रंगीत पेन्सिल्स - स्वीचबोर्ड!

Submitted by वर्षा on 22 January, 2013 - 04:16

स्थिर चित्र सरावचित्र-१

आता जरा काही दिवस पक्ष्यांना विश्रांती देणार आहे::)
स्थिर चित्र (स्टील लाईफ) चा सराव चालू करतेय.
हा स्वीचबोर्ड माझ्या टेबलशेजारीच आहे.
हे पाहून असं वाटण्याची शक्यता आहे आहे की मला अगदीच दुसरं काही नाही सापडलं का स्केच काढायला Proud

हे स्टेडलर वॉटर कलर पेन्सिल्सने काढलंय पण पाणी न वापरता.
पेपरः फॅब्रिआनो अ‍ॅसिड फ्री पेपर 200g/m2

याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - पुन्हा एकदा व्हर्मिलियन फ्लायकॅचर आणि काही उडणारे Northern Gannets: http://www.maayboli.com/node/40245
रंगीत पेन्सिल्स - डोंगरी चिमणी (माऊंटन स्पॅरो): http://www.maayboli.com/node/39974
रंगीत पेन्सिल्स - The Emperor Penguin and its chicks: http://www.maayboli.com/node/39250
रंगीत पेन्सिल्स - चिमणी: http://www.maayboli.com/node/37589
रंगीत पेन्सिल्स - केळफुलावरील सूर्यपक्षी(सनबर्ड ओव्हर बनाना ब्लॉसम): http://www.maayboli.com/node/37011
रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या: http://www.maayboli.com/node/35872
रंगीत पेन्सिल्स - The Great Gray Owl: http://www.maayboli.com/user/340/created
रंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्स: http://www.maayboli.com/node/34195
रंगीत पेन्सिल्स - व्हर्मिलियन फ्लायकॅचरः http://www.maayboli.com/node/31502
रंगीत पेन्सिल्स - रॉबिनः http://www.maayboli.com/node/30934
रंगीत पेन्सिल्स - घोडा: http://www.maayboli.com/node/28145
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्र नेहमीप्रमाणेच सुरेख आहे!

थ्री-पीन सॉकेटची बटनांवर पडलेली सावली मात्र प्रमाणबद्ध आलेली नाही. ती इतर कशाची तर नाही?

धन्यवाद सर्वांना.
सावलीबद्दल पूर्ण सहमत आहे. त्या पांढर्‍या कन्व्हर्टरची सावली गंडली आहे. म्हणजे ती बाजूच्या बटनांवर पडली होती हे खरेच आहे पण मला स्केच नाही करता आली.
आणि शिवाय त्याच्यावर आणि एकदम डावीकडील पांढर्‍या ब्लाईंड प्लगवर त्यांची नावे (ब्रँडनेम्स)पण होती ती राहिलीच. आणि ते लाल बटण (?) आहे त्याच्या रंगकामातही गडबड झाली. माझा बेस कलरच चुकला. पिवळा घ्यायला हवा होता.

बाकी स्केच करण्यापूर्वी मला वाटलं होतं की साध सरळ सोपं असेल स्वीचबोर्ड रेखाटणं. पण प्रत्यक्षातला अनुभव वेगळाच होता. Happy

जबरी यार.... !!
अगदी भिंतीवर लावलेल्या स्वीच चा फोटोच वाटतोय गं !
कमाल आहेस तू !

मस्त दिसतंय. कल्पनाच किती सुरेख आहे. रोजच्या वापरातली वस्तू पण कधी लक्षातही येत नाही त्यातही काही सौंदर्य दडलंय याची.