टू व्हीलर कोणती घ्यावी?

Submitted by गोगो on 26 December, 2012 - 04:54

मला बँगलोरमध्ये टू व्हीलर घ्यायची आहे कुठली टू-व्हीलर चांगली आहे? काय काय बाबींचा विचार करून घ्यावी? कृपया मार्गदर्शन करावे.
(या विषयावर आधिच धागा असेल तर हा डिलीट करेन... मला दिसला नाही.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

TVS wego च सस्पेन्शन उत्तम आहे. गाडी चांगली आहे. फक्त अ‍ॅवरेजमधे मार खाते. नवीन लेट्स कशी आहे? आताच आली आहे मार्केट मधे.

टू व्हीलर घ्यायचा विचार करतेय. २-४ किमी रेडीयसमध्येच वापर होईल शक्यतो. आईकडे ८-१० वर्षांपासून अ‍ॅक्टीव्हा आहे. (बहूतेक पहिल्याच बॅचमधली) तिची भरपूर सवय होती/ अजून्ही थोडी सवय आहे. बाकी जुनी कायनेटीक, स्कुटी, प्लेजर, डिओ अश्या बर्‍याच गाड्या चालवून बघितल्या आहेत. पण आता त्यातली कोणती गाडी चांगली वाटली चालवताना हे आठवतही नाहीये. (एक्सेप्ट स्कुटी २-३ महिने चालवल्यानंतर पाठदुखी सुरु झाल्याचं आठवतंय).

ऑटो एक्स्पो मध्ये बघितल्या पासून वेस्पा च्या स्कूटर्स मनात भरल्यात. पण बहूतेक यांचा किमती जरा जास्त आहेत असं ऐकलंय. अ‍ॅक्टिव्हाचा छान अनुभव आहे जुना. पण तिला भरपूर वेटींग असल्याने आणि अ‍ॅक्टिव्हाचा ओव्हरडोस होतोय सगळीकडे म्हणून मनातून अ‍ॅक्टीव्हा घ्यायची इच्छा होत नाहीये.

जरा बहूगुणी आखुडशिंगी स्कुटर सुचवा.

स्कूटी मुळीच घेऊ नकोस जर जुनी कायनेटिक, अ‍ॅक्टिव्हा वगैरे चालवल्या असशील तर. खेळणे वाटेल स्कूटी म्हणजे. वजनाला हलकी असल्याने अजिबात स्टेबल वाटत नाही.

बाकी मलापण घ्यायचीये टू व्हिलर पावसाळा संपला की. त्यामुळे हा बाफ वाचून काढते.
अ‍ॅक्टिव्हा माझाही पहिला चॉइस आहे. मुंबईत किती वेटिंग आहे माहित नाही पण.

अगं जुनी म्हणजे ते झेड एक्स च्या आधीचं दणकट मॉडेल होतं ना कायनेटीकचं तेच ताबडवलं होतं कॉलेजात.

व्हेस्पाच्या नव्या स्कुटर्स बद्दल काय रिपोर्ट आहे. जर बजेट वाढवायचं ठरलं आणि वेईंग नसेल तर नक्कीच त्यांचा विचार करेन. अ‍ॅक्टिव्हाचं महिनाभराचं वेटींग सांगत आहेत इथे. आठवडाभरापुर्वीच जावेनी तिच्यासाठी चौकशी केली होती.

सध्या तरी मग वेगो, अ‍ॅक्सेस यातून चॉइस ठेवते.

बर एक सांगा लोकहो.. त्या ३ गियर्सच्या स्कूटर्स यायच्या कोणे एके काळी, मग म ८० पण होती ३ गियरवाली.. ते सगळं बंद झालं का?
आता केवळ आटुकमाटुक? गियरची टू व्हिलर घ्यायची तर बाइकच घ्यावी लागेल का? स्कूटर नाही?
गियरला मजा असते राव. कन्ट्रोल आपल्या हातात एकदम.

जावेनी अ‍ॅक्टिव्हा बुक केलीये (बॅक डेट मध्ये केली म्हणे). १३ जुन ची बुकींग डेट आहेआणि या महिना अखेरीपर्यंत मिळेल असं वाटतंय. म्हणजे दीड महिना किमान वेटींग. १२५ सीसी वालं नवं मॉडेल ७०-७२ च्या आसपास नोयडामध्ये मिळतंय.

अल्पना, अ‍ॅक्टीवा आय मस्त आहे. मी मैत्रिणीची चालवूनही पाहिली आहे. एकदम झ्याक!
बाकी, कायनेटीक ताबडवली असशील तर अ‍ॅविएटर बघ... अ‍ॅक्टिवाच्या तुलनेत जरा उंच आहे, पण स्टर्डी आहे एकदम.

अ‍ॅक्टिव्हा आय आवडली? Uhoh स्कुटी आणि अ‍ॅक्टिवाची मधली बहिण वाटते. स्टॅबिलिटीच्या दृष्टिकोनातून माझ्यासाठी तरी बाद Sad

मोटरसायकलवरुन जर स्कूटर वर शिफ्ट झाल तर लहान चाकांमुळे येणारे असंतुलन व असुरक्षितपणाची भावना मला जाणवत. म्हणुन मी स्कूटर घेत नाही. अजुन कुणाला तस वाटत काय?

१२५ सीसी वालं नवं मॉडेल ७०-७२ च्या आसपास नोयडामध्ये मिळतंय.>>> बाबौ!!!!!!!!!

ह्यात दोन चार हजार घातले तर मस्तपैकी १५० सीसीची पल्सर / युनिकॉर्न येतील.
स्कुटरसाठी कम्पन्या लैच पैशे उकळत आहेत की.

ह्यात दोन चार हजार घातले तर मस्तपैकी १५० सीसीची पल्सर / युनिकॉर्न येतील.>>> तेच तर. आमची रॉयल एन्फिल्ड घेतली त्यावेळी ती ८० ची होती. Happy

बाइकचा प्रॉब्लेम म्हणजे एकतर त्यात वस्तू ठेवायला जागा नाही.
म्हणजे १० कामं करत फिरताना सगळ्या वस्तू सगळीकडे नाचवत न्यायच्या. गाडी चालवताना पर्स ठेवायला पण नीट जागा नाही. परत बाइक चालवायची म्हणजे जीन्स किंवा सलवार किंवा मग नऊवारी साडीच मस्ट.. उपयोग काय.

बाइकचा प्रॉब्लेम म्हणजे एकतर त्यात वस्तू ठेवायला जागा नाही.
म्हणजे १० कामं करत फिरताना सगळ्या वस्तू सगळीकडे नाचवत न्यायच्या. गाडी चालवताना पर्स ठेवायला पण नीट जागा नाही. परत बाइक चालवायची म्हणजे जीन्स किंवा सलवार किंवा मग नऊवारी साडीच मस्ट.. उपयोग काय. +१

एकाच चकरेमध्ये सगळी बाजारहाट उरकायची असेल तर ती बुलेट माझ्या काही कामाची नाही. आणि मार्केटामध्ये गाडीचा (चारचाकी) पार्किंगचा उलट प्रॉब्लेम होतो.

३०० सी सी च्या जवळ्पासची घ्यायची आहे. सध्या तीन टू व्हीलर आहेत पल्सर,डीस्कव्हर आणि वेगो. फक्त लाँग ड्राईव्हसाठी पाहिजे (बुलेट नको) जरा हटके पाहिजे. .कृपया सूचवा.

मोटरसायकलवरुन जर स्कूटर वर शिफ्ट झाल तर लहान चाकांमुळे येणारे असंतुलन व असुरक्षितपणाची भावना मला जाणवत. म्हणुन मी स्कूटर घेत नाही. अजुन कुणाला तस वाटत काय?
>> प्रकाश मी आहे तुमच्या रांगेत. मी सगळ्यात पहिली मोटर सायकल शिकले. आणि आजही मला मोसा जास्त सेफ वाटते. स्पीड कंट्रोल आपल्या हातात असतो. मोठ्या चाकामुळे घसरत बिसरत नाही.
नॉन गिअर गाड्या म्हणजे बेभरवशाचं सरकार.

पण वर उल्लेखल्याप्रमाणे मोसावर ठराविक ड्रेस आणि सामान ठेवण्याची बोंब असतेच.
नुसतं मिरवायचं असेल तर मोसा मस्तच.

फक्त लाँग ड्राईव्हसाठी पाहिजे (बुलेट नको) जरा हटके पाहिजे>> क्रुझर मध्ये फार ऑप्शन नाहियेत बुलेट सोडुन.
स्पोर्ट्स मध्ये होन्डा सीबीआर २५० सीसी, निन्जा २५० सीसी आहेत.
ह्या चालवलेल्या नाहियेत. पण निन्जा मख्खन आहे असा रिव्ह्यु वाचलाय.
किमंतही ऑर्गॅनिक मख्खन सारखी जास्त आहे त्याची. Lol

. परत बाइक चालवायची म्हणजे जीन्स किंवा सलवार किंवा मग नऊवारी साडीच मस्ट

>>
बाईकवर नौवारी. चित्र डोळ्यासमोर येऊन लैच हंसलो::फिदी:

बाईक नंतर अ‍ॅक्टिव्हा म्हणजे घसरण्याची ग्यारेंटी. १५० CC ची असेल तर फार पळते, आणि ब्रेक लावला की सुधारत नाही. अनुभवाचे बोल. कदाचित म्हणूनच लोक पाय बाहेर ठेवून घासतपण थांबवायचा प्रयत्न करतात. Proud

Pages