मसाले भात आणि पुलावाला कंटाळून मी हा भाताचा नवीन प्रकार आईकडून शिकले.
साधारण दोन जणांसाठी -
मक्याचे दाणे ( अमेरीकनच पाहिजेत असं काही नाही, भारतीय पण चालतात. ) - १ वाटी
आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर - सगळं अंदजानुसार
पुदिन्याची ताजी पानं
शिजवलेला बासमती तांदळाचा भात - ( तयार भात २ १/२ वाट्या )
जिरं
मीठ - चवीनुसार
बटर किंवा तेल
मक्याचे दाणे वाफवून घ्यावेत. फार मऊ करु नयेत. आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर आणि पुदिना एकत्र वाटून घ्यावं.
कढईत थोडं बटर / तेल गरम कराव. जिरं घालावं. ते तडतडलं की शिजलेला भात घालून आपण जिरा राईसला जसं परततो तसं परतावं. नंतर पुदिन्याचं वाटण घालावं आणि पुन्हा परतावं. हे वाटण भाताला वरूनच घालावं. फोडणीत घातलं तर कढईला खाली लागायची शक्यता आहे. शिवाय आपल्या आवडीनुसार ते कमी / जास्त तिखट करता येतं. सगळ्यात शेवटी मक्याचे दाणे घालावेत आणि भात परतावा.
माझा बटर वर फार जीव आहे. त्यामुळे मी भात तयार झल्यावर मधे मधे थोडं बटर घालते आणि वरती झाकण ठेवते. भाताची वाफ आतच रहाते आणि त्याला चकाकी पण येते.
कमी वेळात एकदम वेगळ्या चवीचा भाताचा प्रकार होतो.
छान स्वाद येणार या भाताला.
छान स्वाद येणार या भाताला. आणि रंगही !
टपोरा पिवळा -चवीला गोड मका
टपोरा पिवळा -चवीला गोड मका ,पुदिना व हि.मसाल्याची मस्त चव येईल..भाताचा एक मस्त प्रकार !!
वाह !! मग कधी येवु जेवायला ?
वाह !!
मग कधी येवु जेवायला ?
फोटो? मस्तच होईल, पहावा करून
फोटो?
मस्तच होईल, पहावा करून या विकांताला...
योगेश... अहो फोटोचं पार
योगेश... अहो फोटोचं पार विसरले मी.
प्रसाद... "कधीही ये जेवायला!" ( असं म्हणण्याइतपत धीट झालीये आता मी. )
छान! मी किंचित साखर पण घालते.
छान!
मी किंचित साखर पण घालते. तसेच गाजर घातल्यास रंग छान येतो.
अरे वा ! छानच की
अरे वा ! छानच की
पहावा करून ............. म
पहावा करून ............. म स्त...
कसले सुगरण लोक आहात यार
कसले सुगरण लोक आहात यार तुम्ही लोक. एकदम YUMMY वाटतोय हा भात. भारीच की.
मलाही मसालेभाताचा भयंकर
मलाही मसालेभाताचा भयंकर कंटाळा आलाय तेव्हा हा करुन बघायला हवा.
ही सोपी आणि जमणेबल रेसिपी
ही सोपी आणि जमणेबल रेसिपी दिसतेय. नक्की करणार.
अगं आई मला जमेल अशाच रेसिपी
अगं आई मला जमेल अशाच रेसिपी सांगते. माझ्यापे़क्षा जावयची फार काळजी अहे तिला. स्मित
एकदम जमणेबल आहे. बिनधास्त कर.
मस्त. करून बघणार.
मस्त. करून बघणार.
यार मी मघाच पासून मक्का मदिना
यार मी मघाच पासून मक्का मदिना का वाचतोय इथे?
मी करुन बघितला. पट्कन होणारी
मी करुन बघितला. पट्कन होणारी मस्त रेसिपी आहे. माझ्या बागेतल्या पुदिनाचा चटणी व पापुचं पाणी यापेक्षा वेगळा उपयोग झाला. आभार्स!
आमचे बाळ आले की करणार.
आमचे बाळ आले की करणार.
मस्त!
मस्त!
आमचे बाळ आले की
आमचे बाळ आले की करणार.
<<<
क्क्क्क्क्क्क्क्काय???
(No subject)