काशीयात्रेबद्दल माहिती हवी आहे

Submitted by मी_आर्या on 22 November, 2012 - 02:48

नमस्कार मंडळी,

पुढच्या वर्षी साधारणतः मार्च एप्रिल मधे आई आणि वृद्ध काकुला काशीयात्रेला नेण्याचा विचार आहे. काशीबरोबरच प्रयाग आणि मिर्झापुरजवळील 'विंध्यवासिनी'देवीचं ही दर्शन करुन घ्यावे हा विचार मनात घोळतोय.
कुणी जाउन आले असल्यास, कृपया मार्गदर्शन करावे.

*काशीविश्वेश्वर आणि कालभैरव यांच्या दर्शनाव्यतिरिक्त अजुन कोणकोणती महत्वाची मंदीरं आहेत?
*धार्मिक पुजाविधी काय काय आणि कुठल्या (घाटांवर वै.)करावेत? त्यांचा जनरली रेट काय असतो?
*रहाण्याची आणि जेवणाची व्यवस्था कशी आहे? हॉटेल कशी आहेत? त्यांचे रेट कसे आहेत? आणि जमल्यास फोन नंबर द्यावे. जेवणासाठी महाराष्ट्रीयन पद्धतीचे हॉटेल्स आहेत का? कारण तिथलं जेवण मोस्टली ऑईली/तळणाचं असतं असं ऐकलय.
*तिथे महाराष्ट्र मंडळाने रहाण्याची व्यवस्था केली आहे का?

*वृद्धांना प्रवासास बरोबर नेतांना काय काय काळजी घ्यावी?
वेळ वाचवण्यासाठी, एका बाजुने विमानाने आणि येतांना ट्रेनने यायचा विचार आहे. आईचं पायाचं ऑपरेशन झालं आहे आणि काकुही अशक्त आहे. दोघींनीच काय आम्हीही आजतागायत विमानप्रवास केलेला नाही, म्हणुन विचारण्याचा सोस!

*धार्मिक यात्रा असल्याने अर्थान खरेदी नाहीच. तरीही किरकोळ खरेदी करायची असल्यास कुठे करावी?

*काशीहुन प्रयागला जाण्यासाठी प्रवासाची काय साधनं उपलब्ध आहेत्?त्यांचं बुकींग करण्याची ठीकाणं वै.

(तिकडे लुबाडण्याचे प्रकार फार घडतात म्हणुन हे सगळं विचारतेय)

धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉटर बघाच >> अनुमोदन दिनेशदा. लिसा रे, जॉनने छान काम केलयं.
'वॉटर' पाहिल्यावर तिने 'कसूर' मधे का काम केलं असं वाटतं.
फारच विषयांतर Happy

Aaryatai apalyakadache taapi nadeevareel prakasha mhanaje prateekashich aahe na?
Jyana kasheela jayala jamat nahee te tithe jatat. tevhadhech punya milate mhane.

(रांड (विधवा), सांड ( देवाला सोडलेले सांड), सिढी ( पाय-या- तिथल्या पायर्या निसरड्या आहेत या अर्थाने), संन्यासी ( काशीचे पुजारी, तिथले साधु-संन्यासी वै.))>>
पुढे याचे कितीही explanation आले असले आणि कोणीतरी सांगितलेली म्हण असली, तरी अशी म्हण ती इथे परत लिहीणे नाही पटले.

ही परिस्थिती अगदी सेम मथुरेला सुद्धा आहे.तिथे असलेल्या वृद्धाश्रमातील स्रिया अश्या मागे लागतात की तुम्हाला काहीतरी देण्यावाचुन गत्यंतर नसतो.
आणी गाईड केलात की तो हमखास त्या त्या आश्रमात नेणार म्हणजे नेणार.

५/६ वेळा मथुरेला जावुनही न सुधारलेला जेम्स.

इब्लिस, मला यकुंचा इतिहास माहीत नाही. मात्र हा उल्लेख गोडसे भटजींच्या पुस्तकांवरून घेतलेला आहे असं दिसतंय. साधारण असाच उल्लेख लोकसत्तेतल्या या लेखातही सापडतो.
आ.न.,
-गा.पै.

आतेभाउ आणि वहिनी चौधरी यात्रा कं ची काशी यात्रा करुन आले ते पुन्हा चौधरी बरोबर परत कोणतीही सहल न करण्याचा निर्णय करुनच.
दिनेशदा म्हणतात त्याप्रमाणे गोवा/कर्नाटक ची देवळं स्वच्छतेच्या बाबतीत उत्तमच. नाहीतर ॠषीकेश/हरिद्वार हा पर्याय त्यातल्या त्यात बरा आहे काशीपेक्षा.

आर्या, मागे काशीचे अनेक फोटो टाकले होतो तिथे ही कॉमेण्टही टाकली होती:

"पौराणीक गॉगल्स घालुन तिथे हिंडलात तर अनेक गोष्टींकडे कानाडोळा करुन ती रहस्ये आत्मसात, आत्मगत करत जाता येतात. मी ती दिव्य दृष्टी घेऊन गेलो होतो. घाण इज इन द आय ऑफ द बिहोल्डर वगैरे. पाणी मात्र बाहेरचे कटाक्षाने टाळले तरीही तिसर्या दिवशी आजारी पडलो आणि दीड दिवस बुडाला. लोक मात्र आरामात गंगेत डुबक्या मारतात.

दुरदूर पसरलेली व आता खूप लोक जात नसलेली मंदिरे एकेकाळी खूप महत्वाची होती. ६४ योगीनी, १२ आदित्य, ५६ गणेश सगळे आहेत तिथे. मला पुन्हा जायला आवडेल. आजकाल भडक रंग असलेली, संगमरवरी टाईल्स लावलेली मंदिरे असतात त्यापेक्षा येथील मंदिरे चांगली आहेत. आत सहसा घाण नसते. "

ते फोटो येथे पाहता येतीलः http://www.maayboli.com/node/30672

तब्बेतीची पूर्ण काळजी घ्यायला हवीच पण तिथे कशासाठी जाताय याचा पण नित विचार करुन जायला हवे. होमवर्क अत्यावश्यक आहे. तिथे जाऊन पंड्यांना विचारले की आता कुठे जाऊ, काय करु तर लुटले जाणार. त्यापेक्षा आधी ठरवा काय करायचे ते आणि तेच करा (कोणती मंदिरे पहायची वगैरे यासहीत).

त्यांना त्या गोष्टीत किती आवड आहे माहित नाही, पण शक्य झाल्यास विद्यापिठातील संग्रहालयात नक्की जा. आणि सारनाथला पण.

आर्या....

"अस्वच्छ देवस्थाने" हा उत्तर भारताला [केवळ उत्तर प्रदेश नव्हे] "बाय डीफॉल्ट" म्हणावा असा लागलेला रोग आहे. मी जशी काशी यात्रा केली आहे तद्वतच ऋषिकेश हरिद्वार लक्ष्मणझुला मथुरा वृन्दावनही केले आहे.....यात्रा कंपनीसमवेत नसून सहा मित्रांनी ठरविलेल्या जीपमधून.

राजीव गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात १९८६ मध्ये 'गंगा अ‍ॅक्शन प्लॅन' राबविण्यात आला होता त्याची चांगली फळे ज्या भागात पाहायला मिळाली होती तो भाग म्हणजे हरिद्वार. भरगच्च अशा घाटावरून स्वच्छ सुंदर अशी गंगा पाहताना मन हरखून गेले होते. वाराणशी पर्यंत तो अ‍ॅक्शन प्लॅन पोचला नाही. हरिद्वार परिसरात मात्र १९९० च्या आगेमागे कमालीची स्वच्छता, शिस्त आढळली. देव आणि पुण्य यांच्या नावावर कसलीही आणि कुणाकडून लुबाडणूक दिसली नाही. [मथुरेत मात्र वैताग आणणारा अनुभव आला होता].... आणि मुख्य म्हणजे भिकारी, गांजेकस, अत्यंत घाणेरड्या अवस्थेत राहाणारी उग्रपंथीय साधू बैरागी यांची त्या भागातून चक्क पोलिसांनी दंडुकेशाहीच्या जोरावर हकालपट्टी केली होती. त्या काळात, सुदैवाने, आजच्यासारखी न्यूज चॅनेल्सची जत्रा नसल्याने त्या पोलिस कार्यवाहीवर कुठेही कसलीच टीकाटिप्पणी झाली नाही. हरिद्वार ऋषिकेशप्रमाणेच काशीलाही ते भाग्य प्राप्त होईल असे वाटत होते....पण ते होणे नव्हते [ते का झाले नाही याची कारणमीमांसा इथे करण्यात अर्थ नाही].

थोडक्यात सांगायचे झाल्यास 'काशीयात्रे' मध्ये अस्वच्छता आणि भिकारी दैनावस्था हे फेरीतील अविभाज्य घटक आहेत हे कबूल करूनच बॅग भरावी. पुरुषांना अशा गोष्टींचा कमी त्रास जाणवतो असे अनुभवास येते. पण स्त्री वर्गाच्या वावरण्याला 'लज्जा' नामक जो तंतू सदैव अडकून असतो त्यामुळेच त्याना स्वच्छता-अस्वच्छतेचे राहूकेतू छळत असतात.

वर दिनेशदा म्हणतात तसा गोवा प्रांत हा 'देवालय स्वच्छते' बाबत आदर्श मानला जावा [चर्चेस तर देवळांपेक्षाही स्वच्छ आणि शांत]. दक्षिणेकडील अनेक देवालये मी पाहिली आहेत. तिथेही अगदी 'गोवा पॅटर्न" नसला तरीही तेथील भव्य गोपुरे आणि स्वच्छ परिसर पाहताना मन नेहमीच प्रसन्न वाटाते. मीनाक्षी मंदिर परिसरात तर स्त्री वर्गाच्या वैयक्तिक स्वच्छतेविषयी विशेष सोय केल्याचे आढळते. आजकाल 'सुलभ शौचालय' या खाजगी संचलित योजनेमुळे अशा यात्रा ठिकाणाभोवतालची अस्वच्छता बरीचशी कमी झाल्याचे दिसून येते....[दुर्दैवाने काही यात्रा कंपन्या....नावे मुद्दाम घेत नाही.....आपल्या गाड्या अशा सुलभ शौचालय ठिकाणी न नेता....पैसे द्यावे लागतात म्हणून..... थेट गावालगतच्या तलाव, नदी, आणि शेतीजवळच त्या विशिष्ट समयी पार्क करतात....मग पुन्हा तो सारा उघड्यावरचा संतापजनक कारभार.....].

अशोक पाटील

एकुण्च सगळ्याना वाईट अनुभव आले असे दिसते. आम्ही jan 2002 मधे गेलो होतो. एका हवेलीत homestay घेतला. RSS चे कोणी गोविन्दाचार्य होते. अतिशय शिस्तशीर माणुस. स्वछ खोल्या. खुप helpful. त्यानी सर्व इन्फो दिली. marathi ब्राह्मण शोधुन दिला. त्यान्चा No. 335826. ब्राह्मण बाळ्क्रुश्न कस्तुरे ४५२११२. त्यानी सर्व धार्मिक विधी व्यव्स्थित केले. आता काय परिस्थीती आहे माहित नही. पण आमची ट्रिप छान झाली. अगदी जेवणा पासुन ते शॉपिइन्ग पर्यन्त त्यानी guide केले.
पुणे इथुन श्री ट्रवेल्स बेलसरे हे सुधा चान्ग्ली सोय करतात. ग्रुप आणी स्वतन्त्र पण बूकीग करता येते.
त्याचा कूक अस्ल्यामुळे जेवणाचा प्रश्न नाही. airtickets booking सुद्धा करुन देतात.
Dec Jan is the best time to go. मार्च नन्तर ऊन्हाचा त्रास होतो.

आत्ताच नुकतेच (दिवाळीनंतर) सहकुटुंब जाऊन आलो. वर अनेकांनी वर्णन केल्याप्रमाणे बकाल वगैरे आहेच,
पण आम्ही ज्या यात्रा कंपनीतर्फे गेलो होतो त्यांनी सर्व ठिकाणी अतिशय चांगली सोय केली होती.
चित्रकूट, अलाहाबाद (प्रयाग), अयोध्या, गया आणि बनारस (काशी) ही ठिकाणे पाहिली.
एक गयेचे हॉटेल सोडले तर बाकी ठिकाणी अतिशय चांगली हॉटेल्स होती. अगदी २ ते ३ स्टार रेटिन्गची.
त्यांचे कुकिन्ग युनिट बरोबर होते त्यामुळे जेवणाचे कुठेही हाल झाले नाहीत.
चहा, नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण, इ. ची खुपच चांगली सोय होती.
तसेच प्रत्येक ठिकाणी धार्मिक विधींसाठी मराठी गुरूजी मिळाले या कंपनीमुळे.

मी तरी नक्की सुचवेन की ज्यांना ईच्छा आहे त्यांनी एकदा तरी जाऊन यावे. विशेषतः वृद्ध नागरिकांची जर ईच्छा असेल तर मुलांनी ती पुर्ण करावी.

MAJHI NANAND SWATA DEVSTHANACHYA TRIP ARRANGE KARATE. YA MARCH'13 LA TYA KASHI AANI ETAR DEVSTHANE BAGHANYASATHI JAANAR AAHET. TUMHALA AJUN KAHI MAHITI HAVI ASEL TAR ME TYANA VICHARUN SANGU SHAKATE.

सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार अशोकजी! Happy

धन्यवाद महेश, राखी, आणि धनश्री. यात्रेचं कन्फर्म करण्यात जरा साशंकच होते...पण तुमच्या प्रतिसादांमुळे दिलासा मिळाला. Happy

महेश यात्रा कंपनीचे नाव पण इथे द्या हरकत नसेल तर. कारण इतरांना पण तुमच्या सारखा चांगला अनूभव येऊ शकतो.

ओहो लिहिण्याच्या नादात नाव लिहायचे राहीलेले दिसते. लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
पुण्यात लक्ष्मी रोडवर पुजारी यांची विहार ट्रॅव्हल्स आहे त्यांच्या पॅकेज ट्रीपमधे गेलो होतो.
चित्रकूट, अलाहाबाद (प्रयाग), अयोध्या, बनारस (मुक्काम, सकाळी काही देवळे आणि गयेकडे प्रयाण), गया (बुद्धगयेसह) आणि पुन्हा बनारस असा प्लॅन होता.

यामधे दोन महत्वाच्या गोष्टी नव्हत्या "सारनाथ" आणि "गंगेची संध्याकाळची आरती" Sad
आता या साठी मी पुन्हा एकदा जाणार आहे फक्त बनारसला.
पण मुळात धार्मिक विधी (श्राद्ध, पिंडदान, इ.) साठी गेलो होतो ते व्यवस्थित झाले.
प्रयागला पित्रे, गयेला मराठे आणि काशीला शिधोरे गुरूजी होते.

मुळात या अशा यात्रा ग्रुप बरोबर करणेच बरे असते, कारण सर्व सोयी असतात कुठेही आपल्याला फारसा विचार करावा लागत नाही. मुख्य म्हणजे जेवणाचा कुठेही प्रॉब्लेम येत नाही. काही ठिकाणी दुपारच्या जेवणाला फार उशीर होतो अगदी ३ किंवा ४ देखील वाजतात, पण त्याचे कारण धार्मिक विधींना लागणारा वेळ.

पुणे ते चित्रकूट आणि बनारस ते पुणे हा प्रवासखर्च पॅकेज मधे नव्हता. तो धरून देखील साधारण माणशी १५ ते १७ ह. पर्यंत खर्च येतो. (पॅकेज माणशी १३ ह. चे होते)

तसे त्रिपिंडी, कालसर्प योग, पिंडदान वगैरे पूजा विधी करतात. गंगापुजन पण असते, पण ते कधी असते ते मात्र माहित नाही.

नमस्कार आर्या ! आज बरेच दिवसांनी बोलतोय आपण नै !!

आपला फुकट सल्ला : काशीपेक्षा हरिद्वारला जा !! अप्रतिम जागा !! खर्‍या अर्थाने हरिचे द्वार !! हीच गंगा पुढे जाऊन इतकी घाण होत असेल ह्यावर विश्वास बस् त नाही हरिद्वारला !!

धन्यवाद महेश आणि सर्वांना! Happy

काशीयात्रेसाठी काशीतलेच महाराष्ट्रीयन ब्राम्हण मिळालेत. त्यांच्याकडेच रहाण्याची, पुजेची व्यवस्था होईल. तसेच त्यांनीच अलाहाबाद येथील पित्रे गुरुजींबद्दल सांगितले. त्यामुळे तिथलाही प्रश्न सुटलाय.

धनश्री, काशीयात्रेत मुख्यतः श्राद्धकर्माव्यतिरिक्त गंगास्नान, गंगापुजा, पंचतीर्थयात्रा ( असि घाट, दशाश्वमेघ घाट, त्रिलोचन घाट,पंचगंगा घाट, मणिकर्णिका घाट), कालभैरव दर्शन, दंपति पुजा, मणिकर्णिका तीर्थश्राद्ध, प्रायश्चित्त संकल्प, गोदानम, इ. विधी होतात.

माझ्या आईच्या मते, पिंडदान, तर्पण, श्राद्ध इ. प्रयागला त्रिवेणी संगमावर करतात.
त्यात संकल्प, गणेशपुजा,प्रायश्चित्त संकल्प,वेणीदान, हिरण्य श्राद्ध, पिंडप्रदान, तर्पण हे विधी होतात.

Pages