प्रेम करणे, ते टिकवणे ही कला आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 25 December, 2012 - 03:35

गझल

प्रेम करणे, ते टिकवणे ही कला आहे!
ही हवीशी वाटणारी शृंखला आहे!!

ते कुठे संस्कार? संध्योपासना कोठे?
आज कोणाच्या कटीला मेखला आहे?

का न व्हाव्या चित्रदर्शी माझिया गझला?
ही न नुसती लेखणी, हा कुंचला आहे!

झोप रात्रीची उडाली, ना मन:शांती.....
झोपडीचा आज झाला बंगला आहे!

कोणतीही खेळ खेळी जीवना आता.....
आज जगण्याचाच झाला फैसला आहे!

द्रृष्ट माझी लागली माझ्याच प्रतिमेला;
आरसा तेव्हाच माझा भंगला आहे!

दागिन्यांची हौस तुजला, मी असा साधा!
ठेव तू मोती तुला, मज शिंपला आहे!!

जोम व्याख्यानात माझ्या तोच पूर्वीचा.....
मान्य, की, हा देह आता खंगला आहे!

सोस आहे, आव आहे गझल लिहिण्याचा!
कोण गझलेच्या नशेने झिंगला आहे?

ऐकते माझी चिताही भाषणे सारी!
सोहळा श्रद्धांजलीचा रंगला आहे!

............ प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सतीशा, नकोस पाडु ह्या वेगानी गजला !
मायबोली तुझ्याच नावानी भरली आहे !!

काढुन द्या रे याला कोणी स्वतंत्र ग्रुप !
टाळण्याचा तूला हा च मार्ग उरला आहे !!

@ admin

<<< का न व्हाव्या चित्रदर्शी माझिया गझला?
ही न नुसती लेखणी, हा कुंचला आहे!>>>

का न झाडुन टाकत नाहीस या गजला?
admin तू, तुझ्या हाती कुंचा आहे!!

प्रसादराव एवढे टोकाला जावू नका ही विनंती

असू द्यात बिग बॉस मधे तो इमाम जसा टाईम्पास करतो तितकेच त्याचे काम आहे तसे समजा हव तर देवसरांच्या गझलेला
Happy
तुम्ही विडम्बन चालू ठेवा ...............

चांगले करता आहात तुम्ही..........

ग.स.
जो पर्यंत ही समीक्षकाची झूल काढून आपण आपल्या बुरख्यातून बाहेर येत नाही, तोवर आपल्या कोणत्याही बरळण्याची आम्ही दखल घेवू इच्छित नाही. क्षमस्व!


>>>>बाळ प्रमोद!
हाहाहा! अगदी दुपट्यात गुंडाळल्यासारखं वाटलं देवपूरकरमामा!<<<<<

अरे देवा !!!
पोट धरुन हसत सुटलेय.
पांढ-या दाढी-मिशीतल दुपटयातल बाळ इम्यॅजिन करुन .

हा हा हा ...

आयला, प्राध्यापकमहोदयांनी चांगलीच जोरात फटकेबाजी चालवलीये. सचिन अर्धनिवृत्त झाल्याची पोकळी भरून काढायचा विचार आहे वाटतं! Lol
-गा.पै.

कळपा बाहेरच्या माणसाला एकजुटीने दगड मारणे किती छान वाटते नाही?

आवडत नसलेल्या कविता न वाचण्यापेक्षा कविला नाउमेद करणे का सोपे असते यावर कोणी गझल पाडली तर हे कोडे उलगडेल. रफिया इ ची शेव वर टाकली असेल तर फारच छान.

नम्र सुनील खापरपणजोबा

आयला, प्राध्यापकमहोदयांनी चांगलीच जोरात फटकेबाजी चालवलीये. सचिन अर्धनिवृत्त झाल्याची पोकळी भरून काढायचा विचार आहे वाटतं!
>>>

ब्यॅटींगच चालु असेल तर .... मीही एखादा सिक्सर मारु का Uhoh

"काफ्या नि रदीफ घेवुं द्या की रं
मला बी गजल शिवुं द्या की रं "

ज्येष्ट रण्धुरंधरांना मैदानात उतरायची परवानगी मागत आहे _/\_

Sunil Dandekar | 27 December, 2012 - 14:20

कळपा बाहेरच्या माणसाला एकजुटीने दगड मारणे किती छान वाटते नाही?

आवडत नसलेल्या कविता न वाचण्यापेक्षा कविला नाउमेद करणे का सोपे असते यावर कोणी गझल पाडली तर हे कोडे उलगडेल. रफिया इ ची शेव वर टाकली असेल तर फारच छान.
<<
+++१

---
ग्म्भीर समिक्शक = बेफिकिरजी. हापिशल डूआयडी.

-iblis on tab

Pages