प्रेम करणे, ते टिकवणे ही कला आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 25 December, 2012 - 03:35

गझल

प्रेम करणे, ते टिकवणे ही कला आहे!
ही हवीशी वाटणारी शृंखला आहे!!

ते कुठे संस्कार? संध्योपासना कोठे?
आज कोणाच्या कटीला मेखला आहे?

का न व्हाव्या चित्रदर्शी माझिया गझला?
ही न नुसती लेखणी, हा कुंचला आहे!

झोप रात्रीची उडाली, ना मन:शांती.....
झोपडीचा आज झाला बंगला आहे!

कोणतीही खेळ खेळी जीवना आता.....
आज जगण्याचाच झाला फैसला आहे!

द्रृष्ट माझी लागली माझ्याच प्रतिमेला;
आरसा तेव्हाच माझा भंगला आहे!

दागिन्यांची हौस तुजला, मी असा साधा!
ठेव तू मोती तुला, मज शिंपला आहे!!

जोम व्याख्यानात माझ्या तोच पूर्वीचा.....
मान्य, की, हा देह आता खंगला आहे!

सोस आहे, आव आहे गझल लिहिण्याचा!
कोण गझलेच्या नशेने झिंगला आहे?

ऐकते माझी चिताही भाषणे सारी!
सोहळा श्रद्धांजलीचा रंगला आहे!

............ प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झोपडीचा आज झाला बंगला आहे!>>>>>>>

हा खयाल माझ्या शेरावरून सुचला ना??
परवा मी तो तुम्हाला सान्गीतला होता तुम्हाला आवडलाही होता

असो

चांगला आहे हा शेर .............

हाती काही सापडत नाही अश्या गझला वाचून. मराठी गझलला लागलेले हे ग्रहण कधी सुटणार समजत नाही. जीवापाड प्रयत्न केला काहीतरी आवडून घेण्याचा, पण जमले नाही.

दहा पाच यमके वृत्तात बसवून गझला होत नाहीत. ती एक साधना आहे. तप आहे. भल्याभल्यांना गझल जमलेली नाही. पण यत्न चालू राहूद्यात.

कळावे

गंभीर समीक्षक

प्रेम करणे, ते टिकवणे ही कला आहे!
ही हवीशी वाटणारी शृंखला आहे!!

ह्या मतलाचे तुम्हीच अवलोकन्,चिंतन ,मनन काय करायचे ते करुन सांगा प्रोफेसर्,की यात वर्णनात्मकता वगळता काय आहे?

म्हणून म्हणतो, '' तुम्हास गझलतंत्र गवसले, मंत्रापासून कित्येक योजने दूर आहात''

तो पर्यंत यत्न चालू असु द्या.

नीधप,

आमचे त्यांना बरेच काही कमी करायचे सांगून झाले पण ऐकतील ते प्रोफेसर कसले? Lol

प्रोफेसर,

हलके घ्या. रच्याकने, एवढा मोठा आय डी घेण्याजोगे काय कारण घडले प्रोफेसर? तेही इंग्रजीमधे?

हलके घ्या.>>>>>

हे वाक्य भरीचे वाट्ले त्यामुळे प्रतिसाद भावला नाही एखादा मायबोलीबाह्य हास्य-भावला तरी टाकायचा होतात देवसरांसारखा असे वाटले मग प्रतिसाद कामियाब झाला असता Wink

एखाद्याने लांबलचक आयडी घेतला की आयडीच्या कॉलमची रूंदी तेवढी होते मग सगळे गणित बिघडते.

विदिपा, मी त्यांच्या (किंवा शक्यतो कुणाच्याच) गझल वाचायला जात नाही त्यामुळे त्यांनी बाकी काय कमी करावे, न करावे याच्याशी माझे काहीच घेणेदेणे नाही. Happy

त्यांना विपुमधे हीच विनंती करून झाली पण बहुतेक ते स्वतःची विपु पण बघत नसावेत त्यामुळे इथे टाकण्याशिवाय पर्याय नव्हता.

गझल प्रेमींचा रसभंग होत असेल तर क्षमस्व.

(किंवा शक्यतो कुणाच्याच) गझल वाचायला जात नाही>> नीधप, हे बेफीना उद्देशून होतं का?

अन हो नुसतं नाव नाही तर ते शिर्षकामुळे सुद्धा होतं बरं का!

>> गंभीर समीक्षक :
>> दहा पाच यमके वृत्तात बसवून गझला होत नाहीत. ती एक साधना आहे. तप आहे.

ह्या गझलेविषयी बोलत नाही, पण हे फार सुंदर वाक्य आहे. गझलेविषयी काहीही बोलण्याइतकी माझी लायकी व समज नाही.

About long user-id that disturbs the layout (Definitely the Site Admin already knows this):

I think even if Mr. deopurkar_satish@rediffmail.com changes his user-id, it could be a recurrent problem for new users. Why not change the CSS used in the view for this particular column so that the user id is text-wrapped automatically? This would ensure that all current and future users can have longer user-id if they want it. You have already done it for the first column.

This is just a suggestion, as I know there are many experts in Maayboli team Happy

ग,स.
हाती काही सापडत नाही अश्या गझला वाचून<<<<<
नजर अधू, हात दुबळे, कसे लागणार काही हाती?

मराठी गझलेला लागलेले हे ग्रहण कधी सुटणार समजत नाही<<<<<<<
आपल्यासारखे गंभीर विदूषक बाजूला झाले की, आपोआपप ग्रहण सुटेल!

जीवापाड प्रयत्न केला काहीतरी आवडून घेण्याचा, पण जमले नाही<<<<<<<
कसे जमेल? हा आपला प्रांतच नाही!

गझल एक साधना आहे<<<<<<
कल्पक व अभिनव शोध!

...........प्रा.सतीश देवपूरकर

कावळेराव!
हवीशी वाटणारी शृंखला<<<<<म्हणजे काय कळले आपल्याला?
म्हणूनच म्हणतात की गझल लिहायला, वाचायला, समजायाला, भावायला एक तबीयत लागते!
ती कमवा, म्हणजे वर्णनातले काव्यही उमगायला लागेल आपल्यालाही!

प्रा.सतीश देवपूरकर

कावळा,
'' तुम्हास गझलतंत्र गवसले, मंत्रापासून कित्येक योजने दूर आहात''<<<<<<<
आता अशी बिनबुडाची प्रशस्तिपत्रके वाटणे सोडा, आपलेच कल्याण होईल!

............प्रा.सतीश देवपूरकर

ग.स.
दहा पाच यमके वृत्तात बसवून गझला होत नाहीत<<<<<
दहा पाच सोडा, २ यमके तरी वृत्तात बसवून दाखवा!

माझी मुंगेरीलाल यांना विनंती आहे कि किमान काही दिवस त्यांनी विनोदी लिखाण पोस्ट करणं थांबवावं. इतकं सगळं एकाच वेळी वाचून होत नाही. देणाराचे हात हजारो...

प्रोफेसरसाहेब, या स्मायली खूप आवडल्या. गझलेमधे दोन शेरांच्या मध्ये जी जागा असते त्यातही एकेक स्मायली टाकण्यासंबंधी विचार करा ना. ( सर्व शेर एकाच पोस्टमधे का टाकावेत ? प्रत्येक शेरासाठी एक स्वतंत्र पोस्ट आणि एक स्वतंत्र स्मायली हे ठीक राहील).

मला No. one fan of Mr. deopurkar_satish@rediffmail.com, Professor, Wadia College असा आयडी घ्यायचा आहे. आपल्या परवानगीसाठी नम्र विनंती करत आहे..

प्रोफेसरसाहेब कुणाकडे लक्ष देऊ नका. भोग आहेत त्यांचे. नियतीने सूड उगवणे म्हणजे काय हे आता समजत असेल काहींना. तुम्ही अजिबात विचलीत होऊ नका. मी तुमचा क्रमाक एक फॅन आहे. कायम पाठीशी राहीन.

नीधप,
कृपया तुमचा आयडी थोडा कमी लांबीचा कराल काय? नवीन लेखनात सगळे विचित्र दिसते आहे<<<<<
युसर नेम चुकून तसे टाकले गेले. ते वन टाइम लौगिन होते. पहातो काही करता येते का ते!

विजयराव!
रच्याकने, एवढा मोठा आय डी घेण्याजोगे काय कारण घडले प्रोफेसर? तेही इंग्रजीमधे?<<<<<
आहो चुकून झाले ते, पहातो काय करता येते ते!

वैभवा!
एखादा मायबोलीबाह्य हास्य-भावला तरी टाकायचा होतात देवसरांसारखा असे वाटले मग प्रतिसाद कामियाब झाला असता<<<<<<<<<<<
असे काय?

२१ च्या वर प्रतिसाद गेले आहेत. किती कमी पडताहेत अवश्य कळवावे. आता हाताशी वेळ असल्याने आज्ञेचे पालन करण्यात काहीच अडचण येणार नाही.

आपला नम्र हनुमान

किरण बजरंगी

दहा पाच यमके वृत्तात बसवून गझला होत नाहीत. ती एक साधना आहे. तप आहे.
फार सुंदर वाक्य आहे<<<<<<<<<
दुस-यांवर फेकायला!

किरण,
गझलेमधे दोन शेरांच्या मध्ये जी जागा असते त्यातही एकेक स्मायली टाकण्यासंबंधी विचार करा ना.
<<<<<<<<<
त्या जागेत अव्यक्त स्मायली असतातच, ते गंभीर विदूषक/समीक्षक यांच्यासाठी असतात!

किरण,
ही मुंगेरेलीलाल आसामी कोण बाबा?
प्रत्येक शेरासाठी एक स्वतंत्र पोस्ट आणि एक स्वतंत्र स्मायली हे ठीक राहील<<<<<<
अभिनव कल्पना!
तुझ्यापासूनच सुरू करू या......

युसर नेम चुकून तसे टाकले गेले. ते वन टाइम लौगिन होते. पहातो काही करता येते का ते! <<
काहीही.
तुम्ही काय रोज नवीन अकाऊंट उघडता की काय?
आयडी बदलण्याची सोय आहे.

इथे रस आहे कुणाला? <<
इतरांचं माहित नाही. मला बिलकुल नाहीये.

किरण,
मला No. one fan of Mr. deopurkar_satish@rediffmail.com, Professor, Wadia College असा आयडी घ्यायचा आहे. आपल्या परवानगीसाठी नम्र विनंती करत आहे..<<<<<<<
आम्ही कोण परवानगी देणार बाबा ? इथे जोतो ऑटोनोमस आहे!

Pages