घन सावळ सावळ रुसला

Submitted by -शाम on 5 December, 2012 - 10:05

घन सावळ सावळ रुसला
दूरात जाउनी बसला
विनविले किती सांजेने
दे निरोप हसुनी मजला

ती वदली वेड्या दोस्ता
हा एकमार्गी रे रस्ता
ठरलेले येणे जाणे
हे जीवन प्रवास नुसता

हे कळून ना कळणारे
का गुंतत जातो सारे
भेटीत विलगण्याचेही
क्षण दडले असती ना रे

उजळोनी मन गाभारा
क्षण साधावा मिळणारा
अंधारच नात्या मधला
ठरतो नाते गिळणारा..

नाहीच मेळ अपुलाही
मी असली अन् तू असला
घन सावळ सावळ रुसला
घन सावळ सावळ रुसला

..........................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकंदर छान!

यमकांनी इन्फ्लुएन्स्डलेली आणि र्‍हस्वदीर्घाच्या किरकोळ बाबी असलेली ही रचना अतिशय लाघवी, सहज सुलभ, आशयदार आणि दिलखुलास रचना आहे.

-'बेफिकीर'!

वैभव, रिया, ...धन्यवाद दोस्तांनो...

बेफि, कवितेपेक्षा तुमच्या प्रतिसादाने जास्त आनंद दिला.

भारतीताई ....सहमत... जाणवत होतेच ते.

Happy

छान!

गोड!

घन सावळ सावळ रुसला
दूरात जाउनी बसला...
विनविले किती सांजेने, दे निरोप हसुनी मजला...

>> इथेच रेंगाळलेय....

बागेश्री........ माझं पण अगदी असंच झालं Happy
घन सावळ सावळ रुसला .....अहा....... किती गोड ते रुसणं Happy
अतिशय लाघवी आणि मोहक काव्य Happy

धन्यवाद दोस्तांनो
... क्रॉसलाईनमुळे कविता बिघडतेय असे वाटून बदल केला आहे.

शाम, इतके सुंदर बदल.. कधीकधी कवितेलाही अल्पसं प्रसाधन हवं असतं नाही ? खुलते ती त्यामुळे.
इथे शेवटी सावळ घन हसल्यासारखा वाटतोय रुसव्यातच. :))

आता बढीया... मांडणीमुळे आशय पोहोचवण्याची तीव्रता नक्कीच बदलते. तू वाढवलेलं कडवं तर सुंदर झालंय...