डोळ्यांच्या समस्या

Submitted by निंबुडा on 28 December, 2012 - 04:36

'आरोग्यम् धनसंपदा' ह्या ग्रूप मध्ये डोळे ह्या विषयावर परीपूर्ण चर्चा असलेला धागा न सापडल्याने हा धागा उघडत आहे.

डोळ्यांच्या समस्या व डोळ्यांचे विकार आणि त्यावरील उपाय, शल्यक्रिया, डोळ्यांचे डॉक्टर्स इ.संबंधी इथे चर्चा करू या.

डोळ्यांशी संबंधित विशिष्ट समस्यां/प्रश्नांसाठी खालील धागे 'आरोग्यम् धनसंपदा' ग्रूप मध्ये तसेच जुन्या मायबोलीवर ह्या आधी बनवले गेल्याचे दिसत आहे. लिंक इथे देत आहे.

डोळे येणे - चांगलं की वाईट ?

डोळ्यांच्या लेझर सर्जरी विषयी माहिती हवी आहे

संगणकाशी दोन हात करताना ... - ह्या धाग्यावर 'संगणक वापरताना डोळ्यांवर येणारा ताण व त्यावरील उपाय' ह्यावर काही लेखन आहे.

त्या व्यतिरिक्त एकूणच डोळ्यांच्या आरोग्यासंबंधी इथे चर्चा करता येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंकु,
अरे देवा! यासाठी ऑनलाईन सल्ले देणे वाईट. त्यांना लिहिले ते वाचून तुम्ही घाबरलात.

त्यांचा त्रास पोस्ट ट्रॉमॅटिक म्हणजे अ‍ॅक्सिडेंटनंतर आलेला आहे. तुमचा साधा सिंपल आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे ही ट्रीटमेंट असते. थोडे चिमूटभर मीठ जास्त घालून लिंबू सरबत घ्या, इलेक्ट्रोलाईट इंबॅलन्स गेला की फडफड बंद होईल.

करुन पाहते इब्लिसदा Happy
ते कंटीन्यु २ दिवस सुरु होत आनि मी मुददाम दुर्लक्ष करत होते.. म्हणुन घाबरले होते थोडी

मला काही दिवसापासुन डोळ्यावर पडदा आल्यासारखा वाटतो. म्हणजे एक्झॅक्टली पडदा नाही. पण अस भुरकट वाटतं. डोळ्यात सार, घाण वैगेरे काहीच नाही. डॉ ला एक्झॅक्टली काय कसं सांगावं कळत नाहीये.

मला डाव्या डोळ्याला वेगळं वाटतं.(म्हणजे दिसतं नीट, पण उजव्या डोळ्यापेक्षा डाव्या डोळ्याचे बघणे वेगळे आहे असे काहीतरी विचीत्र वाटते.)
आसावांकडे गेले होते त्यांना 'या वयात कॅटरॅक्ट होईल का' म्हणून विचारले पण तसे काही निघाले नाही.त्यांनी अ‍ॅलर्जेटिक कंजंक्टिव्हायटीस(साधे डोळे येणे नाही) म्हणून ड्रॉप्स दिले आहेत आणि कॉम्प्युटर कडे बघताना चष्मा लावा सांगितलेय.
मायबोलीवर अनेक भगिनींच्या प्रेडिक्शन प्रमाणे मला लेन्सेस लावायची कटकट वाटते आहे. सध्या लेन्सेस बंद.
चष्मा विसरतोय, पण नियमीत चालू करण्याचा विचार आहे.
दिसते नीट, पण ९-१० तास कॉम्प्युटर कडे बघून 'दमलेले डोळे' हा नेहमीचा प्रकार आहेच.मध्ये मध्ये इथे तिथे बघण्याचा प्रयत्न करते आठवेल तेव्हा.
बायोनिक लेन्स नावाच्या शोधाबद्दल फेसबुक वर वाचले, इथले तज्ञ काही माहिती देऊ शकतील का?

सस्मित, घाबरवत नाहीए पण शुगर चेक करुन घे. तुझं वय मला माहित नाही, पण माझ्या चाळिशीतल्या कलिगला हाच प्रॉब्लेम आला होता. इतरवेळेस आय साइट चांगली होती, पण डोळ्याच्या डॉ. कडे गेल्यावर त्यांनी शुगर चेक करायला सांगितली ती ४५० निघाली. डायबेटीसचे वेगवेगळे symptoms असतात, हिच्या बाबतीत डोळ्यांना धुरकट दिसणे यावरुन कळालं.

डोळ्यांच्या कोरडेपणा असु शकतो. विठ्ठल यांनी सांगितल्यप्रमाणे डॉक्टरांना जे वाटते तेच सांगा. असे सिम्पटॉम त्यांना माहित असणारच.

धन्यवाद ममा, मानव.
डोळे कोरडे नाहीत.
आज डॉ कडे जाणार आहे. त्यांनी शुगरचं काही सांगितलं नाही तर स्वतःच सांगेन की मी चेक करुन बघते म्हणुन.

वोल्फ बेरीज नावाचा एक प्रकार आहे तो रंगाने वेगळा पण मनूक्यासारख्या दिसतो. त्यांनी डोळ्याचे बरेचसे प्रश्न मिटतात. शिवाय रोज प्राणायाम केल्यानंतरची डोळे छान राहतात.

https://www.google.com.sg/webhp?sourceid=chrome-instant&ion=1&espv=2&ie=...

इथे बघ वोल्फ बेरीजचे फायदे.

मला दादर परेल मधील डोळ्यांचे डॉक्टर सुचवा कृपया.
स्वतः किंवा जवळच्या/ माहितीतल्या कुणी अनुभव घेतला असेल तर उत्तम.

मला दादर परेल मधील डोळ्यांचे डॉक्टर सुचवा कृपया.
स्वतः किंवा जवळच्या/ माहितीतल्या कुणी अनुभव घेतला असेल तर उत्तम. >
माटुंग्याला डॉक्टर प्रिती कामदार. चांगला अनुभव आहे .
Jashem Eye Institute
# 358, 1st Floor, Pandorkor Road , Matunga Central Railway,
Matunga. Landmark: Beside Pramanik Alfa Showroom & Above HDFC Bank, Mumbai, Mumbai

Pages