निराशा / वैफल्य

Submitted by असो on 21 January, 2013 - 03:59

निराशा / वैफल्य या संदर्भात माहिती हवी आहे.

वैफल्यातून येणा-या प्रतिक्रिया / वैफल्यग्रस्त होण्याची कारणे / स्वतः किंवा आपल्यामुळे इतरांच्यात वैफल्य येऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी / स्वभाव विशेषाप्रमाणे होणारे परिणाम / उपचार इ. माहिती मिळाल्यास आभारी राहीन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्जू तुम्ही खरंच खुप धीराच्या आहात. फक्त एक सल्ला.. आवडला नाही तर सोडुन द्या..

भाऊ-बहिण म्हणतात की आम्ही सांभाळतो त्याला तुम्ही दोघे फिरून या, picture बघा, नाटक बघा पण त्याला सोडून आम्ही नाही एन्जॉय करू शकत.

>> असं करू नका. मुलं स्पेशल चाईल्ड असोत किंवा सर्वसामान्य, नवरा बायकोचे एक स्वतंत्र खास असे नाते असते. मुलं नॉर्मल असलेले (ज्यांना फिरायला नेता येईल, सिनेमाला किंवा नाटकाला नेता येईल) पालकसुद्धा आपल्या मुलांना आज्जी/आजोबा/मामा/काका कोणाकडेतरी सोडून थोडा वेळ का होईना पण फिरतात की. त्यामुळे आपण मुलाला मुद्दाम वार्‍यावर सोडून भटकतोय असा अपराधी भाव मनात आणू नका. निदान लग्नाचा वादी वै. असेल तेव्हा तरी आवर्जुन किमान १-२ तास तरी दोघे एकटेच बाहेर जाऊन या प्लीज. कदाचित हे १-२ ताससुद्धा तुम्हाला पुढच्या १-२ वर्षांचं बळ देतील. तुमच्या नात्यावर आयुष्यातल्या चॅलेंजेसची छाया पडू देऊ नका. एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधा आणी थोडासा वेळ फक्त एकमेकांसाठी राखुन ठेवा.

>>इथे मदत, सल्ला देणारे खूप लोक आहेत आणि तुला मनमोकळे करायला हक्काची जागा आहे.भाऊ-बहिण तुला सगळीच मदत करायला तत्पर आहेत ना तसेच आम्ही.>>+१

अन्जू, इथे लिहून मोकळी झालीस हे चांगले केलेस. तू स्ट्रॉन्ग आहेस गं! स्पेशल नीड असलेल्या बाळाचे आई-बाबा असणे शारीरिक आणि भावनिक पातळीवर खूप थकवणारे असते. अशावेळी रडू येणे साहाजिकच आहे ना! माझ्या कझिनच्या मुलीला डाऊन्स सिंड्रोम होता. तेव्हा तुम्ही कशा परीस्थीतीतून जात आहात याची थोडीशी कल्पना करु शकते. तुमचे भाऊ-बहिण मदत करायला तयार आहेत तर खरेच थोडा वेळ तुमच्यासाठी द्या. केअर गिव्हरलाही विश्रांतीची गरज असते.

धन्यवाद सर्वांना. युरी,स्वाती खरं आहे तुमचे म्हणणे. माझा प्रॉब्लेम इथे मांडल्याने मला तुमचा आधार मिळाला, पण बाफचा विषय हा माझा वैयक्तिक होऊ नये असे वाटते कारण मला हा प्रॉब्लेम नव्हता शेअर करायचा, विषयाच्या अनुषंगाने थोडे भावनेच्या भरात माझ्याकडून लिहिले गेले.

कुठल्याही प्रॉब्लेमच्या बाबतीत कुटुंब आपल्याबरोबर असणे गरजेचे असते, त्या बाबतीत मी लकी आहे आणि माझ्या सासरची माणसे पण चांगली आहेत फक्त ती लांब आहेत कोकण आणि पुण्याला आहेत. त्यांचापण support आहे.

अन्जू >> Sad
जे खूप स्ट्रॉन्ग असतात त्यांना देव मोठी चॅलेंजेस समोर ठेवतो. असे आपले मला वाट्ते.>> +१

वेल
+१००००००
अंजू,
तुम्हाला care giver fatigue पण येत असेल. थोडा वेळ स्वतःसाठी वेगळा राखून ठेवला पाहिजे.हा अमाचा प्रतिसाद योग्य आहे. नाटक सिनेमा नको,पण निदान तासभर फिरून येणे इ.ने स्वतःला
फ्रेश वाटू शकेल.तुमचा मुलगा ही तुमची जबाबदारी आहेच्,पण त्याव्यतिरिक्तही तुमचे म्हणून एक आयुष्य आहे.अशावेळी बहीणभावाची खरच मदत घ्या.

युरी,
अगदी १००% पटले.
अंजूजी,
जगभर पसरलेले मायबोलीकरही आपले कुटुंबच आहे असे समजा.

आपली दु:ख इतरांबरोबर शेअर केल्याने ती कमी होतात तसेच आपला आनंद हा इतरांबरोबर शेअर केल्याने वृद्धींगत होतो. या मुळे मानसिक आरोग्य चांगले रहण्यास मदत होते.प्रसंगी समुपदेशक / मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी. काही लोकांना त्यात कमीपणा वाटतो. शरीर आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातोच ना? मग मनही आजारी पडतच ना!

<<बाफचा विषय हा माझा वैयक्तिक होऊ नये >> अजिबात असे समजू नका. आपण एक कुटुंबच आहोत अस मला आजवर आलेला अनुभव आहे. तेव्हा तुमची पोस्ट डिलिट करू नका.

अन्जू, काळजी घ्या. तुमची पोस्ट वाचूनच कळून येतंय हे किती थकवणारे रूटीन आहे. स्वत:साठी वेळ काढाच. नवीन वर्षाचे रिझॉल्युशन. Happy
मला खात्री आहे, इथे लिहील्याने तुमचे निम्मे दडपण कमी झाले असेल. Happy

अंजू अजिबात माफी मागू नकोस. बापरे तुझी पोस्ट वाचून खूप अस्वथ व्हायला झाल ,अच्युत गोडबोले यांचा मुलगा पण ऑटीझम चा पेशंट आहे. त्यांनी अशा मुलांसाठी कायमस्वरूपी केअर होम स्थापन केल आहे अस ऐकल आहे. गुगलून बघितलं पाहिजे. वेल नि बरीच उपयुक्त माहिती दिली आहे , युरी ने पण महत्वाचे सांगितले आहे

हो सुजा, अच्युत गोडबोले यांचा मुलगा ऑटिस्टिक आहे, मी वाचले आहे आणि सुहासिनी मालदे यांनी लिहिलेले निरागस पुस्तकपण वाचले पण माझा मुलगा नुसता ऑटिस्टिक नाही, तो मेंदुच्या विकाराने आजारी आहे आणि त्याचे मतिमंदत्वपण अतितीव्र प्रकारचे आहे. फक्त ऑटिस्टिक, मतिमंदत्व कमी प्रमाणात आणि मध्यम प्रमाणात असणा-या मुलांना ट्रेनिंग देता येते अर्थात ऑटिझममध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. तीव्र आणि अतितीव्र मतिमंद्त्व असणा-यांना मार्ग एवढे उपलब्ध नाहीत. मुळात ब-याच स्पेशल स्कूल घेत नाहीत अशा मुलांना हा स्वानुभव. कायम एक माणूस लागतो त्यांना.

माझ्या मुलाला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे, बोलता येत नाही पण सूर धरतो, त्याचे आवडते गायक लता, आशा, सुमन कल्याणपूर, अरुण दाते, श्रीधर फडके आणि हिंदीत किशोरकुमार, सासरी सगळ्यांचे आवाज चांगले आहेत आणि गाण्याची आवड आहे, ती बहुतेक उतरली आहे त्याच्यात. ही त्याची आवड हा प्लस पॉईंट.

आठवड्यातून शक्य तितक्या वेळेला भाजी मंडईतून चक्कर मारत जा.. भाज्या, फळे यांचे रंगीबेरंगी ढीग मनाला उभारी देतात हा अनुभव आहे.

Pages