१) पाव किलो तोंडली (उभी चिरलेली)
२) १ लहान टोमॅटो (बारीक चिरून)
३) मसाल्यासाठी - लिंबूरस + सैंधव (किंवा साधे) मीठ + हळद + हिंग + बडीशोप्-धने-जिरं ह्यांची भाजून केलेली पूड + लाल तिखट
४) फोडणीसाठी - तेल + मोहरी + बडीशोप
१) तोंडलीचे तुकडे थोडे वाफवून घ्यायचे. बर्यापैकी शिजले पाहिजेत, (मी कुकर मध्ये भाताच्या भांड्यात ठेवून एक शिट्टी केली व लगेच बाहेर काढले. जास्त वेळ वाफेत राहिल्यास अति शिजून गोळा होईल.)
२) मसाल्यासाठी दिलेले जिन्नस एकत्र करून मसाला करणे व हे वाफवलेले तोंडलीचे तुकडे त्यात घोळवणे
३) कढईत किंचित तेल घेऊन ते गरम झाले की मोहरी + बडीशोप ची फोडणी करायची.
४) बारीक चिरलेला टोमॅटो ह्यात थोडा वेळ परतणे
५) टोमॅटो शिजला की मसाल्यात घोळवलेली तोंडली घालून परतणे. झाकण ठेवून एक वाफ येऊ देणे.
फोटो:
१) खूपच कमी तेल लागते. कारण तोंडली आधीच वाफवल्यामुळे शिजलेली असते.
२) भाजीला हळद व तिखट सोडले तर मसाल्याचा एकही पदार्थ वापरलेला नाही (उदा. गरम, काळा वा गोडा मसाला इ.)
३) काही भाज्यांची स्वत:ची एक चव असते. आपण नेहेमी गोडा/ गरम मसाला इ. घालून भाजी करतो तेव्हा मूळ चव कुठेतरी हरवून जाते. म्हणून मग हा प्रयोग करून पाहिला.
४) लिंबू नसल्यास आमचूर पावडर वापरता येईल. तशी टोमॅटो मुळे आंबटसर चव येतेच. आंबटपणा नको असेल तर टोमॅटो वगळला तरी चालू शकेल.
काल एका गुजराथी मित्राच्या
काल एका गुजराथी मित्राच्या टिफिन मध्ये खाल्लेली तोंडलीची भाजी आवडली. तेव्हा जाणवले की हळद , तिखट व थोडा आंबटपणा सोडला तर बाकी जास्त काहीच घातलेले नसल्याने तोंडलीची मूळ चव भाजीला जाणवतेय. त्यामुळे ती भाजी मला तरी फारच तोंपासु वाटली. म्हणून ऑफिसहून घरी जाताना लगेच तोंडली घेतली व वरील प्रकारे भाजी ट्राय केली.
हळद आणि हिंग अगदी यथेच्छ प्रमाणात घातले. हिंग + बडीशोप्-धने-जिरं ह्यांच्या चवीमुळे भाजी मस्त लागते एकदम!
मग आज कुणाच्या टिफीनमधली भाजी
मग आज कुणाच्या टिफीनमधली भाजी खाल्लीस
हे बरय आपण रोज नवनवे प्रयोग करायचे आणि लंचला दुसर्यांच्या डब्यातले खायचे म्हणजे तुझे सक्तीचे प्रयोग इतरांना चाखावे लागणार
मग आज कुणाच्या टिफीनमधली भाजी
मग आज कुणाच्या टिफीनमधली भाजी खाल्लीस >>
तळमळू नकोस. आज माझ्याच टिफिन मधली खाल्ली. काल पासून तोंडलीचाच ध्यास घेतला होता मी.
तूला कॅमेराची गरज आहे....
तूला कॅमेराची गरज आहे....
तोंडल्यांचा चीक जाण्यासाठी आमचूर / लिंबू आवश्यक वाटतय. उकडल्यानंतर चीक रहातो का हे सुगृहिणीच सांगू शकतील
फोटु आहे मोबाईल मध्ये. नेट
फोटु आहे मोबाईल मध्ये. नेट गंडलंय. उद्या-परवा कडे टाकणार!
छाने रेसिपी.
छाने रेसिपी.
आता फोटो अॅडलाय
आता फोटो अॅडलाय
निंबुडा, छान भाजी... इथे
निंबुडा, छान भाजी... इथे रस्त्याच्या कडेने, आपोआप उगवलेले कारल्या / तोंडल्याचे वेल दिसतात. पण बाजारात नसतात, विकायला या भाज्या.
बाबु, शिजल्यावर चिक रहात नाही. ( पण कच्ची तोंडली मात्र, सहसा लहान मूलांना देऊ नये, जिभ जड होते.)
मूळ चव कुठेतरी हरवून जाते.
मूळ चव कुठेतरी हरवून जाते. म्हणून मग हा प्रयोग करून पाहिला.>>>> स्तुत्य व अभिनन्दनीय प्रयोग व त्यामागचा.व विचार
बडीशेप पाहूनच मी ओळखले की गुजराती प्रकार आहे म्हणून !
माझी वैयक्तिक मते:
१)बडीशेप+जिरे समप्रमाणात व थोडे धणे भाजून पूड करून ...असे हवे होते लै भारी मज आली असती (इथे दिलेल्या बडीशेपीच्या प्रमाणांमुळे..फोडणीतही बडीशेप आहे ना....त्यामुळे जिरे+धने चव हरवू शकते )
२) पाण्यात आधीच शिजवलेल्या तोन्डल्याची चव तितकी छान लागत नाही . तेलावर परतलेलीच भाजी उत्तम लागते ..त्यातही उभ्या लाम्ब फोडी ऐवजी गोल चकत्या असल्या की मस्त मजा येते ...छान परतल्या जातात त्या !!
असो
आवडीचा पदार्थ होता ...अक्षरशः पाणी सुट्ले आहे अत्ता तोन्डाला!!
धन्स
निंबूडा, काही भाज्यांची
निंबूडा,
काही भाज्यांची स्वत:ची एक चव असते. आपण नेहेमी गोडा/ गरम मसाला इ. घालून भाजी करतो तेव्हा मूळ चव कुठेतरी हरवून जाते. म्हणून मग हा प्रयोग करून पाहिला.
>>> मागे कुठल्यातरी बीबीवर मी नेमके हेच वाक्य लिहिले होते. त्याची आठवण झाली. असो. भाजी करण्याचा माझा फंडा हा मसाला न वापरताच असतो. पण भाज्या अति शिजवून पण त्याची चव निघून जाते किंवा बदलते. कोवळ्या भाज्या शिजवून फोडणीत घालण्यापेक्षा मोठ्या आचेवर झटपट स्टर फ्राय केल्यास मस्त लागतात. वेळही खूप कमी लागतो.
मी तोंडलीची भरली तोंडली काचर्या वगैरे तर करतेच पण माझा आवडता तोंडीलावणे प्रकार म्हणजे तोंडली कोवळी असतील तर नुसत्या तेलावर (एकच चमचा) लोखंडी कढईत किंवा खोलगट तव्यावर परतून घ्यायची. चवीपुरतं मीठ, तिखट घालायचे. अगदी हवं असेल तर वरून थोडा चाट मसाला भुरभुरायचा. आणि गरम गरम खायची.
मी तोंडलीची भरली तोंडली
मी तोंडलीची भरली तोंडली काचर्या वगैरे तर करतेच पण माझा आवडता तोंडीलावणे प्रकार म्हणजे तोंडली कोवळी असतील तर नुसत्या तेलावर (एकच चमचा) लोखंडी कढईत किंवा खोलगट तव्यावर परतून घ्यायची. चवीपुरतं मीठ, तिखट घालायचे. अगदी हवं असेल तर वरून थोडा चाट मसाला भुरभुरायचा. आणि गरम गरम खायची.
>>>
वाचूनच तोंपासु!
ही भाजी केली त्याच दिवशी तोंडलीचे थोडे तुकडे वगळून वर मसाल्यासाठी दिलेले जिन्नस एकत्र करून त्या मसाल्यात हे कच्चे तोंडलीचे तुकडे त्यात घोळवलेत व उन्हं दाखवायला ठेवलेत.
नंतर तळून खाण्यात येतील.
कालच ह्या कृतीने तोंडल्यांची
कालच ह्या कृतीने तोंडल्यांची भाजी केली होती. फारच मस्त चव होती. तोंडली माझी आवडती भाजी नाही पण काल मात्र २- ३ वेळा पुन्हा घेऊन खाल्ली . धन्यवाद निंबुडा
छान
छान
तेंडली आली का मंडईत?
तेंडली आली का मंडईत?