लंडन टुरिझम...

Submitted by सेनापती... on 14 January, 2013 - 17:22

सध्या कामानिमित्त युकेत वास्तव्य असल्याने पुढच्या काही महिन्यात लंडन आणि आसपासचा परिसर फिरायचे मनावर घेतलेले आहे.

लंडनमध्ये काय काय बघावे? काय बघावेच? कुठे खावे? भारतीय आणि पाश्चिमात्य असे दोन्ही.

इथून बरीच माहिती जमवली आहे.

पण तरिही पाहण्याचा क्रम, चालत फिरता येते का? एकूण अंदाजे खर्च, साधारण किती दिवस हवेत वगैरे माहिती प्रत्यक्ष लंडन फिरलेल्यांनी, राहणार्‍यांनी दिली तर बरे पडेल असे वाटते.
.
.
.
रा.रा.कर मायबोलीकर जागे व्हा.. लगोलग एक गटग देखील होउन जाउ दे. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक किस्सा:

आम्ही आधी स्कॉटलंडला गेलो होतो, आणी मग (तिथून पाय निघत नव्हता तरी) लंडनला. लंडनला ट्रेन स्टेशनवरुन हॉटेलला जायला टॅक्सी केली. हॉटेलवर पोचल्यावर टॅक्सीवाल्याला कॅश दिली, तर तो म्हणाला, "Please give me English money!" मला वाटलं चुकून डॉलर काढले की काय मी. (मुक्तपिठ मोड ऑनः आमच्या सासर्‍यांचे जावई अमेरिकेत रहातात बर्का! मुक्तपीठ मोड ऑफ!)
पण पहातो तर बरोबर पौंडच होते. मग पुण्यात रिक्षावाल्यांशी बोलावे तश्या टोनमधे त्याला विचारलं, "हे इंग्लिश नाही तर मग काय कानडी मनी आहेत कारे?" तर म्हणे, हे इंग्लिश मनी नाहीत. एरवी मी घेत नाही, पण आत्ता एक डाव घेतो.
मग नंतर हॉटेलात चौकशी केली की ही इंग्लिश मनी काय भानगड आहे. तर कळलं की माझ्याजवळचे पौंड स्कॉटलंडचे होते. ते आणी इंग्लिश पौंड खरंतर सारखेच आहेत, आणी शक्यतो सगळ्या दुकानांत/हॉटेलात वगैरे घेतात, आणी कुठल्याही बँकेत फुकट बदलून पण मिळतात. पण लंडनचा जाज्वल्य अभिमान असलेले काही टॅक्सीवाले ते घेत नाहीत.
आता ही जाज्वल्य अभिमान काय भानगड आहे ते आम्हास पुरते ठावूक! एका जाज्वल्यवाल्या पुणेकरास लंडनमधे टॅक्सी ड्रायव्हरही जाज्वल्यवाला भेटावा यात नवल ते काय! Wink

इंग्लिश मनी तिथे स्कॉटलंडमध्येही घेत नाहीत हो. Happy जाज्वल्य अभिमान वाले आहेत सर्व इथे!! Lol

बकिंगहॅम पॅलेस आणि विंडसर पॅलेस बघण्यासाठी कधी, कशी, किती आधी तिकीटे घ्यावी लागतात ?

पर्यटकांसाठी हे पॅलेसेस कोणत्या कालावधीत बंद असतात?

मामी, तुम्ही सगळीकडे पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरणार असाल असं गृहित धरुन सांगते. ट्रेनच्या तिकिटावर बर्‍याच टुरिस्ट स्पॉट्स ना 'एकावर एक फ्री' असे तिकीट मिळते. उदा. विंडसर कॅसलला जाताना स्टेशनवर उतरल्यावर ट्रेनची तिकीटं दाखवून तिथेच कॅसलची तिकीटं विकत घ्यायची. स्टेशनच्या समोरच आहे राजवाडा Happy विंडसर लंडनपासून थोडे बाहेर आहे ( ट्रेन कनेक्टिव्हिटी उत्तम आहे ) पण लंडनमधील बरीच ठिकाणं उदा. मादाम तुसाँ, टॉवर ऑफ लंडन वगैरे ह्या ऑफरमध्ये मिळतात.

ट्रेनची तिकिटं थोडी ऑफ पीक घेतली ( सकाळी साडे-नऊ नंतर अशी काहीतरी की तुलनेने स्वस्त होतात. ) लंडनमध्ये फिरण्यासाठी ट्यूब आहे पण आजूबाजूची ठिकाणं जसं की विंडसर, बाथ, ऑक्सफर्ड, आयल ऑफ वाईट, ब्रायटन पीअर अशा ठिकाणी जाण्यास नॅशनल रेल लागेल.
http://www.nationalrail.co.uk/ ह्या साईटवर ऑफर्सची आणि ट्रेन तिकीटांची माहिती मिळेल.

बसेसचे तिकीट घेतानाही डील विचारुन घ्यालच. तिघं-चौघं असल्यास ग्रूप तिकीट घ्यायचे. मग त्याच तिकीटावर ठराविक झोनमध्ये दिवसभर फिरता येते.

स्टोनहेन्ज पाहायचे असल्यास ते ट्रेन, बसेसच्या रुटवर नाही. बाथ आणि स्टोनहेन्जची लंडनहून नेऊन-आणणारी टूर चांगली राहील. नुसते बाथ करणार असल्यास ट्रेनने करता येईल.

मामी, तुम्ही लंडनमध्येच राहणार असाल तर लंडनमधील स्थळांसाठी तुम्हाला ही ऑफर मिळणार नाही. आम्ही लंडनबाहेरुन ट्रेनने यायचो पण विंडसर, बाथला जाताना नक्की वापरता येईल ही ऑफर.

तसेच एक जनरल माहिती, कुणी युकेमध्येच राहणारे असेल तर मर्लिन अ‍ॅन्युअल पास घेऊन बर्‍याच ठिकाणी वर्षभरासाठी अनलिमिटेड वेळा जाता येते. लेगोलँड, लंडन आय, डन्जन्स, वॉरिक कासल अशी बरीच ठिकाणं कव्हर होतात. बर्‍याच थीम पार्क्स कव्हर होतात. एकदा गेले तरी स्वस्तच पडतो पास. अगदी पैसा वसूल ! शिवाय बरेचदा तो डिस्काऊंटेड किंमतीत मिळतो त्याकडे लक्ष ठेवून घ्यावा. आम्हाला दोन वर्षांपूर्वी १२९ पाऊंडांचा ८९ पाऊंडसमध्ये प्रत्येकी मिळाला होता.

स्कॉटलंड ला वेळ काढून १२ दिवसांची ट्रीप केली होती. नकाशे घेऊन काहीही प्लान न करता छोट्या गावातून फिरलो होतो तीन वर्षाआधी.

त्यात plokton बीच आणि pitlochary अशा दोन सुंदर जागा सापडल्या होत्या. http://www.pitlochry.org/

pitlokhary ला लागुनच एक मोठा डोंगर चढून गेलो होतो -- खूप सुंदर तळी, नद्या आहेत इथे आणि गावात एक टुमदार थिएटर आहे. एका दिवसाचा चार दिवस मुक्काम झाला होता. कोणाला इंटरेस्ट असेल तर आणखी डीटेल्स पोस्ट करेन. ज्यांना टुरीस्टी झगमगाट नको आणि स्कॉटलंड गावं आणि निसर्ग पाह्याचा त्यांनी अशी ट्रीप करावी

स्कॉटलंड ला वेळ काढून १२ दिवसांची ट्रीप केली होती. नकाशे घेऊन काहीही प्लान न करता छोट्या गावातून फिरलो होतो तीन वर्षाआधी.

त्यात plokton बीच आणि pitlochary अशा दोन सुंदर जागा सापडल्या होत्या. http://www.pitlochry.org/

pitlokhary ला लागुनच एक मोठा डोंगर चढून गेलो होतो -- खूप सुंदर तळी, नद्या आहेत इथे आणि गावात एक टुमदार थिएटर आहे. एका दिवसाचा चार दिवस मुक्काम झाला होता. कोणाला इंटरेस्ट असेल तर आणखी डीटेल्स पोस्ट करेन. ज्यांना टुरीस्टी झगमगाट नको आणि स्कॉटलंड गावं आणि निसर्ग पाह्याचा त्यांनी अशी ट्रीप करावी

मामी त्या दोन पैकी एकच शक्यतो विंडसर बघा. बकिंगहम ला दालने आणि राणीचे ऐवज यापेक्षा फार काही नाही - बाहेरून बघतो तेच छान वाटते. बहुतेक कॅस्टल एकसारखे वाटू लागतात आतून . तिकिटेही भयंकर आहेत आणि वेळ कमी असला तर उगाच धावाधाव होईल. केंट मध्ये लीड्स कॅस्टल छान आहे पण पूर्ण दिवस लागेल - विंडसर ला ही वेळ काढून जावे लागेल.

अपूर्वाईतले पिटलॉक्रीचे वर्णन आठवले Happy

शबाना + १. विंडसर कॅसल भरपूर मोठा आहे आतून बघायला. राजवाडा पाहिल्याचे समाधान मिळते Happy

लंडन खूप छान आहे. वरील माहीती वाचून परत लंडन ला जाऊन आल्यासरखे वाटले. एवढे मोठे शहर पण त्याने आपले गावपणं अ़जून ही कसोशीने जपले आहे. जास्त मोठ्या इमारती नाहीत, गर्दी जास्त नाही, छोटी छोटी टुमदार घरे, घरांपुढे छोटीशी बाग, रस्ते फुलानी सुशोभित केलेले, शहरात असणारी हाइड पार्क, रिजंट्स पार्क, ग्रीन पार्क सारखी उद्याने, ती शहरातून वाहणारी टेम्स नदी, अख्ख्या लंडनभर विणलेले ट्युबचे जाळे , तो ट्युबचा जगप्रसिध्द नकाशा, ज्यामुळे तुम्ही चुकुन सुध्दा चुकणार नाही आणि पावलो पावली जाणीव पूर्वक जपलेल्या इतिहासाच्या खुणा, शिस्त पाळणारे नागरिक, बघाल तेवढे थोडेच आहे. पण मी असे सुचवीन की थोडा लंडनच्या इतिहास, भूगोलचा अभ्यास करुन जा म्हणजे जास्त एंजोय कराल.

वरती सगळ्यांनी लिहिल्याप्रमाणे लंडन बेस्ट आहे काही भागात चालत फिरायला. अर्थात ट्रेनची, बसेस्ची कनेक्टीवीटी उत्तम आहे,

आधीच बरीच माहीती आहेच वरती म्हणून ज्यास्त लिहित नाही.

मामी, लॉर्डस क्रिकेट ग्राऊंडची टूर आवश्य करा !! खूप भारी वाटतं तिथे.. ट्यूब कनेक्टीव्हीटी आहे तिथे..
काहितरी १० पाऊंडच्या आसपास तिकिट आहे.. सगळी कडे फिरवतात आत.
आणि अजून एक म्हणजे.. नाटवेस्ट करंडक विजेत्या कर्णधारांच्यात त्यांनी गांगुलीचा फोटो लावला नाहीये.. (म्हणजे मी गेलो तेव्हा तरी नव्हता) ह्या बद्दल गाईड कडे नक्की निषेश नोंदवा.. शिवाय ५ विकेट गेल्यानंतर आम्ही मोठं टार्गेट कसं चेस करून इंग्लंडला कसं हरवलं, गांगुलीने शर्ट कसा हवेत फिरवला वगैरे तपशीलांची गाईडला नक्की आठवण करून द्या.. Proud

विंबल्डन कोर्टवरही जाऊन या.. तिथेही म्युझियम आणि टूर आहे. मी नाही गेलो कारण मला स्पर्धा सुरु असताना जायचं आहे..

मस्त माहिती . अशीच एक एक ठिकाणी घेऊन त्या त्या ठिकाणी काय काय बघण्यासारखा आहे त्यावर वेगळे वेगळे बाफ काढले तर जास्त मज्जा.
<<लंडनचा जाज्वल्य अभिमान.एका जाज्वल्यवाल्या पुणेकरास लंडनमधे टॅक्सी ड्रायव्हरही जाज्वल्यवाला भेटावा यात नवल ते काय!>> Lol हा बाफ प्रवासाचे अनुभव भारताबाहेर या या गुप मध्ये हलवायला पाहिजे का ? म्हणजे पटकन लक्ष जाईल .किवा काय कसे ? Happy

मस्त.. बरीच नवीन माहिती कळली. मला प्लान करायला अजून बरे पडेल. धन्यवाद. Happy

आता युके फिरायला उत्तम वेदर आहे. उत्साही बाहुली... Wink

लंडन समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक एकदम भारी . गेल्या ५००० वर्षाचा इतिहास कादंबरीच्या रुपात दिलखुलास मांडलाय. इतिहास तर आहेच पण - लंडन शहर कसे वसले, आर्थिक भरभराट, राजकीय घडामोडी, सामाजिक अभिसरण सगळ्याच विषयावर मस्त लिहिले आहे . मुळात ज्यांना इथल्या इतिहास व संस्कृतीची ओळख नाही त्यांना ही ओळख करून घ्यायला व लंडन समजायला अगदी सोप्पं पुस्तक -- वेळ हवा भरपूर जाडजूड आहे -- पण लंडनची ज्यांना जुजबी माहिती आहे त्यांच्यासाठी एकदा हाती घेतलं कि ठेववत नाही खाली.

/London-Edward-Rutherfurd

याच लेखकाची रशिया आणि न्यू योर्क वरची पुस्तकेही छान आहेत. मला लंडन जास्त भावले. कदाचित इथे प्रत्यक्ष राहत असल्यामुळे असेल.

पराग, माझा नवरा आणि मेव्हणा गेले होते त्यावेळी लॉर्ड्सच्या ब्रिटिश टूर गाईडने त्यांना गांगुलीबद्दल सगळी माहिती दिली होती आणि त्या बाल्कनीत नेऊन इथे गांगुलीने शर्ट काढून हवेत फिरवला होता हेही सांगितलं होतं. फोटो लावला होता की नाही हे त्याला आठवत नाही. लोकं रेग्युलरली निषेध नोंदवत असणार Happy

Pages