च - च - च - च - च

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

पार्ले बाफवर शोनुने आज सांगितले- आपणच आपल्याला घातलेल्या सीमांबद्दल विचार करावा अन एकाचं तरी लंघन करावं. ह्यावर खूप म्हणजे खूप विचार केल्यावर मला असे जाणवले की कविता-बिविता माझा प्रांत नाही अशी जी मी माझ्या प्रतिभेला सीमा घातली आहे तिचे लंघन करायची हीच वेळ आहे. लगेच एक कविता पाडली सुद्धा. पहिलाच प्रयत्न आहे, समजून घ्या-

चकळेन चणालाहीको,
चळतातव चब्दश चसेऐ
चण्हतीक चदनाहीवे,
चषयाचीवि चही चरजग चहीना
चता चथा चथै चय्या !!!!

(च च्या भाषेची एक गम्मत नवर्‍याला सांगत असताना ही कल्पना सुचली. कृपया हलकेच घ्यावे)

विषय: 

आम्ही अजुन एक भाषा बोलायचो.

कापमाल तुपमु कुपमुठे गेपमेला होपमोतास ? म्हणजे काल तु कुठे गेला होतास ?

वाक्यातल्या प्रत्येक शब्दातल्या पहिल्या अक्षरा नंतर 'प' लावायचा पहिल्या अक्षराचा काना मात्रा वेलांटी जे काही असेल ते त्या नंतर 'म' ला लावायचे. पुढची अक्षरे मात्र न बदलता वापरायची.
उ.दा. रामायण = रापमारायण.
नंतर = नपमंतर.
कदाचित = कपमदाचित.

बपमघा तुपमुम्हाला बोपमोलायला जपममते कापमाय ? खुपमुप सोपमोपी आपमाहे हीपमी भापमाषा.

मपमला पपमण येपमेते हिपमी भापमाषा Happy

वी मुंड हिडप्या वाषा मुंड भाडप्या वेते मुंड येडप्या वामुंड काडप्या वुम्हाला मुंड तुडप्या? Happy

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

सॉरी सॉरी मायबोली समजुन मी चुकुन भलतीकडेच घुसले.....

वी मुंड हिडप्या वाषा मुंड भाडप्या वेते मुंड येडप्या वामुंड काडप्या वुम्हाला मुंड तुडप्या?>> Lol

देपमेवा आपमाता नपमविन कपमविता ऐपमकायला लापमागणार... तेपमवधच नपमविन कापमही, पपमण मपमज्जा येपमईल.. Lol

अज्जुके, शिव्यांचि लाखोली काय???
शाळेत असले उद्योग लागतातच. Happy

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

संत्र सोलल्यासारखा >>> Biggrin मस्तय उपमा !

तुर्फम्हाला
रर्फची भार्फषा येर्फते?
एर्फकदम सोर्फपी आर्फहे..
पर्फण पर्फटकन बोर्फललं किर्फ कर्फळत नार्फही.
..प्रज्ञा

वी मुंड हिडप्या वाषा मुंड भाडप्या वेते मुंड येडप्या वामुंड काडप्या वुम्हाला मुंड तुडप्या?>>>

दक्षिणा Happy
ही भाषा तुम्हाला येते का??
असं आहे ना ते??

राज्या, बरोबर. Happy
अहो लोकहो! मराठी उप्-भाषांच्या उत्पतीचा बी बी नाहिए हा...
सिंड्रेलाच्या कवितेवर पण भाष्य करूयात का आता? Happy

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

रर्फची भार्फाषा मर्फला येर्फेते.

गन्गरफची भान्गरफाषा येन्गरफेते कान्गरफा तुन्गरफुम्हाला?

माझे सीमोल्लंघनाचे प्रयोग बहुधा 'दारू पिणार नाही' या स्वतःच स्वतःवर घातलेल्या सीमेचे उल्लंघन करण्यापर्यंत थांबतात. मग मात्र, हे असले काही न करतासुद्धा पुष्कळदा मी काय बोलतो हे बहुतेक कुणालाच काहीच कळायचे नाही.

खुपच छान....!!!!

वकदममुंडाएरुपया वस्तमुंडामरुपया! (चकदमए चस्तम!)
चकळेन चणालाहीको>>>>>> एक दुरुस्ती ........चळेनक

वामुंडाहारुपया वागामुंडाधरुपया वंमतमुंडागरुपया व्हणुनमुंडामरुपया वरमुंडावरुपया वाढतेमुंडाकरुपया वाहेमुंडाअरुपया. वितीमुंडाकरुपया विवसमुंडादरुपया वालेमुंडाझरुपया वीमुंडाहरुपया वंमतमुंडागरुपया वरुनमुंडाकरुपया. Happy

डेव्हलपमेन्टल सायकॉलॉजी मध्ये किशोर वयीन मुलांची वैशिष्ट्ये मध्ये या वयातली मुले सांकेतिक भाषा तयार करून आपसात वापरतात असे म्हटलेले आहे (इतर वैशिष्ट्ये डे ड्रीमींग, हीरो वर्शिप इ.)

Pages