परमेश्वर आणी धर्म

Submitted by human being on 21 November, 2012 - 10:58

खरंतर ईश्वर आहे अथवा नाही, याबाबत चर्चा करणे व्यर्थ आहे,,, पण सर्व धर्माच्या थोड्या थोड्या अभ्यासाअंती माझ्या ध्यानी काही गोष्टी आल्या...

जवळपास जगातल्या सर्वच धर्मांनुसार या जगात ईश्वर आहे. त्यांच्या शिकवणीनुसार पृथ्वीवर जो मनुष्य त्या धर्माने सांगीतलेल्या देवाची पुजा करतो त्याला तो मेल्यानंतर स्वर्गात जागा मिळवुन देतो, आणी जो धर्माचे पालन करत नाही तो नरकात जातो... जर खरच असे असेल हिंदु व्यक्ती पण स्वर्गात जातो, मुस्लीम व्यक्ती पण स्वर्गात जातो, आणी ख्रिस्ती व्यक्ती पण स्वर्गात जातोपण हे कसं शक्य आहे,,?? स्वर्गातही वेगवेगळ्या धर्माचा देव असतो काय? कि, यहोवा, ब्रह्मा आणी अल्लाह, ह्यांनी बनविलेले स्वर्ग वेगवेगळे आहेत..

प्रत्येक धर्म सांगतो,, कि ह्या जगाची निर्मीती देवाने केली आहे, आणी तोही आम्ही सांगीतलेल्याच... जरी खरच ह्या जगाची निर्मीती ईश्वराने केली असेल, पण मग,, ह्या सर्व धर्माच्या ईश्वराबद्दलच्या संकल्पना वेगवेगळ्या कश्या काय बुवा??

प्रेषीत मोझेस म्हणतात, कि ईश्वराचे नाव जिव्होवा आहे, प्रभु येशू म्हणतात ईश्वराचे नाव यहोवा आहे, सनातन धर्मवाले म्हणतात त्याचे नाव ब्रह्मा आहे, मुस्लीम बांधव म्हणतात त्याचे नाव अल्लाह आहे... अन पुरावा मागितला तर बायबल वाच, अशी प्रतिउत्तरे मिळतात... अरे बाप रे.... इतके सारे परमेश्वर,, मग या जगात पृथ्वी एकच कशी?? म्हणजे याचा अर्थ इथुन एक सोडुन बाकिचे लोक खोटे बोलले... किंवा सर्वच खोटे बोलत असतील, म्हणजे ह्या लोकांनी सांगीतलेले धर्म खोटे आहेत....
मग आपण ह्यांची गुलामगीरी का म्हणुन करायची? आमचा धर्म श्रेष्ठ आमचा धर्म श्रेष्ठ म्हणत दंगे का म्हणुन करायचे? केवळ आपण ज्या धर्मात जन्मलो म्हणुन तो धर्म श्रेष्ठ का? मनुष्य हा चिकित्सक असावा, असे का घडले हे जाणण्याची त्याला उत्सुकता असावी, आपण नव्या युगातील विज्ञानवादी पोर... पण धर्मग्रंथांत लिहीलेल्या चमत्कारांवर विश्वास ठेवतो, का? तर आम्हाला कोणीतरी ठेवायला सांगीतलं... खरच तुम्ही यावर विचार करुन बघा,,,

भगवान बुद्ध म्हणतात,,,,, कुणी सांगितले म्हणून, कुठे लिहिले आहे म्हणून, शास्त्रात लिहिले आहे म्हणून किंवा मी बोलतो म्हणून मान्य करू नका तुमच्या बुद्धीला जे पटते, तर्क आणि अनुभवाच्या कसोटीवर घासून पहा, जे पटते त्याचा स्वीकार करा अन्यथा सोडून द्या. काळबाह्य आहे ते सोडावे आणि जे काळसंगत, तर्कसंगत आहे त्याचा स्वीकार करावा.

The Buddha says,

<3Do not believe any of My words, Do not believe in any holy Religious Books "Believe nothing, no matter where you read it, or who said it, no matter if I hv said it, unless it agrees with ur own reason and ur own common sense<3

~The Buddha

असो बरं जाऊद्या.... शेवटी एव्हढेच म्हणतो,, देव आहे कि नाही यावर चर्चा करणे व्यर्थ आहे... माझ्यामते जरी देव असेलही..... तरी तो तुमच्याप्रमाणे हिंदु, मुस्लीम, ख्रिस्ती धर्माचा नसेल... (मी नास्तिक आहे) जर असेलच तर तो एकच असेल... कारण जर ब्रह्मा, अल्लाह, यहोवा वेगवेगळे असते तर... त्यांनी निर्मीलेल्या पृथ्व्या पण वेगवेगळ्या असत्या..

जर ईश्वर असेल तर तो निधर्मीच असला पाहिजेत........

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं.
तुम्ही नास्तिक आहात म्हणे? इथे मायबोलीवर नास्तीक म्हंजे वेदप्रामाण्य न मानणारा असे म्हणतात. निरिश्वरवादी नव्हे.
नक्की काय आहात तुम्ही?

आणि हो. इथे लै अभ्यासू लोक्स आहेत. थोडा थोडा अभ्यास करून ल्याहायला अलाऊऊड नाही. )काही सन्माननीय अपवाद वगळता( Happy

उल्ट्या कंसात, इब्लिस)(

आणि हो. इथे लै अभ्यासू लोक्स आहेत. थोडा थोडा अभ्यास करून ल्याहायला अलाऊऊड नाही. )

Proud

आणि नुस्ता अभ्यास असून चालत नाही. नंदिनीबाईचे सर्टिफिकेट लागते - तुम्ही अभ्यासू आहात म्हणून.

indivisual consciousness ,collective consciousness आणि universal consciousness ही उत्तरोत्तर विकसित आणि विस्तारित होत जाणारी आत्म-जाणीवेची रूपे आहेत .

प्रत्येक व्यक्तीच्या karmic cycle मधील उत्क्रांतीक्रमा नुसार त्याला जीव-जगत आणि जगदीश्वर यांच्या अस्तित्वाचे /कार्याचे ज्ञान होत असते .

विविध साधू-संत-प्रेषित यांना त्यांच्या साधना आणि उत्क्रांती -चक्रातील प्रवासानुसार ईश्वराचे विविध स्वरूपात / विविध पातळीवर दर्शन झाले .त्यानुसार त्यांनी जो उपदेश केला ,तो त्यांच्या अनुयायांनी लिहून काढला , त्यालाच पुढे "धर्म-ग्रंथ" असे म्हणतात.उदा. बायबल,कुराण,गीता,गुरुचरित्र इत्यादी

यापैकी एकही कथित "धर्म-ग्रंथ " स्वत:प्रेषितांनी लिहिलेला नाही हे विशेष!!!!!!!!!!!!!

साईबाबा म्हणत त्यानुसार "अल्ला भला करेगा" ...याचा अर्थ ते त्यांच्यापेक्षा वरिष्ठ शक्तीकडे निर्देश करत. पण अंती तेच स्वत: परमात्म-स्वरूप झाले ,म्हणजे अल्लाह मध्येच मिसळून गेले .

शब्द बरेच जड आणि अवघड आहेत हे मान्य ...नंतर यथावकाश स्पष्टीकरण देईन...!

human being जी , आपण किती धर्म-ग्रंथांचा अभ्यास केला आहे? खरे ज्ञान स्व-अनुभव+ ज्ञान या दोघांच्या मिलाफाने प्राप्त होते.......................

असो .

ज्यांना काहीच समजले नसेल, त्यांची माफी मागतो....................!

human being,

>> पण मग,, ह्या सर्व धर्माच्या ईश्वराबद्दलच्या संकल्पना वेगवेगळ्या कश्या काय बुवा??

'एको सत् विप्रा: बहुधा वदन्ति' हे वचन आपण ऐकलं असेल. व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकजण आपापल्या प्रकृतीप्रमाणे ईश्वराची कल्पना उराशी बाळगून असतो.

आ.न.,
-गा.पै.

नंतर यथावकाश स्पष्टीकरण देईन...!
नका हो एव्हढे कष्ट घेऊ. हे असले लिहायला इतर काही मासिके आहेत, तिथे लिहा. इथे नुसती टिंगल, टवाळी करायला लोक येतात. ज्यांना या विषयात काही गम्य आहे, समजून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी इतर अनेक साधने आहेत, नि ती त्यांना माहित आहेत.

"indivisual consciousness ,collective consciousness आणि universal consciousness ही उत्तरोत्तर विकसित आणि विस्तारित होत जाणारी आत्म-जाणीवेची रूपे आहेत ."

***

कात्रे गुरूजी,
मायबोलीवर आटूक्माटूक स्पेलिंग चेक होतं हो.
katre.jpg
बघा बरं. तुमच्या पर्तिसादात कापी पेस्टलं तरी लाल रेघ दिस्तेय ना?

असो.

तुम्ही पुढे म्हणता : "ज्यांना काहीच समजले नसेल, त्यांची माफी मागतो....................!"
म्हणजे तुम्ही स्वतःचीच माफी माग्ताहात का?
तुम्ही काय लिहिले आहे ते तुम्हाला तरी समजले आहे का?

मुस्लीम बांधव म्हणतात त्याचे नाव अल्लाह आहे... अन पुरावा मागितला तर बायबल वाच, अशी प्रतिउत्तरे मिळतात >>>
मुस्लीम लोक बायबल ला मानू लागले? आनंद आहे.

बरोबर आहे नंदिनी! येशूला ते लोक ईसा म्हणतात. मोझेस = मुसा = मोशे अशी बरीच सामायिक पात्रे (characters) आहेत.
आ.न.,
-गा.पै.

जौद्याना लोकहो, रुमालबिमाल नै टाकत मी.
बुद्धंSS शरणंSS गच्छाSSSमीSS, धम्मंSS शरणंSS गच्छाSSSमीSS असे मी म्हणतो [झालं समाधान? ]
अन आता रजा घेतो Proud

[ S कसा टाकायचा? ~ अ या कीज ने येत नाहीये Sad ~अ ]

ओह इब्लिसराव, धन्यवाद ऽऽ,,,जमले बर्का. Happy थ्यान्क्स अ लॉट.
दोनाम्ब्या, तुलाही धन्यवाद Happy तथागत माझे नेहेमीच कल्याण करीत आलेले आहेत, पुढेही करीत रहातील,
बायदिवे, तथागत हा शब्द जैनधर्मियांबाबतही ऐकल्यासारखा का वाटतोय? गुगल केले तर मात्र भगवान बुद्धान्नाच तथागत असे संबोधताहेत असे दिसते.
नेमके काय ते सान्गा बर चट्टदिशी, बुद्ध अन जैन धर्मांमधे माझा गोन्धळ उडवू नका.

काय राव तुम्हीच उत्तर दिलयं शेवटी >>>>

कुणी सांगितले म्हणून, कुठे लिहिले आहे म्हणून, शास्त्रात लिहिले आहे म्हणून किंवा मी बोलतो म्हणून मान्य करू नका तुमच्या बुद्धीला जे पटते, तर्क आणि अनुभवाच्या कसोटीवर घासून पहा, जे पटते त्याचा स्वीकार करा अन्यथा सोडून द्या. काळबाह्य आहे ते सोडावे आणि जे काळसंगत, तर्कसंगत आहे त्याचा स्वीकार करावा.

आणि काय पायजे Happy

>>> आणि काय पायजे <<<
अगदी अगदी, अन इथे तरी विचारायला कशाला हवे वा कुणाला काही सान्गायलाही कशाला हवे?
कुणाचे काही लिहीलेले बोललेले वाचायला/ऐकायला तरी कशाला जावे?
त्यापेक्षा आत्मचिम्तनात मग्न व्हावे Happy नै का? Happy

निंबूडा, मुस्लिमांमधे येशू हा एक प्रेषित मानला जातो. >>>
अरे त्या विधानात येशू नाही अल्लाह बद्दल बोलतायत. म्हणून शंका उपस्थित केली. बायबल मध्ये अल्लाह कुठून आला?

>>>> तेच नाटक, तेच संवाद, तीच पात्र
>>>> नावं फक्त वेगळी <<<< Lol
अगदि अगदी.
याच धर्तीवर असे म्हणता येईल का?
तेच ते धर्म, तेच ते उपदेश, तीच ती मडकी,
काळ फक्त वेगळा......

इब्लिस व आम्बा ID नी केलेल्या कोणत्याही लिखाण /प्रतिसादाला उत्तर देणे मी आवश्यक समजत नाही. माझ्या कुवतिनुसार मी माझे मत माण्डले आहे...

ज्याना फक्त उपहास्/ टवाळक्या आणि छिद्रान्वेशन करायचे असेल , त्यानी माझ्या लिखाणावर प्रतिक्रिया देवु नयेत ...

मी तुम्हाला घाबरत नाही....हे लक्षात ठेवा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

प्रेषीत मोझेस म्हणतात, कि ईश्वराचे नाव जिव्होवा आहे, प्रभु येशू म्हणतात ईश्वराचे नाव यहोवा आहे, सनातन धर्मवाले म्हणतात त्याचे नाव ब्रह्मा आहे, मुस्लीम बांधव म्हणतात त्याचे नाव अल्लाह आहे...
>>
जिव्होवा , यहोवा, ब्रह्मा, अल्लाह हे सगळे भगवंताचे ड्यु-आय आहेत. Lol

जिव्होवा , यहोवा, ब्रह्मा, अल्लाह हे सगळे भगवंताचे ड्यु-आय आहेत.
<<
Lol
तुमच्या जिव्हो ला काही हाड? :हहपुवा:

अरे जातियवादी लिंब्या , तु आपला पाच, दहा रुपयाची स्तोत्राची पुस्तकं काखोटीला मारुन सव्वा रुपयाची भिक मागतच फिरायच्या लायकीचा आहेस ,माबोवर कोणी वेडप्रामाण्यवादी असल्यास तिथे भिक माग, समजलं का रे जातियवादी शेंड्या.

आंबा२ | 23 November, 2012 - 02:49

धन्यवाद, आपल्या पाठिंब्यामुळे निर्भय आहे. पण कित्येकांना हा विषय काहिच माहित नसल्यामुळे खाजवून खरुज नको म्हणून काळजी घ्यावी लागती एवढेच.
पुनश्च आभार....

धर्म आणि पंथ किंवा संप्रदाय या मध्ये गल्लत केली जाते. ज्याला "हिंदू" असं संबोधलं जातं तो बहुधा मानवीय इतिहासातला शिल्लक असलेला एकमेव धर्म आहे. इतर सर्व पंथ किंवा संप्रदाय आहेत. वेद किंवा नंतरच्या स्मृतींमध्ये धर्माविषयी अनेक मुबलक संदर्भ उपलब्ध आहेत. व्यासांनी केलेली एक व्याख्या इथे देतो.

धारणात धर्मं इत्याहू: धर्मो धारयते प्रजाः । यश्च धारण संयुक्तस धर्मं इति निश्चयः ॥ महाभारत शान्ति पर्व १०९ ११

धारण करण्यास जो योग्य आहे तो धर्म, अशी सोपी व्याख्या व्यासांनी केलेली आहे. निसर्गासकट निसर्गातल्या प्रत्येक स्थिरचराला धर्म आहे. स्मृतीकारांनी पुढे त्याचे विवेचन करताना मानव धर्माची दहा लक्षणे सांगितली आहेत. जी खालिलप्रमाणे आहेत.

१. धृती (धैर्य),
२. क्षमा,
३. दम,
४. अस्तेय,
५. शुचिता,
६. इंद्रियनिग्रह,
७. धी (ज्ञान),
८. विद्या,
९. सत्य
१०.अक्रोध

यात कुठेही परमेश्वराचा उल्लेखही नाही. याचाच अर्थ जो नास्तिक किंवा निरीश्वरवादी असतो तो धार्मिक असू शकतो आणि जो देव देव करतो तो अधार्मिक असू शकतो. आपणही नेहमीच्या वापरात "देवधर्म" असा शब्द वापरतो. ज्याला "हिंदू" किंवा "वैदिक" (हा शब्द आजकाल शिवीसारखा वापरला जातो हे दुर्दैव आहे) म्हणा त्यात अनेक पंथ येतात. जे बहुतकरून एका देवतेला समर्पित असतात, वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्य इ.इ.

आजच्या काळात हाच धर्म भारतात आपण "नागरिक" म्हणून स्विकारला तर आपापसातली ही पांथिक युध्दे मिटतील. टिंगल टवाळीसाठीही हा धर्म किती सोयीस्कर आहे ते आपण अनुभवतच आहात.

Pages