परमेश्वर आणी धर्म

Submitted by human being on 21 November, 2012 - 10:58

खरंतर ईश्वर आहे अथवा नाही, याबाबत चर्चा करणे व्यर्थ आहे,,, पण सर्व धर्माच्या थोड्या थोड्या अभ्यासाअंती माझ्या ध्यानी काही गोष्टी आल्या...

जवळपास जगातल्या सर्वच धर्मांनुसार या जगात ईश्वर आहे. त्यांच्या शिकवणीनुसार पृथ्वीवर जो मनुष्य त्या धर्माने सांगीतलेल्या देवाची पुजा करतो त्याला तो मेल्यानंतर स्वर्गात जागा मिळवुन देतो, आणी जो धर्माचे पालन करत नाही तो नरकात जातो... जर खरच असे असेल हिंदु व्यक्ती पण स्वर्गात जातो, मुस्लीम व्यक्ती पण स्वर्गात जातो, आणी ख्रिस्ती व्यक्ती पण स्वर्गात जातोपण हे कसं शक्य आहे,,?? स्वर्गातही वेगवेगळ्या धर्माचा देव असतो काय? कि, यहोवा, ब्रह्मा आणी अल्लाह, ह्यांनी बनविलेले स्वर्ग वेगवेगळे आहेत..

प्रत्येक धर्म सांगतो,, कि ह्या जगाची निर्मीती देवाने केली आहे, आणी तोही आम्ही सांगीतलेल्याच... जरी खरच ह्या जगाची निर्मीती ईश्वराने केली असेल, पण मग,, ह्या सर्व धर्माच्या ईश्वराबद्दलच्या संकल्पना वेगवेगळ्या कश्या काय बुवा??

प्रेषीत मोझेस म्हणतात, कि ईश्वराचे नाव जिव्होवा आहे, प्रभु येशू म्हणतात ईश्वराचे नाव यहोवा आहे, सनातन धर्मवाले म्हणतात त्याचे नाव ब्रह्मा आहे, मुस्लीम बांधव म्हणतात त्याचे नाव अल्लाह आहे... अन पुरावा मागितला तर बायबल वाच, अशी प्रतिउत्तरे मिळतात... अरे बाप रे.... इतके सारे परमेश्वर,, मग या जगात पृथ्वी एकच कशी?? म्हणजे याचा अर्थ इथुन एक सोडुन बाकिचे लोक खोटे बोलले... किंवा सर्वच खोटे बोलत असतील, म्हणजे ह्या लोकांनी सांगीतलेले धर्म खोटे आहेत....
मग आपण ह्यांची गुलामगीरी का म्हणुन करायची? आमचा धर्म श्रेष्ठ आमचा धर्म श्रेष्ठ म्हणत दंगे का म्हणुन करायचे? केवळ आपण ज्या धर्मात जन्मलो म्हणुन तो धर्म श्रेष्ठ का? मनुष्य हा चिकित्सक असावा, असे का घडले हे जाणण्याची त्याला उत्सुकता असावी, आपण नव्या युगातील विज्ञानवादी पोर... पण धर्मग्रंथांत लिहीलेल्या चमत्कारांवर विश्वास ठेवतो, का? तर आम्हाला कोणीतरी ठेवायला सांगीतलं... खरच तुम्ही यावर विचार करुन बघा,,,

भगवान बुद्ध म्हणतात,,,,, कुणी सांगितले म्हणून, कुठे लिहिले आहे म्हणून, शास्त्रात लिहिले आहे म्हणून किंवा मी बोलतो म्हणून मान्य करू नका तुमच्या बुद्धीला जे पटते, तर्क आणि अनुभवाच्या कसोटीवर घासून पहा, जे पटते त्याचा स्वीकार करा अन्यथा सोडून द्या. काळबाह्य आहे ते सोडावे आणि जे काळसंगत, तर्कसंगत आहे त्याचा स्वीकार करावा.

The Buddha says,

<3Do not believe any of My words, Do not believe in any holy Religious Books "Believe nothing, no matter where you read it, or who said it, no matter if I hv said it, unless it agrees with ur own reason and ur own common sense<3

~The Buddha

असो बरं जाऊद्या.... शेवटी एव्हढेच म्हणतो,, देव आहे कि नाही यावर चर्चा करणे व्यर्थ आहे... माझ्यामते जरी देव असेलही..... तरी तो तुमच्याप्रमाणे हिंदु, मुस्लीम, ख्रिस्ती धर्माचा नसेल... (मी नास्तिक आहे) जर असेलच तर तो एकच असेल... कारण जर ब्रह्मा, अल्लाह, यहोवा वेगवेगळे असते तर... त्यांनी निर्मीलेल्या पृथ्व्या पण वेगवेगळ्या असत्या..

जर ईश्वर असेल तर तो निधर्मीच असला पाहिजेत........

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिस |
माझ्या योग्यतेची काळजी करायची तुम्हाला गरज नाही . तुम्ही आणि माहितीपूर्ण चर्चा ? what a joke .तुमचे ह्या आधीचे 'धार्मिक ' मधले प्रतिसाद मी वाचले नाहीत कि काय ?ह्या विषयावर तुम्हाला काय माहित आहे हे मला माहित नाही कि काय ?स्वताची योग्यता 'कशात काय अन फटक्यात पाय' अशी असताना दुसर्यांच्या योग्यतेवर बोलणं म्हणजे आपलच हसं करून घेणं आहे . Rofl

मुलांनो भांडू नका!
डॉ नरेंद्र दाभोलकरांचे पुण्यातील टिळ्क स्मारक मधील वसंत व्याखान मालेत २००७ मधे आम्हीच खरे धार्मिक या विषयावर व्याखान झाले होते.

मोहिनी,
तुमच्या लाडक्या स्मायलीने तुमची वर्जिनल आयडी सिद्ध केलीच शेवटी.
संस्कार उघडे पडले Wink

Proud

:G:-G:खोखो:

:G:-G:खोखो:

Pages