Submitted by -शाम on 5 December, 2012 - 10:05
घन सावळ सावळ रुसला
दूरात जाउनी बसला
विनविले किती सांजेने
दे निरोप हसुनी मजला
ती वदली वेड्या दोस्ता
हा एकमार्गी रे रस्ता
ठरलेले येणे जाणे
हे जीवन प्रवास नुसता
हे कळून ना कळणारे
का गुंतत जातो सारे
भेटीत विलगण्याचेही
क्षण दडले असती ना रे
उजळोनी मन गाभारा
क्षण साधावा मिळणारा
अंधारच नात्या मधला
ठरतो नाते गिळणारा..
नाहीच मेळ अपुलाही
मी असली अन् तू असला
घन सावळ सावळ रुसला
घन सावळ सावळ रुसला
..........................................शाम
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली ; पण नेहमीसारखी.खूप
आवडली ; पण नेहमीसारखी.खूप जास्त नै
पहिली दोन कडवी छानच,जरा
पहिली दोन कडवी छानच,जरा शेवटचे कडवे वेगळे वळण घेतेय..
एकंदर छान! यमकांनी
एकंदर छान!
यमकांनी इन्फ्लुएन्स्डलेली आणि र्हस्वदीर्घाच्या किरकोळ बाबी असलेली ही रचना अतिशय लाघवी, सहज सुलभ, आशयदार आणि दिलखुलास रचना आहे.
-'बेफिकीर'!
आवडली!
आवडली!
वैभव, रिया, ...धन्यवाद
वैभव, रिया, ...धन्यवाद दोस्तांनो...
बेफि, कवितेपेक्षा तुमच्या प्रतिसादाने जास्त आनंद दिला.
भारतीताई ....सहमत... जाणवत होतेच ते.
वा, शाम - सुर्रेखच आहे
वा, शाम - सुर्रेखच आहे रे.....
छान!
छान!
गोड!
गोड!
खूप सुंदर, आता हळवेपण गडद
खूप सुंदर, आता हळवेपण गडद झालेय..
गोडच ! विदिपांशी सहमत.
http://www.divshare.com/downl
http://www.divshare.com/download/21365919-ac4
चालवण्याचा प्रयत्न केलाय.
कविताही आवडली आणि
कविताही आवडली आणि प्रमोदकाकांनी लावलेली चालही
घन सावळ सावळ रुसला दूरात
घन सावळ सावळ रुसला
दूरात जाउनी बसला...
विनविले किती सांजेने, दे निरोप हसुनी मजला...
>> इथेच रेंगाळलेय....
छान ! मनाला भावणारी, हुरहूर
छान ! मनाला भावणारी, हुरहूर लावणारी, गोड कविता !
बागेश्री........ माझं पण अगदी
बागेश्री........ माझं पण अगदी असंच झालं
घन सावळ सावळ रुसला .....अहा....... किती गोड ते रुसणं
अतिशय लाघवी आणि मोहक काव्य
सुंदर.. हळुवार...
सुंदर.. हळुवार...
धन्यवाद दोस्तांनो ...
धन्यवाद दोस्तांनो
... क्रॉसलाईनमुळे कविता बिघडतेय असे वाटून बदल केला आहे.
उजळोनी मन गाभारा क्षण साधावा
उजळोनी मन गाभारा
क्षण साधावा मिळणारा
अंधारच नात्या मधला
ठरतो नाते गिळणारा..
खुपच गोडांबी कविता !
शाम, इतके सुंदर बदल.. कधीकधी
शाम, इतके सुंदर बदल.. कधीकधी कवितेलाही अल्पसं प्रसाधन हवं असतं नाही ? खुलते ती त्यामुळे.
इथे शेवटी सावळ घन हसल्यासारखा वाटतोय रुसव्यातच. :))
आता बढीया... मांडणीमुळे आशय
आता बढीया... मांडणीमुळे आशय पोहोचवण्याची तीव्रता नक्कीच बदलते. तू वाढवलेलं कडवं तर सुंदर झालंय...
वाढवलेलं कडवं तर सुंदर
वाढवलेलं कडवं तर सुंदर झालंय...>>>>+१
वाह अत्यन्त गोड मोहक अनुप्रास
वाह अत्यन्त गोड मोहक अनुप्रास