टू व्हीलर कोणती घ्यावी?

Submitted by गोगो on 26 December, 2012 - 04:54

मला बँगलोरमध्ये टू व्हीलर घ्यायची आहे कुठली टू-व्हीलर चांगली आहे? काय काय बाबींचा विचार करून घ्यावी? कृपया मार्गदर्शन करावे.
(या विषयावर आधिच धागा असेल तर हा डिलीट करेन... मला दिसला नाही.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुद्दाम नाही ग करत कोणी पंक्चर ! खरतर ती ६ वर्शे जुनी आहे. टायर-ट्युब वैगरे बदलले.पण आमच्या येथिल रस्तेच खराब आहेत. Sad

आमच्याकडे प्लेजर आहे महीन्यातुन एकदातरि नियमाने पंक्चर होते >> गाडीचा आणि पंक्चर चा कसा काय संबंध?

माझाही कल प्लेजर कडे झुकतो आहे.
एक शंका आहे. अ‍ॅटो इंजिनीअर्सनी लक्ष द्यावे.

या सगळ्या स्कुटर टाईप गाड्यांचे अ‍ॅव्हरेज ४० ते ४५ आहे. डोक्यावरून पाणी गेल्यास ५० किमी पर लिटर.
का या स्कुटर टाईप गाड्यांचे अ‍ॅव्हरेज वाढत/ वाढवता येत नाही काय?
नक्की काय कारण असावे कमी अ‍ॅव्हरेजचे?

अ‍ॅव्हरेज ४० ते ४५ म्हणजे जुनी असणारी कायनेटीक होंडा काय वाईट? ती गाडीसुद्धा आताच्या होंडा अ‍ॅक्टीव्हाच्या तोंडात मारणारी होती.

होंडा अ‍ॅक्टीव्हा, होंडा आय अ‍ॅक्टीव्हा, डिओ, अ‍ॅक्सेस या गाड्या ओव्हरप्राईज्ड ओव्हरहाईप्ड आहेत हे नक्की.

एक अनुभव. होंडा अ‍ॅक्टीव्हाच्या शोरूममध्ये या गाडीची किंमत विचारली. त्यानंतर ते म्हणाले की इंजीनची दोन वर्षे वॉरंटी आहे. अ‍ॅडीशनल ३ वर्षे वॉरंटीसाठी ६५०/- रूपये जास्त लागतील.

मला सांगा, तुम्ही होंडाचे इंजीन लावता गाडीला मग तुमचा स्वतःचाच विश्वास नाही तुमच्या टेक्नॉलॉजीवर? केवळ दोन वर्षे वॉरंटी देतात? म्हणजेच दोन वर्षांनंतर ते इंजीन काम काढेल की!

फालतू मार्केटींग अन पैसे कमावण्याचे धंदे.

मला हिरो प्लेजरवाल्यांचाही तसा राग आलाच आहे. मला सांगा तुम्ही दोन जण बसतील अशी गाडी तयार करून विकत्तात मग मागच्या सिटचे पाय ठेवायच्या दोन दांड्याचेही अ‍ॅक्सेसरीजमध्ये पैसे घेतात?

अ‍ॅक्सेसरीज मध्ये कमावतात ते.

अन गाडी विकणार्‍या डिलरचे कमीशन किती असते?

जुन्या टू स्टोक कायनेटिक होन्डाचे अ‍ॅवरेज कमी म्हनजे ३० आहे अशी बोम्ब मारीत सर्व्हिस सेन्टरमध्ये गेलो . कामगार समजावणीच्या सुरात म्हनाला साहेब ३० म्हंजी बरे आहे . साधारण २५ देते शहरात. तिथे कम्पनीचा इ.न्जीनीअर आला होता व्हिजिटला सहज. त्याने मला मागे बसवले आणि एक राईड मारून डबलसीट ६० अ‍ॅव्हरेज काढून दाखवले. चालवण्याच्या सवयींचा मोठा रोल असतो अ‍ॅव्हरेज मध्ये.....

त्या डिओ च संस्पेन्शन इतक विकृत आहे की धक्के शोषण्याऐवजी धक्के देण्याच काम करत.

+१.
होन्डाच्या स्कूटर्सचा (एव्हिएटर अपवाद) हा मोठ्ठाच दोष आहे, आणि यामुळेच मी त्यांपासून दूर राहिलो. अ‍ॅक्टिव्हा आणि डिओ, दोन्हींना जुन्या काळचे स्प्रिंग लोडेड सस्पेंशन आहेत, जे खराब रस्त्यावर तुमचा अंत बघतात. आजच्या काळातल्या स्कूटरला किमान टेलिस्कोपिक सस्पेंशन असलेच पाहिजेत. स्कूटर घेतांना हा मुद्दा नक्कीच विचारात घ्यावा.

Go for TVS Wego. One of the best in the mkt. ithe dyaneshchich wachleli post recall hotey...
कॉपी - पेस्टः

ज्ञानेश | 29 March, 2013 - 21:12
टफ अप ट्युब्ज होन्डाच्या जवळपास सगळ्या गाड्यांना असतात. तेही पंक्चर होतात, फक्त प्रमाण (तुलनेने) कमी असते. "पंक्चर न होणारी गाडी" रबरी चाकांत मिळत नाही. भारतात तरी.

धागाकर्ता / कर्ती ला स्कूटर हवी आहे. वर दिलेले सगळेच पर्याय उत्तम आहेत. सहा महिन्यांपुर्वी मीसुद्धा बायकोसाठी चांगल्या स्कूटरच्या शोधात होतो. मी होन्डाचा फॅन आहे. स्वतः युनिकॉर्न वापरतो. त्यामुळे होन्डाच्या स्कूटर्सकडेच कल होता. पण तरीही, बराच रिसर्च केल्यावर टीव्हीएस विगो घेतली.

विगोचे प्लस पॉईंट्स-

- उंची आणि वजन- स्त्री ग्राहकांसाठी अत्यंत आदर्श. (स्कूटीइतकी हलकी नाही, अ‍ॅक्टिव्हाइतकी जड नाही.)
- फुल्ल मेटल बॉडी (अन्य पर्याय ? फक्त अ‍ॅक्टिव्हा आणि वेस्पा.)
- फ्युएल कॅप सीटच्या बाहेर. (अन्य पर्याय- रोडिओ / स्कूटी स्ट्रीक)
- १२ इंची टायर्स. दोन्ही. (अन्य- फक्त अ‍ॅव्हीएटर. तेही फक्त पुढचे चाक.)
- बॉडी बॅलेन्स टेक. (हे गिमिक नाही. विगोचे वेट डिस्ट्रीब्युशन सर्वोत्तम आहे.)
- मेन स्टॅन्डवर लावायला सर्वात सोपी. अगदी सर्वात ! (टीव्हीएसने पेट्न्ट घेतलंय त्या डिझाईनचं.)
- मायलेज ४५-५०. (यात काही विशेष नाही, सर्वच देतात.)

विगोचे मायनस पॉईन्ट्स-

- इंजिन सुझुकी अ‍ॅक्सेस / स्विशसारखे पावरफुल नाही. (११० सीसी- म्हणजे अ‍ॅक्टिव्हाइतके आहे.)
- इंजिन होन्डा किंवा सुझुकीच्या गाड्यांइतके स्मूथ / रिफाईन्ड नाही.

किंमत-

५५,८००. (बजेटपुर्वी.)

महिंद्राची ड्युरो कुणी वापरली आहे का? काय रिझल्टस् आहेत? अॅव्हरेज खरंच ‌इतकं म्हणजे ८५ किमी प्र‌लि. मिळतं का? चांगलं अॅव्हरेज देणारी दुसरी कुठली बाईक घेता येईल, ज्यावर दोन (लहान) मुलं आणि एक बायको मावू शकतील?

माझी होंडा अ‍ॅक्टीवा आहे गेले ४.५ वर्षात एकदाही पंक्चर नाही, टच वूड. जवळचा लांबचा दोन्ही प्रवास अगदी उत्तमरित्या केलाय. ४५ च्या पुढेच अ‍ॅव्हरेज देते. अर्थात एकहाती आहे.

मुंबईमध्ये वेगो ऑन स्पॉट डिलेव्हरी ऑन रोड प्राईस ६०५००/-
अ‍ॅक्टीव्हा ५७००० सांगितलान एक्स की ऑन रोड माहिती नाही..
अ‍ॅक्टीव्हा चे अव्हरेज खरेच ६० पर्यंत पडते का? वेगो चे डिलर बोलला ४५-५०..
प्लीज मदत करा..

होंडा अ‍ॅक्टिवाचं स्लिम व्हर्जन 'अ‍ॅक्टिवा आय' बाजारात आलंय... ऑन रोड साठ हजार. मस्स्स्त आहे!!

Pages