प्रेम करणे, ते टिकवणे ही कला आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 25 December, 2012 - 03:35

गझल

प्रेम करणे, ते टिकवणे ही कला आहे!
ही हवीशी वाटणारी शृंखला आहे!!

ते कुठे संस्कार? संध्योपासना कोठे?
आज कोणाच्या कटीला मेखला आहे?

का न व्हाव्या चित्रदर्शी माझिया गझला?
ही न नुसती लेखणी, हा कुंचला आहे!

झोप रात्रीची उडाली, ना मन:शांती.....
झोपडीचा आज झाला बंगला आहे!

कोणतीही खेळ खेळी जीवना आता.....
आज जगण्याचाच झाला फैसला आहे!

द्रृष्ट माझी लागली माझ्याच प्रतिमेला;
आरसा तेव्हाच माझा भंगला आहे!

दागिन्यांची हौस तुजला, मी असा साधा!
ठेव तू मोती तुला, मज शिंपला आहे!!

जोम व्याख्यानात माझ्या तोच पूर्वीचा.....
मान्य, की, हा देह आता खंगला आहे!

सोस आहे, आव आहे गझल लिहिण्याचा!
कोण गझलेच्या नशेने झिंगला आहे?

ऐकते माझी चिताही भाषणे सारी!
सोहळा श्रद्धांजलीचा रंगला आहे!

............ प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण,
प्रोफेसरसाहेब कुणाकडे लक्ष देऊ नका. भोग आहेत त्यांचे. नियतीने सूड उगवणे म्हणजे काय हे आता समजत असेल काहींना. तुम्ही अजिबात विचलीत होऊ नका. मी तुमचा क्रमाक एक फॅन आहे. कायम पाठीशी राहीन.
<<<<<<<धन्यवाद रे बाळा किरण!
पण आमच्या कानांना असे काही ऐकण्याची सवयच राहिली नाही रे!
पण आम्ही म्हटलेच आहे........
जेवढी होईल टीका,
तेवढे आम्ही उधाणू!
.................................................
मी असा दिसतो, नको जाऊस त्यावर.......
जाण तू पडली कुणाशी गाठ आहे!

...........प्रा.सतीश देवपूरकर

देवपूरकर ऐवजी आता गझलपूरकर असा आयडी घ्या...
कशा काय सूचतात हो इतक्या गझला..अक्षरश: पूर आलाय तुमच्या गझलांचा. Happy
तंत्र जमलंय..पण उस्फुर्त, वा! म्हणण्यासारखे फार काही जाणवत नाही...हे विधान तुम्हालाच काय कोणत्याही गझलकाराला नाही आवडणार हे माहीत आहे मला...पण हल्ली गझला लिहिणारे तुमच्यासारखे जुने/नवे बहुतेक लोक तंत्रात हुशार झालेले दिसतात...पण त्यात गझलेचा आत्मा...गझलियत मात्र क्वचितच दिसते....हे सांगण्याची हिंमत... उद्धटपणा म्हटलात तरी चालेल... एक रसिक म्हणून मी करू इच्छितो

किरण,
२१ च्या वर प्रतिसाद गेले आहेत<<<<<
तू बाळा प्रतिसादांची संख्या मोजत बसलास काय?ळ
आम्ही इथे एकेकाचा समाचार घेत बसलो आहोत वेळेत वेळ काढून (सौ,घोरत आहेत म्हणून केव शक्य होत आहे रे बाबा ! असो!
आम्ही संख्येपेक्षा गुणात्मकतेला मानतो!्
अवांतर:
व्याख्यानांचे वाचन सोडून हे आमचे उद्योग छुपे छुपे चालले आहेत बघ!
काहींना वाटते आमच्याकडे रग्गड वेळ असतो! पण परिस्थिती उलटी आहे!

कायपण म्हणा, पण प्रोफेसरमहाशयांनी प्रतिसादांची भट्टी जबरी जमवली आहे. उद्या सकाळीसकाळी पहिल्या धारेची येउद्यात! आमची फर्माईश म्हणा हवं तर.
Biggrin
-गा.पै.

प्रमोद!
कशा काय सूचतात हो इतक्या गझला..अक्षरश: पूर आलाय तुमच्या गझलांचा<<<<<<
बाळ प्रमोद! तू आम्हास/आमच्या गझलांना आता पहात आहेस, पण आम्ही गेली किमान २५/३०वर्षे जाणीवपूर्वक गझला लिहीत आहोत! २५/३० वर्षांचे लिखाण जेमतेम ५/६ महिन्यात पाहणे म्हणजे पूर आल्यासारखेच वाटणार!
तंत्र जमलंय..पण उस्फुर्त, वा! म्हणण्यासारखे फार काही जाणवत नाही...<<<<<<<
काय बोलणार बाबा? पसंद अपनी अपनी!
पण एवढे मात्र निश्चित की, गझलकाराबरोबर रसिकांजवळ पण किमान सौंदर्यबोध/काव्यबोध असणे गरजेचे असते!
दोघांमधेही गझलेसाठी लागणारी तबीयत असणे आवश्यक असते!

...........प्रा.सतीश देवपूरकर

गामा पैलवान,
कायपण म्हणा, पण प्रोफेसरमहाशयांनी प्रतिसादांची भट्टी जबरी जमवली आहे. उद्या सकाळीसकाळी पहिल्या धारेची येउद्यात! आमची फर्माईश म्हणा हवं तर<<<<<<<<
ही सर्व मायबोलीची, द्वाड मायबोलीकरांची कृपा व शिकवण आहे!
आपली फर्माईश जरूर पुरी करू!
पहिल्या धारेची/पहिल्या वाफेची कडक गझल पेश करण्यात येईल हा आमचा/प्राध्यापकाचा शबुद हाय!

............प्रा.सतीश देवपूरकर

>>>बाळ प्रमोद<<<

देवपुरकरमामा, तुमचे एकूणच अवघड आहे. जरा प्रोफाइल बघत चला. ते 'बाळ' प्रमोद तुमच्याच वयाचे आहेत.

२५-३० वर्षांचे लिखाण ५-६ महिन्यात टाकायला कोणी सांगितले? आस्ते आस्ते पिडा!

रसिकांच्या तबियतीचे जाऊ द्या. सध्यातरी तबीयत उत्तम आहे. आपल्या गोडाऊनमधे पडून असलेल्या मालापासून आपण आता पहिली धार काढणार आहात म्हणता. त्या नंतर तबियतीचे काही खरे नाही.

देवपूरकरांना स्मायली टाकायला टाकायला ज्याने शिकवले त्याची मायबोलीवरून हकालपट्टी करावी अशी विनंती करतो माबोप्रशासनाला.

एखाद्या लहान मुलाच्या हातात नवीन खेळणं सापडलं की ते पार तोडूनफोडून टाकेपर्यंत हातातून सोडत नाही ते पोर....अगदी तसं झालंय मामांचं..ह्या विशेष हसर्‍या वापरायला शिकल्यापासून. Happy
प्रमोदबाळाचे मामा..म्हणून बाळमामा देवपूरकर!
गझलांचं हसं झालंच आहे तर आता हसर्‍यांचीही गझल येऊ द्या !

बागेश्रीताई,
ज्या गावाला जावे तसा वेष करावा म्हणतात!
आमचे व्यक्तिमत्व म्हणाल तर माझे लेखन (आमचे लेखन) वर क्लिक करा, ठायी ठायी आम्हीच दिसू!
जे पाहिजे तुला ते, तू वाच पान माझे....
पुस्तक तुझ्याचसाठी उघडे सताड आहे!.
......हा आमचा पिंड
टीप: काही गोष्टी आमच्या प्रिय मायबोलीकरांनी शिकविल्या आहेत!

.............प्रा.सतीश देवपूरकर

एखाद्याने लांबलचक आयडी घेतला की आयडीच्या कॉलमची रूंदी तेवढी होते मग सगळे गणित बिघडते. >> ओह ह्यामुळे तसं चिवित्र दिसतय कायं.
मला वाटलं माझ्या इथेच काहितरी बिघडलय.

नजर अधू, हात दुबळे, कसे लागणार काही हाती?

कवी सतीश, खणखणीत नाणे असायला हवे गझल म्हणजे. चार आठ यमकांचा खुळखुळा वाजवत फिरण्याने फार तर गझलकार हे बिरुद मिळेल, पण स्वतःच्याच गझलेने आधी स्वतःलाच आनंद द्यायला हवा.

आपल्यासारखे गंभीर विदूषक बाजूला झाले की, आपोआपप ग्रहण सुटेल!

कवी सतीश, वरील प्रतिसाद व हास्यमुद्रांचा पसारा हेच दर्शवतो की गझलकाराने आता विदुषकी चाळे आरंभलेले आहेत. प्रथम थोडे गांभीर्याने गझल या काव्यप्रकाराकडे पाहू लागा. मेखला हा दागिना आहे, तो परिधान करून संध्योपासना करणे हा एक विनोदी विचार मांडला आहेत एका शेरात. थोडे थांबून लिहा, विचारपूर्वक लिहा.

कसे जमेल? हा आपला प्रांतच नाही!

आमच्या प्रांतात मराठी गझल हा एक लहानसा भाग आहे. याशिवाय अनेक लहानमोठ्या भागांनी आमचा प्रांत सजलेला, नटलेला आहे. आम्ही कमी बोलतो याचे कारण आम्ही चिंतन अधिक करतो.

कल्पक व अभिनव शोध!

हा उपहास दुराभिमानातून जन्मलेला सहज समजत आहे. हा दुराभिमान जर गझलांच्या संख्येमुळे अस्तित्वात आला असला तर त्याचा लवकरात लवकर त्याग करा. दुराभिमान हा कवी व चांगली कविता यांच्यातील न निघणारा अडसर आहे. काव्यात्म विचार असेल तेथेच कविता होऊ शकते व गझलतंत्र व गझलमंत्र अवगत असेल तेथेच कवितेची गझल होऊ शकते. शिवाय, गझलेच्या नैसर्गीक प्रवृत्तीला शोभेल अशी विचाराची मांडणीही आवश्यक असते. तारेवरची कसरत आहे ही.

दहा पाच सोडा, २ यमके तरी वृत्तात बसवून दाखवा!

यमके वृत्तात बसवणे हे आपण काहीतरी महान कार्य मानता असे आढळते. गझललेखनाची ती निव्वळ पहिली पायरी आहे. कोणी सांगून गझल रचावी अशी आमची ठेवण नाही. मात्र आमच्या जुन्या गझला आपल्याला वाचायला मिळू शकतील. जमल्यास एखादी येथेही सादर करू आम्ही.

गझलेचा दर्जा प्रतिसादांच्या संख्येवर विसंबून नसतो ना मुशायर्‍यातील टाळ्यांवर! शेर वाचून मनात गलबलायला हवे. नकळत दाद जायला हवी. मागे वळून आपलेच लेखन एकदा त्रयस्थपणे तपासायला घ्या. काय त्रुटी आहेत, काय कमतरता आहेत यांचा सखोल अभ्यास करा. या तपःश्चर्येला सामान्य मानू नका. शब्द, यमके, वृत्ते ही कुठे पळून जात नाहीत. इतर कोणी वापरली तरी आपण वापरू शकतोच. त्यांची घाई नसावी. विचार करा.

कळावे.

गंभीर समीक्षक

>>प्रेम करणे, ते टिकवणे ही कला आहे!

मुळात या शीर्षकाचा अख्ख्या गझलेशी संबंध नाही(च) ना? तर गझलेच्या बाराखडी व्यतिरीक्त, गझलेचे शीर्षक काय असावे यावर काही 'मार्गदर्शक' नियमावली प्रसिध्द आहे का?..

तुमच्या प्रोफाइल पेज वर जा आणि संपादन असा टॅब असेल त्यावर माऊसने टिचकी मारा.
मग असे पेज येईल.
sampadanw.jpg
यात लाल चौकोन दाखवलाय तिथे तुमचा १ सेंटिमीटर एवढ्याच लांबीचा आयडी भरा.

हे झाल्यावर माऊसवरच्या चाकाने किंवा साइडबारमधून तेच पान स्क्रोल करत खाली पोचा.
तिथे असे दिसेल.
sampsavew.jpg

लाल चौकोनात जे सेव्ह दिसते आहे त्यावर क्लिक करा.
म्हणजे तुमचा आयडी योग्य त्या लांबीचा होऊन आमची डोकेदुखी कमी होईल.

लाल चौकोन केवळ तुम्हाला समजावे म्हणून केलेले आहेत. प्रत्यक्षात ते दिसणार नाहीत.

इतके सोपे असूनही तुम्ही तुमचा आयडी तसाच ठेवलात तर मात्र लोकांना त्रास देण्याचा तुमचा हेतू आहे असे समजावे लागेल.

प्राजू ........आहेस का माबोवर......बघ ! नीधपचा वरचा प्रतिसाद वाच.... ; प्राजू स्पून फीडिन्ग याला म्हणतात.....!!!! तू उगाचच देवसराना त्यादिवशी असे म्हणाली होतीस की तुम्ही स्पून फीडिन्ग करता म्हणून

यात लाल चौकोन दाखवलाय तिथे तुमचा १ सेंटिमीटर एवढ्याच लांबीचा आयडी भरा>>>>>>>>>
फक्त एक से.मी. ?? तेही देवसराना म्हणते आहेस ??? अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर एवढा मोठा घाला आजवर पाहिला नव्हता
मी तर म्हणेन त्यांनी पूर्ण नाव + फोन क्र.+ कामाचा हुद्दा +कामाचे ठिकाण ( पूर्ण पत्त्यासहीत) + घरचाही पत्ता वगैरे द्यायला हवा आयडीनेम मधे
देवममींचाही फोन क्र. दिल्यास अधिकच उत्तम म्हणजे सरांविरुद्ध कुणाला काही तक्रारी वगैरे असतील त्या मामींना सांगता येतील .......... देवमामा फक्त त्यानाच घाबरतात असे ऐकून आहे !!!

देवमामा फक्त त्यानाच घाबरतात असे ऐकून आहे !!!
----- मामांकडे घाबरायला वेळ आहे कुठे ? घाबरत बसले तर तहानलेल्या रसिकांना गझलांची मेजवानी मिळणार कशी ?

प्रा महाशय - तुम्ही तुमचा आय डी काय वाट्टेल ते ठेवा.... पण अविरत गझला करत रहा. Happy

छान

Pages