भारत पाक संबंध आणि काँग्रेसची (राज)निती

Submitted by डँबिस१ on 18 January, 2013 - 16:20

आजच आलेल्या वर्तमान पत्रातील दोन बातम्या आपले लक्ष वेधुन घेतील.

जयपुरला चाललेल्या कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात आलेल्या कॉंग्रेस सरकारात असलेल्या सलमान खुर्शिद यांचे विधान....

LoC incidents won’t hurt peace process, Salman Khurshid says
Ref: http://timesofindia.indiatimes.com/india/LoC-incidents-wont-hurt-peace-p...

NEW DELHI: Further de-escalating tensions, foreign minister Salman Khurshid on Friday said recent incidents are not going to impact the ongoing peace process between the two countries. Suggesting that India is looking favourably at Pakistan's offer for talks to sort out the LoC issue, Khurshid said in Jaipur that there was a "positive content" in the statement that has come from Pakistani foreign ministerHina Rabbani Khar and Pakistani high commissioner to India Salman Bashir.

आणि त्याच चिंतन शिबिरात कॉंग्रेस पक्षश्रेठीचे विधान....

नीट वागा, सोनियांनी पाकला सुनावलं
पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर एका भारतीय जवानाची हत्या करून त्याचे शीर नेण्याच्या घटनेनंतर भारत-पाक संबंधात निर्माण झालेला तणाव जयपूर येथे सुरु असलेल्या कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात जाणवला. पाकिस्तानने आधी आपले वर्तन ठिक करावे, नंतर चर्चेसाठी हात पुढे करावा असे खडे बोल यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाकिस्तानी सुनावले आहे. विशेष म्हणजे पाकच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी भारतासमोर चर्चेसाठी प्रस्ताव ठेवला होता.

परराष्ट्र मंत्री असलेल्या सलमान खुर्शीद यांना भारत पाक संबंध सूरळीत करायची घाई लागली आहे.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे LOC वर झालेल्या गोष्टीचा फारासा फरक पडू नये. पाकिस्तान भारताच्या सैनिकांची कत्तल करीत राहो आणि परराष्ट्र मंत्री संबंध सुधारण्याच्या गोष्टी करत राहो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डँबिस१,

फाळणीच्या वेळी पाकिस्तानवादी हस्तक शिरजोर झाले होते. तसेच आताही डोक्यावर चढून बसताहेत. यावेळी आपण हिंदूंनी सावध राहायला पाहिजे. पाकी दलालांना अजिबात डोईजड होऊ देता कामा नये.

आ.न.,
-गा.पै.

हा सलमान खुर्शीद आजच्या बातमीत पाकिस्तानला क्लिन चीट देऊन मोकळे झालेत !!
भारत पाक संबध मधुर होतील आता !!

ऑपरेशन विजयच्या काळात भारतीय जवानांचे डोळे काढण्याच्या आणि हात पाय कापण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या घटनेनंतर १५ ऑगस्टला पाकिस्तानचे युद्धकैदी सोडून देण्यात आले होते
आताही ही घटना घडताना पाकिस्तानमधल्या अंतर्गत घडामोडी समजून घेणे गरजेचे ठरेल. हा भारताला उकसवायचा आणि कट्टरपंथी गटांना हवी असणारी प्रतिक्रिया भारतीय वर्तुळातून काढून घेण्याचा प्रयत्न असावा असं वाटतंय. कादरीचा उदय, एका रात्रीत त्याला मसिहाचं स्वरूप येणं, पंतप्रधानांना अटक आणि कादरीच्या आडून लष्कराचे डावपेच सुरू असल्याचा आरोप होणे या घटनांचं योग्य विश्लेषण करून त्याचा अन्वयार्थ लावता आला पाहीजे. कदाचित राजनैतिक मुत्सद्यांनी या सर्वांचा विचार केलाच असेल.

>>पाकिस्तानमधल्या अंतर्गत घडामोडी समजून घेणे गरजेचे ठरेल. हा भारताला उकसवायचा आणि कट्टरपंथी गटांना हवी असणारी प्रतिक्रिया भारतीय वर्तुळातून काढून घेण्याचा प्रयत्न असावा असं वाटतंय. कादरीचा उदय, एका रात्रीत त्याला मसिहाचं स्वरूप येणं, पंतप्रधानांना अटक आणि कादरीच्या आडून लष्कराचे डावपेच सुरू असल्याचा आरोप होणे या घटनांचं योग्य विश्लेषण करून त्याचा अन्वयार्थ लावता आला पाहीजे. कदाचित राजनैतिक मुत्सद्यांनी या सर्वांचा विचार केलाच असेल.
<<

करा कि वांझोटे विश्लेषण्, वांझोटी चर्चा वगैरे वगैरे वांझोटे उद्योग,
आपल्या एकाही जवानाचा बळी जाणार नाही याची काळजी आम्ही नाही करणार तर कोण? विश्लेषक आणी मुत्सद्दी? ते तर एसीमध्ये बसून असतात. त्यांना काय झळ लागते?
आपली कुरापत न काढता त्यांना त्यांच्या प्रदेशात बसू द्या एकमेकांच्या उरावर. हा सत्त्यानाशाचा मार्ग आहे हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हांच त्यांचे डोळे उघडतील. पण त्यासाठी इझरेली व्हायला हवे. नाहितर आहेच पुन्हा नव्या फाळणीच्या दिशेने वाटचाल!