मसाप मध्ये डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचा जंगी सत्कार

Submitted by अ. अ. जोशी on 3 November, 2012 - 10:34

मसाप मध्ये डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचा जंगी सत्कार

डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची ८६व्या अ.भा.साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष्यपदी निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सायंकाळी कोत्तापाल्लेन्चा सत्कार पुण्याच्या मसापच्या सभागृहात झाला.

त्यावेळी अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. त्यातही रावसाहेब कसबे आणि अनंत दिक्षित हे विशेष. त्याचबरोबर उल्हास पवार, न.म.जोशी ई. उपस्थित होते.

कोत्तापल्ले यांचे स्वागत करण्यासाठी खास चौघडा वादन झाले. चौघड्यातील विविध तालांनी वादकांनी कमाल केली. स्वत: कोत्तापल्लेही त्यामुळे भारावून गेले.

मसापच्या अध्यक्ष असलेल्या डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी कोतापल्ले यांचा सत्कार करताच टाळ्या आणि चौघड्याने सभागृह दणदणून गेले.

त्यानंतर आमच्या सुचेतानांत प्रकाशनासह ४-५ प्रकाशक, साहित्य संस्था यांनी कोतापल्ले यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमातील बराचसा महत्वाचा भाग वर्तमान पत्रांमध्ये आलाच आहे. मात्र काही गमतीदार गोष्टी मी सांगतो.

परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी नेहमीप्रमाणेच दमदार भाषण केले. त्यात एक मुद्दा त्यांनी असा घेतला ...

'' सर, मला विशेष आनंद होतो आहे की तुमची आत्ता निवडा झाली. कारण, तुम्ही हलते- फिरते असतानाच्या वयात तुमची अध्यक्षपदी निवड होणे हेसुद्धा विशेष आहे.''

अरुण जाखडे यांनी सांगितले,

'' सर, निवड झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी सत्कार करताना आनंद होतो आहे. म्हणजे कसं की, लग्न झाल्याबरोबर सत्यनारायण केला कि सगळीकडे फिरायला मोकळे.''

रावसाहेब कसबे म्हणाले,

'' काही वेळा एकही ओळ न लिहीणारेसुद्धा अध्यक्ष झाले आहेत. मात्र आता एक अभ्यासक अध्यक्ष झाला हे चांगले झाले. आपल्या प्रचंड बहुमताने झालेली निवडच हे सांगत आहे.''

डॉ. कोतापल्ले यांनीही काही गमती सांगितल्या,

'' मला भांडण करणारे विद्यार्थी आवडतात. पूर्वी एकदा मी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी बोरकरांचे नाव सूचित केले होते. तसे त्यांच्या विरुद्धही माझेच स्नेही उभे होते. निवडणूक झाली, बोरकर हरले. माझे विद्यार्थी माझ्याकडे पेढे घेउन आले. मला कळेना. पण विद्यार्थी म्हणाले, सर आम्ही म्हणता होतो ना! तुमचे खोटे झाले, आमचेच खरे झाले, बोरकर हरले आणि आमहाला जे हवे होते ते जिंकले. हे घ्या पेढे!"

डॉ. कोतापल्ले पुढे म्हणाले,

" ४-५ वर्षांपासून अनेक लोक मला सांगत आहेत कि तुम्ही संमेलनाची निवडणूक लढवा. मी पुढे ढकलत होतो. पण मी त्यांना सांगितले, की एक लक्षात ठेवा की, अ.भा. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्याशिवाय मी काही मरणार नाही हे नक्की! "

अतिशय मनमोकळेपणे साजरा झालेला हा सोहळा साहित्य विश्वाला नक्कीच पुढे घेउन जाणारा होता असे वाटते.

धन्यवाद!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या चर्चेतला एक गंमतीशीर सूर पाहून करमणूक झाली. एखाद्याचं साहीत्य वाचलेले नसणे म्हणजे त्याच्याबद्दल शंका उपस्थित घेण्याचा अधिकार वाचकाला प्राप्त होतो का? अशोककाकांनी वर जी नावे घेतली आहेत त्यातल्या व्यंकटेश माडगूळकर यांचं ब-यापैकी आणि सुभाष भेडे यांचा एखाद दुसरा लेख वाचनात आलाय. प्रि. हातकणंगलेकर, प्रा. राजेंद्र बनहट्टी यांचं लिखाण कधीही वाचनात आलेला नाही म्हणजे हे साहीत्यिक नाहीत अशी ओरड करण्याचा हक्क मला प्राप्त होतो का ? माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणीतरी आहे ही भावना बाळगणे गरजेचे आहे असं वाटतं. पिकासोची चित्रं मला कळत नाहीत म्हणून पिकासो चित्रकार नाहीच असं कुणी म्हणू शकेल काय ? अरुंधती रॉय, नायपॉल यांची पुस्तके वाचली नाहीत म्हणून त्यांना बुकर पुरस्कार का मिळाला असा प्रश्न कुणीच उपस्थित करत नही हे विशेष !!

मुक्तछंदाबाबत काही म्हणायचे नाही. पण मंगेश पाडगावकरांची नऊ पुस्तके छापून सुद्धा विकली गेली नव्हती. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं हे मुक्तछंदातलं काव्य गाजलं तेव्हां त्यांच्या पुस्तकांना मागणी आली असं ऐकीव माहितीवरून नमूद करतोय. चुभूदेघे. कुसुमाग्रजांचंही प्रेम करावं भिल्लासारखं आजही लोकप्रिय आहेच कि. खूप लांब नको जायला , कवी सौमित्रच्या मुक्तछंदातल्या कवितांमुळे मराठी अल्बमची अभूतपूर्व अशी धडाधड विक्री होण्याचं उदाहरणही आपल्या डोळ्यांसमोर आहे. त्याच्या कवितांची जितकी विडंबनं झाली तितकी मराटीतल्या क्वचितच कुठल्या कवीची झालेली असावीत, एकीकडे नव्याची कास धरा म्हणून संदेश द्यायचा आणि एकीकडे नव्या मंडळींनी मुक्तछंदाची कास धरली म्हणून सडकून टीका करायची ही नीती पटत नाही. ज्याप्रमाणे हल्ली मुक्तछंदाचे पीक आलेय त्याप्रंमाणे कधी काळी छंदबद्ध कवितांचेही आले होते. पण आशयघन नसेल तर दोन्हीही टिकणार नाही हे वै. मत. लेखनसीमा.

अशोक नायगावकर यांच्या मुक्तछंदविरहीत कविता आहेत का ? त्यांच्या एखाद्या गाजलेल्या काव्यसंग्रहाचे नाव देता येईल का वगैरे वगैरे

<कोत्तापल्ले ह्यांनी काय असे साहित्य निर्माण केले आहे ते मला कळले नाही.>

प्रसाद१९७१ याचे कारण तुमच्या वाचनाच्याच मर्यादा हे असू शकेल ना?कोतापल्लेंचे साहित्य माहीत नाही म्हणता; रा.ग.जाधव, द.भि.कुलकर्णी यांची लेखनसंपदा तुमच्यापर्यंत पोचली होती का? (आता हे लोक कोण असे विचारू नका!)
मी कोणे एके काळी लोकप्रभा साप्ताहिक वाचायचो, तेव्हा त्याचे संपादक ह.मो. होते. तेव्हा त्यांचे नाव लक्षात राहिले होते. ही गेल्या शतकातली गोष्ट आहे. त्यानंतर हमोंनी लिहिलेले 'साहित्य' माझ्या वाचनात आलेले नाही. गेल्या दोन वर्षांत एका दिवाळी अंकात त्यांचे जे लेखन मी वाचले त्याला साहित्य म्हणावे असे त्यात काही नव्हते. एवढ्या ऐवजावर मला ह.मो.मराठे हे साहित्यिक नाहीत असे म्हणायचा हक्क मिळतो का?

<पण मंगेश पाडगावकरांची नऊ पुस्तके छापून सुद्धा विकली गेली नव्हती. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं हे मुक्तछंदातलं काव्य गाजलं तेव्हां त्यांच्या पुस्तकांना मागणी आली असं ऐकीव माहितीवरून नमूद करतोय.>

पाडगावकरांच्या 'जिप्सी'च्या किमान १७ आवृत्त्या प्रकाशित झाल्यात. त्यातल्या किमान ७ , १९९० पूर्वी म्हणजे 'बोलगाणी' प्रकाशित होण्यापूर्वीच्या आहेत. अर्थात जिप्सीच्या १७ आवृत्त्यांसाठी ५० हून अधिक वर्षे लागली, तर बोलगाणीच्या १६ आवृत्त्या १६ वर्षांत आल्या. त्यांचा 'सलाम' हा संग्रहही गाजलेला आहे. पाडगावकर-बापट-करंदीकर या त्रयींनी महाराष्ट्रात काव्यवाचनाच्या कार्यक्रमांची परंपरा नव्याने सुरू केली.

कोतापल्ले अध्यक्ष होण्यास पात्र आहेत की नाहीत हा वाद उगीचच निघत आहे. प्रसाद १९७१, कोतापल्ले काय किंवा कोणीही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष काय, उगाचच अध्यक्ष होतील इतकी दुर्दैवी अवस्था आलेली नाही.

कोतापल्ले व्हावेत की ह मो व्हावेत हाही वाद उगीचच आहे. तूर्त 'ह मो यांच्यासारखे डिरेल्ड विचार प्रकट करणारे होऊ नयेत' हे योग्यच.

मात्र हे विधान (कोतापल्लेंचे) गैर आहे.

>>>" ४-५ वर्षांपासून अनेक लोक मला सांगत आहेत कि तुम्ही संमेलनाची निवडणूक लढवा. मी पुढे ढकलत होतो. पण मी त्यांना सांगितले, की एक लक्षात ठेवा की, अ.भा. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्याशिवाय मी काही मरणार नाही हे नक्की! "<<<

तसेच, कोतापल्ले हलते बोलते नसताना त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी कशी काय येणार होती म्हणे? मरणोत्तर अध्यक्षपद ही प्रथा आहे काय?

एकुण, ज्या सभागृहाला महान व शंभर वर्षाची परंपरा आहे तेथील कारभार व तेथे या कार्यक्रमाला जमलेल्या महान विभुतींची वर (मूळ लेखात) उद्धृत केलेली विधाने बघून मेलेली म्हैस फेकल्यावर गिधाडे जमतात याची आठवण झाली. प्राण्यांमध्ये जातीयवाद नसतो (म्हणजे एकाच योनीतील समुहात) मात्र माणसांमध्ये असतो हे आणखी एक दुर्दैव!

-'बेफिकीर'!

अशोकजी मायबोली खरे तर जगभराच्या मराठी बांधवांकरताच तयार झालीय. जेणे करुन दूर परदेशी असलेल्या मराठी बंधु भगिनींना या माध्यमातुन एकत्र येता येईल, जिव्हाळा, सलोखा जोपासला जाईल, नवीन मैत्रीबंध निर्माण होऊन जगभरातले मराठी एकत्र येतील आणी आपल्या मायभूमीपासुन दूर असल्याची भावना कमी होईल.

पण हा खरा हेतू काही मायबोलीकर विसरत आहेत असे दिसतेय. कुठेही चर्चा जरा रंगली की तेथे जातियवाद आणतात आणी मूळ उद्देश भरकटुन बाफ बंद पडतो. पण हे आजचे नाही कित्येक वर्षापासुन चालले आहे.

पण इथे तुम्ही, दिनेशजी सारखी रसिक, कलाप्रिय आणी सामाजीक बांधिलकी जोपासणारी मंडळी आहेत म्हणून या माध्यमाची लोकप्रियता टिकुन आहे. त्यामुळेच मी म्हंटले की संयमीत लिखाण करणारे तुमच्यासारखे दुर्मिळच.

अजूनही काही चांगली मंडळी आहेत, पण त्यांची नावे दिली गेली नसली तरी मला त्यांच्या विषयी आदर आहेच.

महेश जाऊ द्या उडदामाजी काळे गोरे निघायचेच.

टुनटुन,
तुमच्या संतुलित अन संयत प्रतिसादाबद्दल वाटणारा आदर शेवटच्या एका गोष्टीमुळे धुळीत मिळाला, कारण शेवटी त्यात संतुलन नव्हतेच इतकेच दिसले Wink

इब्लीस मला खरच वाद घालायचा पण नाहिये किंवा वाढवायचा पण नाहीये. परंतु महेश यांनी चार चार वेळा विनंती करुनही काही ड्यु आयडीज जातियतेचा रंग इथे सोडु शकत नाहीत याचेच नवल वाटले.

आणी माझ्याविषयी कसला आदर? मी मुळात तुम्ही किंवा इतर अनूभवी, प्रगल्भ ( इथे प्रगल्भ हा शब्द चांगल्याच अर्थाने मी वापरलाय, कृपया गैरसमज नसावा) मंडळींइतकी हुशार नाही. आणी खरच मनात आले तेच मी व्यक्त केले. असू दे. आपण सगळे विसरुन पुढे जाणे श्रेयस्कर ठरेल.

Pages