पुण्या-मुंबईतून अमेरिकेत खाद्यपदार्थ कसे पाठवावेत?

Submitted by हायझेनबर्ग on 3 November, 2012 - 12:41

पुण्या-मुंबईतून अमेरिकेत तयार खाद्यपदार्थ पाठवण्यासाठी कुरिअर सेवा पुरवणार्‍या खात्रीलायक कंपन्यांची माहिती हवी आहे.
कुणाला एखाद्या कंपनीचा चांगला अनुभव आहे का?.
त्यांच्या चार्जेस वगैरे बद्दल काही कल्पना आहे का?
पार्सल पोहोचण्यासाठी साधारण किती दिवस लागतात?
खाद्यपदार्थ ई. गोष्टी पाठवण्यासाठीचे काही नियम आहेत का?
पॅकिंग मटेरियल वगैरे कुठलं चांगलं?
पॅकिंग कसं करावं ज्याने खाद्यपदार्थ प्रवासात जास्त दिवस टिकतील?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१० kg साठी ६६०० >>> असाच रेट आहे साधारण. माझे आईबाबा नळस्टॉपवरील इंडोफाईनमधून पाठवतात. ते फेडेक्सने ३र्या दिवशी येते पार्सल. सुपर्ब प्रकार आहे.

मी uniqueairexpress जे dhl ला कनेक्ट करतात त्यातून 375 रु. प्रतिकिलो (सहा किलो किमान) अधिक सर्व्हिस टॅक्स असे अनेक वर्षे CA ला पाठवले आहे.
आता dtdcने जवळजवळ याच दराने पण घराजवळून (पिंपरीतून) पाठवते. या वर्षी 576.8 रु. प्रतिकिलो (592.25 + 15 % ST) असे पाठवले आहे. ST आधी 12% होता 15 % झालाय असे dtdc नेच सांगितलेय.

DTDC :- ६ कि. साठी ३,८००/- (US /CANADA )

आता पर्यंतचा dtdc चा अनुभव चांगला आहे...सगळ्या वस्तु व्यवस्थित पोहोचतात...पॅकींग तेच करून देतात..

अगदी लेटेस्ट,इंडोफाईन नळस्टॉप, ५९००(सगळे टॅक्स धरून) , १०किलोसाठी. शुक्रवारी पार्सल पाठवले, आज दारात हजर!! खाण्याच्या वस्तूंना खूप छान पॅकिंग केले होते. धन्यवाद बस्के, तुमचा अनुभव वाचूनच तिथे विचारलेले.

मुंबई मध्ये गेल्या दहा वर्षांपासुन नंदा बेन म्हणुन आहेत त्यांच्याकडुन पार्सल पाठवतो. घरी येऊन सगळे पार्सल पॅक करतात. नंतर DHL ने अमेरीकेमध्ये येते. इतर देशांमध्ये पण त्या पाठवतात. आता ६५०रु/kg ५ किलोसाठी व ६००रु./kg १० किलोसाठी रेट आहे.

Pages