नकाशा

Submitted by स्वातीपित्रे on 29 November, 2012 - 00:24

विचारांचे चक्र आणि चक्राकार विचार कधीकधी डोके भंडावून सोडतात. हे सर्व का कशासाठी? कोणासाठी? कधीपर्यंत? चिचार आणि भाषा खरे तर आपणच तयार केलेली, आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा अर्थ समजून घेता यावा आणि त्याप्रमाणे आपल्याला क्रिया करता यावी, आपले निर्णय घेता यावेत, सर्वांशी संवाद साधता यावा आणि तोही दर्जेदार, म्हणून. पण कधीकधी आजूबाजूला इतके काही घडत असतं- गोष्टी, बातम्या , शब्द ह्यांचा भडीमार होत असतो को त्यातले अचूकपणे काय घ्यावे आणि काय सोडावे समजत नाही. भरमसाठ एमैल्स, भरमसाठ फेसबुक अपडेट्स , भरमसाठ चान्नेल्स, भारंभार बेरजाआणि वजाबाक्या कॉर्पोरेट जगतातल्या, मोठे मोठे सेल्स आणि अचाट खर्च करणारी गर्दी, कधीकधी नकोशी वाटते. अगदी छोट्याश्या आपल्या मनाच्या कोपर्यात घाबरून जाऊन बसावे आणि चार घटका विश्रांती घ्यावी ह्या विचारांपासून असे म्हंटले तरी तेही जमत नाही. जमवत नाही, आपले मोजमाप करणारे मन.

असे म्हणतात कि map is not the territory. आपल्याला एखादा नकाशा मिळतो, तोच आपल्याला तो प्रत्यक्ष प्रदेश आहे असे वाटायला लागतो आणि तिथेच चुकतं. तसेच भाषेतं असतं. आपल्याला भरमसाठ शब्द मिळतात भाषेकडून वापरायला. पण ती जी भाषा असते ते मात्र नामानिराळी च राहते. त्यात विचार करतात ते फ़क़्त तेचतेच घिसेपिटे शब्द आणि मग आपली भाषा बहरत नाही, विचारांमध्ये नाविन्य येत नाही आणि बाहेरील जगाला आपण आपल्या अंतर्मानापेक्षा जास्त मोठे स्थान देतो. तीच territory आहे असे समजतो. अर्थात हा संवाद दोन्ही दिशेने असला पाहिजे हे खरेच, पण बाहेरील जग कधीकधी इतका ताबा घेतं की बस. अंतर्मन खरे तर अगदी शांत आणि निरभ्र असतं आणि तेच अथांग गोष्टींचा खरा वेध घेऊ शकतं. आणि तेच ह्या अशा विचारांच्या चक्रीवादळाला शमवू शकतं. त्या अंतर्मानाच्या सान्निध्यात नवीन भाषा नवीन शब्द आणि नवीन विचार सुरु होतात.

हा प्रदेश तसा दरवेळी नवीनच वाटतो आणि तिथे कुठलेच भय नसते, कुठलेच संघर्ष नसतात आणि तिथून पळून जावेसे वाटत नाही. चार घटका विश्रांती घ्यायला तिथे मुभा असते. नवीन beliefs ठेवायला मोकळीक असते आणि मग विचारच आपोआप नदीसारखे वळतात. आणि नवीन प्रदेश घडवतात. आणि आपला मन जे फ़क़्त नकाशावर अवलंबून असतं ते नवीन प्रदेशही

अस्तित्वात आहेत ह्यावर विश्वास ठेवतं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याला एखादा नकाशा मिळतो, तोच आपल्याला तो प्रत्यक्ष प्रदेश आहे असे वाटायला लागतो आणि तिथेच चुकतं.
>>>>>>>
हे वाक्य आवडले, पण त्या अनुषंगाने बाकीचे समजायला अवघड गेले.
कदाचित माझीच वाचनसीमा.

धन्यवाद. मनाच्या विश्वात ह्या वाक्याचा अर्थ असा माझ्या डोक्यात होता कि शब्द हे आपल्यासाठी असतात आणि मनाला विचार करायला लावण्यासाठी असतात पण आपण त्यांच्यापलीकडे कधीकधी जायला विसरतो आणि नवीन शब्द आत्मसात करत नाही किंवा थोडेच शब्द हीच भाषा समजतो किंवा त्यांनाच सर्व अर्थ आहे असे समजतो. जरा खोलवर जाणारा विसहाय असल्याने वाचक काढतील तो अर्थ सुधा निघू शकतो.