शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलेशियन एअरवेजचे विमान कोसळले नसून कुठे ना कुठे पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे अशी चिन्हे आहेत. त्या दिशेने तपास चालू आहे. म्हणजे कसे का असेनात पण सगळे अडिचशे प्रवासी आणि क्रू सुखरूप आहेत हे शुभ वर्तमान समजावे का? तसे ते असावे ही प्रार्थना आहे देवाजवळ!

मैत्रेयी +१
उलट चीन आणि फ्रान्सच्या उपग्रहांनाही ऑस्ट्रेलियाच्या नैऋत्येला बर्‍याच दूरवर संशयास्पद गोष्टी/तुकडे पाण्यावर तरंगताना दिसले आहेत.

मैत्रेयी, मागच्या आठवड्यातल्या रेडिओच्या बातम्यांमधून सतत तसं ऐकल्यामुळे लिहिलं होतं.. पण आता लेटेस्ट घडामोडींवरून दुर्दैवाने ती शक्यता मावळलेली आहे बहुतेक Sad
वरदा, मीही त्याच संदर्भाने आता हे म्हणतेय.

आपल्या देशात मेडिकल सायन्स किती प्रगत झालं आहे याची प्रचिती डॉ.सुरेश शिंदे यांच्या माबो वरच्या लेखांमधून होत असतेच. अशीच एक अत्यंत आशादायी बातमी.

"ह्रदयात तयार झालेल्या सुपारी एवढ्या ७० गोळ्यांमुळे मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या युवकाची यशस्वी शस्त्रक्रीया नागपूरच्या डॉक्टरांनी करुन दाखवली"

सविस्तर वृत्तः
मटा:
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/hart-...

आजचा ईसकाळ

ओळखायला शिका फेसबुकवरील "चेहरे'

मुलींनी काळजी घेतानाच गैरप्रकाराविरुद्ध धाडस दाखविण्याची गरज
कोल्हापूर : विशाखा (काल्पनिक नाव) अतिशय देखणी. हुशार. कॉलेजच्या सर्व कार्यक्रमांत तिचा सहभाग. गॅदरिंगमध्ये तिने समूहनृत्यात भाग घेतला. नृत्याच्या एका टप्प्यात मुलाच्या हातात हात घालून फेर धरायचा होता. तिने सहजपणे मुलाच्या हातात हात दिला. कार्यक्रम संपला. हातात हात देण्याचा क्षणही विसरला गेला; पण विकृत मनोवृत्तीच्या त्या तरुणाने काही दिवसांनी मुद्दाम हातात हात घेतलेल्या त्या क्षणाचा मोठा केलेला फोटो फेसबुकवर टाकला आणि "तिच्या' घरी गहजब उडाला. नातेवाईक, स्नेह्यांचे फोनवर फोन सुरू झाले. विशाखाच्या आईला तर घामच फुटला. स्वत: विशाखा हडबडून गेली; पण काही क्षणांत ती भानावर आली...

तिने ठरविले, हा फोटो टाकणाऱ्याचा "शोध' घ्यायचा. तिने सायबर क्राईम पाहणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याचा सल्ला घेतला व ज्याने फोटो फेसबुकवर टाकला, त्याच्या घरी ती पोचली. पायातले चप्पल काढून तिने हातात घेतले व घरात बसलेल्या त्या "अज्या' नावाच्या तरुणाची कॉलर पकडली. त्याला घराबाहेर ओढले व दारात उभे राहून त्याला चपलाने फटकावले. कॉलेजमध्ये फुकटचा रूबाब करणारा तो अज्या या प्रकाराने घाबरला. हात जोडू लागला. सगळी गल्ली हे बघायला गोळा झाली. "ताई राहू दे' म्हणत काही जण मध्यस्थी करू लागले; पण विशाखा घाबरली नाही. "पुन्हा फेसबुक ओपन करायचा व काल टाकलेला फोटो वाईट हेतूने टाकला होता, असे फेसबुकवर कबूल करून माफी मागायची,' असा दम तिने दिला. एका क्षणात तो फेसबुकबहाद्दर माफी मागायला तयार झाला व काही वेळातच फेसबुकवर त्याचा माफीनामा झळकला.

कोल्हापुरात घडलेली ही सत्य घटना. यातल्या विशाखाने धाडस दाखवले व फेसबुकवर बसून एखाद्याच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या त्या अज्याला वठणीवर आणले. पण, अशा अनेक विशाखा आहेत, की त्या भीतीच्या छायेखाली आहेत. पूर्वी मुलींना चाकूची, चेहऱ्यावर ऍसिड मारण्याची धमकी दिली जात होती; पण आता "तुला फेसबुकवर टाकतो,' म्हणून मुलींना भीती घातली जात आहे. आता प्रत्येकाच्या हातात मोबाइल असल्याने कळत-नकळत अनेक मुलींची छायाचित्रे टिपणारी विकृत तरुणांची एक फौजच्या फौज तयार आहे. कळत-नकळत मुलींची अशी छायाचित्रे घेणे हा भाग वेगळा आहे. मात्र, अनेक मुलीही फेसबुकच्या जाळ्यात अडकल्या आहेत. फेसबुकवर रोज वेगळा ड्रेस, रोज एक वेगळी पोझ, रोज एक हेअर स्टाईल, रोज एक हाय हिल्स घालून फोटो टाकण्याचे त्यांना व्यसनच लागले आहे आणि फेसबुक म्हणजे गावातल्या चावडीसमोरचा कट्टाच झाला असल्याने हे फोटो सगळे गाव बघत आहे.

फुकटच्या कॉमेंट करायला अनेकांना संधी मिळत आहे. त्यामुळे मुलींनीही फेसबुकवर आपले किती फोटो टाकायचे, हे एकदा पाहण्याची गरज आहे. कधीतरी या फोटोत मिक्‍सिंग करून हा फोटो कोणाबरोबरही जोडला जाण्याची भीती आहे. आता हे तंत्रज्ञान म्हणजे दोन बोटांचा खेळ झाला आहे. कधीतरी डोके फिरवून टाकेल, अशा पोझमधले छायाचित्र फेसबुकवर कोणी झळकवले, तर आश्‍चर्य नसणार आहे. विशाखा धाडशी होती म्हणून ती फेसबुकवर फोटो टाकणाऱ्याची कॉलर पकडू शकली. इतर मुलींनीही तसे धाडस दाखवण्याची गरज आहे. कारण कॉलेजवर, गल्लीत, तालमीजवळ कितीही रूबाब करणाऱ्याची कॉलर जेव्हा एखादी मुलगी धरेल, तेव्हाच त्याचा रूबाब उतरणार आहे.

तक्रार धाडसाने करा
फेसबुकवर एखाद्या तरुणीचे, गृहिणीचे छायाचित्र परस्पर कोणी झळकवले तर ती तरुणी पोलिसांत तक्रार करू शकते. सायबर क्राईमखाली संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, ""कोणीही कोणाच्या छायाचित्राचा गैरवापर करू शकत नाही. त्यामुळे फेसबुक, ट्विटरची भीती घालणाऱ्यांविरोधात तरुणींनी तक्रार करण्यास धाडसाने पुढे यावे.

लोकहो,

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली संतांची बदनामी करणाऱ्यांना न्यायालयाने जोरदार चपराक हाणली आहे. कृपया ही बातमी पहावी :

'संतसूर्य तुकाराम' आणि 'लोकसखा ज्ञानेश्वर' फाडून टाका- न्यायालय

आ.न.,
-गा.पै.

पुरावे का दिले नाहीत? अजब आहे.
आधी यादवांबद्दल सहानुभूती वाटली होती. आता सगळेच चोर वाटतात.

नंदिनी +१
पण त्याच बरोबर अभिनंदन ज्या कुणी नातेवाईक/डॉक्टरने "सिस्टीम"समोर हे करता येईल का हे विचारायचं धाडस दाखवल तिचे/त्याचेही अभिनंदन. म्हणतात ना मागा म्हणजे मिळेल.

नंदिनी - वॉव... छान बातमी दिलीत. सम्पुर्ण टिमचे (नातेवाइक, डॉक्टर, पोलिस, चालक... ) अभिनन्दन. कार्य यशस्वी होण्यामधे परस्परातील समन्वय खुप महत्वाचा आहे...

गिरीकंद, नंदीनी मस्त बातम्या.

पहिल्या बातमीने आनंद झालाच पण दुसर्‍या बातमीने विशेष आनंद ह्या साठी झाला की भारतात आपण सर्व, सगळे काही सरकार वर सोडून देण्याच्या प्रवृत्तीचे आहोत ह्या समजाला छेद देणारी ही बातमी हुरुप वाढवणारी आहे. देशाला चांगले दिवस, आपोआप येत नाहीत आपल्याला आणावे लागतात. अशी प्रोअ‍ॅक्टीव्हिटी समाजाचे सर्वसामान्य घटक करू पहात आहे हे खरोखरच शुभ वर्तमान आहे.

मायकेल शुमाकर कोमातुन बाहेर.

>> हि बातमी छानच आहे. पण मी डिटेल बातमीत वाचले कि तो आयुष्यभर वेजिटेटिव्ह स्टेट मध्ये राहाणार म्हणुन. Sad

कोणाला काही अधिक माहिती आहे का?

http://timesofindia.indiatimes.com/india/No-lal-batti-Chennai-halts-traf...

या रोडवरून संध्याकाळी पावणे सातवाजता पंधरा मिनीटांत अ‍ॅम्ब्युलन्स काढण्यासाठी ड्रायव्हरचे खास अभिनंदन.>>> अरे मला ही लिंक का दिसत नाहीये???

या केसमधे हेलिकॉप्टर वापरता आले असते तर अजुन फास्ट काम झाले असते आणि ग्रीन कॉरिडॉर करायची गरज पण पडली नसती. अर्थात फिजिबिलिटी नसेल तर या मुद्द्यात दम नाही.

देशाला चांगले दिवस, आपोआप येत नाहीत आपल्याला आणावे लागतात. अशी प्रोअ‍ॅक्टीव्हिटी समाजाचे सर्वसामान्य घटक करू पहात आहे हे खरोखरच शुभ वर्तमान आहे.>>
खरंय हर्पेन.
खूपच मस्त बातमी आहे.

अ‍ॅम्ब्युलन्स ची बातमी चांगली. शूमाकरची ही - त्याला पूर्ण बरे होण्याकरिता शुभेच्छा!

सर्पदंशावर आयुर्वेदिक आणि वेगवान पर्याय सापडला. आयुर्वेदाला नावे ठेवणार्‍यांना सणसणीत चपराक.

Snakebite-inundated rural PHCs find new saviour in Ayurveda

When a 40-year-old female farmhand from rural Malharpeth in Satara was rushed to the area's Primary Healthcare Centre (PHC)................................was given only 20 minutes to live by local medical experts.

In a last ditch attempt to save her life, an oral ayurvedic tablet — 'Pinak' — was administered. Miraculously, the woman began responding within no time, and her life was saved.

महिला-मुलांना आईचे नाव लावता येणार

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

सरकारी कागदपत्र-अर्जांमध्ये केवळ वडिलांचे किंवा पतीचे नाव लावण्याची सक्ती काढून टाकण्यात येणार असून आता यापुढे आईचे नाव व आडनाव लावता येणार आहे. राज्य सरकारच्या तिसऱ्या महिला धोरणानुसार सरकारी अभिलेख्यांमध्ये महिलांना व मुलांना त्यांच्या पसंतीनुसार नाव लावण्याचा अधिकार सरकारने दिला आहे.

सरकारच्या संबंधित विभागांच्या कामकाजांमध्ये महिलांचे विशिष्ट आडनाव खास करून पतीचे अथवा पित्याचे लावण्याचा आग्रह धरण्यात येणार नाही. नाव किंवा अडनाव काय असावे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रिला राहील, असे महिला व बालविकासमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. यासंबंधीच्या सूचना सर्व सरकारी विभागांना देण्यात येतील व त्याची अंमलबजावणी न झाल्यास त्याविरोधात थेट त्याठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविण्याचा अधिकार संबंधित महिलेला असेल. सर्व सरकारी अर्जांत आई किंवा वडील किंवा दोघांचे नाव यापैकी कोणताही पर्याय निवडण्याची मुभा राहील. आई किंवा वडील यापैकी कोणतेही एक नाव पुरेसे मानले जाईल, असे नव्या महिला धोरणात निश्चित करण्यात आल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

-----------------------

पुरोगामी महाराष्ट्रात चांगले निर्णय झाला

PSLV-C23 चे सोबत पाच परदेशी बनावटीचे कृत्रिम उपग्रह घेऊन श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डान आज सकाळी पार पडले
यात दोन कॅनडा,जर्मनी आणि सिंगापूर चे प्रत्येकी एक कृत्रिम उपग्रह आहेत.तसेच त्यात फ्रांसचा स्पॉट-७ हा मुख्य कृत्रिम उपग्रह आहे.आत्तापर्यंत एकूण ४० विदेशी सॅटेलाईट्स आपल्या पीएसलव्ही ने यशस्वी प्रस्थापित केले आहेत.

पाचपैकी,यात फ्रांसचा स्पॉट-७ पृथ्वी चे निरीक्षण करणे या सदरात मोडणारा स्पॉट ६ नंतरचा उपग्रह आहे.आता दोन्ही उपग्रह जोडीने काम पहाणार आहेत.जर्मनीचा AISAT हा जागतिक सागरी दळवळण व्यवस्था पहाणार आहे.
NLS 7.1 आणि NLS 7.2 हे कॅनडाचे कृ.उपग्रह परस्परपूरक कार्य करतील जे जीपीएस प्रणालीत महत्वाचा वाटा देतील.तसेच इतर कृत्रिम उपग्रह आणि इतर सेलेस्टिअल ऑब्जेक्टवर लक्ष्य ठेवण्याचं काम करेल.आणि व्हेलोक्स-१ हा सिंगापुरी उपग्रह इमेज सेन्सींग,तसेच परस्परपूरक उपग्रहतील रेडीओ-फ्रिक्वेन्सी दुवा सांधण्याचे काम पार पाडेल

इस्रोचं स्वस्त तंत्रज्ञान वापरुन अनेक देश आपले उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी भारताची मदत घेत आहे हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे.

इस्रोचे शास्त्रज्ञ आणि भारत तसेच सर्व देशांचे,अभिनंदन!!

कुख्यात गुन्हेगार, असंख्य रक्तरंजित गुन्ह्यांचे शिल्पकार, गुन्हेगारीविश्व अर्थात अंडरवर्ल्ड निर्माण करण्यात सिंहाचा वाटा असणारे ज्येष्ठ अपराधी दाऊद इब्राहिम ह्यांच्या भगिनीचा हृदयविकाराने मृत्यु झाला. हसीना परकार ५५ ह्या बाई आपल्या भावाप्रमाणेच खंडणी, हवाला वगैरे उद्योगात रममाण होत्या. इतकी वर्षे मुंबईत राहून कुठल्याही केसमधे न गुंतता सुखाने कारभार करत होत्या. त्यांच्या पतीचा अन्य गोटातील कुठल्याशा गुंडाने खून केला होता. त्याचा फिल्मी स्टाईलने दाऊदने बदलाही घेतला होता म्हणे.
आता लवकरच ज्येष्ठ बंधूंच्या मृत्यूची बातमी मिळेल अशी आशा.

http://indiatoday.intoday.in/story/dawood-ibrahim-sister-haseena-parkar-...

शरियत न्यायालये बेकायदेशीर- सर्वोच्च न्यायालय
- - वृत्तसंस्था
सोमवार, 7 जुलै 2014 - 12:08 PM IST

Tags: supreme court, fatwa, shariat courts, muslims, new delhi
नवी दिल्ली - शरियत कायद्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) महत्त्वपूर्ण निकाल देत, शरियत कायद्यांना परवानगी नसल्याचे व फतव्यांना कायदेशीर मान्यता नसल्याचे म्हटले आहे.

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5390275373052873110&Se...

Pages