लसणीचे ति़खट

Submitted by bedekarm on 4 October, 2008 - 10:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी सोललेला लसूण
पाव वाटी तिखट
पाव वाटी तेल
चवीला मीठ

क्रमवार पाककृती: 

सोललेल्या लसूण पाकळ्यांचे बारीक तुकडे करायचे.
तेल तापवायचे त्यात ते तुकडे टाकायचे.
खरपूस लाल तळायचे.
गॅस बंद करायचा. पाच मिनिटांनी अजून तेल गरम असताना त्यात तिखट घालायचे.
चवीप्रमाणे मीठ घालायचे. एकत्र करायचे. मग गरम वरण भात नाहीतर गरम पोळी नाहीतर भाकरी बरोबर खायचे.
हे तिखट १०-१२ दिवस टिकते.

वाढणी/प्रमाण: 
कोण किती तिखट खात त्यावर अवलंबून आहे.
अधिक टिपा: 

खाताना यावर लिंबूरस पिळून घ्यावा.

माहितीचा स्रोत: 
एक खानदेशी मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह, हे वेगळच आहे लसणीच तिखट. ह्यात सुख्ख खोबर वगैरे भानगड नाही दिसत आहे. Happy
तोंडाला पाणी सुटल पण वाचुन.

आंबाडीच्या भाजीवर हे तिखट अप्रतीम लागते.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

आम्ही याला 'लसणी' म्हणतो. लसूण तुकडे न करता नुसताच थोडासा ठेचून टाकतो तेलात. हा पदार्थ सहसा पावसाळ्यात करतात.
इथे ऑलिव्ह ऑइल मिसळून ब्रेड डिप म्हणून किंवा पास्त्यावर घातल्यासही छान लागतो.

आमच्याकडे थोडि वेगळि पधत आहे .. लसुण आणि तिखट पोळपटावर वाटुन घेतात आणि मग तेलावर फोडणी करुन तळुन घेतात ..मस्त वाट्ले वाचुन आजच करुन बघनार आहे

असाच मीठभुरका (भुर्का).. लसनाएवजी दान्याचा कुट.. किंवा तीळ घालायचे..सर्व पातळ भाज्यांवर वरुन घालायचे.. आणि वरपायचे Proud

माझी आजी मुळची खान्देशची. ती ह्या पदार्थाला तळलेल तिखट म्हणायची. अजुनहि मी, भाजी आवडती नसेल तर तळलेल तिखट बनवून खाते पोळीबरोबर.

आम्ही लसूण तळल्यानन्तर खोबर्याचा किस टाकतो व आवदीप्रमाणे तिखट मीठ. ह्याची रेसीपी मी "तळलेल लसूण " म्हणून जुन्या हितगूज वर टाकली आहे