टू व्हीलर कोणती घ्यावी?

Submitted by गोगो on 26 December, 2012 - 04:54

मला बँगलोरमध्ये टू व्हीलर घ्यायची आहे कुठली टू-व्हीलर चांगली आहे? काय काय बाबींचा विचार करून घ्यावी? कृपया मार्गदर्शन करावे.
(या विषयावर आधिच धागा असेल तर हा डिलीट करेन... मला दिसला नाही.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्कूटरेटमध्ये वेगो चांगली आहे. अ‍ॅक्टिव्हापेक्षा सस्पेन्शन भारी आहेत. वेगो किंवा टीव्हीएस अ‍ॅक्सिस १२५ ह्यात चॉईस करावा.

३०० सी सी च्या जवळ्पासची घ्यायची आहे. सध्या तीन टू व्हीलर आहेत पल्सर,डीस्कव्हर आणि वेगो. फक्त लाँग ड्राईव्हसाठी पाहिजे (बुलेट नको) जरा हटके पाहिजे. >>>>>>

लाँग ड्राईव्ह साठी पाहिजे असेल तर स्पोर्ट बाईक घेउ नका.
माझ्या कडे सीबीआर २५०आर आहे. मोठ्या हौसेने घेतली. पण आता वैतागलो आहे. एक तर गाडी ट्रॅफिक मधे भयानक गरम होते. टर्निंग रेडियस कमी त्यामुळे सिटी मधे चालवायला वैताग.
लाँग ड्राईव्ह ला जायचं म्हणलं कि तळहात दुखून येतात. गाडी ८ ते १० दिवस वापरली नाही कि स्टार्टर उचलत नाही. बॅटरी डाउन होते. अ‍ॅव्हरेज १५ ते २० च्या आसपास. बोजड. थोड्याफार फरकाने निन्जा, ह्योत्सूंग, यमाहा यांची हिच परिस्थीती आहे.

ईतके वाचून पण घ्यायची ईच्छा असेल तर मला विपू करा. आम्ही विकणार आहोत. Proud

जर बजेट चा प्रॉब्लेम नसेल तर हार्ली बघा. आता फक्त ६० ते ७० हजार डाउनपेमेंट आणि पाच वर्षासाठी ८ते ९ हजार महिन्याचा हप्ता पडतो.

अल्पना, अ‍ॅक्सेस घेताना नीट चौकशी करा. ३-४ वर्षांनंतर खूप त्रास देते गाडी.

प्रकाश, बाइकवरून स्कूटरवर शीफ्ट व्हायचा अजून एक तोटा म्हणजे पाठ्दुखी / कंबरदुखी. दुचाकीचा तो तोटा असतोच पण स्कूटर्सची चाके लहान असल्याने धक्के जास्त बसतात आणि दुखणे लवकर मागे लागते / असलेले दुखणे जास्तच वेगाने बळावते.

आम्ही बघितलीये.
>>हे चित्र बहुधा गणपथी किंवा अन्य तत्सम मिरवणुका आणि र्‍याल्यात दिस्ते . रोजच्या जीवनात तरी न्हाय बगिटलं...

स्कूटी पेप प्लस Happy

रोजचा धबडगा वापर असेल, तर एकदम हॅण्डी, हलकी. सामान ठेवायला भरपूर जागा. अन्य काही स्कूटरेट्सच्या तुलनेत किंमतही कमी आहे (ना?)

(रस्त्यात गाडीला काही बिघाड झाला, तर हातात धरून १-२ किमी नेता आली पाहिजे - हा माझा क्रायटेरिया होता. Proud तशी एकदा ही आरामात नेली. पेट्रोल संपलं म्हणून :फिदी:)

बाकी, मोसा ला अनुमोदन. मी ऑलमोस्ट ५-७ वर्षं मोसा वापरली. (हिरो होण्डा सी डी १००) पण एक-दोनदा हातात धरून ढकलत न्यावी लागली, तर वाईट वाट लागली.

मृणाल १, जर दिसणे (लूक्स) हा क्रायटेरिया असेल तर पियाजियो ची व्हेस्पा एकदा जरूर पाहा. फसिनो पेक्षा जास्त स्लिक अन छान आहे दिसायला. मार्केट मध्ये बर्‍यापैकी स्टेबलही झालीये आता. सो एकदम ब्रॅन्ड न्यू पेक्षा सरस ठरावी.

बाकी माझं मत मात्र टिव्हीएस वेगो नाहीतर ओल्ड गूड अ‍ॅक्टिव्हा.
१०० सीसी/ १२५ सीसीनी फार काही फरक पडत नसावा. Happy

व्हेस्पा आणि fascino च्या किमतीत बराच फरक आहे.
सुपुत्राला घ्यायची आहे. त्यामुळे लुक्स हा मुद्दा विचारात घेतला जातोय . घरात २ Activa आहेतच.त्यामुळे वेगळी गाडी हवी आहे . ती जवळ जवळ final केलीये त्याने .

>>प्रकाश, बाइकवरून स्कूटरवर शीफ्ट व्हायचा अजून एक तोटा म्हणजे पाठ्दुखी / कंबरदुखी. दुचाकीचा तो तोटा असतोच पण स्कूटर्सची चाके लहान असल्याने धक्के जास्त बसतात आणि दुखणे लवकर मागे लागते / असलेले दुखणे जास्तच वेगाने बळावते.<<
माधव हा मुद्धा माझ्या लक्षात आला नव्हता. त्यामुळे बाईक वरुन स्कूटरवर शिफ्ट करण्याचा फेरविचार करतो. बाईक माझ्या एकट्या पुरतीच मर्यादित राहते. स्कूटर असेल तर ती बायको व मुलीला पण चालवता येईल.बायकोकडे व्हिगो आहे तर मुलीकडे ऎक्सेस १२५ . व्हेगो जास्त आरामदायी आहे. सस्पेन्शन व मेन स्टँड इझी. आहे.
माझ्याकडे स्प्लेंडर आहे. मला त्याचा काही त्रास वाटत नाही. फक्त स्कूटर सोयीसाठी जास्त उपयुक्त आहे

टीव्हीएस ज्युपिटर, वेगो आणि अ‍ॅक्टिव्हा ३जी यांत कोणती चांगली आहे गाडी?

सध्या स्कूटी पेप वापरते आहे. पण ८ वर्षांत खूपच त्रास दिला आहे तिने. खास करून बॅटरी प्रॉब्लेम खूप आहे. ३ वेळा तरी बॅटरी बदलली आहे. आता परत बंद पडली आहे. ओळखीतल्या अजून दोघींच्या स्कूटींबद्दलही हेच ऐकले आहे. त्यामुळे, परत टीव्हीएसकडे जावे का नाही याबद्दल साशंक आहे. Sad
अ‍ॅक्सेस चालवून पाहिली. आवडली, पण फारच जड वाटली. Uhoh

ती बजाज एम ८० आता बंद झाली असे दिसते.मोटरसायकल व स्कूटर यांच्या मधले मॉडेल म्हणुन चांगले होते. आता त्या डिझाईनचे अन्य मॉडेल दिसत नाही.

TVS jupiter / maestro edge vx / Activa

वरीलपैकी कोणती गाडी घ्यावी?

Wego आणि Activa i यापैकी कोणती गाडी घ्यावी?

रोज 13-14 km रनिंग होईल.

Activa i चा review चांगला आहे. इथे कोणाकडे आहे का? असल्यास कशी आहे? मला शक्यतो कमी वजन असलेली हवी आहे पण स्कूटी नकोय. Activa / Activa 3G खूपच जड वाटतात म्हणून i घ्यावी असं मत आहे. तसेच पुण्यात होंडा चा चांगला डीलर कुठला आहे? वेबसाईट वर review वाचून ठरवता येईल का?

Aprilia sr 150 hi scooter विषयी काय मत
आहे?

Padhara hatti ahe.. nusatach show... mulachya agrahakhatar ghetali tyala pan pastawalo .. ajibat avarage det nahi..
arthat he maz personal mat ahe.

इकॉनॉमी पाहिजे असल्यास ऍक्टिवा 4g किंवा 5g किंवा tvs ज्युपिटर.आता मैत्रिणीने सुझुकी ऍक्सेस घेतली.तीही चांगली आहे.पिकअप वगैरे चांगला.lcd ओडोमीटर आहे.
व्हेस्पा च्या गाड्या सुंदर आहेत.पण शोरूम आणि सर्व्हिस स्टेशन कमी.आणि गाड्या महाग आहेत.
हिरो वाले आम्हाला खूप रेड कार्पेट वागणूक देत होते.मायस्रो आणि ड्युएट वर चांगल्या ऑफर,फ्री हेल्मेट, 10 वर्ष जुन्या स्कुटी चे चांगले पैसे देत होते.तीही गाडी चांगली आहे.पण हिरो कंपनी आणि ती मॉडेल्स चालू राहतात का इतके बघावे लागेल.

स्कूटर सेकशन मध्ये यामाहाची फसिनो चांगली गाडी आहे..
दिसायला देखणी, मायलेज चांगला देते आणि चालायला पण स्मूथ आहे
माझ्याकडे २. ५ वर्षांपासून आहे अजून तरी काही प्रॉब्लेम नाही

Gear aata outdated झालेत gear wali bike chi गरज आहे .
जगात 10, बाईक gearless आहेत असं मी वाचलं आहे

@mi_anu, होंडाची स्ट्रीट ही ऑटोमॅटिक नव्हती, तर क्लच लेस होती. क्लच दाबायची लिव्हर नव्हती. डायरेकट गियर्स टाकायचे.
अन ती मोटार सायकल नसून स्टेप थ्रू हा मोसाचा उपप्रकार होती. फार लोकप्रिय झाली नाही.
कायनेटिकची के-फोर अशीच गाडी (स्टेप थ्रू मोसा, १०० सीसी,क्लचवाली ) पण ही देखील फारशी चालली नाही.

शिवाय स्ट्रीट ला रोटरी गिअर होते, चौथ्यानंतर परत पहिला गिअर पडायचा. सलग दाबत गेले तरी चालत होते. स्ट्रीटची स्मार्ट एडिशन पण आलेली तीही फेल गेली.
मोटारसायकल मध्ये टिव्हीएस ची क्लचलेस जाईव्ह होती. तीही चालली नाही. पिकअप नव्हता समाधानकारक. कायनेटिक फोरेस चे बॉडी क्वांलिटी मात्र भंगार होती. न तुटलेली फुटलेली एकही कधी दिसली नाही.

Pages