झकास उपास मिक्स

Submitted by deepac73 on 3 November, 2012 - 07:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी आदल्या दिवशीची साबुदाणा खिचडी
२ वाट्या आदल्या दिवशीचा रताळ्याचा किस
१ चमचा तुप

क्रमवार पाककृती: 

१. माक्रोवेवच्या भांड्यात साबुदाणा खिचडी आणि रताळ्याचा किस एकत्र करा
२. माक्रोवेव मधे ३० सेकंद गरम करा
३. बाहेर काढून एकत्र करा आणि १ चमचा तुप घाला
४. परत माक्रोवेवमधे १ मिनीट गरम करा आणि गरम गरम खा.

अधिक टिपा: 

प्रमाण पदार्थाच्या उरण्यावर अवलंबून आहे

माहितीचा स्रोत: 
शिळे पदार्थ नाश्त्याला संपवायचा एक यशस्वी प्रयत्न
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म्म्म...मिक्सची आयडिया भारी असली तरी आमच्याकडे साखि उरण्याची शक्यता ना ़ के बराबर....(उलट केलेली कमीच पडते...)

Proud

साबुदाण्याची खिचडी आणि कीस एकत्र करुन त्यात अजून थोडं दाण्याचं कूट, मिरची, मीठ आणि मिळून येण्यासाठी उपासाची भाजणी / राजगिरा पीठ / शिंगाडा पीठ / साबुदाणा पीठ ( जे उपलब्ध असेल ते ) घालून थालिपीठे लावा. कुरकुरीत नवीन पदार्थ तयार.
उरलेल्या भाजीची अशी थालिपीठं ( भोपळ्याच्या भाजीचीच होतात फक्त कारण ती भाजी नवर्‍याला आवडत नाही आणि हमखास उरते. ) नाहीतर मग डाळीचं पीठ, लसूण, मिरची, भिजवलेले पोहे / ब्रेड / रवा घालून कटलेट्स हे आमच्याकडचे दोन यशस्वी पदार्थ आहेत. दुसर्‍यादिवशी तो पदार्थ आहे त्याच स्वरुपात खायचा कंटाळा येतो Happy
भारतात पोळ्या आणि भाजी चिरायला बाई होत्या तेव्हा हमखास पदार्थ उरायचे. इथे फार क्वचित उरतात Wink

अरे, हे युसुयुसां वर आदल्या दिवशी चे उपासाचे पदार्थ संपवण्याची युक्ती म्हणून खपले असते. "सेपरेट पाकृ चा धागा" ये बात कुछ हजम नही हुई! Light 1