फाटती विरल्या विजारी फार हल्ली..

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

सांडती नोटा नि नाणी याच गल्ली
फाटती विरल्या विजारी फार हल्ली

पुसल्या न शंका मम मनाला डंखणार्‍या,
मंडळी देतात सल्ले फार हल्ली

गावता ब्लिंपास उंची विरहण्याची,
खेचती खाली दिवाणे फार हल्ली

लेखिता कवतीक आपुले चिमुटभरिचे
सांगती, 'माझेही अस्से' फार हल्ली

जमताच माझा कंपू मजला चेव येतो
कोपचे उजळून येती फार हल्ली

का कुणी ओळींस वाची या फुकाच्या
गावतो का वेळ हापिसी फार हल्ली?

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

Rofl

विकुअण्णा!
आमच्या ह्या काहीच्याकाहीमधे तुम्हाला गझलीयत, ती देखिल 'तशी बरी' दिसली याबद्दल सर्वप्रथम आम्ही आपले आभार मानावे असे वाटून गेले. परंतू आमची ही रचना (बर्व्यांशी हिचा काही संबंध नाही) नोगझल आहे हे आम्ही इथे नम्रपणे नमूद करू इच्छितो. मुळात गझलच नाही म्हंटल्यावर काफिये नाहीत की रदीफ नाही. (प्रेग्नंन्सी नाही म्हंटल्यावर मुलगाही झाला नाही किंवा मुलगीही झाली नाही, इतके हे सरळ आहे.)

तुमच्या तल्लख बुध्दीला तेर्श्याच्या मुशायर्‍यातील जुने शेर अजूनही आठवतात? आम्हाला आम्ही घेतलेली पावशेर! तिचे पैसे आपण भरले होते हे आपण असे जाहीररित्या सांगितले नसते तर आपल्याबद्दलचा आदर किंचितही कमी झाला नसता.

आपण आम्हाला बरीच मेहेनत घ्यावयास सांगता आहा. यावरूनच आपल्याला टिकेच्या प्रांगणात काही काळ अधिक बागडणे आवश्यक आहे हे लक्षात येते. आपण म्हणता त्याप्रमाणे मेहेनत केल्यास काही सखोल, अर्थपूर्ण, तसेच खळबळजनक आमच्या हातून लिहिले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (आमच्या का.का.गुरुमाऊलींचे आशीर्वाद आजही आमच्या पाठिशी आहेत).

..पण जाऊ द्या अण्णा, हे आशीर्वादाचे बळ आपल्या डोक्यावरचे आहे!

बाकी इतरांनो, वेळेचा अपव्यय करून इथवर इतके भाराभर वाचत बसलात? एका तासाचा अर्धा पगार कापायला कळवले पाहिजे. हाच वेळ सत्कारणी लावला असता तर एव्हाना २ भांडी घासून, दात फ्लॉस करून, शेजार्‍यांच्या बोक्याला काल फाटलेले दूध देऊन झाले असते.

सगळ्यांना धन्यवाद!

Engineers%20%20Life.jpg

बाळ मृ ,

तुझ्यासारख्या नवख्या गझलकारांना खरी गझल म्हणजे काय हे समजावे म्हणून आम्ही हे असिधाराव्रत घेतले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलांना चल कप्पी, अचल कप्पी वगैरे रुक्ष विषय शिकवितानाही डोळ्यासमोर काफिये, रदीफ, मतले, तखल्लूस, तबस्सूम वगैरे नाचत असतात. मग रात्री तीन वाजेपर्यंत जागरण करून नव्या गझला पाडणे, आय मीन लिहिणे, तुझ्यासारख्या नवख्या गझलकारांना इस्लाह करणे, वगैरे कामे. नव्या मराठी गझल जगतासाठी आपली हाडे झिजविणारा आधुनिक दधिचीच जणू मी. यावरून मला कसबा बावडा तालुक्याचे आमदार आणी तंबाखू खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष यांच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त झालेल्या मुशायर्‍यात सादर केलेला माझा शेर आठवला. पुन्हा केव्हातरी.

असो, गझल लेखनात अशीत उत्तरोत्तर प्रगती होवो.

प्रा विकु
उपयोजित यंत्रशास्त्र विभाग,
खा. बोबडे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय.
पौड फाटा, पुणे.
भ्रमणध्वनी ९४२२ १२३४५६

मृ, विकु Rofl

यावरून मला कसबा बावडा तालुक्याचे आमदार आणी तंबाखू खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष यांच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त झालेल्या मुशायर्‍यात सादर केलेला माझा शेर आठवला <<< Lol

मृ, कसले चित्र टाकले आहेस. हसून हसून मुरकुंडी वळली!

Pages