मासे ४०) कान्टा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 November, 2012 - 13:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कान्टांचे २ वाटे
लसूण पाकळ्या १५-२०
२ चमचे मसाला
अर्धा चमचा हळद
लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ
मुठभर चिरलेली कोथिंबीर
२ मिरच्या
चवीनुसार मिठ
२ पळ्या तेल

क्रमवार पाककृती: 

कान्टांची खवले, शेपुट व पोटातील घाण काढुन टाकावी व कान्टा तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
भांडे तापवून त्यात तेल घालावे. तेल चांगले तापले की त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी द्यायची. त्यावर लगेच हळद, मसाला व चिंचेचा कोळ घालायचा. मग त्यात साफ केलेल्या कांन्टा व मिठ घालायचे. शिजू लागले की एकदा हलक्या हाताने ढवळायचे. जोरात ढवळल्याने त्या तुटतात. ५-७ मिनिटे शिजले की त्यावर मोडलेल्या २ मिरच्या व चिरलेली कोथिंबीर कालून १ मिनिट ठेवून गॅस बंद करायचा. चविला अप्रतिम लागतात.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

कान्टां हे समुद्रातील मासे. आकाराने साधारण बोटाएवढेच असतात. ह्यांचा सिझन असतो. ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये भरपूर प्रमाणात हे मासे मिळतात. हे मासे काही प्रमाणात काटेरीच असतात पण खुप चविष्ट असतात.

ह्यांचे वरील प्रमाणे सुकेच जास्त चांगल्या लागतात.

मसाल्या ऐवजी १ चमचा तिखट वापरू शकता.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कान्टा हा माझा सर्वात आवडता तर बांगडा हा सर्वात नावडता मासा आहे. दोन्ही सारखे लागतात असे वाचून वाईट वाटले

सोनू वाईट वाटुन घेऊ नकोस. बांगड्याची चव, खास करुन तळलेल्या बांगड्याची चव युनिक आहे. इतर कुठल्याही माशाला ती नाहीय. पेडवे तळले जाणार नाहीत त्यामुळे ती चव कधीच येणार नाही.

गौरीने नुकतीच सुरवात केलीय, तिला अजुन चव डेवलप करायला वेळ लागेल. Happy

सोनु मलाही तुझ्यासारखेच वाटले. :स्मितः

कान्टाला काळा भाग बांगड्यासारखा असतो पण चवित खुप फरक असतो. कांटा चविष्ट असतात.

गौरी आता परत एकदा घेउन कर आणि कांटा म्हणून आनंद घेउन खा. Lol

गौरी,साधना, 
माझी आवड सांगितली, वाईट नका वाटून घेऊ. घरी रोज रात्रीच्या जेवणात मासे किंवा जलचरवर्गिय खायची सवय झाल्याने चवीतला फरक प्रकर्षाने जाणवतो. गौरी, एंजाॅय मत्स्यया़त्रा.. तुम्हाला मिळतात तिथे.. मी सध्या फोटोवरूनच चव तोंडात घोळवतेय... 
जागू, लव यू... सगळ्या रेसेप्या वाचतेय... लाळ पुसून येइन हाताची पप्पी घ्यायला .. 

>>बांगड्याची चव, खास करुन तळलेल्या बांगड्याची चव युनिक आहे. इतर कुठल्याही माशाला ती नाहीय. <<
++१

मुंबईत मिळणार्‍या, मस्तपैकी कोकम वगैरे लावुन (मालवणी पद्धतीने) मेरिनेट केल्यावर तळलेल्या बांगड्याची चव अगदि विरळा! अघुन-मधुन आम्ही ती इकडे मिळणार्‍या स्पॅनीश मॅकरल मध्ये शोधायचा अयशस्वी प्रयत्न करत असतो; सगळे सोपस्कार करुन देखील "मुंबईची" चव सापडत नाहि. कदाचीत पाण्याचा गुण असावा... Happy

तसं नाहि भाऊसाहेब; आमचं घर (home) आणि घरवाली (heart) दोन्ही इकडेच आहेत. पण मालवणी चोखंदळपणा आमच्या डिएनएतच असल्याने अशी तुलना केल्याशिवाय राहावत नाहि. तसंच इथे मिळणारे अ‍ॅट्लांटिक्/अलास्कन सॅमन, हॅलिबट, माहि-माहि, सीबॅस यांची चव मुंबईत मिळणार नाहि याची कल्पना आहे. Happy

Pages