भारतातील सरकारी ओळखपत्रे/ कागदपत्रे, प्रक्रिया व नियम

Submitted by नीधप on 2 November, 2012 - 09:24

आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सरकारी ओळखपत्रे हरघडी लागत असतात. या सगळ्या ओळखपत्रांच्या बाबत प्रक्रिया आणि नियम यांचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे. प्रत्येकाने आपला अनुभव (प्रक्रियेसंदर्भाने) लिहावा.
कुणाला किती पैसे चारल्यास किती लवकर काम होईल इत्यादी गोष्टींची चर्चा न केल्यास बरे.

अश्या प्रकारचा धागा असेल तर प्लीज हा उडवावा.
सरकारी कागदपत्रे असा वेगळा ग्रुप सुरू करून भारतीय आणि वेगवेगळ्या देशांतर्गत लागणारी सर्वप्रकारची सरकारी ओळखपत्रे/ कागदपत्रे यासाठी वेगवेगळे धागे केल्यास सापडायला अजून सोपे पडेल.
सध्या सोयीसाठी म्हणून या धाग्यावर फक्त भारतातील ओळखपत्रे, कागदपत्रे यासंदर्भाने माहिती जमवूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या लिस्ट मधील एकच डॉ. लागते. खाली दिल्याप्रामाणे काही डॉ. बरोबर अ‍ॅडीशनल सपोर्ट डॉ. लागतात. म्हणुन लागतेच असे नाही
<<
इकते सळ्गे डॉक्टरं काय कामाचे बा?

जर पत्ता तोच असेल तर लागत नाही <<< पाटील, पण सध्याचा पत्ता आणि (दहा वर्षांपूर्वीच्या) जुन्या पासपोर्टाच्या वेळचा पत्ता एकच आहे, हे दाखवण्यासाठी एक अ‍ॅड्रेस प्रूफ लागेलच, ना?

इब्लिस भाय Wink

गजानन राव सिरीयस विचारताय अस समजुन सांगतो. जुना पासपोर्ट (३ वर्षापर्यंत) हा तुमचा आय डी आणि अ‍ॅड्रेस प्रुफ असतो. जर अ‍ॅड्रेस बदलला नसेल आणि बाकिचे कोणतेच बदल नसतील तर काहीही डॉ(क्युमेंट्स) लागत नाहीत. मागच्याच आठवड्यात मी रीइस्श्यु करुन घेतला आहे. मी वर जी लिंक दिली आहे त्यावर क्लिक करत गेलात ऑप्शन प्रमाणे तर नेमके काय डॉ. लागणार आहेत ते समजते.

डॉ(क्युमेंट्स)
<<
डॉ. टायपायला लागतात तितक्याच किस्ट्रोक्स मधे कागद शब्द टंकून होतो की राव. Proud

माझ्याकडे पुण्यात काढलेले दुचाकीचे (पांढर्‍या रंगाच्या पुस्तकासारखे) ड्रायविंग लायसन्स आहे. भारतातले चारचाकीचे लायसन्स नाही.
इकडे एकाने त्याच्याकडच्या ओमानच्या लायसन्सच्या आधारावर हैदराबाद मधे थेट भारतीय लायसन्स काढून घेतले असे खात्रीपूर्वक सांगितले. पुणे आरटीओच्या वेबसाईटवर FAQ मधे खालील माहिती मिळाली...

Who is exempted from test of competence for driving licence ?
A person holding a driving licence issued by the Defence Department to drive their vehicles
or issued by a competent authority of any country outside India subject to the compliance of medical certificate is exempted from the test of competence to drive such class of vehicle.

१. माझे ओमानचे चारचाकीचे वैध लायसन्स दाखवून पुण्याच्या आरटीओ तून चारचाकीचे लायसन्स थेट मिळू शकते का?
२. तसे असल्यास आरटीओ मधून एकच लायसन्स (नवीन स्मार्टकार्ड स्वरुपातले) दुचाकी आणि चारचाकीसाठी (कॉमन) असे मिळते का?
... या संदर्भात कोणाला स्वानुभव किंवा अजून काही माहिती असल्यास मार्गदर्शन करावे.

रेशन कार्डबद्दल

1. सध्या वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना मा मोदीजीनी सुरू केली आहे. जुन्या पद्धतीचे पुस्तकी रेशन कार्ड आहे. मग हे कार्ड ऑनलाइन दिसते का ₹?

2. रेशन कार्ड कोल्हापूर ते मुंबई ट्रान्सफर कसे करायचे?

3. नवीन घराचे प्रूफ म्हणून लाईट बिल आहे , ते दाखवून रेशन कार्ड ऑनलाइन ट्रान्सफर करता येईल का ?

4. मतदार यादीत असलेले नाव कसे ट्रान्सफर करावे ?

4. मतदार यादीत असलेले नाव कसे ट्रान्सफर करावे
###below received from my society management###
Forms -

https://www.nvsp.in/

New Voters Registration -
Form 6

Important - above 21 age, should also fill declaration form if applying for new voter registration 1st time.

Transfer Case
-

Fill form 7 online and get tracking number,
Fill Form 6 and submit along with tracking number of form 7

Documents required-

1. Age proof
2. Photo id proof
3. Residence proof
4. Colored passport size photograph

For age proof u can take *adhar, pan, school leaving certificate, passport.*(any one)

For foto id proof
*Government icard, pan card* (any one)

For residential proof
*Registered agreement, index 2 , bank passbook with proper address(here)*(any one)

Don't attach only one document for all proofs.

१)रेशन कार्ड कोल्हापूर ते मुंबई ट्रान्सफर

प्रथम कोल्हापुरातून रद्द करून घेणे. ते चलन नवीन घराजवळच्या दुकानात जाऊन दाखवा. तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. ( तुमचा पत्ता पाहून सांगेल की तो भाग त्याच्याकडे आहे का बाजूच्या दुसऱ्या रेशन दुकानात आहे. मग स्थानिक रेशन ओफिसमध्ये अर्ज दिला की ट्रान्सफर होते. पण आता नवीन बदल म्हणजे ही प्रक्रिया तो दुकानदारच करतो काही ठिकाणी.
विशेष म्हणजे स्थानिक रेशन ओफिसांचे ( बीट ओफीस)काम भयानक गतिमान आणि सुधारले आहे. हा अनुभव आला.

२) कार्ड ऑनलाइन दिसते का

आता लेखी स्वरूप जाऊन आधारला संलग्न झाले असल्याने ते ओनलाईनच आहे पण ते बहुतेक आपल्याला दिसणार नाही. सध्या छापील कार्डावर 'महाराष्ट्र शासन' लिहिले आहे. पण राष्ट्रीय पातळीवर जाण्यास अडचण नसावी कारण अन्नधान्य साठा केंद्रिय आहे. ( बोरिवली स्टेशनजवळ food corporation of india चे कोठागार आहे. )

मतदार यादीत असलेले नाव
पत्ता बदल.

निवडणुका जवळ आल्या की मतदार याद्या अद्ययावत करतात आणि आताच फेब्रुवारीत ती मोहीम होऊन गेली. तालुक्यात दोनतीन ठिकाणी केंद्रे उघडतात. त्या वेळी दिलेले बदल ताबडतोब होतात. वोटर कार्ड महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे .

Pages