परमेश्वर आणी धर्म

Submitted by human being on 21 November, 2012 - 10:58

खरंतर ईश्वर आहे अथवा नाही, याबाबत चर्चा करणे व्यर्थ आहे,,, पण सर्व धर्माच्या थोड्या थोड्या अभ्यासाअंती माझ्या ध्यानी काही गोष्टी आल्या...

जवळपास जगातल्या सर्वच धर्मांनुसार या जगात ईश्वर आहे. त्यांच्या शिकवणीनुसार पृथ्वीवर जो मनुष्य त्या धर्माने सांगीतलेल्या देवाची पुजा करतो त्याला तो मेल्यानंतर स्वर्गात जागा मिळवुन देतो, आणी जो धर्माचे पालन करत नाही तो नरकात जातो... जर खरच असे असेल हिंदु व्यक्ती पण स्वर्गात जातो, मुस्लीम व्यक्ती पण स्वर्गात जातो, आणी ख्रिस्ती व्यक्ती पण स्वर्गात जातोपण हे कसं शक्य आहे,,?? स्वर्गातही वेगवेगळ्या धर्माचा देव असतो काय? कि, यहोवा, ब्रह्मा आणी अल्लाह, ह्यांनी बनविलेले स्वर्ग वेगवेगळे आहेत..

प्रत्येक धर्म सांगतो,, कि ह्या जगाची निर्मीती देवाने केली आहे, आणी तोही आम्ही सांगीतलेल्याच... जरी खरच ह्या जगाची निर्मीती ईश्वराने केली असेल, पण मग,, ह्या सर्व धर्माच्या ईश्वराबद्दलच्या संकल्पना वेगवेगळ्या कश्या काय बुवा??

प्रेषीत मोझेस म्हणतात, कि ईश्वराचे नाव जिव्होवा आहे, प्रभु येशू म्हणतात ईश्वराचे नाव यहोवा आहे, सनातन धर्मवाले म्हणतात त्याचे नाव ब्रह्मा आहे, मुस्लीम बांधव म्हणतात त्याचे नाव अल्लाह आहे... अन पुरावा मागितला तर बायबल वाच, अशी प्रतिउत्तरे मिळतात... अरे बाप रे.... इतके सारे परमेश्वर,, मग या जगात पृथ्वी एकच कशी?? म्हणजे याचा अर्थ इथुन एक सोडुन बाकिचे लोक खोटे बोलले... किंवा सर्वच खोटे बोलत असतील, म्हणजे ह्या लोकांनी सांगीतलेले धर्म खोटे आहेत....
मग आपण ह्यांची गुलामगीरी का म्हणुन करायची? आमचा धर्म श्रेष्ठ आमचा धर्म श्रेष्ठ म्हणत दंगे का म्हणुन करायचे? केवळ आपण ज्या धर्मात जन्मलो म्हणुन तो धर्म श्रेष्ठ का? मनुष्य हा चिकित्सक असावा, असे का घडले हे जाणण्याची त्याला उत्सुकता असावी, आपण नव्या युगातील विज्ञानवादी पोर... पण धर्मग्रंथांत लिहीलेल्या चमत्कारांवर विश्वास ठेवतो, का? तर आम्हाला कोणीतरी ठेवायला सांगीतलं... खरच तुम्ही यावर विचार करुन बघा,,,

भगवान बुद्ध म्हणतात,,,,, कुणी सांगितले म्हणून, कुठे लिहिले आहे म्हणून, शास्त्रात लिहिले आहे म्हणून किंवा मी बोलतो म्हणून मान्य करू नका तुमच्या बुद्धीला जे पटते, तर्क आणि अनुभवाच्या कसोटीवर घासून पहा, जे पटते त्याचा स्वीकार करा अन्यथा सोडून द्या. काळबाह्य आहे ते सोडावे आणि जे काळसंगत, तर्कसंगत आहे त्याचा स्वीकार करावा.

The Buddha says,

<3Do not believe any of My words, Do not believe in any holy Religious Books "Believe nothing, no matter where you read it, or who said it, no matter if I hv said it, unless it agrees with ur own reason and ur own common sense<3

~The Buddha

असो बरं जाऊद्या.... शेवटी एव्हढेच म्हणतो,, देव आहे कि नाही यावर चर्चा करणे व्यर्थ आहे... माझ्यामते जरी देव असेलही..... तरी तो तुमच्याप्रमाणे हिंदु, मुस्लीम, ख्रिस्ती धर्माचा नसेल... (मी नास्तिक आहे) जर असेलच तर तो एकच असेल... कारण जर ब्रह्मा, अल्लाह, यहोवा वेगवेगळे असते तर... त्यांनी निर्मीलेल्या पृथ्व्या पण वेगवेगळ्या असत्या..

जर ईश्वर असेल तर तो निधर्मीच असला पाहिजेत........

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धर्म आणि पंथ किंवा संप्रदाय या मध्ये गल्लत केली जाते. ज्याला "हिंदू" असं संबोधलं जातं तो बहुधा मानवीय इतिहासातला शिल्लक असलेला एकमेव धर्म आहे. इतर सर्व पंथ किंवा संप्रदाय आहेत.<<<

हो का?
म्हणजे हिंदू नक्की कोण?
तुमचा प्रतिसाद प्रिंटाऊट काढून त्या कागदाचा योग्य तो आकार करून जपून ठेवला आहे Happy धन्यवाद.

इब्लिस,

>> म्हणजे हिंदू नक्की कोण?

जो भारताच्या प्राचीन परंपरेशी नातं जोडू इच्छितो (किंवा जोडलेलं आहे) तो हिंदू.

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : योग्य आकाराचा कागद घेऊन तुम्ही नक्की काय करणार आहात? भारतात धुवायची पद्धत आहे, पुसायची नाही.

तो कागद तुमच्यासाठी ठेवलाय हो गापै. आलातच कधी पाहुणे म्हणुन तर गैरसोय नको तुमची Wink

>>जो भारताच्या प्राचीन परंपरेशी नातं जोडू इच्छितो (किंवा जोडलेलं आहे) तो हिंदू.<<

या प्राचीन परंपरा नक्की कोणत्या? अन नातं जोडायचं म्हणजे नक्की काय करायचं?
अन हिंदू ही जर 'लाईफस्टाईल' आहे, तर गापै, तुमचा धर्म कोन्ता?

इब्लिस,

१.
>> आलातच कधी पाहुणे म्हणुन तर गैरसोय नको तुमची

धुवायच्या ठिकाणी धुतलेली बरी. तरीपण आपल्या आस्थेबद्दल धन्यवाद! आपण दाखवलेल्या आपुलकीने आमचा ऊर (आणि केवळ ऊरच) भरून आला आहे.

२.
>> अन हिंदू ही जर 'लाईफस्टाईल' आहे, तर गापै, तुमचा धर्म कोन्ता?

वैदिक.

३.
>> या प्राचीन परंपरा नक्की कोणत्या? अन नातं जोडायचं म्हणजे नक्की काय करायचं?

या परंपरेला वैदिक परंपरा म्हणतात. याच्याशी नातं जोडायचं म्हणजे धर्मपालन करायचं. धर्म म्हणजे कर्तव्य आणि मर्यादा यांचा सुसंगत संगम.

आ.न.,
-गा.पै.

वैदिक लोकं यज्ञात बळी वगैरे देऊन मस्त नान्वेज खात अन सोमरस पीत असत आन यज्ञमंडपात काय्काय करत असत म्हणे? तसं असेल तर आपल्याला बी सामील करून घ्या राव तुमच्या वैदिक धर्मात.. लै झ्याक धर्म हाये तो

(आशाळभूत) इब्लिस

आज फेसबुक वर योगेश कामतेकर यांनी लिहलेली पोस्ट...
अभ्यासकांनी यावर अधिक माहिती सांगावी .

एक प्रश्न हमखास विचारतात, कि "तुमच्या त्या फडतूस हिंदू धर्मात म्हणे ३३ कोटी देव आहेत, त्यांची नावे तरी माहिती आहेत का तुम्हाला?" आणि आमचे भोळे-भाबडे हिंदू बंधू या प्रश्नासमोर गडबडून जातात.
मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट "उगीचच" या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे कि आपले ज्ञान कमी पडतेय.

३३ कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृतचा अभ्यासक म्हणून ठामपणे सांगतो. खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, "प्रकार". कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात "बैजिक पदांच्या कोटी" हि संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देव नेमके कोण? तर त्यांची नावे देतो.

धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)

धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)

हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)

आणि याखेरीज २ अश्विनीकुमार!

असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात.

https://www.facebook.com/yogesh.kamthekar/posts/408029745942820

महागुरू,

अमोल माहितीबद्दल धन्यवाद! फेसबुकावरील पानात खाली एकाने म्हंटलंय की २ अश्विनीकुमार नसून इंद्र आणि प्रजापति असे उरलेले दोघे आहेत. काय खरं धरायचं?

असो.

अवांतर : हा ३३ कोटि म्हणजे ३३ श्रेणी हा आकडा फ्रीमॅसन लोकांच्या ३३ डिग्रींशी जुळतो.

आ.न.,
-गा.पै.

ग.पै. , मला ह्या गोष्टीतले एक अक्षरही कळत नाही. पहिल्यांदाच असे काहीतरी वाचले म्हणुन जाणकार लोक अधिक खुलासा करतील ह्या आशेने इथे टाकले.

महागुरू, मीदेखील या क्षेत्रातला शास्त्री वा पंडित नाहीये! मलाही कुणालातरी विचारावं लागेल. शेवटी हे एक प्रकारचं अन्वेषण (investigation) आहे. माहिती मिळाली की इथे टाकेन. या प्रश्नास वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद! Happy
आ.न.,
-गा.पै.

महागुरू तुम्ही लिहिलेले बरोबर आहे. ३३ करोड देव नसून ३३ प्रकारच्या देवांच्या श्रेणी आहेत.

इंद्र हा देवाधिदेव म्हणून ३३ पैकीच एक असून २ अश्विनीकुमार योग्य आहेत असे वाचण्यात आले आहे.

अश्र्विनौ (द्विवचन) हे जुळे बंधू असून त्यांची जोडी कधीच फुटत नाही. (ऋ.3.39.3) ते विवस्वानाचे पुत्र असून सरण्यू त्यांची माता आहे. ते तरुण, वीर्यशाली, दानशूर, विद्वान, संपत्तिमान व शुंभाचे स्वामी आहेत. ऋग्वेदातील हे अश्र्विनौ पुराणात अश्र्विनीकुमार या नावाने प्रसिद्ध झाले. विवस्वानाची भार्या संज्ञा ही घोडी होऊन फिरत असता विवस्नानाने घोड्याच्या रूपाने तिच्याशी समागम केला. त्यावेळी तो परपुरुष असावा या कल्पनेतून तिने ते वीर्य आपल्या नाकपुडीतून बाहेर टाकले. त्यामधून अश्र्विनीकुमरांची उत्पत्ती झाली. थोरल्याचे नाव नासत्य व धाकट्याचे नाव दस्र आहे. नकुल-सहदेव हे माद्रीचे पुत्र त्यांच्याच अंशापासून जन्मास आले.

महागुरू,

१२ आदित्यांतील एक नाव शक्र आहे. हे इंद्राचं नाव आहे. त्यामुळे उरलेले दोन अश्विनीकुमार असावेत. चूभूदेघे.

आ.न.,
-गा.पै.

जवळपास जगातल्या सर्वच धर्मांनुसार या जगात ईश्वर आहे. त्यांच्या शिकवणीनुसार पृथ्वीवर जो मनुष्य त्या धर्माने सांगीतलेल्या देवाची पुजा करतो त्याला तो मेल्यानंतर स्वर्गात जागा मिळवुन देतो, आणी जो धर्माचे पालन करत नाही तो नरकात जातो.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>धर्मानुसार माणसाने सत्कर्म केले कि तो स्वर्गात जातो दुष्कर्म केले कि तो नरकात जातो.परंतु मेल्यावर शरीर तर जाळून टाकतात म्हणजे स्वर्गात आत्मा जातो का?. जर शरीर स्वर्गात जात असेल तर समजा एकाद्या व्यक्तीने आयुष्यात पुण्य केले व तो नवद्दव्या वर्षी मरण पावला तर स्वर्गात त्याचे नव्वद वर्षाचे खंगलेले शरीर जाईल का? एखादे अर्भक जन्मल्यानंतर दोन तासात मरण पावले तर ते स्वर्गात जाईल का नरकात? ह्याबाबत धर्मशास्त्रात काय माहिती दिलेली आहे का? कि फक्त जुन्या लोकांनी लिहून ठेवले म्हणून त्यावर अंधविश्वास ठेवायचा.

मंदार, गामा पैलवान, लिंबूटिंबू, गमभन, चित्रचकोर, महागुरु, हरिहर, सर्वांस नमस्कार . . . . आणी माझ्याकडुन +१ x ३३ कोटी . . . .

छान आहे तुम्हा सर्वांचा प्रयत्न आजच्या काळातही धर्माचे निरुपण चांगल्या प्रकारे करण्यासाठी.

बाकिच्या लोकांच्या कु-तर्क वादास टीका समजुन तुम्ही क्षमा करावी अशी प्रार्थना . . . . पण मग सगळे एव्हढे गप्प का बसले आहात ?

अहो, धर्माचे निरुपण, ज्यांना त्याची कल्पनाच नाही त्यांसाठीच करणे जास्त आवश्यक आहे, ज्यांना वेळ काढण्यासाठी अश्या पानांवर येवुन उगीचच वाटेल ते बोलुन आणी कु-तर्क करुन जायचे असते असे खूप लोकं आहेत ईथे आणी बाहेर जगातही.

आता मला जे वाटते ते मी ईथे तुम्हा सर्वांबरोबर वाटुन घेतो . . . .

धर्म,
सत्य, विद्या, संयम, क्षमा, दम ( स्वतः वर नियंत्रण ), अस्तेय ( प्रामाणिकपणा ), शुद्धता ( अंतर्बाह्य ), इंद्रीय निग्रह, अहिंसा ( क्रोध आवरणे, चरचरातील सर्व प्राणीमात्रांशी अहिंसात्मक दृष्टीकोन ठेवणे ), धैर्य ह्या दहा प्रकारे जो आपले आचरण ठेवतो तो धार्मिक, आणी ही दहा अंगे म्हणजे धर्म.

जर आपण वेगवेगळ्या धर्मांमध्ये दिलेले उपदेश पाहिले तर आपणांस असे कळेल कि हे दहा प्रकार व त्यांचे दिलेले उपदेश ह्यांत जास्त भिन्नता नाही. ,
म्हणजेच, ज्या-त्या प्रदेशांतील लोकांना ज्या मार्गाने ते उमजु शकतील व त्यांना ते समजणे कठीण जाणार नाही, त्या दृष्टीने त्यांस हे सांगितले गेले असावे. आणी मग त्याच्या मार्गाला नांवे पडली . . . . हिंदू, इस्लाम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, आणी पुढे , हीच नांवे त्या-त्या पंथातील धर्म-मार्ग म्हणुन प्रचलित झाली. . . . आता वर कुणितरि जे लिहेले आहे कि हिंदु हा एकच आदी काळात वाचलेला धर्म असावा, बाकि सगळे पंथ. . . . ह्या विचारास माझे अनुमोदन, कारण तुम्ही हिंदू धर्म म्हणा व बाकिचे पंथ अथवा बाकिचे धर्म म्हणा व हिंदू हा पंथ , ह्याने काही फरक पडत नाही . . . . हो, हे खरे आहे कि हा धर्म-पंथ सर्वांत प्राचीन आहे, आत्तापर्यंतच्या अवगत ज्ञाना नुसार.

इश्वर,
हा आहे, अवश्य आहे, त्याली प्राचीन काळापासुन कोणी अगदी दगड म्हंटले असते तर तेच नांव प्रचलित झाले असते ना ? म्हणजे आज आपण ह्या human being साहेबां च्या वतिने असे विचारले असते " दगड आहे कि नाही ?" खरेतर त्या अनंत आणी सर्वशक्तिमान शक्तिला हेच सुचवायचे असावे !
कि, मला दिले गेलेली नांवे ह्यांत एक गहन अर्थ आहे . . . . म्हणजेच दगड म्हणायच्या ऐवजी आपण त्याला इश्वर असे संबोधितो.
एका यजुर्वेद संहितेत ज्यास आपण ईशवास्य उपनिषद् ( स्वामी विश्वरुपानंद ह्यांनी मा.बो. वर एका वेगळ्या पानावर ह्या बद्दल लिहिले आहे ), असे विदीत आहे कि " ईश वास्यम इदं सर्वम ", म्हणजेच ह्या चरचरात जे काही आहे त्यांत हा इश्वर पूर्ण भरुन राहिला आहे आणी हे सर्व त्यात ( इश्वरात ) भरुन राहिले आहे.
हा इश्वर संपूर्ण चरचरात एकच आहे, ज्याची ही वेग-वेगळी नांवे पुढे आली त्या-त्या प्रदेशांतील भाषांनुसार.

सूर्य, Sun, आफताब ( सूरज ) . . . . हे सगळे वेग-वेगळे नांव एकाच गोष्टीचे नाहि का ? पुढे चंद्र, माहताब (चांद ), Moon . . . . काय कळतं ? हे तिन्ही एकाच ग्रहाची नांवे ना ? अहो पहा ना . . . . ह्या जगात एकाच गोष्टींची अशी कित्येक नांवे आहेत . . . . मग त्या सगळ्या वेगळ्या आहेत का ? अरे ह्या सर्व कु-तर्कात ईथे येवुन उगीचच वेळ दवडण्यापेक्षा ह्या लोकांनी जर नीट डोळे उघडुन पाहिले तर सर्वत्र इश्वरच भरुन राहिलेला दिसेल, म्ग त्यास देव, अल्लाह, God, बुद्ध, महावीर, काहिही म्हणा. . . . कशी गोष्ट आहे ? तो सर्व ( एकाच दिशेने ) जाण्यार्‍या पंथांत वेग-वेगळ्या नांवाने स्थित आहे, विवीधता धारण करुनही सर्वत्र तोच आहे.

आणी शेवटी हे म्हणेन कि, सृष्टीची निर्मीति हि एकच वेळेस एकाच नियमाने झाली आहे, ती म्हणजे निर्गुणा ( ज्याला आपण परब्रह्म आणी इस्लाम मध्ये अल्लाह म्हणतात ), पासुन हे सर्व चराचर निर्मिले गेले आहे ( ह्याचे निरुपण मी मा. बो. वर एका दुसर्‍या पानावर केले आहे,(हे दशग्रंथी ब्राह्मण कोणास म्हणावे - हे श्री. विश्वरुपानंद ह्यांचे पान आहे ).
पण आता जो दिसत नाही, ज्याला रुप,रंग, आकार, वास, चव, स्पर्श, वजन, काहिच नाही, त्या परब्रह्माला कसे काय उमजावे वा त्याची उपासना करावी ? ह्या कारणास्तव त्याने आपली पुढची काही रुपे दृष्टीगोचर केली, जसे विष्णु, शंकर, ब्रह्मा. . . . कि लोकहो ! हा असा मी, ह्याची उपासना करुन तुन्ही माझ्या परब्रह्म रुपांत विलीन होउ शकता अथवा माझ्या ह्या रुपांत विलीन होऊ शकता.
परंतु जर इस्लाम धर्मात ह्या निर्गुण, निराकार रुपा शिवाय आणखीन कुठले ही रुप जर नाही सांगितले तर त्यांत काहिच वेगळे नाहि, म्हणुन इस्लाम धर्माच्या प्रमाणे त्या-त्या उपासना घरात ( मस्जिद ) कोणतिही मूर्ति नसते, ते खरोखरं सरळ त्या निराकार शक्तिला ( अल्लाह ) आळवतात.

ह्या मुळेच असावे कि जेव्हां-जेव्हां भारतात त्यांनी आक्रमण केले तेव्हां-तेव्हां मूर्ती भंगल्या, कि तो असा नाही आहे, तो निराकार आहे !
आणी ही गोष्ट अगदी खरी कि, तो निराकार आहे, पण पुढे ते सांगण्यासाठी जे मार्ग धरले ते बरोबर नव्हते.

प्रीय human being आणी बाबुजी ! ! ! ! आपल्याला जर काही असे ह्या विषयावर काही विचारायचे असेल तर कृपया संयमाने उत्तरे मिळतील अश्या रितीने विचारल्यास सांगणारे सुद्धा उत्साहाने भाग घेऊ शकतील.

बाकि बाबुजी ! ! ! ! तुमच्या वक्तव्याचा मला ईथे काहिही परिणाम दिसला नाही . . . . तरिही तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे, कि, " जावे त्याच्या वंशा, तेव्हां कळे ", पाप आणी पुण्य हे आजच्या काळातील, बँक बॅलन्स आहे, हे तुमचे देवाघरचे तुमच्या पृथीवरील केलेल्या कार्यांचे डेबिट - क्रेडिट आहे. पण आपली जी कर्मे आहेत ती व्याजाप्रमाणे असतात, हे व्याज फेडल्याशिवाय स्वर्ग-नर्क हे मिळणे कठीण असते.

हा सर्व हिशोब एव्हढा सोपा नाही कि पुण्य=स्वर्ग आणी पाप=नर्क !

आपली कर्मे तीन प्रकार ची असतात ( तुम्हाला उमजतील अश्या शब्दांत सांगायचा प्रयत्न करतो ) . . . . पुण्यकर्म, पापकर्म, निर्गुण कर्म.

( कारण खरे तर कर्मे ३ प्रकारची अशी असतात . . . .सत्व, रज, तम गुणांवर आधारलेली ).

पुढे काय ते समजण्या इतपत तुम्ही सूज्ञ आहातच .

सर्वांस नमस्कार . . . .

A man saw the Buddha resting under a tree in meditation. The man was impressed with the Buddha's way.

He asked, "Are you a god?"

"No, I'm not a god."

"Are you an angel?"

"No", replied the Buddha.

"You must be a spirit then?"

"No, I'm not a spirit," said the Buddha.

"Then what are you?"

"I'm awake."

Maanus ,

Absolutely right you are . . . . & when one is awake, he has already crossed all the limitations & due-identifications of this materialistic world & reached the stage of being one & the only, be it through any path or pantha.

परब्रह्म, तुमच्या नावाप्रमाणेच तुमचे विचार आहेत. उत्तम balanced पोस्ट!

माणुस,

आप - आपल्या दृष्टीकोनातुन जे काय उमजतं तेव्हढं आपणा सगळ्यांबरोबर वाटुन घेत असतो. आपल्या सारख्यांच्या प्रतिसादात्मक उत्साहाने धैर्य कायम राहाण्यास आधार असतो, आभारी आहे . . . .

zoting,

नाही म्हंटलं तरी मला हसु आवरले नाही ! ! . . . . तुमच्या ह्या इब्लीस रावांना, प्रात्यक्षिक खर्‍या कडक उत्तराने. छानच, बरोबर बोललात.
आजच्या जगात, चांगले आणी खरे काय, हे समजुन घेण्याऐवजी बाकि काही कामे नसल्यामुळे कैक वेळेस भरल्या पोटाने केलेल्या अश्या विडंबनांनाही उत्तरे द्यावीच लागतात.
असो . . . . आपल्या परखडपणा बद्दल आभार !

इब्लिस,

तुमचा चेष्टा करण्याचा उद्देश नसला तरी मलासुद्धा तेच वाटले . . . . अजाणतेपणाने का होईना, चुकुन चिख्खल फेकतांना आपले हात नेहेमी आधी घाण होतात हो !

बाकि वेगवेगळ्या यज्ञकर्मांमध्ये तीन आदी गुणांचा समावेश नेहेमी होतो . . . . सत्व, रज, तम. यज्ञ म्हणजे कर्म, आणी कुठलेही कर्म आले कि त्यांत कुठल्य ना कुठल्या गुणांचा भाग असतोच असतो.

प्रत्येक यज्ञात अग्नी दृष्टीगोचर असावाच, असे नव्हते.

बळी देण्याच्या मार्गांमध्ये ही नियम होते. कोणत्याही देवाला ( भगवान विष्णु, शंकर, ब्रम्हा ह्या तीनही आदी देवतांना बळी देऊन प्रसन्न करण्याची पद्धत नव्हती ).
एकुण ३७९ ( ह्यांपैकि एक वा अनेक, सगळे नाही ), यज्ञ हे वर्षातुन एकदा अथवा आवश्यक तेव्हांच करावयाचे होते.
बाकिचे २१ यज्ञ हे नित्यकर्म म्हणुन केले जात असत. ह्या यज्ञांमध्ये खालील पांच यज्ञ तर खरोखरीच नित्य नियमाने केले जात असत. काही यज्ञ ज्यांमध्ये दृष्टीगोचर अग्नीची आवश्यकता कशी नसे ते बघु.

देवयज्ञ - ह्यात अग्नीत समीधांचे हवन ( अर्पण ) करुन देवांना समर्पित करायचे.
ऋषीयज्ञ - शास्त्रांचे अध्ययन करुन ऋषींना प्रसन्न करुन त्यांचे आशिर्वाद घेणे. ( अग्नी नाही ).
पितृयज्ञ - त्यांच्या शांतीसाठी आणी त्यांना समिधार्पण करण्यासाठी. ( अग्नी नाही ).
मनुष्ययज्ञ - आपल्या परीसरांतील असहाय्य, दीन्-दुबळ्यांना, वा, ज्यांना अन्न प्राप्ति कठीण असेल अश्या लोकांना अन्न समर्पण. ( अग्नी नाही ).
भूतयज्ञ - मुक प्राणी, जसे जनावरं , पक्षी इ. ह्यांना अन्न समर्पण. ( अग्नी नाही ).

अग्नी हा पंचमहाभूतांपैकि तिसरा महाभूत त्यांत अर्पण केलेल्या पदार्थांना त्या-त्या देवाकडे पोहोचवतो असे समजुन त्यात हवन सामग्री अर्पित असत.
खरेतर अग्नीस फार्-फार पूर्वी हा श्राप मिळाला होता कि तु सर्वभक्षी होशील, मग आता त्यात हे सगळे हवन करुन त्या-त्या देवांना पोहोचते करण्याचे काम ह्यांच्याकडे लागले, कारण अग्नीस्पर्श हा पवित्र करतो आणी त्यात एकदा अर्पण केलेली समिधा दुसर्‍याच कोणाच्या प्रतिस्पर्शाने अपवित्रही होणार नाही ही खात्री असते.
देवांना अन्न, वस्त्र, फळे, फूले, गंध्-अक्षता, जल, पंचांमृत, ह्यांशिवाय वाहने अथवा भेट म्हणुनही काही प्राणी अर्पण केले जात असत.
ह्या प्राण्यांना मरणोत्तर उत्तम गती प्रदान करण्याची त्या-त्या देवांची कर्तव्ये असत.
प्राण्यांचा बळी ही प्रथा तद् नंतर द्वापर आणी कलियुगातच आली होती.

काही-काही यज्ञांमध्ये फक्त मांस अर्पण करावयाचे, हे सर्व त्यास फक्त स्पर्श करुन अर्पित असत, ते नंतर शिजवुन खात असत हा असा प्रकार अजिबात नाही.

आधीच्या सत्ययुगात ( म्हणजेच कृतयुगात )आणी त्रेता युगात ही प्रथा प्रचलीत नव्हती, त्याला कारण ह्या दोन्ही युगांमध्ये तशी आवश्यकता नसे.
हे प्रथा पुढे धर्म्-संकर प्रखरपणे जाणवता सुरु झाली.

खरे तर कोणत्याही देवाला पशु-हत्या ( यज्ञात बळी ) ही मान्य नाही.

अगदी अलिकडे आत्ताच्या काळात कालिका देविने हे प्रत्यक्षात सांगितले होते श्री रामकृष्ण परमहंसाना, कि मला जीव-हत्या आवडत नाही, तेव्हा तु, ही प्रथा थांबवावीस.

माझ्या मते बळी देण्याचा खरा अर्थ असा असावा कि, प्रत्येक यज्ञात आपल्याला आवडणारी वस्तु, पदार्थ, गोष्ट, जे काही असेल ते, यज्ञात अर्पण करुन द्यायचे आणी म्हणायचे " हे देवा ! मला आवडीची ही गोष्ट आजपासुन मी त्यागतो आहे, कारण जितक्या आवडीच्या गोष्टी, तितके आपले मन त्याच्यातच गुंतुन राहाते. म्हणजे तेव्हढी आसक्ति नेहेमी राहातेच.
उदाहरण : मला जर माझा घोडा खूपच प्रीय आहे, तर मी त्याचा त्याग करीन असे नाही, वा त्यास यज्ञाच्या अग्नीत झोकिन असे ही नाही, बहुदा त्याचे मूर्तिमंत प्रतिरुप यज्ञात अर्पण करुन हा माझा सर्वांत आवडता अश्व, हे देवा, मी तुम्हाला अर्पण करतो असे म्हणुन ते प्रतिरुप यज्ञात सोडायचे, त्याच बरोबर त्याची आसक्तिही सोडायची, हा झाला खरा बळी.

असे हळु-हळु आसक्तिविरहीत होऊन जायचे म्हणजे अंत समयी बहुतेक कुठल्याच बाबतीत आपले मन आसक्त न राहुन पुढील गति व्यवस्थितपणे प्राप्त होण्यास अनुकुलता प्राप्त होते.
आणी आसक्त झालेल्या गोष्टी देवाच्याच नांवाने सोडल्या, कि थोडी तरी लाज-भीड माणसात राहाते, कि देवाला अर्पण केली, आता पुन्हा त्यात आसक्त होऊ नये !

मला वाटते एव्हढे स्पष्टीकरण पुरे असावे इब्लिस साहेब ?

नमस्कार . . . .

आजकाल प्राचीन भारतीय संस्कृती आणि उज्ज्वल इतिहास यांची टेर खेचणे / अपमान करणे / निंदा करणे याची फॅशन कम लाट आली आहे,

वैदिक- इ.स.पूर्व 8000 ते इ.स. पूर्व 2000

पौराणिक - इ.स. पूर्व 2000 ते इ.स. 100

आणि ऐतिहासिक - इ.स. 100 ते इ.स. 2000 असे तीन कालखंड आहेत

शनि सुर्यपुत्र आणि राहू केतू , कलीचा प्रभाव वगैरे विषय हे पौराणिक काळातील आहेत म्हणजे पुराणात तसे उल्लेख आहेत . वेद किंवा उपनिषदात नाही,हे लक्षात घ्या

पुराणे ही अनेक कपोलकल्पित व प्रक्षिप्त गोष्टींनी भरलेली आहेत ,पण म्हणून तुम्ही सगळ्या आध्यात्मिक वेदिक ज्ञांनाला एकाच साच्यात बसवून टीका करू नका.

आधी अभ्यास करा ,मग बोला !

जर तुम्ही नास्तिक आहे तर देवाबद्दल चर्चा का करताय,
( देव नाही हे म्हणायला देवाचा उच्चार करावा लागतो यातच देचाच अस्तित्व मानाव लागेल)

अहो किरण साहेब, नमस्कार . . . .

कसचे आस्तिक आणी असचे नास्तिक !

आस्तिक . . . हा फक्त आपल्या सर्व अध्यात्मिक पुराव्यांना मान्यता देऊन देवाला देव म्हणणारा एक प्राणी. पुढे आपली जिज्ञासा म्हणुन ह्याचा अभ्यासही करतो.
शेवटी जर शेवट पर्यंत स्थित राहीला तर मुक्त होऊन जातो.

नास्तिक . . . . हा फक्त कुठल्याही पुराव्यांना मानत नाही आणी म्हणुनच देवालाही देव मानत नाही, ह्या पेक्षा एक कोणतीतरी शक्ति आहे खरी जी हे सर्व चालवत असावी असे मानतो. कधी-कधी तर हे सुद्धा मानत नाही.
शेवट पर्यंत आपल्याच हट्टावर स्थित राहातो, आणी जातांना शेवटी आस्तिकतेला आपल्या नास्तिकतेच्या जाचातुन मुक्त करुन जातो.

आस्तिकाची भावना एव्हढीच, कि देवाला दोघेही एक सारखेच प्रीय असतात, कारण देवाच्या दृष्टीत कोणीही मोठा वा लहान नसतो, असतो फक्त एकच . . . . समभाव.

Parbhrama sunder vichar aahet aavdle. Pan mi aas manto ki manus melya verch tyala mahiti padat ki sarvancha ishwar ekch aahe pan melela manus jivant mansala nahi sangu shakat jar meleleya mansane sangitale aaste ter sarv jagat ekch dev v ekch dharn aasta jagatli hich sarvat moti dukhha chi gosht aahe....

परमेश्वर आणी धर्म >>>
काही संबंध नाही ह्या २ गोष्टींचा . धर्म हा फक्त 1 प्रोटोकॉल आहे . मूर्ख लोक परमेश्वराला ह्या प्रोटोकॉल मध्ये बांधण्यासाठी तडफडतात . पण तो संग्ल्या बंधनांच्या पल्याड आहे

ह्या प्राण्यांना मरणोत्तर उत्तम गती प्रदान करण्याची त्या-त्या देवांची कर्तव्ये असत.

............
अग्गोबै ! मग यज्ञ करणारा स्वताच त्यात उडी का मारत नाही ? उत्तम गती मिळेल के

ईश्वराची संकल्पना म्हणजे अडाणी आदिमानवाला पडलेले भयंकर वायफ़ट, खर्चाळू व घातक स्वप्न!
जितकी अज्ञानाची खिंडारे गोल, तितकी देव-दैवताची ठिगळे चौरस !
जसे लोक तसे त्यांचे देव.
वेद असो वा कुराण, त्या त्या काळच्या लेखकांच्या अज्ञानाचा आरसा असतत.
गेल्या वर्षीचे फोनबुक सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त अचूक व उपयुक्त असते!
पण
प्रत्येक सजीव जन्मजात नास्तिकच असतो!
अगदी व्हायरस पासून सस्तन व्हेलमाशा पर्यंत!
भटुकड्य़ा-पादरी-मुल्लांनी फशी पाडलेल्या आयबापांनी
अंधश्रद्धेचं जोखड नकळत्या वय़ातच गळ्यात-लंगोटीत अडकवलेलं असतं.
आपण मनाचं कवाड सताड उघडून 'स्वभावे, स्वस्थानी, 'स्वगृही' परत' येणं
हे थोड्यांनाच साधतं.
तसं जमलं तर अभिनन्दन!
=
Now enjoy your 'GEMS LIFE' without having to carry any burden of blind-faith!
GEMS Life = God-free Eco-friendly Moral-ethical & Self-reliant Life, interesting, fun & exciting!

वैदिक लोकं यज्ञात बळी वगैरे देऊन मस्त नान्वेज खात अन सोमरस पीत असत आन यज्ञमंडपात काय्काय करत >>>
चांगल्या आणि वाईट अश्या दोन्ही प्रकारच्या शक्ती अस्तित्वात आहेत . यज्ञ कोणत्या शक्तीला प्रसन्न करण्यासाठी केला जात आहे त्यावरून त्यात बळी देण्याच्या गोष्टी आणि त्याचे नियम ठरलेले आहेत . दुष्ट शक्तींना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करायचा असेल तर अर्थातच त्यात बळी देणं आलं.
वामाचार तंत्रामध्ये नाही का ५ मकारांचा उपयोग केला जातो . तेव्हा अर्धवट माहितीच्या आधारे वैदिक संकृती ला बदनाम करण सोडून द्या .
वाटसरडा सगळीकडे एकच प्रतिसाद देतो . Wink

मोहिनी,
तुमच्यासारख्यांशी 'माहितीपूर्ण' चर्चा करावी अशी तुमची योग्यता नाही.
आधी वैदिक म्हणजे काय त्याचा अभ्यास वाढवा, अन मग पुढे लिहा.

Pages