येत्या रविवारी दिनांक ३० डिसेंबर रोजी योगोत्कर्ष ह्या योग आणि योगासनांसाठी वाहून घेतलेल्या संस्थेतर्फे योग आणि योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गेली २५ वर्षे ही संस्था पुणे जिल्ह्यात कार्यरत आहे. योग प्रसार व प्रचाराचे काम यथाशक्ती करीत आहे.योगशास्त्र आणि योगासनांचॆ आवड जनमानसात, विशेषत: मुलांमध्ये लहानपणापासूनच निर्माण व्हावी या उद्देशाने स्पर्धा भरविण्यात येतात. आजपावेतो अनेक विद्यार्थ्यांची योगासन स्पर्धेसाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यात यशही मिळाले आहे.
या संस्थेच्या मते,
योग ही एक जीवन पद्धती आहे. त्यातील तत्त्वे, धर्म, जाती, लिंग, देश यांच्या पलिकडे जाउन मानवजातीच्या उद्धाराकरिता आहेत. ही तत्त्वे आपणांस माहित नसली तरी आपण दैनंदिन जीवनात पाळत असतो. याची जाणीव स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करून देण्याचा प्रयत्न आहे.
योगासनांना व्यापक महत्व मिळत गेल्यावर प्रसाराबरोबरच त्या स्पर्धेचे स्वरूप व मुला उद्देशही बदलत गेला. त्यांना निखळ शारीरिक कसरतीचे स्वरूप येउ लागले. आर्टिस्टिक योगाच्या नव्या रूपाने हा प्रकार ह्रीदमिक जिमनेस्टिकच्या जवळ गेला. त्याच्याशी एकरूप झाला. योगासनांच्या प्रात्यक्षिकांमध्ये त्याला एक्रोबेटिक्सचे स्वरूप आले. या रूपांना योगशिक्षकांबरोबर योगसंस्थाही जबाबदार आहेत.
या धर्तीवर पुन्हा एकदा अभिनव बदल करून योगशास्त्राचे मूळस्वरूप स्पर्धेच्या माध्यमातून लोकांसमोर आणणार आहे.
आसनांच्या अभ्यासाबरोबर आसनांसंबंधी इतर अंगे (यामानियामादी) यांची उपयुक्तता या काळातही कशी महत्वाची, तसेच विविध रोगांवर कोणती आसने कशी उपयुक्त आहेत हेही महत्वाचे ठरते.
याचा स्पर्धेच्या नव्या स्वरूपात अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
हा अभिनव प्रयोग दिनांक ३० डिसेंबर २०१२ रोजी पुण्याच्या स.प. महाविद्यालयाच्या स्टुडंट हॉल मध्ये आयोजिण्यात आला आहे. ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी खालील व्यक्तींशी संपर्क करावा...
चित्तरंजन चांदोरकर ०९८५०१५९६८८
सुनील रोट्टी ०९८२३२८९१५४
अजय, ही माहिती येथे
अजय, ही माहिती येथे दिल्याबद्दल धन्यवाद !
सुनिल रोट्टी हे फारसे प्रसिद्ध नसले तरी जवळपास अय्यंगारांच्या तोडीचे आहेत.
माझे भाग्य की मी शाळेत असताना या मंडळींच्या समवेत योगासने करीत असे