दोस्ती (भाग २)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

अखेर आज तो दिवस उजाडला. आज तिच्यासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस. लहानपणी इंडियात जायचं म्हटलं की तिला राग यायचा. हा देश तिला कधीच आवडला नाही. पण आज इथेच ती तिचा संसार उभा करणार होती. नाझियाला आपण कुठे आहोत तेच कळत नव्हतं, मधेच तिने मान वर करून रेहानकडे पाहिलं. शेरवानीत एकदम वेगळा दिसत होता. तिचा ड्रेस तर त्यानेच बनवला होता. .. How romantic ...

निकाहची नमाज पढून झाली.. मुल्लासाहेब आता कुराणमधले आयत दोघाना वाचून दाखवत होते.

असिफ़ रेहानच्या बाजुलाच बसला होता. सगळ्या लग्नाची जबाबदारी त्याच्यावरच तर होती. रेहानच्या निकाहनंतर रुबियाचा निकाह होता. त्यामुळे त्याची तयारी सुरू करायला हवी होती. हॉल माणसाची तुडुंब गर्दी होती. तो परफ़्युमचा वास.. ती गडबड कोलाहल... असिफ़ला या सगळ्याचा अतिशय तिटकारा होता.
त्याने रेहानकडे पाहिलं.. हाच का तो रेहान? तो रेहानला पहिल्यादा भेटला. तेव्हा रेहान नुकताच हॉस्पिटलमधून बाहेर आला होता. तेव्हाचा रेहान आणि आजचा रेहान किती फ़रक होता.
"क्या हुआ?" रेहानने विचारलं.
"मै जब शादी करूगा तो किसीको नही बुलाऊगा.. तुम्हे भी नही.." तो रेहानच्या कानात म्हणाला...
आलेलं हसू रेहानने दाबून धरलं.
असिफ़ने परत एकदा भरलेल्या हॉलकडे पाहिलं.
अचानक हॉल शांत झाला. कसलाच आवाज ऐकू येईना. त्याने आजूबाजुला पाहिलं... सगळं नॉर्मल वाटत होतं. पण तरीही एक अस्वस्थता त्याला सतावत होती.
तो मोकळ्या हवेसाठी बाहेर आला. तरी कहीतरी राहिलं होतं. कुठेतरी... कुणितरी... पण काय.. ते कळत नव्हतं.
त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. त्या अंधारात त्याला दिसलं... कुणीतरी धावताना.. ओळखीचं वाटत होतं पण चेहरा दिसत नव्हता. त्याने डोळे उघडले तरी तो अंधार तसाच होता. कसलातरी गंध त्याला खुणावत होता. खूप ओळखीचा गंध होता. नुकत्याच उडालेल्या अत्तारासारखा.... नव्हे.... काळोखातच त्याला दिसली ती उडालेली रक्ताची एक चिळकांडी. त्या रक्ताचाच हा वास....
त्याला दरदरून घाम फ़ुटला. डोक्यात एकच विचार थैमान घालायला लागला.
तो धावत गाडीकडे गेला. कसलीतरी धुंदी त्याच्यावर स्वार होती. कोणतरी त्याला रस्ता दाखवत होतं. तो निघाला आणि पाठी हॉलमधे "सुभानल्ला" ऐकू यायला लागलं. रेहानने नाझियाला आणि नाझियाने रेहानला कबूल केलं होतं.

तिच्या फ़्लेटपर्यंत पोचला. बेल वाजवून काही फ़ायदा नाही हे त्याला ठाऊक होतं.
ती घरात नसू दे...त्याने अल्लाकडे प्रार्थना केली. दरवाज्याच्या बाजुला लपवलेली चावी त्याने काढली.
घरात शांतता होती.
तो बेडरूममधे गेला. क्षण दोन अन त्याचा डोळ्यावर विश्वास बसेना.
प्रिया जमिनीवर पडली होती. रक्ताच्या थारोळ्यात..
तिने तिच्या डाव्या हाताची नस कापली होती.

=======================================

रेहान केव्हाची असिफ़ची वाट बघत होता. त्याच्या निकाहमधून गायब झालेला असिफ़ अजून परत आला नव्हता.
त्याने पुन्हा त्याचा नंबर फ़िरवला. कुणीच उचलला नाही. एवढं पार तो लग्नातून काही न कळवता गेला याचा अर्थ काहीतरी मोठी भानगड असणार. पण तरी एक मेसेज तरी त्याने पाठवायला हवा होता. नाझ रूमम्धे आली तरी त्याचं लक्ष नव्हतं.
"असिफ़ का कुछ फ़ोन आया?" तिने विचारलं.
त्याने नाही म्हणून मान हलवली.
"कही काम मे होगा.." नाझ म्हणाली.
"मेरी शादी से भी जरूरी क्या काम है? कमीना साला... गया होगा किसी लडकी के साथ...." रेहान उसळला.
"रेहान, cool down कुछ प्रॉब्लेम भी तो हो सकता है ना.."
"चलो.. अभी उसे फ़ोन लगाता हू.. अगर बात की तो ठीक नही तो आने के बाद देख लुगा हरामजादे को.."
त्याने परत असिफ़चा नंबर फ़िरवला. कुणीच उचलला नाही. तो कट करणार एवढ्यात कुणीतरी फ़ोन उचलला.
"हेलो.." आवाज अनोळखी बाईचा होता..
"असिफ़ कुठाय?" त्याने विचारलं.
"तुम्ही कोण?"
"मी त्याचा दोस्त बोलतोय. प्लीज अर्जंट काम आहे.."
"त्यानी सांगितलय की कुणाचा फ़ोन घेऊ नको. ते बिझी आहेत. तुम्ही सारखा फ़ोन करताय. आम्हाला डिस्टर्ब करू नका. "
रेहान शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. काही करून तिला बोलत ठेवणं गरजेचं होतं.
ती कुठून बोलतेय हे कळलं असतं तरी चाललं असतं.
"हे बघा.. मला माहित आहे की मी तुम्हाला त्रास देतो. पण मला फ़क्त एवढं सांगा असिफ़ कसा आहे? सकाळी आमचं झगडा झाला आणि तो गेला. तेव्हापासून पत्ता नाही.. मला काळजी वाटते.." रेहान म्हणाला.
नाझिया आपल्या नवर्‍याकडे बघत होती. त्याचा आवाज पार रडवेला झाला होता. नाटकी... तिने मनातच म्हटलं.
"हे बघा.. तुमचा मित्र ठीक आहे. तसा काहीही प्रॉब्लेम नाही." तिचा आवाज जरा अडखळला.
रेहानला जे हवं ते मिळालं होतं.
"तुम्ही खोटं बोलता. मला माहित आहे की त्याला काहीतरी झालय.. म्हणून तो माझ्याशी बोलत नाही. त्याची बायको केव्हाची त्याला शोधतेय..."
"काय? त्याची बायको... सर तुमचा घोटाळा होतोय.. तुम्हाला असिफ़ शेखच हवाय ना?"
पण रेहानला ट्रेक मिळाला होता.
"हो असिफ़ शेख.. माझा बचपनचा दोस्त आहे..." त्याचा आवाज पार भरून आला.
"सर, असिफ़ इथे आहे, आणि त्याची बायको पण. खरं तर त्यानी कुणाला सांगू नको म्हटलेलं पण तरीही मी सांगते.
त्याची बायकोने आत्महत्यचा प्रयत्न केलाय..."
रेहानने सुटकेचा निश्वास सोडला. असिफ़च्या कुठच्यातरी छावीने हा घोळ घतला होता.
"कुठल्या हॉस्पिटलमधे?" त्याने नाटक चालु ठेवलं.
"जे जे मधे. आय सी यू मधे.."
म्हणजे प्रकरण भारी होतं.
"आपण कोण?"
"मी स्टाफ़ नर्स बोलतेय. असिफ़ नमाज पढतोय म्हणून फ़ोन माझ्याकडे आहे.."
" madam,, Thank You एक विचारू.. असिफ़च्या बायकोचं जरा नाव सांगाल. काय आहे तीन लग्ने केली आहेत त्याने त्यामुळे ..."
रेहानच्या चेहर्‍यावर हसू होतं. नाझने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं.
"एक मिनिट हा.. असिफ़ शेख आणि अरे.. असं कसं शक्य आहे?"
"काय झालं.?"
"इथे तर त्याच्या बायकोचं नाव..... प्रिया कुलकर्णी... "
"ओह...प्रिया आहे तिथे.." असिफ़ने खोटं नाव दिलय हे त्याच्या लक्षात आलं.
"हो ना... प्रिया.... काय छान मुलगी आहे हो.." ती म्हणाली.
रेहान काहीच बोलला नाही. त्याला हवी तेवढी माहिती मिळाली होती.
"तुम्हाला म्हणून सांगते.. तिचे वाचायचे चान्सेस फ़ार कमी आहेत..."
"ठीक आहे मी येतो तिकडे.." तो म्हणाला. माणूसकी म्हणून.
"लवकर या. तिचे आई वडील आले थोड्या वेळापुर्वी. आई ला तर झोपेचं injection दिलं. "
आता ती नर्स बोलत सुटली होती. रात्री अकरा वाजता तिलाही गप्पा मारणारं कुणीतरी हवंच होतं.
रेहानला आता काळजी वाटायला लागली शेवेटी काही झालं तरी कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न होता.
"वडील कसे आहेत?" त्याने विचारलं.
"ते पण घाबरलेत. पण ते असिफ़ला खूप काहीतरी बोलले. कोणीतरी रेहान आहे... तोच या सगळ्याला जबाबदार आहे.. सोन्यासारखी मुलगी त्याच्यापायी वेडी झाली असं म्हणाले. असिफ़ काहीच बोलला नाही. कसे नवरे हे सहन करू शकतात देवेच जाणे.... " ती पुढेही बोलत होती.

पण रेहानच्या हातातून फ़ोन केव्हाच पडला होता..
===========================================

रेहान येतोय हे असिफ़ला नर्सने सांगितलं. जे व्हायला नको होतं ते झालं होतं पण ही वेळ विचार करायची नव्हती. काही करून रेहानला परत पाठवायला हवं होतं. एक तर प्रियाचे आईवडील इथे होते वर रेहानचं आजच लग्न झालं होतं, परत त्याच्या घरच्याना त्याच्यावर नाराज व्हायला संधी मिळाली असती.

वीर आणि जतिन एव्हाना पोचले होते. प्रियाला चांगल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधे हलवायची तयारी चालू होती.
असिफ़ला काय करावं ते सुचेना. तो बाकावर शांत बसून राहिला.
रेहान आय सी यु च्या जवळ आला. असिफ़ तिथेच बसला होता.
रेहानने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
असिफ़ने वर पाहिलं...
दोघंही काहिच बोलले नाही. बोलण्यासाठी शब्दच कुठे शिल्लक राहिले होते?
असिफ़चे डोळे भरून आले होते.
"कहा है?" रेहानने विचारलं.
असिफ़ने आयसी यु च्या दरवाज्याकडे पाहिलं..
रेहान तिकडे जायला निघाला.
"मत रेहान.." असिफ़ म्हणाला.
रेहानने प्रश्नार्थक चेहर्‍याने त्याच्याकडे पाहिलं.
"रेहान.. मै तुम्हे सब समझा दूंगा.. पर अभी नही. तू वापस जा.. प्लीज.."
"असिफ़, एक तर तुम्ही सगळ्यांनी मला फ़सवलं आणि आता मला सांगतो परत जायला... तू कधीच बोलला नाहीस की प्रिया कुठे आहे? मी कायम विचारलं.. पण नाही... आणि आज मला हे सगळं कळतय.. असिफ़.. मुझे ये पुछना है उससे कि क्यु इतने दिन तक वो मुझसे झूठ बोलती रही? "
"मै बताता हू.. उसने कसम खाई है के वो जिंदगीमे कभी तुम्हारी शकल नही देखेगी... प्लीज आज वो बेहोश है She is fighting against death.. पर मे नही चाहता के उसकी कसम टूटे.. रेहान आज वापस जाओ... हम बाद मे बात करेंगे इस मामले मे..."
रेहान आयसीयूच्या दरवाज्याकडे वळला... असिफ़ने त्याचा हात घट्ट धरला.

"रेहान तुझे प्रिया की कसम.. "
रेहान थबकला. त्याने असिफ़कडे पाहिलं त्याच्या डोळ्यात अंगार होता.
"असिफ़, मुझे नही पता के तु सच बोल रहा है या झूठ.. अब मै तुमपे यकीन नही कर सकता. मै प्रिया को देखे बगैर यहा से वापस नही जाऊगा. वो मेरी शकल नही देखना चाहती. fine पर मुझे उसको देखने से आज खुदा भी नही रोक पायेगा... "आणि रेहान आत गेला.

चौथ्या नंबरच्या बेडवर ती होती. शांत. नुकतीच झोपल्यासारखी.. हाताला बंडेज बांधलं होतं...
तो तिच्या उशाशी बसला. हलकेच त्याने तिच्या केसातुन हात फ़िरवला... पाच वर्षं.. पाच वर्षानी तो तिला बघत होता. तिचा चेहरा बिलकुल बदलला नव्हता. इतक्या वर्षाचे प्रश्न त्याच्या मनात फ़िरत होते. पण सगळी उत्तरं आज मूक झाली होती...

तो पहाटे घरी परत आला. नाझिया अजून जागीच होती..
"कैसी है असिफ़ की दोस्त?" तिने विचारलं.
तो काहीच बोलला नाही. तिने परत विचारलं. "ठीक है... " तो एवढंच म्हणाला.
"तुम सो जाओ.." त्याने तिला सांगितलं आणि तो हॉलमधे आला.

त्याचं डोकं गरगरत होतं. त्याने एक पेग बनवून घेतला. पण जगातली कुठचीच गोष्ट आज त्याच्या मनातली अस्वस्थता शांत करू शकत नव्हती.
प्रियाचं त्याच्यावर प्रेम होतं.. ते भेटले त्या पहिल्या दिवसापासून.. पण तिने त्याला कधीच सांगितलं नाही. का? ते त्यालाही माहित नव्हतं. पण प्रिया त्याला का नाही भेटली? का त्याच्यापासून दूर जात रहिली. असिफ़ला तिच्याविषयी सगळं माहित होतं तरी का त्याने त्याला सांगितलं नाही?

रेहानला वाटलं की तो कुठल्यातरी एका खेळातला कठपुतळीचा बाहुला आहे. सगळे जण त्याला मनाला येइल तसं खेळवत आहेत. असिफ़ने जर एकदा.... फ़क्त एकदा त्याला सांगितलं असतं की प्रिया कुठे आहे तर कदाचित आज प्रिया त्याची दुल्हन बनली असती. कदाचित.... नाझच्या जागी... आज प्रिया.....

============================================

पाखी प्रियाच्या जवळ बसली होती. प्रिया शांतपणे झोपली होती. पाखीला इथुन जावंसं वाटतच नव्हतं. प्रियाला हॉस्पिटलमधे ठेवलय हे कळताच ती धावत आली होती.. प्रिया असं काही करेल हे तिच्या गावीही नव्हते. प्रिया आता ठीक होती. पण तरीही ती पूर्ण बरी होईपर्यंत तिला परत न्यायला जतिन तयार नव्हता.

असिफ़ हातामधे किलोभर फ़ळं घेऊन आला. दिवसातून तीनदा तरी त्याची इकडे चक्कर असायचीच. आल्या आल्या तो ओरडला.. "हाय पाखी.."
"श्श. प्रिया आताच झोपलिये.."
"अरे, फ़िकर नॉट.. ती झोपली की उठतच नाही... चाहो तो ढोल भी बजा लो.."
त्याने सफ़रचंद कापलं.. आणी पाखीच्या हातात अर्धं दिलं.
"मला वाटलं तू प्रियासाठी आणलयस"
" तिला अ‍ॅपल आवडत नाही " असिफ़ म्हणाला.
"असिफ़, तू प्रियाला इतकं ओळखतोस?"
"पाखी.. प्रिया माझी बेस्ट फ़्रेंड आहे. पण त्याहूनही जास्त असं तिचं आणि माझं नातं आहे.." प्रियाला जरा जरी काही झालं की कुठल्यातरी प्रकारे असिफला समजायचं.. नक्की का ते माहित नाही... पण तरीही.. प्रियाचा जीव वाचवण्यासाठी तो कायम यायचाच.
"प्रिया पण मला एकदा हेच म्हणाली होती... असिफ़, प्रियाने असं का केलं हे माहितिये तुला?"
असिफ़ने प्रियाकडे पहिलं.
"पाखी, प्रियाने हे पहिल्यादा केलं नाहिये. आणि ती परत करेल हेही मला माहित आहे..."
"पण का?"
असिफ़ हसला.. हलकेच..
"कारण तिने तिच्या आयुष्याला स्वत्:च थांबवून ठेवलंय. पॉजचं बटण दाबल्यासारखं. तिच्याबरोबरचे खूप पुढे निघून गेले पण ति मात्र तिथेच आहे... एकटी.."

===========================================

नाझिया रेहानचे लहानपणाचे फ़ोटो बघत बसली होती. मोहसीना, रेहानची चार नंबरची दिदी आणि साजिदा तिला माहिती देत होत्या.
रेहानच्या अब्बाना फ़ोटोग्राफीची भरपूर आवड होती त्यामुळे रेहानचे अक्षरश: ढिगाने फ़ोटो पडून होते. रेहान आणि नाझच्या लग्नाला जवळ जवळ महिना होत आला होता... पण रेहान हल्ली फ़ार शांत असायचा. कारण कुणालाच माहित नव्हतं. असिफ़ने घरी येणं पूर्ण बंद केलं होतं.
"रेहान, ये कौन है?" नाझने विचारलं.
तो भानावर आला.
तिच्या हातात एक जुना black and white फ़ोटो होता. तो असेल पाच सहा वर्षाचा त्या फ़ोटोत. सोबत एक दोन तीन महिन्याचं बाळ होतं.
"याद नही... बहुत पुराना फ़ोटो है..:" तो म्हणाला..
"क्या रेहान,, तुम्हे याद नही?" मोहसीनाने अविश्वासाने विचारलं.
"सच मे याद नही..." तो वैतागून म्हणाला..
अब्बा तिथेच बसले होते. त्यानी फ़ोटो मागितला. आणि बघून ते हसले.
"रेहान... तुम्हे अपनी बीवी याद नही..." ते हसतच म्हणाले.
"क्या?" नाझ उडालीच.
"रेहान.. फ़िर से देखो."
रेहानने अब्बाच्या हातातून फ़ोटो घेतला. आणि त्याला आठवले.
"अब्बा, ये तो रूही है..."
"आत्ता आठवले तुला... " मोहसीना म्हणाली.
"नाझ, ये रूही.. हमारे बाजु मे रहते थे ना. उनकी बेटी.." मोहसीनाने नाझला सांगितलं.

रेहानच्या चेहयावर हलकेच स्मित उठले. "नाझ, इसका नामे भी मैने ही रखा था.. रेहान की रूही.. और इसके कान मे पहली अझान भी अब्बाने दी थी..."
"पुरा टाईम उसीके साथ खेलता था... " अम्मी म्हणाली.
"अम्मी, आजकल कहा है ये रुही?" नाझने विचारलं.
"पता नही बेटा, उसके वालिद और वालिदा का वक्त से पहले इन्तकाल हो गया तब से पता नही चला.." नाझ रेहानकडे बघायला लागली.
"मतलब.. उसके मा बाप मर गये. तबसे वो किधर गयी पता नही... " रेहानने तिला समजावलं.

"खरंच, कुठे गेली ही मुलगी ते कळालंच नाही.." मोहसीना म्हणाली.
"तेच तर लाइफ़ आहे. कधी कधी कुणी फ़ार जवळ असतं. तर कधी तेच फ़ार दूर होऊन जातं. कधी आपल्याला कळतच नाही की आज जे जवळ आहे ते उद्या दूर जाईलही.... " रेहान म्हणाला.
"फ़िर से मिलेगी रूही?" नाझने विचारलं..
"आपण परत भेटू की नाही हा प्रश्न तुला पडतोय... मला नाही कारण काही झालं तरी मी तुला भेटणार आहे...." रेहान म्हणाला.
"काय? " मोहसीना म्हणाली. कुणालाच तो काय म्हणाल ते कळले नाही....
पण अब्बा मात्र हळूच पुटपुटले..
" Thats her friendship "
=====================================

प्रियाचे वडील.. सुधीर कुलकर्णी म्हणजे एक मोठं प्रस्थ होतं. वजनदार व्यक्तिमत्व. आणि प्रभावी डोळे. त्याचा दरारा एवढा मोठा होता की ऑफ़िसात काय पण घरात पण त्याना सगळे घाबरायचे.. अर्थात प्रिया सोडून.
ते आणि आई प्रियाला भेटायला आले होते.
"कसं वाटतय.." प्रियाला आईने विचारलं. दिवसातून एकदाच प्रियाला भेटायला जायचं असा नियम तिला नवर्‍याने घालून दिला होता.
"आहे, अजून जिवंत आहे.." प्रिया रूक्षपणे म्हणाली.
बाबा काहीच बोलले नाहीत. शांतपण खोलीतल्या खुर्चीवर बसून राहिले.
"घरी येशील ना?" आईने घाबरतच विचारलं.
प्रियाने तिखट नजरेने आईकडे पाहिलं.
"असे प्रश्न कशाला विचारतेस. ज्याचं उत्तर माहीत आहे." बाबा पहिल्यादा म्हणाले.
प्रियाने घर सोडून जवळ जवळ चार वर्षे झाली होती. नोकरी लागल्यापासून तर स्वतंत्र खोलीत राहत होती.
"आई, तू ये थोडे दिवस माझ्याकडे.. तुला जर एवढीच माझी काळजी असेल तर... " ती म्हणाली. बाबा पाठवणार नव्हते हे नक्की होतं. पण तरीही एवढं म्हटलं तरी आईला समाधान मिळालं असतं.
"तू कशाला तिची काळजी करतेस? तिची काळजी घेणारे आहेत तिचे लोक... ते बघून घेतील." बाबा म्हणाले.
"बाबा, तुम्ही अति बोलताय. त्याच्यापैकीच एकाने माझा जीव वाचवला आहे." प्रिया म्हणाली.
"मुली, तू शांत बस बघू... " आई म्हणाली.
"का म्हणून मी शांत बसू? हे स्वत्:ला समजतात कोण? परवा हॉस्पिटलमधे असिफ़ला हवं तसं बोलले. त्याने उलट उत्तर दिलं नाही हा त्याचा सभ्यपणा."
"सभ्यपणा... अगं त्याची जातच मुळी कुत्र्याची... त्याच्याकडून माणूसपणा मिळणार नाही..."
"बाबा, तुम्हाला कुणालाही असं म्हणायचा हक्क नाहिये. तुम्ही मला भेटायला आला होतात. आता निघालात तरी चालेल."
"प्रिया.... " आई म्हणाली...
"आई, तुम्ही नाही आलात तरी चालेल मला. पण हे असले विखारी शब्द नको मला." प्रिया म्हणाली.
"चल गं.." बाबानी हुकूम सोडला.
"अहो, जरा माझं ऐका.. तिला जरा समजून घ्या.." आईने विनवणी केली.
"काय समजून घ्या. हे बघ, तिला या जगात हवी असलेली प्रत्येक गोश्ट मी दिली आहे पण मुसलमानाबरोबर मला कसलेही संबंध नको म्हणून सांगितलय मी.. आधी तो रेहान आणि आता हा असिफ़. दुसरं कुणी मिळत नाही हिला"
"बाबा, तुम्ही निघा. " प्रिया शांतपणे म्हणाली.
"प्रिया, अगं तू तरी जरा समजूतीने घे. तुम्ही दोघानीही माझं जगणं मुश्किल केलय.." आई म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी होतं.
"आणि याला जबाबदार तूच आहेस. का ते तुला माहित आहे ना?" हलक्या आवाजात तिने विचारलं. प्रियाने आईच्या खांद्यावर हात ठेवला. "मी नंतर फ़ोन करेन तुला... आता नको. गेली सहा वर्षं हाच विषय सुरू आहे. बाबा, मला आता कंटाळा आलाय. तुम्हाला समजावता समजावता मी एक दिवस संपून जाइन तरी तुमचा हेकेखोरपणा जाणार नाही."
"प्रिया, तु काय रंग उधळतेस त्या रेहानसोबत ते मला चांगलेच माहित आहे."
प्रियाने एकदा डाव्या हातावरच्या जखमेकडे पाहिलं. "बाबा, dont worry रेहानचं लग्न झालं. त्याच्या आवडत्या मुलीबरोबर. happy? "
तिचा आवाज भरून आला. डोळ्यातल्या अश्रूना ती मोठ्या कष्टाने परतावत होती.
"काय सांगतेस?" आई म्हणाली. तिला जरा बरं वाटलं. पण ही तर वादळाची सुरुवात होती.

"हो आई, महिन्याभरापूर्वी.." प्रियाने तिचा हात आईसमोर धरल, "आणि ही माझी वेडींग गिफ़्ट.. नाझिया नावाची मुलगी आहे.."

"पाहिलस, प्रेमाची थेरे आमच्या मुलीसोबत आणि लग्न मात्र स्वत्:च्या धर्मातल्या मुलीबरोबर."
"बाबा, विषय संपला ना आता.. अच्छा,,,, म्हणजे तुम्हाला अजून असं वाटतय की मी त्याच्याशी लग्न करेन अशी भिती अजून आहे का तुम्हाला?" प्रिया उपरोधिक स्वरात म्हणाली.
"प्रिया, अगं काय हे बोलणं? तो मुलगा तुझं अयुष्य बरबाद करतोय म्हणून आम्ही सांभाळतोय तुला" आई म्हणाली.

"रेहान माझं आयुष्य बरबाद करतोय? आई, त्याला तेवढा चान्स तरी कुठे दिला तुम्ही? आधी तो वेडा आहे म्हणून आणि नंतर तो मुसलमान आहे म्हणून... कायम त्याला माझ्या आयुष्यातून तुम्ही हाकलतच आलात ना? त्याने एक मेल पाठवलं होतं मला दिल्लीतून.. मिस यु.. लिहिलेलं त्यावर सगळ्यात जास्त गहजब कुणी केला? या.. तुझ्या नवर्‍यानेच ना मला गणपतीच्या पायाची शपथ घ्यायला लावली की मी परत रेहानचं तोंड बघणार नाही म्हणून.. अजून काय हवय तुम्हाला माझ्याकडून?"

"नुसती शपथ घेऊन चालत नाही ती पाळावी लागते." बाबा गरजले.
"मी शपथ पाळली की नाही ते मला माहित आणि गणपतीला.. त्यासाठी तुम्हाला सफ़ाई द्यायची मला गरज नाही.." प्रिया म्हणाली.
"प्रिया, अगं असं बोलू नकोस.." आई म्हणाली,

"बाबा, तुम्हाला मी कित्येक वेळा सांगितलय. गेली सहा वर्ष तोच विषय चालू आहे. तुमच्या हेकेखोरपणामुले तुम्ही मुलगी गमावून बसाल. बाबा, मी तुम्हाला परत एकदा निर्लज्जपणे सांगते की माझं रेहानवर प्रेम आहे आणि त्याच्या लग्नामुळे यात काहीही बदल होत नाही. तुम्ही मला रेहानला न भेटण्याची शपथ घातली होती. ती मी आजवर पाळली. पण म्हणून मला जेव्हा जेव्हा रेहानला भेटावंसं वाटतं तेव्हा मी माझं आयुष्य संपवेन. असिफ़ मला मरू देणार नाही आणि मी अशीच तडफ़डत राहेन. आणि माझ्या या अशा जगण्यातून जर तुम्हाला समाधान मिळ्ते. तर असं तडफ़डणं पण मान्य.. "

======================================

"कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है..."
प्रिया अत्यंत भसाड्या आवजात गात होती.
रेहान कांदा कापत होता.
"के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये...."
"प्रिया, अब बस भी करो. आस पडोस वाले भाग जायेन्गे.."
"है कौन अपने आस पडोस मे.. ये बंगला इतने जंगल मे जो बनाया है तुमने." प्रिया म्हणाली.
"प्रिया, वो मटर पकाने से पहले खा लोगी तो सब्जी किसकी बनाऊ.." रेहान प्रियाला ओरडला.
तेवढ्यात फ़ोन वाजला. "मी बघते.." प्रिया हॉलमधे आली.
आईचा फ़ोन होता.
"बोल गं," प्रिया म्हणाली.
"कुठे आहेस तु?" आई चिडलेली होती.
"कुठे म्हणजे काय प्रत्येक वीक एंडला असते तिथेच.." प्रिया एकदम casually म्हणाली.
"कहर केलायस तू अगदी. अगं काही नाही तर बापाच्या इज्जतीचा तरी विचार कर. शोभतं का हे वागणं तुला..." आई पुढे अजून पण काहीतरी बोलत होती.
प्रियाने फ़ोन बंद केला. रेहान किचनमधून बाहेर आला.
"कौन था?"
प्रिया काहीच बोलली नाही.
"ओके, मा या बाप" त्याने विचारलं.
"मा" ती म्हणाली.
" cool . तो लंच करे?" त्याने विचारलं.
"रे, मा बहोत गुस्से मे थी... मे बाबा का गुस्सा झेल सकती हू पर मा का नही. She hates me. I cant take it anymore .."
"प्रिया, हर डीसीजन तुम्हारा है, मैने तुम्हे कभी कुछ नही कहा.. ये रिश्ता तुमने बनाया है, और तुम जब चाहो तब तोड सकती हो. मुझे वैसे भी तुम्हारे बगैर जीने की आदत हो गयी है..."
"रे, मै ये रिश्ता नही तोड सकती,, क्युंकी मुझे जीने की आदत हो गयी है.." प्रिया डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली.

===========================================

"पाखी, सुनो तो..."
पलीकडुन फ़ोन बंद झाला. असिफ़ने आपलाच डोक्यावर हात मारून घेतला.
"रेहान, यार हसतोस काय? मदत कर ना.." पण खरंच रेहानला हसू आवरत नव्हतं. असिफ़ सकाळपासून पाखीला फ़ोन करत होता. पण ती त्याचा फ़ोन घेतच नव्हती. शेवटी त्याने रेहानच्या मोबाईलवरून तिला फ़ोन लावला पण आज पाखी ऐकायच्या मूडमधे नव्हती.

रेहान आणि असिफ़ नुकतेच बोलायला लागले होते. यामधे नाझने खूप मध्यस्थी केली होती. तसं रेहानला पण असिफ़शिवाय करमत नसायचंच.

"असिफ़, तिला सारखं फ़ोन करून सतावू नकोस. in fact तिला अजिबात फ़ोन करू नको. "
"रेहान, अब तू मुझे बतायेगा लडकी कैसे पटाते है?"
"नही रे, मै तुमसे लडकी पटाने की बात नही कर रहा हू. बिवी पटाने की बत कर रहा हू..." रेहानने हसत असिफ़च्या पाठीत धपाटा घातला.
"कुछ भी मत बोल, तुझं लग्न झालं म्हणून काय माझं पण लावणार का?" असिफ़ म्हणाला.
"पण पाखीची आणि तुझी जोडी मस्त दिसेल. ती चांद का टुकडा आणि तू खजूर मे अटका... "
" bad idea... ये कैसा लगता है, पाखी सुपरस्टार और मे सुपर बेकार.."
रेहानने हसतच विचारलं ..."कौन बोला?"
"इतना भारी दिमाग है किसका?"
"कौन.... प्रिया?"
"हा. कभी कभी सोचता हू उसके दिमागमे क्या किडे भरे है... कुछ भी बोलती है... सोचने का डीपार्टमेंट ही नही है उसके पास..."
प्रियाचा विषय काढताच रेहान गप्प झाला.
"असिफ़.. मुझे उससे मिलना है...."
" not possible " असिफ़ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"असिफ़, मला तिला बरंच काही विचारायचं आहे. माझ्या बर्याच प्रश्नाची उत्तरे तिच्याजवळ आहेत. ती माझ्या लाईफ़मधे स्वत्: आली. आणि स्वत्: निघून गेली. मला काहीही विचारायला किंवा समजायला चान्स मिळाला नाही. असिफ़ तूच सांग. do i deserve an explaination or not?
"रेहान, I can understand ur problem,. पर फ़िर भी वो तुमसे नही मिलेगी.. at least उसका बाप जिंदा है तब तक तो नही.."

============================================

प्रियाने गाडी पार्क केली आणि ती वाट बघत थांबली. अजून पाच मिनिटे ही झाली नसतील तेवढ्यात एक काळी मारुती येऊन थांबली.

"क्या बात है? आज तू आधी आलीस.." गाडीचा दरवाजा उघडतानाच ऐकू आलं.

"इरफ़ानचाचा, आजकाल हवा बदललेय. बर्याच गोष्टी अशा होणारच." प्रिया हसत म्हणाली.

रेहानचे अब्बा गाडीच्या बाहेर आले.
"बोलो चाचू, आज इस कनीझ को कैसे याद किया...." प्रिया नाटकीपणाने म्हणाली.
"कनीझ नही, आप तो हमारी बेटी हो. याद तो तुम्हे हम हर वक्त करते है... बस तुमसे मिल नही पाते.." चाचा म्हणाले.
"घराते सगळे कसे आहेत?" तिने विचारलं.
"आहेत मस्त. स्पेशली रेहान, सातव्या आसमानातच असतो तो.." चाचा म्हणाले..
प्रिया काहीच बोलली नाही. "तुझ्या घरात.. सगळं आलबेल ना?" चाचानी विचारलं.
"डोंबलाचं आलबेल... बाबा हल्ली अति करतायत. वर आईच्या डोक्यात माझ्या लग्नाचं खूळ घुसलय. जगणंच मुश्किल होत चाललय माझं...."
"प्रिया, तुझा आणि रेहानचा एकच प्रॉब्लेम आहे. You expect too much from life आलेल्या परिस्थितीशी लढण्याची हिंमत तुम्हा दोघातही नाही. आणि म्हणूनच अशी वेळ तुमच्यावर येते."
"चाचा.. मग मी काय करू.. बाबाना मी सगळं खरं सांगितलं की मी आणि रेहान फ़क्त मित्र आहोत तरी त्याचा विश्वास नव्हता. आणि आज जेव्हा मी सांगते की माझं रेहानवर प्रेम आहे तरी त्याना पटत नाही."
"कारण तुझं सत्य ऐकून घ्यायची त्याच्यात हिंमतच नाही. तो तेच ऐकतो जे त्याला ऐकायचं असतं. आणि मला वाईट वाटतं की तू अशा माणसासाठी एवढं करतीयेस."

"चाचा... तुम्हाला सगळं माहित आहे ना. मग तरीही असं का बोलता?"
"माहित आहे? रुही... अडीच वर्षाच्या त्या बाळाला अनाथाश्रमात ठेवत होता तुझा काका... माझी तुला सांभाळायची ऐपत होती. रेहानची अम्मी पण तयार झाली होती पण मग हा माझा मित्र. याची बायको गरोदर होत नाही म्हणून डिवोर्स देत होता. त्या बाईने येऊन रेहानच्या अम्मीला सगळं सांगितलं आणि म्हणून तुला मीच तिच्या हातात दिलं.... अभीतक पछताता हू... क्यु मैने बच्ची को उसके हाथ मे दिया... "
प्रिया हसली.
"काय होईल. जेव्हा त्याना कळेल की मी प्रिया नाही.. रुही आहे म्हणून.."
"सांगून टाक त्याला एकदाचं. ही जी नाटकं चालवली आहेत ना ती बंद कर म्हणावं.." चाचा म्हणाले.
"इतकं सोपं आहे का?"
"प्रिया, तू ठरवलंस तर खूप सोपं आहे..."
"पण आता काय उपयोग? चाचा, मी accept केलय की मला रेहान कधीच मिळणार नाही. बाबान तेच हवं होतं आणि मला त्याच्या उपकाराचा बदला असा तर देता येणार नाही ना... "
"बेटा, मला तुझं हे असं जगणं नाही बघवत.."
"का? काय खराबी आहे माझ्या जगण्यात? पैसे मिळवते. एकटी राहते. माझ्यकडे बघायला तुम्ही आहात. असिफ़ आहे... I am happy... very happy "

"मला सगळ्यात जास्त भिती तुझ्या या खुशीची आहे....."
"चाचा.. Dont worry , मी आता पुन्हा कधीही मरण्याचा प्रयत्न करणार नाही... कारण आता मला जगण्याचा एक मार्ग अंधुकसा दिसतोय.
आयुष्यात एवढा जुगार खेळले... आता पुन्हा एक.. कदाचित शेवटचा.. हा... पण एक मात्र खरय की या जुगारात मी जिंकणार हे निश्चित... फ़क्त मी जिंकताना किती आयुष्य उधळेन हेच आता बघायचय..."

========================================

"प्रिया, अब बस करो.. सुबह से पी रही हो.." असिफ़ने प्रियाच्या हातातला भरलेला ग्लास काढून घेतला..
प्रिया काहीच बोलली नाही.
"क्यु पिते हो?" असिफ़ म्हणाला.
" लोग कहे क्यु पिते हो
मन कहे क्यु जिते हो
जीने की कोई चाह नही
मरने की कोई राह नही..."
"ओके.. आगे?"
"अबे, इडियट.. आगे तेरा ससुराल... खतम हो गया शेर.. साला, तुझ्याजवळ ना कलासक्तता नावाचा प्रकारच नाही.."
" whatever .. मला एक सांग एवढे पिऊन पण तुला हे असले word बोलता येतात?"

प्रिया एकदम हसली "असिफ़, शराब दिमाग पे असर तभी करती है जब आप करने देते हो... "
"और तुम्हारे पास दिमाग है ही नही.."
"नही असिफ़.. गलत मत समझ.. दिमाग है पर दिल नही है.. जर असतं तर मी असं का केलं असतं?"
"प्रिया.. मला वीर सांगत होता की जतिनला तुझ्याशी लग्न करायचय.. Think about it "
प्रियाने डोकं सोफ़्यावर ठेवलं आणि डोळे मिटले.
"असिफ़, च्यायला. माझं लग्न कुठे आलं मधेच. मला जतिनला बरबाद करायचं नाहिये. तो खूप चांगला आहे आणि he really loves me पण नको.. असिफ़.. तो विचार पण नको. मी जशी जळतेय तेवढं पुरेसं आहे मला..."
"पण तू आयुष्यभर अशीच राहणार का?"
"असिफ़, आपल्याला भेटून किती वर्षे झाली... आठ वर्षे.. तेव्हा विचार केला होतास की असं काही होईल म्हणून.. पण काय झालं... आणि जे काही घडलं ते कुणी बदलू शकत होतं... मग आज तरी मी उद्याचा विचार का करु? रेहानला नाझिया भेटली मलाही कुणीतरी भेटेल.."
"पण मग जतिन का नको.?"
प्रियाने डोळे उघडून असिफ़कडे पाहिलं. आणि ती हलकेच हसली.
"असिफ़, अजून मी मांडलेला खेळ पूर्ण नाही झाला..."
"म्हणजे.."
"ग्लास दे इकडे आणि ऐक.. You might hate me after hearing this. but thats truth and you can not run away fom it
तुला माहित आहे ना की मला इरफ़ानचाचानी आईला दत्तक दिलय. कारण माहित आहे?"
"तुझ्या आईला लग्नानंतर बरेच दिवस काही झालं नाही म्हणून..."
"चूक... because her husband was an impotent पण सगळ्या जगासमोर हे कबूल करायची त्याना लाज वाटली आणि मग त्यानी बायकोला वांझ ठरवलं. घरातले दुसर्‍या लग्नाच्या मागे लागले तेव्हा आईने सत्य फ़ोडायची धमकी दिली. तेव्हा मग मोठ्या उदार अंत:करणानी त्यानी मुलगी दत्तक घ्यायची परमिशन दिली. आईने मला निवडलं, पण मी मुसलमान आहे हे बाबाना कधीच सांगितलं नाही. हा तिचा बदला होता. स्वत्:चं ब्राह्मणीपण आणि पुरुषार्थ चार चौघात मिरवणार्या तिच्या षंढ नवर्याचा तिने असा पराभव केला. आणि या खेळात मी रूहीची प्रिया झाले.."
"पण मग त्याचा इथे काय संबंध?"
"ऐकून घे, तुला माहित आहे मी पूर्ण हिंदु धर्मात वाढले. मलाच माहित नव्हतं की मी कोण आहे.. पण इरफ़ानचाचा आईला फ़ोन करुन विचारायचे मी कशी आहे म्हणून.. एकदा त्याचं बोलणं मी ऐकलं.

असिफ़, त्यादिवशी मला माझा जितका तिरस्कार वाटला.. कुणीतरी माझं अस्तित्वच संपवलं होतं. इतके दिवस मी ज्या घराला आपलं म्हणत होते ते माझं नव्हतच.. मी आईला खरं काय ते विचारलं. तिनही सांगितलं.. त्या दिवशी मी घरातून निघाले. मला तिथे राहायचं नव्हतं, तसंही बाबानी मला कधी जीव लावला नाही, आणि आता आई पण परकी झाली. पण बाबाना समाजाची काळजी होती. त्याच्या इज्जतीची काळजी होती. गुराना बडवतात तसं त्यानी मला पकडून आणल्यावर मारलं. एकदाही हे नाही विचारलं की का घर सोडलस..."
"प्रिया.. तुला जास्त झालीये जाऊन झोप... "
"नाही असिफ़, आज मला बोलू दे. कारण उद्या तू तरी मला दोष देणार नाहीस.. "

"कसला दोष?"
"असिफ़, त्या दिवशी त्या क्षणी प्रिया मेली आणि रुही पण मेली. उरलं ते फ़क्त हे असं जिवंत प्रेत. मी बंडखोर झाले. बाबानी आखून दिलेल्या प्रत्येक नियमाला मी तोडलं. आधी खूप मारायचे.. पण परिणाम शून्य. मी निगरगट्ट होत गेले. नितीमूल्य, संस्कार आणि समाज कशाचीच मला पर्वा राहिली नाही. आयुष्याची होडी मी भर समुद्रात सोडून दिली.... परिणामाचा विचार न करता."

"नंतर रेहान माझ्या आयुष्यत आला. इरफ़नचाचानी मला त्यच्याबद्दल सगळं सांगितलं होतं. त्याला कॉलेजमधे पाठवयच्या आधी मला डॉक्टरानी त्याच्याशी कसं वागायचं हे समजावलं होतं. पण तरीही... असिफ़ जर तू त्या दिवशी आला नसतास तर आजची वेळ आलीच नसती. पण घटना ठरवून होत नाहित."
"प्रिया, चाचानी रेहनला आणि तुला मुद्दाम जवळ आणलं ना..."
"बहुतेक, त्याना आमच्या दोघाचं लग्न करायचं होतं.. पण माझ्यासाठी रेहान आणि तू फ़क्त मित्र होतात. my best fiends मी त्यावेळेला जितकं हसले तितकी नंतर कधीच नाही. मी स्वत्:ला जगापासून तोडलं होतं.. तुम्ही मला परत आणलत.. असिफ़.. तुझं आणि माझं कनेक्शन तर मला अजून नाही कळालं.... मला काहि व्हायच्या आधी तुला कसं समजतं रे???.."
"मला तरी कुठे कळलय. पण एवढे मात्र खरं की त्यामुळे बर्‍याचदा मी तुझा जीव वाचवला."
प्रिया हसली.
"तुझ्यामुळेच तर असिफ़ मी अजून मेले नाही. मला फ़क्त तूच या जगाशी बांधून ठेवलस... आणि रेहान... बिच्चारा.. त्याला सुरुवातीला मी इतकं सतवलं ना की बस्स. रात्री अपरात्री मी त्याला रस्त्यावर दिसायचे.. असा घाबरायचा तो.. कित्येकदा त्याला वाटायचं की परत त्याचे भास सुरू झालेत.... पण ते त्याच्यासाठी तेव्हा गरजेचं होतं,.."
"प्रिया, तू रेहानवर तेव्हापासून प्रेम करतेस?"
"नाही असिफ़.. मी रेहानवर प्रेम केलं नाही आणि बहुतेक आजही करत नाही..."
"काय?"
"अरे, इतना क्यु डरते हो? मला प्रेम म्हणजे काय हे तेव्हा माहित नव्हतं. आजही माहित नाही.. पण आपल्या मैत्रीचे किस्से बाबाच्या कानावर जायला लागले आणि मग घरात.. रोज एक रामायण... आधी मुळात ते गाव केवढंसं त्यात परत त्या देशपांड्यासारखी कुडमुडेच जास्त.. अफ़वा पसरायला वेळ नाही लागत. रोज घरी गेलं की खरडपट्टी सुरू असायची. मी हे तेव्हा कधीच कुणाला सांगितलं नाही. घर हा विषयच माझ्यासाठी लाजिरवाणा झाला होता. पण नशीब.. रेहान दिल्लीला गेला. पण बाबाचा संशय मात्र तिथेच रहिला. मी रोज घसा फ़ोडून सांगायचे की मी आणि रेहान फ़क्त फ़्रेंड्स आहोत. पण काही उपयोग नव्हता. रेहानचं मेल आलेलं बाबानी पाहिलं आणि त्या दिवशी कहर झाला. मला त्यानी गणपतीच्या पयाशी शपथ घ्यायला लावली की मी परत रेहानशी कुठलाही संबंध ठेवणार नाही.......... आणि मी गणपतीची शपथ घेतली की माझ्या आयुष्यात रेहानशिवाय कुणीही येणार नाही.. हे कदाचित प्रेम असेल किंवा माझा सूड असेल... सत्य त्या गणपतिलाच ठाऊक..."

प्रिया, तुला खूप दिवसापसून विचारेन म्हणतोय.. पर पता नही डर लगता है.... तुम किसे मानती हो?"
"असिफ़, मेरी पैदाईश इस्लाम है परवरीश हिंदु... और सारा वक्त गुजारती हू तुम जैसे शैतानो के साथ... अपने साथ अगर कुछ बुरा होगा... तो कोई न कोई भगवान देख लेगा... सबको हाथ जोडती हू.. सजदा करती हू.. उसके बारे मे इतना क्या सोचना. "
"पण मग तू रेहानला भेटली का नाहीस?"
"ए असिफ़, साला एक तो मेरेको चढी है उसमे तू बात बात पे टॉपिक मत बदल.... अब भगवान की बात हो रही थी रेहान कहा से टपका.."
"प्रिया, जर तू कसम घेतलीस की तुला रेहानच हवा म्हणून मग..."
"ओहो... उसी के लिये तो इतना हिस्ट्री का लेक्चर चालू होता है... माझा खेळ तिथूनच सुरू झाला..."
"मतलब.."
"असिफ़, मला माझ्या बाबाना असा वार द्यायचा होता की आयुष्यभर त्याना त्रास झाल पाहिजे. मी खूप विचार केला पण मी मुसलमान आहे हे कळून इतका उपयोग झाला नसता... समजा मी रेहानशी लग्न केलं असतं तरी तो एका क्षणाचा धक्का ठरला असता कारण आधीच त्याना आमचं लफ़डं आहे असं वाटत होतं... त्यामुळे त्यात एवढी मजा नव्हती. मुळात पहिलं म्हणजे मला स्वत्:च्या पायावर उभं राहायचं होतं. आणि दुसरं म्हणजे रेहानच्या आयुष्यातून बाहेर पडायचं होतं..."
"पण का?"
"कळेल.. असिफ़ लवकरच कळेल.. तुलापण आणि रेहानला पण... आज मी जे ठरवलं ते झालय. रेहान शादिशुदा आहे आणि मी कमावती.. मला कुणाच्याही आधाराची गरज नाही. असिफ़.. परत एकदा सांगते. माझं रेहानवर प्रेम आहे की नाही हे मला माहित नाही पण माझ्या आणि बाबाच्या या लढाईत त्याला बरंच काही गमवायला लागणार आहे... चीअर्स असिफ़.. This story is going to start now...
"मला तू काय म्हणते ते समजतच नाहिये.. तू स्पष्ट सांग तू आता काय करणार आहेस?"
"काय करणार म्हणजे... रेहानला भेटणार... अजून काय?"

=====================================

"नाझ, प्लीज बार बार फ़ोन मत करो.. मुझे कोई डीस्टर्बन्स नही चाहिये" रेहानने जरा गुश्शातच फ़ोन ठेवला. हल्ली त्याचा अर्धा वेळ कामातच जायचा पण कपडे विकण्यापेक्षा त्याला जास्त interest डीझाईन्स बनवण्यात होता आणि त्यासाठीच तर त्याला वेळ मिळत नव्हता. घरात निवांतपणा मिळायचाच नाही. सारखं कुणाचं ना कुणाचं तरी येणं जाणं चालू, ऑफ़िसचा वेळ सगळा administration आणि marketing मधेच जायचा. शेवटी वैतागून रेहानने पनवेलच्या पुढे असलेला हा बंगला विकत घेतला. त्याला जेव्हा केव्हा creative काम करावंसं वाटयचं तेव्हा तो इकडे यायचा. एकदम शांत आणि मस्त ठिकाण होतं. लग्नाला ज्जवळ जवळ वर्ष होत आलं होतं.
पण तरीही नाझ त्याला दिवसातून दहादा फ़ोन करायचीच. पण तसा बाकी कसलाही त्रास नव्हता.

त्याने स्वत्:साठी कॉफ़ी बनवून घेतली. सकाळचे आठ साडे आठ झाले होते. बाहेर पाऊस मनाला वाटेल तेव्हा पडत होता. आजचा पावसाचा नूर एकदम लहरी होता. वातावरणतच आज एक प्रकारचा शांतपणा होता. त्याच्या डोक्यात वेगेवेगळे रंग सध्या थैमान घालत होते. काय करावं हा विचार चालू होता, तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आता कोण आलं असेल हा प्रश्न रेहानला पडला.

त्याने दरवाजा उघडला.. समोर एक मुलगी उभी होती. साधारण पंचविशीची.
"जी कहिये.." तो म्हणाला..
"पहचाना?" तिने विचारलं. ती अर्ध्याहून जास्त भिजली होती. लांबसडक केसामधे मोती चमकत होते.. चेहरा अर्थातच ओळखीचा होता. झोपेत काय मेल्यावर पण त्याने ओळखला असता हा चेहरा.
"प्रिया?" त्याने विचारलं.
"नही... उसका भूत.. अभी ऐसेही दरवज्जेपे रोकोगे या अंदर भी आने दोगे? थंडी वाजतेय मला"
रेहानला काय बोलायचं तेच सुचेना. त्याला आठ वर्षापूर्वीची प्रिया आठवली. एका काळोख्या रात्री त्याला रस्त्यावर भेटली होती. आणि अशाच एका वळणावर त्याला सोडून गेली होती. कायमची. कधीही त्याचा चेहरा न पाहण्याची कसम घेऊन मग आज इथे??

रेहान.. तुला परत भास होतायत; त्याने स्वतःलाच समजावलं.

"रेहान, आत येऊ दे मला." तिने रेहानला हलवलं.. "काय विचार चालू आहे तुझा?"
"अं.. कुछ नही.. प्रिया.. तुम यहा पे..." त्याला काय बोलायचं तेच सुचेना.
"का.. मी इथे नाही येऊ शकत.. आणि काय.. मराठी विसरलास पूर्ण? बरोबर आहे म्हणा.. लंडनच्या पोरीशी लग्न केलस ना..." प्रिया आत आली सुद्धा.
परत रेहानला वाटलं की त्याला आता वेड लागेल. ही मुलगी काय चीज होती?
"रेहान, एवढा विचार करू नकोस.. झेपणार नाही तुला." प्रियाने केस झटकले. शुभ्र पांढर्‍या सलवार कमीझमधे ती आज वेगळीच दिसत होती. आठ वर्षापूर्वीची अल्लड प्रिया आणि आजची प्रिया.. पाहिलं तर काहीच फ़रक नव्हता.. आणि तरी या दोन वेगवेगळ्या वाटत होत्या.
हॉस्पिटलमधे झोपलेली प्रिया आणि आणि ही अशी तूफ़ान मेल प्रिया.

"रेहान. कधी पाहिलं नाहिस का तु मला? घूरना बंद करो.. मला थंडी वाजतेय. कॉफ़ी मिळेल?" प्रिया सोफ़्यावर बसली होती.
रेहान अचानक भानावर आला. किचनमधे जाऊन त्याने कॉफ़ी गरम केली.
"प्रिया. I am confused " रेहान म्हणाला.
" I know that " तू हाच विचार करतोयस ना की ही मुलगी इतक्या दिवसानी मला कशी काय भेटतेय.. सांगेन.. सगळं सांगेन.."
"प्रिया, तुला मी इथे आहे हे कुणी सांगितलं?"
"अरे वा... अजून मराठी येत मग तुला,.. good very good "
"प्रिया,... अगर मे कभी हार्ट अटेकसे मरुगा ना you will be responsible "
प्रिया खळखळून हसली.
"तू बिलकुल नाही बदललास...." तिचा आवाज एकदम गंभीर झाला.
"और तुम.. तू तरी कुठे बदललीस?" त्याने तिच्याकडे पाहत विचारलं.
ती हातातली कॉफ़ीच्या मगकडे पाहत होती. क्षण दोन क्षण असेच शांततेत गेले.
"रेहान.. i am sorry "
" for what ?"
"तुला मी खूप दिवस अंधारात ठेवलं. तुझ्या खूप जवळ असून मी तुला भेटले नाहि.. रेहान, मी.... मला.. "
"प्रिया, माफ़ी का तो सवाल ही नही उठता. जो तुमने मेरे साथ किया है मै कभी नही भूल सकता..." रेहान शांतपणे म्हणाला.
" i know आणि म्हणूनच आज तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी इथे आलेय."
"मला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नकोय. प्रिया, जो हो गया सो हो गया. now move ahead in your life
" the way you have moved "
" yes प्रिया. मैने एक बात सिखी है जिंदगी से. वो किसी के लिये नही रुकती."
"पर मुझे उसे रोकनाहि नही है.. ना खुद रुकना है.. रेहान बहोत हो गयी ये घिसीपीटी बाते.. मी इथे तुझ्याबरोबर माझं आतापर्यंतचं आयुष्य डिस्कस करायला नाही आले. मला माझ्या मित्राकडून मदत हवी आहे. ती मिळेल का तेवढं सांग."
"प्रिया. तुम मेरी best freind थी और रहोगी.. बोलो क्या मदद चाहिये?"
प्रियाने कॉफ़ी खाली ठेवली. आणि एकदम थंड आवाजात तिने विचारलं.
"क्या तुम मुझे अपनी रखैल बना सकते हो?"

"प्रिया, दिमाग ठिकाने पे है तुम्हारा? काय बोलतेयस ते समजतय तुला?" रेहान उसळून म्हणाला.
"रेहान, मी पूर्ण विचार करूनच बोलतेय. खरं तर मला हे धाडस करायलाच इतके दिवस लागले. माझ्यासाठी हा सगळ्यात कठीण निर्णय आहे..."
रेहान शांत बसला.
"प्रिया, का करायचय तुला हे?"
"रेहान, कुणीतरी माझ्या आयुष्याच पट उधळला आहे. मला तो पूर्ण विखरायचा आहे..."
"काय मिळेल तुला यातुन..."
" good question रेहान, मला यातून काहीही नकोय. माझी बदनामी होईल आणि काय...."
"प्रिया, तुम पागल हो"
"रेहान, if i am not mistaking.... असिफ़ने सगळ्यत आधी माझ्याबद्दल तुला हेच सांगितलं होतं ना? मला माहित आहे की कुठलिही मुलगी असं करायल धजावणार नाही.... पण मग मी दुसरि कुठलीही मुलगी नाहिये ना? I am different "
"प्रिया, माझं लग्न झालय आणि I am very haappy with my wife तिला माझ्या पास्टबद्दल सगळं माहित आहे तरी तिने माझ्याशी निकाह केला.. आणि मी तिला धोका देणार नाही..."
"मी तुला नाझियाला धोका दे असं सांगितलंच नाही.. रेहान, This is a deal तुला फ़क्त हे नाटक करायचं आहे.. बास मला अजून काहीही नको... मी स्वत: सगळं नाझला सांगायला तयार आहे."
"प्रिया, हे नाटक तुला खूप भारी पडेल. बापाशी बदला घेण्याची कधीतरी माझीपण इच्छा होती. पण म्हणून हे असं काहीतरी... प्रिया नफ़रत आदमी को अंधा बनाती है.. तेरे हाथ से जिंदगी युही निकल जायेगी और तू बाद मे पछतायेगी.."
"रेहान... एक मिनिट थांब. मी आधीच तुला सांगितलय की मला कसलेही उपदेशाचे डोस नको. ते सगळ्यानी दिलेत. इरफ़ानचाचानी तर अख्खी philosophy समजावली मला. पण कुणीही माझा निश्चय बदलू शकलं नाही.."
"इरफ़ान.. मतलब मेरा बाप?"
"हा.."
"तुम कैसे जानती हो उन्हे?"
"प्रिया कुलकर्णी नही जनती... रुही काझी पहचानती है..."
प्रिया हलकेच हसली.
बाहेर पाऊस आता जोरात कोसळत होता. सकाळ सुद्धा काळवंडली होती.
रेहान खिडकीतुन बाहेर बघत होता.
" i am confused " तो बर्‍याच वेळाने म्हणाला.
" as usual.. let me give you some explanation..."

===========================================

दुपारचे बारा वाजत आले होते. प्रिया अखंडपणे बोलत होती. इतक्या वर्षाच्या तिच्या साठलेल्या भावना सगळे बांध तोडून आल्या होत्या. रेहान शांतपणे ऐकत होता.
"प्रिया, तु मला जे काही सांगितलंस ते खरंच कुणालाही जमणार नाही. मला तुझ्या या डीसीजन घ्यायच्या ability ची कमाल वाटतेय. पण तरीही This is not a way to solve the problem "
"मी परत एकदा सांगतेय की मला आता उपदेश नकोय. मला फ़क्त तुझा होकार हवाय..."
"आणि जर मी नकार दिला तर..."
"तू देणार नाहीस..."
"कशावरून.?"
प्रियाने रेहानकडे पाहिलं..
"रेहान, म्हणून तर मी तुझ्याकडे आले.. जर मला तुझ्या नकाराची पर्वा असती तर.. केव्हाही तुझ्याबरोबर मी प्रेमाचं नाटक करू शकले असते. तुला समजलं पण नसतं की मी तुला कसं वापरलय.. पण मला ते नकोय... मी तुला काय रे पूर्णपणे खरं सांगतेय आणि मी एक मित्र म्हणून तुझ्याकडे मदत मागतेय..."
"प्रिया.... आणि जर मी नकार दिला तर तू काय करशील?"
प्रियाने डोळे मिटले. "रेहान, तू नकार देणार नाहीस..."
"मला नाझची सगळ्यात जास्त काळजी आहे. पण त्याहूनही तुझी काळजी आहे.. मुर्खासारखं तू तुझं आयुष्य वाया घालवतेस..."
"रेहान हे फ़क्त मी माझ्यासाठी नाहि करत.." प्रिया उसळून म्हणाली..
"तू कुणासाठीही कर... पण only you willl suffer... "
" suffer... हा... ask my mother about it .... रेहान.. हे मला माझ्या आईसाठी करायचय. तिने खूप कष्ट काढले या माणसापायी. You know.. she is still virgin पण या माणसाने तिला वांझ म्हणून declare केलं. स्वत्:ची खोटी इज्जत जपण्यासाठी... रेहान. मला त्याला आयुष्यातून उठवायचय."
प्रियाच्या अंगातून संताप नुसता उसळत होता. रेहान तिच्याकडे बघत होता.

त्याला प्रिया हवी होती का? त्याने स्वत:लाच विचारलं. त्याच्या मनात एकाच वेळेला अनेक विचार आपापसात लढत होते. एक नवरा. एक मुलगा. एक मित्र आणि एक पुरुष..
पण शेवटी कुणीतरी एकच जिंकलं..
"प्रिया.. I am ready for your deal.." रेहान शांतपणे म्हणाला.
" Thank you. "
"पर मेरी कुछ शर्ते है.. उन्हे पहले सुन लो... मी हे फ़क्त तुझ्यासाठी करतोय. पण हे नाटक फ़क्त एकच वर्ष चालू राहील. तू तुझा आताचा जॉब सोडशील आणि माझ्या कंपनित येशील. अस a brand manager . तू माझी रखैल वगैरे काहीही नसशील. मी तुला ते नाव देणार नाही.. नाझला किंवा माझ्या फॅमिलीला यातलं काही सांगायचं नाही. असिफपासून तर काही लपवायचा प्रश्नच येत नाही. "
"आणि एक वर्षानंतर,... "
"ते मी ठरवीन.. आतापर्यंतचा खेळ तू खेळलीस.. पण पुढचा मी ठरवीन.."

==================================================

नाझियाला तिच्या भावाचं म्हणणं आता पुरेपूर पटत होतं. रेहानला स्किझोफ्रेनिया झाला होता हे ऐकूनच या लग्नासाठी त्याने नकार दिला होता. पण नाझ तेव्हा तिच्या निश्चयावर ठाम होती. डॉक्टराच्या मते हा आजार पूर्णपणे कधीच बरा होत नसतो. पण तरी तिने रेहानबरोबर येणं पसंद केलं होतं. पण हल्ली तोच रेहान असं का वागत होता?

प्रिया आणि रेहान एकत्र काम करत होते. त्यानी विरासत कलेक्शनला यश दाखवून दिलं. रेहानची डीझाईन्स आणि प्रियाचं मार्केटिंग.. बॉलीवूडच्या मोठ्या असाईनमेंट्स मिळेपर्यंत त्यांची मजल गेली होती.

कंपनीमधून येणार्‍या अफवा वाढतच होत्या. प्रिया त्याची जुनी मैत्रीण होती. आता ती त्याच्यासोबत पनवेलच्या बंगल्यावर राहते असलं काहीबाही ऐकू येत होतं. सुरूवातीला तिने इग्नोर केलं पण नंतर नंतर बात वाढत गेली तशी तिने रेहानला विचारलंच. त्याने या विषयावर बोलायला पण इन्कार केला.

असिफ़ने तिला प्रियाबद्दल काही चांगलं सांगून मनवलं होतं. फ़क्त एकदातरी प्रियाला भेट असं त्याचं म्हणणं होतं. पण नाझला तिचं तोंड बघायची इच्छा नव्हती...

सुधीर कुलकर्णीनी व्हॉलंटरी रीटायरमेंट घेतली होती. गावामधल्या राजकारणामधे त्यांचा बराच राबता सुरू झाला होता. गावामधून MLA साठी उभे राहत होते. पण त्याची एकुलती एक मुलगी मुसलमानाबरोबर लग्नाशिवाय राह्ते ही बातमी त्याच्या हितशत्रूनी व्यवस्थित पसरवली. कुलकर्णीना नॉमिनेशन परत घ्यायला त्याच्या पक्षाने भाग पाडलं. हा प्रियाचा विजयी क्षण होता. तो तिने रेहानबरोबर celebrate केला.
प्रियाची आई चिडायची ओरडायची.. प्रियाच्या बाबानी तर तिच्याशी असलेले सगळे संबंध तोडूनच दिले होते.

सुधीर कुलकर्णींना तीळ तीळ मरताना पाहून प्रिया खुश होत होती. पण कुठेतरी... हा विजय कुणाचातरी बळी देऊन मिळालाय हे तिला समजत होतं. नाझच्या मनस्थितीची तिला कल्पना होतीच.

रेहान तिच्या आयुष्यात नुसतीच एक business deal बनून आला नाही. जगण्याला प्रेमाची आणी त्याहूनही जास्त अशा शांतीची गरज असते. हे रेहानने तिला शिकवलं. हे सुरूवातीला तिला नाटक वाटत होतं.तेच नाटक आता तिचं आयुष्य बनून गेला.

लहानपणापासून प्रिया प्रत्येक नात्याच्या स्पर्शाला मुकली होती. रेहान तिच्यासाठी ते प्रत्येक नातं जगला. तिच्या एकाकी जगण्यात त्याने स्वत्:च्या आयुष्य झोकून दिलं. रेहान प्रियाचा फ़क्त प्रियकरच नाही तर वडील, भाऊ मित्र सगळं काही होता.
तशीपण प्रियाला आणि रेहानला समाजाची पर्वा नव्हतीच त्यामुळे किती बदनामी झाली तरी काही फ़रक पडत नव्हता. नाही म्हणायला रेहानचे अब्बा थोडे फ़ार चिडले होते. पण तसंही रेहान कुठे त्याच्या आज्ञेत कायम होता?
बघता बघता दिवस कसे झर झर सरत होते कळलेच नाही
हळू हळू सगळ्याना या जगावेगळ्या नात्याची सवय होत गेली.

खरं काय ते समजल्यावर नाझ खूप रडली, शेवटी तलाकची धमकी देऊन लंडनला निघून गेली. रेहानने तिला फोन करायचा खूप प्रयत्न केला. पण तिने त्याच्याशी कुठलाच काँटॅक्ट ठेवला नव्हता.

प्रिया आणि रेहान दर वीक एंडला या पनवेलच्या बंगल्यात यायचे.
आजही प्रिया आणी रेहान इथे आले होते.
प्रियाला सकाळी एक मीटींग होती.. पण रेहान काही तिला सोडत नव्हता...
कारण आज रेहानच्या खेळाचा दिवस होता. आणि तो वाट बघत होता एका व्यक्तिची.

==================================================

रेहान, मी काल रात्रीपासून बघतेय. तु कसल्यातरी विचारात आहेस.. काय झालय?"
प्रियाने विचारलं.
"काही नाही.. " त्याने तिच्याकडे न बघता उत्तर दिलं..
"रेहान, मी निघू?"
"नको, थोडा वेळ थांब..."
"मला उद्या सकाळची फ़्लाइट आहे.."
" I know पण तरी थांब,"
"का?"
"तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला i dont have time " तो भडकला.
"रेहान,... चिडू नकोस. मी सहज विचारलं.... असिफ़ आणि पाखीच्या लग्नात पण तू असाच वागत होतास.. काय झालय ते स्पष्ट सांग..."
त्याने केसातून हात फ़िरवला. तो अस्वस्थ होता.
"प्रिया.. थोडा वेळ तू बाहेर जाऊन बस... मी कसला तरी विचार करतोय.. please leave me alone "
प्रिया बेडवरून उठली.
"ठीक आहे.. एकीकडे मी तुला या रूममधे नकोय आणि तू मला जाऊ पण देत नाहिस.. " ती दरवाज्यापर्यंत गेली.... आणि पाठी वळून म्हणाली.."मला असं का वाटतय की तुला या नात्याचा आता त्रास होतोय.." आणि ती हॉलमधे आली.
तो काहीच बोलला नाही.

ती बाहेर येऊन बसली... तिच्या डोळ्यासमोरुन गेलेला काळ भुतासारखा नाचायला लागला. तिच्या एका आततायी निर्णयामुळे तिने किती जणाची आयुष्य उधळली होती. नाझिया कायमची लंडनला गेली होती. तिने रेहानकडे तलाक़ मागितला होता... इरफ़ानचाचानी आणि रेहनच्या अम्मीशी तर तिने स्वत्:हूनच संबंध तोडले होते.
काय तोंडाने ती त्याना भेटणार होती. नाही म्हणायाला असिफ़ पाखी अजूनही तिला समजून घेत होते. पण त्याना त्याचं आयुष्य होतं.....
तिने नोकरी सोडल्यापासून वीरने तर तिला ओळख सुद्धा दाखवली नव्हती. आणि जतिन.. कदाचित त्याचे एव्हाना लग्न झालं ही असेल... ती स्वत्:शीच हसली.
आतापर्यंत ती स्वत्:च्या शर्तीवर जगत आली होती.
मग आजच अचानक हा अंधार का जाणवत होता.
रेहानने तिला accept करून तिच्यावर उपकार केले होते. आणि आज जर त्याला याचं ओझं जाणवत असेल तर त्यात त्याची काय चूक होती.
आपलं रेहानवर प्रेम आहे का.. तिने स्वत्:लाच विचारलं..
किती तरी वेळ प्रश्नाचं उत्तर आलंच नाही... मग आतून कुठूनतरी एक प्रति ध्वनी उठला...
नाही प्रिया तुझं रेहानवर प्रेम नाही. तू त्याला स्वार्थासाठी वापरलं आहेस. तू तर बरबाद झालीसच पण त्यालाही घेऊन बुडालीस. तुझ्या निखळ मैत्रीची किंमत तो चुकवतोय. तुला वडीलाचा बदला घ्यायचा होता ना... पण तू तर रेहानलाच मिटवायला निघालीस..
तसं बघायला गेलं तर आपल्यात वितुष्ट असं काहीच नव्हतं. एखाद्या नवरा बायको पेक्षा आपण नीट राहतो....
प्रियाच्या मनात हा विचार आला आणि ती थबकली. आपण आपलं तारू किती भरकटवलय याची तिलाच कल्पना आली. रेहान नाझियाला तलाक़ देणार नाही हे तिला माहित होतं आणि ती रेहानची दुसरी बायको होणार नाही हे त्याला माहित होतं.
या नात्याला जगाच्या कुठच्याही पारड्यात तोलता येणार नव्हतं. आणि हे नातं असं संपवताही येणार नव्हतं.
ती उठून किचनमधे आली. नातं संपवणं शक्य नव्हतं पण ती तर स्वत्:ला संपवू शकत होती ना..
प्रियाने तिथे असलेला चाकू उचलला. आत्महत्या हे सगळ्यात मोठं पाप आहे. तिने मनाला समजावलं. पण त्या पापापेक्षा मोठं ओझं जगण्याचं आहे. तिच्या मनानं उत्तर दिलं.

वर्षानुवर्षे तिच्या मनत चालत असलेला संवाद परत सुरू झाला. पण तिला आज हा संवाद सम्पवायचाच होता.
रेहानला कळू नये म्हणुन ती मागच्या दरवाज्याकडून गार्डनमधे निघाली. तेवढ्यात कुणाची तरी गाडी गेटमधून आत आलेली दिसली.
थोड्या वेळाने कुणीतरी पुढच्या दरवाज्याची बेल वाजवत होतं.

प्रियाच्या हातातुन चाकू गळून पडला. कोण आलय हे तिला संगायची गरज नव्हती.
रेहानने प्रियाला आवाज दिला. ती मुक्यासारखी हॉलमधे आली.
"प्रिया, पहचानती हो इसे?" रेहानने विचारलं.
तिने हलकेच मान डोलावली... रेहानच्या मनात काय विचार आहे हे तिला अजूनही कळलं नव्हतं.
जतिन तिच्या समोर उभा होता. निवांतपणे. बहुतेक पुढे काय होणार आहे याची त्याला कल्पना असावी. फ़क्त अजून तीच अंधारात चाचपडत होती.
"बस मी आलोच.." रेहान किचनमधे गेला.
ती तशीच उभी राहिली.
"प्रिया, तू पण बस ना.. " जतिन अगदी casually म्हणाला.
ती नाईलाजाने बसली.
"प्रिया, जेव्हा रेहानने मला सांगितलं तेव्हा माझा विश्वासच बसेना. i was so shocked "
तो कशाबद्दल बोलतोय तेच प्रियाला कळेना.. पण ती मुद्दामच काही बोलली नाही.
"जतिन, चलो.. lets decide everything " रेहान बाहेर आला.
" about what ?" प्रियाने विचारलं..
रेहानने प्रियाकडे एकच क्षण पाहिलं.. आणि बर्फ़ासारख्या थंड आवाजात तो म्हणाला..
"तुझ्या आणि जतिनच्या लग्नाबद्दल...."
प्रियाला एका क्षणासाठी पूर्ण कोरी झाली.. रेहान काय म्हणतोय तेच तिच्या लक्षत आलं नाही, आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा तिचा संताप डोळ्यातून उसळला.
"रेहान, तू काय बोलतोयस... कल्पना आहे तुला?" ती ओरडली.
"प्रिया,... मी आधीच सांगितलं होतं ना,, की नंतरचा खेळ मी ठरवेन.."
"माझं आयुष्य तुझं खेळणं नाही..."
"ते मी नाही तू बन्वलयस... प्रिया,.. अब्बा कायम म्हणतात की आपल्या दोघाकडे maturity नाही, आणि ते खर आहे,, नाहीतर एवढा मूर्खपणा आपण केला असता का?"
"अच्छा,, म्हणजे आता तुला मी नको झाले म्हणून तू माझ्यापासून ही अशी सुटका करून घेणार का?" तिच्या डोळ्यात पाणी आलं..
"प्रिया, जर मला तुला सोडायचंच असतं ना तर मी कुठच्याही क्षणी सोडलं असतं. मला तुला काहीही excuse द्यायची गरज नव्हती. but i am concerened about you "
प्रियाच्या डोळ्यातून आपोआप पाणी आलं.
"जतिन, देखो.. जिंदगीभर इसे संभालना पडेगा.. " रेहान जतिनकडे बघत म्हणाला.
"रेहान, मैने पहले भी कहा था.. आज भी.. और हमेशा कहूंगा. i love her "
" thats it जतिन.."
रेहानने प्रियाच्या डोक्यावरून हात फ़िरवल.
"मला पाखीने जतिनबद्दल सांगितलं होतं. मी त्याला भेटलो. तेव्हा त्याने मला सांगितलं की तो तुझ्यावर प्रेम करतो.
प्रिया, सबसे important तो यही होती है ना.. कोई किसी बिना शर्त के आपसे प्यार करे.."
"पण रेहान,,,,"
"प्रिया,. हे मी आपल्या दोघासाठी करतोय.. तुझ्यासाठी जतिन चांगला मुलगा आहे. कारण त्याला तू जशी आहेस तशी चालेल. प्रिया. हमेशा उसीके साथ जिंदगी बिताओ जो तुमसे प्यार करे. ना की जिस से तुम प्यार करो.."
"रेहान.. This is not a solution. मला जतिनचे घरवाले कधीच accept करणार नाही."
"जतिन.. अब तुम बोलो" रेहान म्हणाला.
"प्रिया, मी घरी बोललोय.. आता नाही खूप आधीपासून. आणि मी हे clear केलय की तुला कसलाही त्रास घरी होणार नाही. त्यांनी तुला अ‍ॅक्सेप्ट करण्या न करण्याचा सवाल येतच नाही. " जतिन म्हणाला.
"प्रिया, this is perfect "
प्रियाने जतिनकडे पाहिलं. "माझ्याजवळ दुसरा कुठलाच option नाहिये ना?" तिने हसण्याचा प्रयत्न केला. केविलवाणा.
"प्रिया, मी तुझ्यावर कुठलीही जबरदस्ती करत नाही. decision हा तुझाच राहील." जतिन म्हणाला.
"रेहान, मला वाटतय की तू मला तुझ्या अयुष्यातून घालवायचा प्रयत्न करतोयस.."
रेहान हलकेच हसला.
"प्रिया, मी तुला तुझं आयुष्य पुढे नेण्यासाठी मदत करतोय. मला तुला खूप खुश बघायचय. तुझा हा रडका चेहरा मला बघवत नाही आणि मी जतिन स्वत्:हून तयार झालाय... अजून काय हवय तुला?"
प्रिया काहीच बोलली नाही. रेहानने जतिनकडे पाहिलं.
"जतिन. तू तयारीला लाग. मी लंडनला जाऊन नाझला परत घेऊन येतो, तोपर्यंत असिफ़ परत येईल.. "
"रेहान पण अजून प्रिया तयार नाही झाली..." जतिन म्हणाला. रेहानने प्रियाच्या खांद्यावर हात ठेवला.
"ए पागल, चल हा बोल दे"
तिने परत एकदा डोळे पुसले.
रात्र नुकतीच सुरू झाली होती.
प्रियासाठी मात्र आयुष्याची नविन पहाट सुरू होत होती.

समाप्त

(धन्यवाद)

प्रकार: 
शब्दखुणा: 

परवा राहवलं नाही आणि जुनी मायबोली खणली आणि त्याच दिवशी वाचून संपवली ही गोष्ट. मस्त आहे. फिल्मी तर आहेच पण तीच युएस्पी आहे ह्या गोष्टीची. मजा आली वाचायला.

फिल्मी तर आहेच पण तीच युएस्पी आहे ह्या गोष्टीची. मजा आली वाचायला.>> धन्यवाद.

अखी, तू जुन्या माबोवरवाचली होतीस ना?

चनस, जुना शेवट्पण हाच होता. Happy

ही सुद्धा आवडलीच खूप फिल्मी आणि प्रेडिक्टेबल असली तरी पकड घेतेच मस्त!! तुझी पहीली कथा आहे ही??? ही कशी मिसली मी? बहुदा जुन्या माबोवर मी सुमॉच्या कथाच जास्त वाचायचे रोमात Happy

तळ्टीपः तुझ्या प्रत्येक कथेतील रेहान खान आणि प्रिया कुलकर्णी हे मेड फॉर इच अदर वाटतात... मग ते मित्र असोत... लव्हर्स असोत... जोडीदार असोत...

डुबक्या मारशील तेव्हा तुझ्या जुन्या कथाही इथे डकव ना प्लीज...

Pages