रॅग पर्वत.
ट्रेकची सुरवात आतिशय सुंदर झाली,डोगाराच्या पायथ्याशी गाडी पार्क केल्या केल्या तेथे नेमलेल्या माहीतगाराने हातात नकाशा दिला,ट्रेकचा मार्ग मार्करने काढून दाखवला, थोडक्यात महत्वाची माहिती सांगितली आणि मदत लागल्यास एक emergency फोन नंबर पण दिला. हे सगळ माहीतगाराच काम साधारण ८-९वी तील विध्यार्थी करत होते.खरच कुतूहल वाटलं हे बघून.
प्रची २: सकाळच्या कोवळ्या उन्हातल सोनेरी गवत.
सकाळीचे ९ वाजले होते.... बॅगत दुपारच जेवण, पाण्याच्या बाटल्या, कॅमेरा, लेन्स, ट्राय-पॉड एवढ्याच सामानासह सौ सोबत ट्रेक ची सुरवात केली. वातावरणात बऱ्यापैकी थंडी होती म्हणून एक जाड जॅकीट पण चढवल. फॉल सीझन ऎन बहरात होता. एका इग्रजी वाक्याचा पुनश्च प्रत्यय आला Autumn is a second spring where every leaf is a flower!
प्रची ३: कार पार्किग मधून ट्रेकच्या वाटेकडे जाताना, हे अंतर साधारण १ की.मी. आहे.... रस्त्याच्या दुतर्फा निसर्गाची रंग-पंचमी सुरु होती.
प्रची ४: उंच लांबसडक पाईन वृक्ष्याच्या जंगलातून जाणारी वाट....असं वाटत होत की ही वाट कधीच संपूच नये.
प्रची ५: वाटेत बरेच वृक्ष मुळासकट उन्मळून पडले होते, त्यातल्या काही पडलेल्या झाडांची खोडं ओली होती म्हणजे नुकतीच पडलेली असणार कदाचित (४-५ महिने?)...पण बहुतांशी झाडं वादळाने पडली होती आणि काही मोजकीच वीज कोसळून (अश्या झाडांच खोड कोळश्यासारख काळ होत).
असे हे वादळाने पडलेले झाड सौंदर्य अधिकच खुलवत होत.
प्रची ६: पाईन वृक्षांच्या मधून डोकावणारा रवी.
प्रची ७: आमच मार्गक्रमण आतिशय संथ गतीने सुरू होत...अगदी रमत गमत, बरेच ग्रुप आम्हाला मागे टाकून पुढे जात होते...एक ग्रुपतर आमच्या मागून जाउन परत पण आला आणि जाताना टाटा करून गेला वाटेत घेतलेली थोडी विश्रांती.
प्रची ८: घटकाभर विश्रांतीनंतर परत मोहिमेच्या वाटेने.
प्रची ९: वाटेत पडलेल्या झाडांचा वन्य विभागाने फक्त झाडाचा वाटेत येणारा भाग कापला होता...त्यामुळे वाटही नाही बदलली आणि झाड ही जैसे थे.....इथल्या वन्य विभागाला सलाम.
प्रची १०: आभाळाच्या पडद्यावर ओक,पाईन, मॅपल याची मस्त मैफल रंगली होती.
प्रची ११: वर चढता-चढता झाड विरळ होत गेली, आकाश दिसायला लागल आणि वाटेत मोठे दगड दिसायला सुरवात झाली होती, त्यामुळे अंदाज आला की आता कॅमेरा बॅगेत ठेवायची वेळ आहे आली कारण rock scramblingला लवकरच सुरवात होणार होती.
प्रची १२: दुपारचे २ वाजले तरीही आही rock scrambling पर्यंत पोहचलो नव्हतो. माहीतगाराने सांगीताल्यानुसार हा ट्रेक ४-६ तासाचा आहे आणि अजून आम्हाला शिखर गाठायचं होत, त्यात सूर्यास्त ५.३० त्यामुळे या अश्या अपरिहार्य कारणामुळे ट्रेकचा वेग वाढवायला लागणार होता. आता गिअर बदलून निघालो सुसाट rock scramblingच्या वाटेने.
प्रची १३: हूशश....पोहचलो पहिल्या पॅचवर. तसा बराच सोपा होता हा पॅच, पण कॅमेरा-लेन्स आत ठेवाव्या लागल्या...पण नंतरच सगळ scrambling हे गुळगुळीत दगडावरून होतं त्यामुळे कॅमेरा गळ्यात अडकवायची हिंमत नाही झाली आणि वेळ कमी असल्याने कॅमेरा काढ-घाल करण्यात वेळ दडवुन चालणार नव्हत. रॉक स्क्रम्ब्लिंगचे काही फोटो मात्र हुकले
प्रची १४: ओल्ड रेग माउंटनच ३२०० फुट उंच शिखर पहील्यादा नजरेत आल.
प्रची १५: दगडांवरून तर कधी दगडाखालून आमची वाटचाल चालू होती.
प्रची १६: बरोबर चार वाजता आम्ही शिखरावर पोहचलो....डब्बे खात मस्त शिखरावरून वरून व्ह्यू बघताना काय मस्त वाटत.
प्रची १७: शिखरावरून वरून दिसणारा नजारा.
प्रची १८: परतीच्या वाटेने निघालो...निघायला ४.३० वाजले.....सॅडल ट्रेल २.५km आहे, ती झपझप उतरलो आणि 'विकली हॉलो फायर रोडला' लागलो...हा रस्ता दगडी आहे पण ४ चाकी जाईल इतका मोठा आहे.
प्रची १९ :'विकली हॉलो' रस्त्या वरुन चालाताना आहूपे-भिमाशंकरची आठवण आली. आता सूर्य अस्ताला आला होता आणि उरलेला ६km चा रस्ता संधी प्रकाशात संपला.
फेसबूकचं पान- https://www.facebook.com/Tanmay.Photography
फ्लिकर - http://www.flickr.com/photos/tanmay_photography/
धन्यवाद,
तन्मय शेंडे
लेखनाचा प्रकार बदलून "लेखनाचा
लेखनाचा प्रकार बदलून "लेखनाचा धागा" केला आहे. आता दिलेले सर्व प्रतिसाद राहतील.
स्प्रिंग (किंवा कधीही) मध्ये
स्प्रिंग (किंवा कधीही) मध्ये ओल्ड रॅग गटग करायला खरच मजा येईल. लांबून येणार्या मायबोलीकरांना आदल्या रात्री आमच्याकडे येता येईल मुक्कामाला. माझ्या घरापासून दीड-दोन तासांवर आहे ही जागा.
@ तन्मय, त्या जाड माणसाने नंतर ट्रेक केला की नाही माहित नाही कारण आम्ही तिथून लगेच निघालो. तो या कपारीत अडकण्याच्या एपिसोडने बराच घाबरला होता आणि त्याला दमही खूप लागत होता.
तन्मय तुम्हाला ओल्ड रॅगची ट्रेल आवडली असेल तर व्हाइट ओक/सिडर ट्रेल पण आवडेल. Elevation, length आणि difficulty level साधारण ओल्ड रॅग सारखेच आहे.
धन्यवाद admin !! रूनी पॉटर -
धन्यवाद admin !!
रूनी पॉटर - खरच अस निसर्गमय गटग करायला फार धमाल येईल.
शॅननडोह व्हॅली आणि
शॅननडोह व्हॅली आणि व्हर्जिनीया कंट्रीसाइड प्रची आणि माहिती
http://www.maayboli.com/node/40895
मस्त फोटो!
मस्त फोटो!
व्वा सुंदर .. काय अप्रतिम
व्वा सुंदर .. काय अप्रतिम निसर्ग आहे...
आवडल
सुंदर फोटो आणि वर्णन !
सुंदर फोटो आणि वर्णन !
अप्रतिम निसर्ग आणि रंग...
अप्रतिम निसर्ग आणि रंग...
अप्रतिम फोटो आहेत!!
अप्रतिम फोटो आहेत!!
वॉव सिंपली ऑसम... वाटा,
वॉव सिंपली ऑसम...
वाटा, जंगल.. सर्व परिकथेतलं दिसतंय.. खरीच निसर्गाची रंगपंचमी स्मित
सुंदर, नेटकं वर्णन.. >>>>> +१००० .......
"१२७ अवर्स" पिक्चरही आठवला ते दगड बघून ......
प्रज्ञा,रोहित,डॅफोडिल्स,sanky
प्रज्ञा,रोहित,डॅफोडिल्स,sanky,आबासाहेब,शशांक खुप खुप धन्यावाद
अप्रतिम अनुभव मस्त
अप्रतिम अनुभव मस्त
जल्ला तन्मया..नाळीच्या वाटेत
जल्ला तन्मया..नाळीच्या वाटेत भेटला होतास नि आता थेट तू तिकडची डोंगररांग दाखवून जळवलास आपल्याला.. !! फोटोज सगळे जबरी ! सुं द र च !
अप्रतिम फोटोज फॉल कलर्स फार
अप्रतिम फोटोज फॉल कलर्स फार सुंदर दिसत आहेत
अप्रतिम फोटोज फॉल कलर्स फार
अप्रतिम फोटोज फॉल कलर्स फार सुंदर दिसत आहेत
अप्रतिम फोटोज फॉल कलर्स फार
अप्रतिम फोटोज फॉल कलर्स फार सुंदर दिसत आहेत
shekharkul - त्रीवार धन्यवाद
shekharkul - त्रीवार धन्यवाद !!!
Yo.Rocks - आभारी आहे....पण सह्याद्री जाम मिस करतो यार
खूप मस्त फोटोज... आवडले
खूप मस्त फोटोज... आवडले
Pages