प्रवेशिका - २३ ( pulasti - चादर नाही, छप्पर डोक्यावर नाही...)

Submitted by kaaryashaaLaa on 6 October, 2008 - 22:45


चादर नाही, छप्पर डोक्यावर नाही
या रस्त्यांवर स्वप्नांचा वावर नाही

काल नफ्याने भिजले जे; या तोट्याचा -
शिंतोडाही त्यांच्या अंगावर नाही?

मंदी, युद्ध...तुम्हाला विषय चघळण्याचे
पोट तुम्हा लोकांचे हातावर नाही

रोजच पाणी देतो रोपांना, आता -
फार भरवसा या आभाळावर नाही!

सत्य हरवले छाया-पडछायांमध्ये
सूर्य कुणाचाही का माथ्यावर नाही?

खेळ सुरू ठेवा अवकाशप्रयोगांचे
माझी भाकर मंगळ-चंद्रावर नाही

कसली खोगिरभरती करता हो देवा
घट्ट कुणाची मांडच जगण्यावर नाही

फार अपेक्षा करणे मी सोडून दिले...
राग मलाही आता माझ्यावर नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>या रस्त्यांवर स्वप्नांचा वावर नाही

>>कसली खोगिरभरती करता हो देवा
घट्ट कुणाची मांडच जगण्यावर नाही Happy

छान! ७ गुण.

वा!

बहोत खूब. वृत्त वेगळं आहे, झकास आहे. सगळेच शेर आवडले.

माझे ८
-----------------------------------------------------
फिर मुझे दीद-ए-तर याद आया
दिल, जिगर तश्न-ए- फरियाद आया

फक्त शेवटचा एक शेर सोडून, उर्वरित सगळे शेर आवडलेत. तरीही माझ्याकडून १० गुण. शब्दांचा बाज फार आवडला.

अभिनव कल्पना आहेत. भाकर चंद्रावर, पोट हातावर हे शेर छान असूनही मूळ विचाराची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटले. तोट्याचा शिंतोडा, खोगीरभरती आवडले. खोगिरभरती मध्ये व्याकरणाची सूट घेतली आहे का?

माझ्याकडून ६ गुण.

सर्वच शेर छान आहेत!!!

१० पैकी १०...

सत्य हरवले छाया-पडछायांमध्ये
सूर्य कुणाचाही का माथ्यावर नाही?

छान----बाकी सगळे शेरही मस्त
८ गुण

रोजच पाणी देतो रोपांना, आता -
फार भरवसा या आभाळावर नाही!

छान शेर आहे. माझ्या मते ६ गुण.
-सतीश

क्या बात है! मस्त कल्पना.. नफा-तोटा, मंदी, मंगळ-चंद्र.. आवडलेच..
८ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

रोजच पाणी देतो रोपांना, आता -
फार भरवसा या आभाळावर नाही!

हा आवडला

५ गुण

छान! मतला आणि शेवटचा शेर थोडे सपाट वाटतात. पण एकंदर गझल आवडली!
माझे गुण - ७.

छान आहे विषय आणि मांडणीही.
माझे ७ गुण

मांडणी आवडली..
लय अजून साधता आली असती.. ७ गुण.

आशय झकास आहे.. कल्पनाही अभिनव पण जरा लयीकडे लक्ष द्यायला हवं होतं - असं आपलं माझं मत.. माझे ५ गुण..

कल्पना छान आहेत...
सगळे गुण त्यासाठीच... माझे ५
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

२,,४,५ आवडले, वेगळं वृत्त वेगळे विषय वेगळी हाताळणी......तरिही आवडलं

व्रुत्तामुळे लय ठरते असं वाटलं होतं मला. मग व्रुत्तात असुनही गझल मनात म्हणताना लयीत म्हणनं जड का गेलं असावं?

बाकी कल्पना तर एकदम भन्नाट.

कसली खोगिरभरती करता हो देवा
घट्ट कुणाची मांडच जगण्यावर नाही

का कुणास ठाऊक, पण हे वाचुन हसु आलं मनात. मस्त आहे एकदम.

गुणः ८

पुलस्ती...... अभिनंदन Happy

खेळ सुरू ठेवा अवकाशप्रयोगांचे
माझी भाकर मंगळ-चंद्रावर नाही >>

मस्तच !!

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-

sarivina, जयु, प्रसाद - धन्यवाद Happy

Pages