भारतातील सरकारी ओळखपत्रे/ कागदपत्रे, प्रक्रिया व नियम

Submitted by नीधप on 2 November, 2012 - 09:24

आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सरकारी ओळखपत्रे हरघडी लागत असतात. या सगळ्या ओळखपत्रांच्या बाबत प्रक्रिया आणि नियम यांचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे. प्रत्येकाने आपला अनुभव (प्रक्रियेसंदर्भाने) लिहावा.
कुणाला किती पैसे चारल्यास किती लवकर काम होईल इत्यादी गोष्टींची चर्चा न केल्यास बरे.

अश्या प्रकारचा धागा असेल तर प्लीज हा उडवावा.
सरकारी कागदपत्रे असा वेगळा ग्रुप सुरू करून भारतीय आणि वेगवेगळ्या देशांतर्गत लागणारी सर्वप्रकारची सरकारी ओळखपत्रे/ कागदपत्रे यासाठी वेगवेगळे धागे केल्यास सापडायला अजून सोपे पडेल.
सध्या सोयीसाठी म्हणून या धाग्यावर फक्त भारतातील ओळखपत्रे, कागदपत्रे यासंदर्भाने माहिती जमवूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे PAN card २० वर्षापूर्वी कढलेले आहे. ते रन्गीत नाही. गेली अनेक व. मी ते रेल्वे मध्ये ओळखपत्र म्हणून ( इ तिकीट असल्याने) वापरत आहे. कोणीच हरकत घेतली नव्हती. परवा एस्टीत मात्र वाहकाने वाद घातला. म्हणाला की ते मूळ नसून तुम्ही Xerox दाखवत आहात! खरे तर ते मूळच अस्सून laminated आहे. पण ते अलिकडच्या प्रमाणे रंगीत नसल्याने त्याचे समाधान होत नव्हते. शेवटी आवाज चढवल्यावर त्याने मान्य केले. हे पूर्वीचे वैध असते ना? की बदलून घ्र्तले पाहिजे?

पासपोर्ट साठी लागणारे कागदपत्रे (माझ्याकडुन जी घेतली गेली)

१) राशनकार्ड
२) आधारकार्ड
३) १ वर्षाचे लाईटबिल ( स्वतःच्या नावाने नसल्यास रेशनकार्डावर असलेल्या मुख्य नावाचे चालेल)
४) बँक स्टेटमेंट १ वर्षाची
५) लिविंग सर्टीफिकेट
६) १२वी आणि पदवी चे सर्टीफिकेट

हे वरिल कागदपत्रे ओरिजनल घेतली होतीत आणि ४५ मिनिटात सर्व सोपस्कर पुर्ण झालेले

पासपोर्ट साठी orignal LC >> पासपोर्टसाठी जाताना सगळी ओरिजिनल कागदपत्रं आणि त्याच्या प्रती घेउन जावीच लागतात. तिथे व्हेरीफिकेशन करून ओरिजिनल परत देतात (बँक स्टेटमेंट्स सोडून) आणि प्रती ठेवून घेतात.

हे पूर्वीचे वैध असते ना? की बदलून घ्र्तले पाहिजे?
>> तुम्ही तोच नंबर ठेवून नवीन रंगीत घेऊ शकतात. यूटियाच्या ऑफिसमध्ये अर्ज द्यावा लागतो. अर्ज सेम असतो फक्त ऑपश्ण वेगळा घ्यावा लागतो.

कुमार१,

माझ्या माहीतीप्रमाणे जुने कार्ड कधीही अवैध होत नाही. त्यावर भारत सरकारचा शिक्का आहे. ते नाकारणे म्हणजे कामात हयगय आहे.

आ.न.,
-गा.पै.

Na नव्या पानकार्डला अर्ज करा. माझी सही बदलली . शिवाय फोटोही जुना होता. मनुन मी नवे घेतले होते. नवीनचा अर्ज भरताना जुना प्यान न्म्बर लिहा. म्हनजे त्याच नम्बरचे कार्ड. २१ दि वसात येते.

आता माझा प्रश्न. आधारकार्डावर नवा मोबैल नम्बर घालुन नवे कार्ड कसे मिलवावे

पासपोर्ट साठी लागणारी कागदपर हा एक गम्मतशीर प्रकार आहे.. त्यांनी प्रूफ ऑफ आयडेंटीटी, प्रूफ ऑफ रेसिडंसन्स ह्या गोष्टींसाठी एक लिस्ट दिलेली आहे.. आणि त्या लोस्ट मधील कोणतेही एक प्रूफ चालेल असीए म्हणलेले आहे.. परंतु प्रत्यक्ष कागद जमा करताना प्रत्येकी दोन प्रूफ हवीच असतात.. कशासाठी आणि का कागद जमा करत बसतात त्यांनाच माहित...

उदयन, मी गेल्या वर्षी तिघांचे नवे पासपोर्ट काढले, या वर्षी एक पासपोर्ट नुकताच रिन्यू केला. तेव्हा बँक स्टेटमेंट लागली नाही. अगदी अलीकडचा हा नियम आहे का? हां, अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून बँकेचे पासबुक चालते. (तेही ज्यावर अ‍ॅड्रेस्स आहे त्या पानाची झेरॉक्स आणि पडताळणीसाठी ओरिजिनल)

काही देशांच्या व्हिजासाठी बँकस्टेटमेंट लागतात, हे ठाऊक होते. पण पासपोर्टसाठी लागते हे माहीत नव्हते, खरेच!

पासपोर्ट रिन्यु करायला पण हे सगळे लागते का? जर पत्ता तोच असेल तर कोणतेही कागदपत्र लागत नाही असे लिहिले आहे. जुना पासपोर्ट ज्या office मधुन काढला तेथेच रिन्यु करत आहे.

पासपोर्ट रिन्यु करायला पण हे सगळे लागते का? जर पत्ता तोच असेल तर>>> फक्त आणि फक्त जुना चांगल्या अवस्थेतला पासपोर्ट लागतो. जर एक्सपायर होउन ३ वर्षे झाला असेल तर मात्र बाकिचे दॉ लागतात.

हो आताचानियम आहे>>> ते लागतेच असे नाही.
http://passportindia.gov.in/AppOnlineProject/docAdvisor/attachmentAdviso...

यावर आपल्या कॅटेगरीसाठी काय लागते ते घेउन जाणे.

lisT of address proof:

http://passportindia.gov.in/AppOnlineProject/popuponline/AttachmentAdvis...

मी माझे पासपोर्ट भारताच्या परदेशातील दूतावासातून दोनदा घेतले ( एक्स्पायर नव्हते झाले, शिक्के मारून मारून पाने संपली होती ) मला विहीत नमुन्यात अर्ज आणि फोटो आणि अर्थातच वट्ट डॉलर्स याशिवाय कुठलेही कागदपत्र लागले नाही.

अहो आमच्या कडुन आवर्जुन घेतलेले ते सांगतोय तसा नियम आहे.. <<< तुम्ही त्यांनीच इथे दिलेल्या पानावरचा नियम सांगायाचा ना त्यांना.

किमान नियम तरी बदलायचा सल्ला द्यायला हवा होतात. Proud

फक्त आणि फक्त जुना चांगल्या अवस्थेतला पासपोर्ट लागतो. <<< जुन्या पासपोर्टवर तुमच्या जोडीदाराचे नाव नसेल आणि नव्यावर घालायचे असेल तर विवाहनोंदणीही प्रमाणपत्र लागते.

पासपोर्ट ऑफिसला कागदी घोडे नाचवण्यात प्रचंड आनंद होतो त्यामुळे जेव्हढे कागद तुमच्याकडे असतील ते त्यांना नेऊन द्या... त्यांच्या कडे साठवण करायला भरपूर जागा आहे... दुनिया पेपरलेस कडे जात आहे आणि हे अजून पेप्र द्या पेप्र द्या करत आहेत..

फक्त आणि फक्त जुना चांगल्या अवस्थेतला पासपोर्ट लागतो. <<
नाही. प्रूफ ऑफ रेसिडेन्स/ अ‍ॅड्रेस प्रूफ लागतेच.

माझा रिन्यू करून घेतला तेव्हा मॅरिटल स्टेटस आणि अ‍ॅड्रेसमधे बदल करायचा होता. त्यासाठीची कागदपत्रे लागली पण ते करायचे नसते तरी अ‍ॅड्रेस प्रूफ लागलेच असते.

काही देशांच्या व्हिजासाठी बँकस्टेटमेंट लागतात, हे ठाऊक होते. पण पासपोर्टसाठी लागते हे माहीत नव्हते, खरेच! >> बँक स्टेटमेंट हे अ‍ॅड्रेसप्रूफ म्हणूनच लागतं. जर पासबूक असेल तर तेही चालते. हल्ली सगळ्या बँका पासबूकं देत नाहित (उदा. आयसीआयसीआय) म्हणून बँक स्टेटमेंट. १ वर्षाचं मागतात जे प्रूव्ह करतं की तुम्ही एकाच पत्त्यावर एक वर्षापासून राहताय. नाहितर कोणिही फक्त पासपोर्टसाठी नवीन खातं एखाद्या पत्त्यावर उघडून ते प्रूफ म्हणून लावू शकतं.

रेशनकार्ड नसले तरे चालेल.. रेशनकार्ड नक्की कशासाठी पुरावा धरतात हेच कळत नाही.. रेशन कार्डाबाबतीत बर्‍याच वेळेस असे सांगितले गेले आहे की तो पुरावा म्हणून ग्राह्य धरु नये.. पुण्यात तर सध्या बनावट रेशनकार्डाबद्दल बराच घोळ चालू आहे..

ते लागतेच असे नाही.>>> त्या लिस्ट मधील एकच डॉ. लागते. खाली दिल्याप्रामाणे काही डॉ. बरोबर अ‍ॅडीशनल सपोर्ट डॉ. लागतात. म्हणुन लागते असे नाही . Happy

फक्त आणि फक्त जुना चांगल्या अवस्थेतला पासपोर्ट लागतो. <<
नाही. प्रूफ ऑफ रेसिडेन्स/ अ‍ॅड्रेस प्रूफ लागतेच.

जर पत्ता तोच असेल तर लागत नाही

हिम्स्कुल सध्या परिस्थिती खुपच बदलली आहे. Happy खुप कमी पेपर लागतात जी लागत नाहिइत ती तेथेच परत देतात.

Pages