लंडन टुरिझम...

Submitted by सेनापती... on 14 January, 2013 - 17:22

सध्या कामानिमित्त युकेत वास्तव्य असल्याने पुढच्या काही महिन्यात लंडन आणि आसपासचा परिसर फिरायचे मनावर घेतलेले आहे.

लंडनमध्ये काय काय बघावे? काय बघावेच? कुठे खावे? भारतीय आणि पाश्चिमात्य असे दोन्ही.

इथून बरीच माहिती जमवली आहे.

पण तरिही पाहण्याचा क्रम, चालत फिरता येते का? एकूण अंदाजे खर्च, साधारण किती दिवस हवेत वगैरे माहिती प्रत्यक्ष लंडन फिरलेल्यांनी, राहणार्‍यांनी दिली तर बरे पडेल असे वाटते.
.
.
.
रा.रा.कर मायबोलीकर जागे व्हा.. लगोलग एक गटग देखील होउन जाउ दे. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लंडन जबरी आहे. मात्र फेब्रु. मधे कसे असते माहीत नाही. समरमधे गेलो होतो. ३-४ दिवस भरपूर पाहण्यासारखे आहे. कदाचित जास्तच. सेंट्रल लंडन मधे राहता आले तर पाहा. यायचा-जायचा वेळ वाचेल.

लॉर्ड्स व विम्बल्डन पाहायचे असेल तर टूर बद्दल आधीच चौकशी करून ठेव. सध्या गर्दी नसेल बहुधा.

थेम्स नदीच्या काठाने असलेल्या वास्तू चालत चालत बघता येतात बहूदा.

टॉवर ब्रिज
टॉवर ऑफ लंडन
लंडन आय
सेंट पॉल्स कॅथेड्र्ल
क्लिओपॅट्राज नीडल
इंपेरिअयल वॉर मुझियम
ट्रॅफॅलगर स्क्वेअर
पिकाडेली
वेस्ट मिंस्टर
हाउस ऑफ पार्लिमेंट
बकिंगहॅम पॅलेस आणि म्युझियम
क्विन विक्टोरिया मेमोरियल

याशिवाय....

वॅक्स म्युझियम
ब्रिटिश म्युझियम
हाईड पार्क
रिजंट पार्क

थेम्स फेरी राईड आणि लंडन ट्युब मधून फिरणे हे देखील करता येईल ना!!!

मस्त असते फेब मध्येही लंडन. Happy
पावसाच्या हलक्या सरी कधीही येतात.. जातात.
सेंट्रल लंडन ला बरेच काही आहे पहाण्यासारखे. हो त्या ओपन बसेस च्या गाईडेड टूर्स नाही घेतल्या तरीही ट्युब ने सगळे फिरता येते.

रिजेंट्स पार्क जवळ चा लंडन झू आणि अक्वेरियम Happy

एखाद्या दिवशी गंमत म्हणून साउथ हॉल ला जाउन ये. दिल्लीच्या रस्त्यांवर फिरतो आहोत असे वाटले होते. कुणी रस्त्यात दुकानासमोर जिलेब्या तळत होता.. ओरडून ओरडून खाण्याचे पदार्थ.. म्युझीक सिडीज.. वगैरे विकत होते लोक. Happy

ट्युब बरी की ओपन डेक बसेस. ह्या दोन्हीत हॉप ऑन - हॉप ऑफ करता येते का?>>> दोन्ही पूर्ण वेगळे आहे.
ओपन डेक बसेस: या ठरवून कराव्या लागतात, एक दिवस व दोन दिवस असे पर्याय आहेत बहुधा. आम्हाला वेळ पुरला नव्हता सर्व दाखवतात ते पाहायला.
ट्यूब व नेहमीच्या बसेसः यांचे १-७ दिवसांचे पास मिळतात. ते जरूर घे. मग कधीही कोठेही जाता येइल, त्यांच्या नेटवर्क मधे. याचा आम्हाला खूप फायदा झाला.

तुझ्या बघण्याच्या लिस्ट मधे "चर्चिल ची वॉर रूम" जरूर टाक. वेस्टमिन्स्टर जवळच आहे. तुला एवढी इतिहासाची आवड आहे तर नक्की आवडेल. चर्चिल बद्दलचे तेथील पेपर्स काही वर्षांपूर्वीच खुले झाले असे वाचले.

सिटीत चालत सगळे जवळ आहे. मजा म्हणून ओपन डेक बस घेउ शकतोस. आणि भरपूर वेळ असेल मनासारखे हवे तिथे फिरायचे असेल तर चालत फिरता येईल.

निस्डेन चे स्वामि नारायण टेंपल चांगले आहे. तिथेही खाली त्यांचे म्युझीयम आहे. मंदिराबाहेर च्या हॉटेल मध्ये टिपिकल पंजाबी आणि गुजराथी जेवण आणि स्नॅक्स मिळायचे. Happy

चर्चिल ची वॉर रूम - जबरी. हे असे काही वेगळे बघायची इच्छा आहेच. सेकंड वर्ल्ड वॉर बद्दल मला बघण्या-ऐकण्याची इच्छा आहेच.

आम्ही हा बाईक टूर घेतला..४ तासाचा असतो ..सेंट्रल लंडन मध्ये फिरवऊन आणतो ..बिग बेन, ट्रफल्गर स्केवर, बकिंघॅम पॅलेस , १० डौनिंग स्ट्रीट ..वगरे ..आम्हाला आवडला...
http://fattirebiketours.com/london

पिकॅडेलीला चौकशी कर साधारण लंडन मुझियमच्या इथे. तिकडे लंडनच्या " वॉकिंग टुर्स "असतात. त्या घेतल्या तर ते गाईड खुप चांगली माहिती असलेले असतात. तुला इतिहासाची आवड आहे व ज्ञानही. तुला नक्की आवडेल.

तसच टॉवर ब्रीज ला जा. स्टेशनच आहे ते. जास्त दिवस असशील तर ऑक्स्फर्ड ला जाता येइल. सुरेख सीटी. लंडन मधे ऑपेरा/नाटक काहीतरी नक्की बघच. हॉप इन सोयीच्या पडतात. ट्युब्+बस् + हॉप-इन चा सामायिक पास मिळतो.

लंडन मधे नुसते निरुद्देश फिरण्यातही मजा आहे.

विंडसर कॅसल बघण्या सारखा आहे. ( राणीचा रहाता राजवाडा). थेम्स कॄझ, बकिंगहॅम जवळ व्हीक्टोरिया स्टेशच्या दिशेला एक राजघराण्याच्या खजान्याचं प्रदर्शन आहे ( टॉवर ब्रीज नव्हे), ते फारच छान आहे. थोडे आडबाजुला आहे.

हाइड पार्क मस्त . नुसतं बसण्यातही गंमत आहे.

लंडन आय वरुन चालत बीग बेन कडे येताना रस्त्यात भाजलेले चेस्टनट्स, कॅरेमलाइज्ड पीनट्स मिळतात ... ते नक्की खा... लंडन आय च्या ऑफिस मधल्या कॅफेटेरीया मधे क्रीम वॅफल्स मिळतात ते खा.

ऑक्स्फर्ड स्ट्रीट वर रस्त्यात फळे वगैरे विकतात. ती एकदम मस्त असतात..... अत्ता लंडनला खुप चील असेल. कदाचित पाउसही पडेल.

थेम्स रिव्हर क्रुझ घे. मस्त वाटते. बाकी वर लिहिलेच आहे सगळे. निरुद्देश लंडन पण सुंदरच. फक्त आत्ता थंडी असेल त्याची कळजी घेऊन प्लॅन कर.

oyster card घ्या.
ट्युब न बस दोनहीवर चालतं..३ पौंड डिपॉझिट ..पे अ‍ॅज उ गो , वापरता..दिव्सभर मॅक्झेम ५.६०( ? बदललं का आत माहित नाही हि लिमिट) पौ. लागतं फ्क्त..

बाकी ट्रेन्स वर बरेचदा रिटर्न तिकिट स्वस्त पडतं, वन वे पेक्षा.

लांब पल्ल्य्यच्य बसेस साठी वार्षिक कार्ड काढून मग ट्रिप च तिकिट काढलं तर स्वस्त पडतं....

बाथ्/स्टोन्हेज वगैरे च्या १ दिवसाच्या ट्रिप असतात से. लंडन वरून....

लॉर्ड- बघाच ...गांगुली ने बाल्कनीतून शर्ट काढून केलेला जल्लोष.. सचिन, सुनिल , कपिल पाजी ज्या मैदानावर खेळले ..ज्या ड्रेसिंग रूम मध्ये उतरले, हे सगळं अनुभ्वायला मस्त वाटतं...

Hi Rohan,
- If interested in indian freedom struggle history, take a trip with Godbole kaka. (v.godbole3@yahoo.co.uk). He does 1day walking tours and shows places where Savarkar/Tilak lived, studied etc. Will get you in touch with the non-touristy parts of london as well. Highly recommended.
- Take an oyster card. Costs a 5£ deposit ( which you can claim back once used). Weekend day travel is capped at 8.90£. Refer http://visitorshop.tfl.gov.uk/travelcards/off-peak-day/product/day-off-p... You can use it for trams/tubes/buses. Invaluable.
- Go to Camden Town. My favourite place for street food in London. Think of it as a mumbai styled fashion street. The only place where you can see goths, punks and all manners of people. Dont be fooled by some of the cheap looking fashion joints, they can be unbelievably costly inside Happy
- Go to trafalgar square ( take the pic nxt to famous lion statues - without which london album is considered incomplete) Walk from Trafalgar Square ... to St Pauls ... over the Millenium Bridge .... into Tate's modern art .... around the Shakespeare's Globe theater .... next to the warship .... over the Tower bridge ... near the Catherine wharf. Then once done, you can take the bus no 15 back to trafalgar, or else take a river cruise to Greenwich.
- Greenwich is a beautiful place in itself. Take a pic across the "GMT" line. look over the canary wharf views, take pics along the cutty sark, eat in the greenwich weekend market
- Go to the famous Notting Hill Market on a saturday. Has lotsa street chow again. also can probably indulge in antiques of some sort. The huge posh-n-pricy malls of Westfield and Harrods are not far away.
- Go to buckingham palace for key-handover ceremony. A proper touristy thing. Once done, head to the speakers corner (on saturday mornings) in Hyde's park. People speak on all sorts of ideologies ( half of them fuelled by booze). but makes for v interesting out-of-world conversations at times.
- Far india miss karat aslas tar eat wada-pav/misal at ShriKrishna vadapav center(Harrow/Hounslow). Its easily as good as (or better) than any wada-pav center in pune.... and is cheap at 1quid for wadapav and 50p for a masala chai. Cant get more soul warming than that. If want to eat south indian, then the breakfasts at Chennai-dosa(wembeley and lots of other places) are legendary. again soul food ( you must be willing to ignore the service/hygiene etc tuccha goshti). the food is good, bass.
- My fave museums are British museum / imperial war history museum (which you might enjoy), V&A museum ( always have trouble pulling my wife away from the jewellery section there)
These are the typical London "dos" which us marathis might enjoy. London has of course unlimited personalities .... Greater London has 32 boroughs and each has a different feel to it. Depends how much time you have and what are your priorities.
Chal, lai lihila. PM me if you need any specific info. Cheers,
- rishi

छान माहिती. हृषिकेश भिडे धन्यवाद.

जूनमध्ये १०-१२ दिवसांकरता लंडन, स्कॉटलंड करण्याचा विचार आहे. काही मौलिक टिपा असतील तर जरूर द्या.

सेनापती, तुम्ही लंडनवर स्वारी केली की नाही ? अनुभव लिहा ना.

वेळ कमी असेल तर लंडन बस टूर मजा येते. ग्रीनिच ला जाउन ये -एक दिवस पूर्ण लागेल. maritime museam छान आहे . cutty sark जवळच आहे. तिथे village फूड fair असतो शनिवारी, बर्याच ठिकाणचे खाणे आणि आर्ट्स क्राफ्ट्स.
लंडन dungeon धमाल आहे. इस्ट हम ला साउथ इंडिअन खाण्यासाठी. सेन्ट्रल लंडन आणि नॉर्थ मध्ये टर्किश, लेबनीज , मेदितरिअन अशी अनेक वेगळी रेस्तारांत आहेत. museum, gallerias बरोबरच south bank आणि barbican अवश्य जा.

thames ला संध्याकाळी लंडन ब्रिज ते वेस्ट मिनिस्टर असा walk मस्तच -- मध्ये अनेक आर्त gallerias आहेत- all experimental, south american असे काही बोर्ड दिसले तर जरूर explore कर.

also have a look at Time Out in London for weekly events

मामी, टॉवर ब्रिज, लंडन आय, सेंट पॉल्स कॅथेड्र्ल, ट्रॅफॅलगर स्क्वेअर, पिकाडेली ,बकिंगहॅम पॅलेस, ग्रीनिच, वॅक्स म्युझियम ( madame tussauds) हे टुरिस्टांच्या मस्ट सी मध्ये येतं

म्युझियम ची आवड असेल तर - ब्रिटिश म्युझियम, सायन्स म्युझियम, नॅचरल हिस्टरी म्युझियम, विक्टोरिया अ‍ॅन्ड अल्ब् र्ट म्युझियम बघण्या सारखे आहेत

पार्क ची आवड असेल तर - हाईड पार्क, रिजंट पार्क, Kew royal botanical garden बघता येतील..

शॉपिंग साठी अर्थातच ऑक्सफर्ड स्ट्रिट Happy

ही सगळी सेंट्रल लंडन ची ठिकाणे ट्युब ( अंडरग्राउंड ट्रेन) ने / बसने / ( काही काही तर अगदी पायी चालत) पहाता येतील आणि अगदी २-३ दिवसात कव्हर होतील..

वेळ असेल तर ब्रायटन , ऑक्सफर्ड आणि (किंवा) केम्ब्रिज , रोमन बाथ, विंडसर कॅसल-लेगोलॅन्ड, ला पण जाता येईल..

स्काडलंड ला कुठे रहाणार आहात ? Edinburgh ला का?
लोकल डे ट्रिप ची आयडीया येण्यासाठी ही साईट नजरे खालून घाला http://www.viator.com/Scotland/d732-ttd?pref=02&aid=g3000

बाकी वर च्या पण टिप्स मस्त आहेत.. Happy

लंडनला ३ वेळा जाणे झाले पण तिन्ही वेळा कामानिमित्त. Sad फिरायला उसंत नाही. आता ५-७ एप्रिल वेळ ठरवली आहे. गुढीपाडव्याचा कार्यक्रम देखील आहे महाराष्ट्र मंडळात.

मामी कधी येताय? कळवा नक्की. Happy त्यानिमित्ताने भेट होईल. Happy

प्रयत्न करतो. Happy

६ तारखेला एका मित्राला भेटायचे आहे त्यामुळे ५ तारखेला आलो तर रहावे लागेल. लंडनमध्ये शनिवारी रहाण्याची सोय म्हणजे लै महाग पडेल... Proud

आता London Eye ची वेळेनुसार तिकीटं घेता येतात. आम्ही सकाळी ९:३० चं घेतलं होतं. तिकीटावर असलेल्या वेळेप्रमाणे ९:३० ला आजीबात वेटींग नव्हतं. लंडन आय झाल्यावर तिथूनच Thames River Cruises निघतात. त्यात एक क्रूझ अशी आहे, की त्याने Tower of London पर्यंत जाउन तिथे उतरता येतं, आणी तिथे फिरुन झाल्यावर परत येता येतं. ती क्रूझ घेउन टॉवर ऑफ लंडनला उतरायचं आणी निवांतपणे टॉवर ऑफ लंडन पहायचा. इथेच अंतूशेट नी सांगितलेला कोहीनूर पहायला विसरू नका Happy . टॉवर ऑफ लंडनच्या मागच्या बाजूला एक दार आहे, तिथून हातावर स्टँप घेउन बाहेर जाता येतं. तिथेच Tower Bridge आहे. टॉवर ब्रीजच्या वेळा पाहून गेल्यास ब्रीज उघडला जाताना बघता येईल. ते बघून झाल्यावर हातावरचा स्टँप दाखवून परत टॉवर ऑफ लंडन मधे जायचं आणी उरलेला भाग पाहून मुख्य दरवाजातून बाहेर यायचं, की तिथून परतीची क्रूझ. परत जाणारी क्रूझ लंडन आयच्या विरुद्ध दिशेला Westminster Bridge ला सोडते. तिथून जिन्यानी वर आलं की तिथेच Westminster Abbey आणी Big Ben आहे. ते बघून थेम्स रिव्हरच्या काठावरुन कंटाळा येईपर्यंत फिरायचं. फिरताना आजूबाजूला काय काय ठिकाणं लागतात त्यासाठी सकाळच्या क्रूझमधल्या कॉमेंट्रीदरम्यान सांगतात ते उपयोगी पडतं. कंटाळा आला की जवळच ट्युब स्टेशन गाठायचं, आणी संध्याकाळी/रात्री वाटल्यास Piccadilly Circus ला जाता येईल. अशा रितीने एका दिवसात फारशी दमछाक/धावपळ न करता बरीच ठिकाणं होतात. मग दुसर्‍या दिवशी Buckingham Palace, Madame Tussauds, Trafalgar Square इ. करता येईल.

स्कॉटलंडला जायला ट्रेन घेता येते. या ट्रेनचं तिकीट बर्‍यापैकी आधी काढल्यास जवळपास रेग्युलर तिकीटाच्या किंमतीत फर्स्ट क्लासचे मिळते, आणी फर्स्टक्लास चा प्रवास मस्तच एकदम! स्कॉटलंडमधील आम्ही पाहीलेली ठिकाणे (सर्वच मस्ट सी :स्मित:)
१. Urquhart Castle - चांगलं वेदर असेल तर अशक्य सुंदर आहे ही जागा
२. Dunnottar Castle - याचं ही लोकेशन जबराट, हा अ‍ॅबर्डीन जवळ आहे
३. Glamis Castle - हा ईनडोअर आहे, त्यामुळे ज्या दिवशी खराब वेदर असेल त्या दिवशी करायला उत्तम Happy
४. Edinburgh Castle - हा किल्ला मोठा आहे फिरायला, हा आणी नंतर एडीनब्रा फिरायला जवळपास आख्खा दिवस लागतो.

लंडन-स्कॉटलंड ट्रेन नी जाण्याचा अजून एक फायदा म्हणजे वाटेत York नावाचं स्टेशन आहे. तिथे उतरून यॉर्क मधे फिरता येईल. यॉर्क खूप सही आहे जायला असं आम्हाला नंतर कळलं.

चला, तुम्हाला सांगण्याच्या निमीत्ताने मीही परत एकदा युके फिरुन आलो Happy

Pages