हैद्राबाद आणि श्रीशैलम्

Submitted by इंद्रधनुष्य on 22 November, 2012 - 02:20

'हुसेन सागर' तलावाच्या भवताली वसलेले, आंध्र प्रदेशची राजधानी असलेले शहर 'हैद्राबाद'.

प्रचि १

प्रचि २

महम्मद कुली कुतूब शहाने १५९१ मधे शहराच्या मध्यभागी साधारण ५० मि. उंचीची 'चारमिनार' इमारत उभी केली.
प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

चार मिनारच्या दक्षिण टोकाला मक्का मस्जिद दिसते.
प्रचि ६

चारमिनार जवळच मोती, रंगीत बांगड्या, कपडे, चप्पल इ. खरेदीसाठी प्रसिद्ध असे ठिकाण म्हणजे 'लाड बाजार'.
प्रचि ७

Lumbini Park
प्रचि ८

प्रचि ९

Amphi Theater - Sound & Light Show
प्रचि १०

प्रचि ११

NTR Garden
प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६ सचिवालय

श्रीशैलम्

हैद्राबाद पासून सुमारे २१० कि.मी. वर पुर्वे कडे नल्लामलाईच्या डोंगर रांगात वसलेले श्री मल्लिकार्जुन यांचे प्राचिन तिर्थक्षेत्र आहे. समुद्र सपाटी पासून ४७६ मि. उंचीवरील या सदाहरित जंगलातील कृष्णा नदिचं पात्र हे श्रीशैलमचे प्रमुख आर्कषण. कृष्णा नदी पुढे नागार्जुन सागर जलाशयाला मिळते त्या आधीचा तिचा प्रवास केवळ नयनरम्य आहे. नदीच्या दोन्ही तिरावरील विविध जिवसृष्टी आपले मन मोहवून टाकते.

महाकाली मंदिरात तपस्या करत असलेल्या नंदी वर प्रसन्न होउन मल्लीकार्जुन आणि ब्रम्हरंभा रुपात शिव-पार्वती इथे प्रगट झाले. श्रीशैलमचा इतिहास आपल्याला सातवाहन काळा पर्यंत मागे घेऊन जातो. चौदाव्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैलमचा सुवर्णकाळ मानला जातो. राजा रेड्डीने पाताळगंगा (कृष्णा नदी) ते श्रीशैलम असा पायरी मार्ग बांधला. विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे निर्माण कार्य करण्यात आले. पुढे पंधराव्या शतकात कृष्णदेवराय यांनी पुर्वे कडे राजगोपुर आणि सलुमंतापस आदींचे निर्माण कार्य केले. १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विज मोहिमेच्या वेळी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुराचे बांधकाम केले.

१२ ज्योतिर्लींगां पैकी एक ठिकाण असल्याने इथे वर्षभरात महाशिवरात्री ब्रम्होत्सव, तेलुगु नववर्षाचा उगादी सण, दसरा, कुंभोत्सवम, संक्रांती, कार्तीकामोहोत्सव असे अनेक सण साजरे केले जातात.

श्रीशैलम् मंदिर समिती तर्फे बांधलेल्या धर्मशाळेत मुक्कामाची उत्तम सोय होते. स्वच्छतेच्या बाबतीत इतर तिर्थक्षेत्रां पेक्षा वरच्या स्थानावर आहे. मंदिर परिसरात कॅमेरा वापरावर पुर्णपणे बंदी आहे.

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९ श्रीशैलम धरण

प्रचि २०

प्रचि २१ कृष्णा नदी

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेल हैदराबादला जाणार असशील तर एक दिवस सुरेंद्रपुरीसाठी न एक रामोजी फिल्म सिती साठी नक्की ठेवा.
सुरेंद्रपुरी हे साधारण ६० किमी वर आहे न बहुतेकांना माहिती नाही. पण तेथे भारतातिल बहुतेक सर्व मंदिरांच्या डमी उभारल्या आहेत. एक मस्ट गो प्लेस. . आत कॅमेरा नेता येत नाही. पन गुगलल्यास काही फोटो पहायला मिळतील.
अन एक ५ दिवसात हैद्राबाद व श्रीशैल होणे कठीण आहे.

गणपतीच्या सुट्टीतला हैदराबादेचा प्लान फिसकटला. आता होळीच्या आसपास जात आहोत. २२ / २३ ला रात्री पोहोचु. २८ ला निघु.

जाऊन आल्यावर लिहेन इथे.

हा हा हा - नाही हो मुंबईचीच.

पण नवर्‍याने अगदी परेमाने विचारले, तू फिरायला येऊनही इतरांसोबत डिनर करणार का मला आणी लेकाला टाकून. शिवाय दीर जाऊ आनी त्यांची मुलगी सुद्धा असणार सोबत. म्हणून चहा स्नॅक्स वर आले.

Pages