बार्ली चे आप्पे..

Submitted by सुलेखा on 25 October, 2012 - 13:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी बार्ली.
२ टेबलस्पून उडदाची डाळ.
२ टेबलस्पून दही.
१ हिरवी मिरची.
१/२ इंच आले.
२ लसणीच्या कळ्या.
१/२ टी स्पून हळद.
१ टेबलस्पून तीळ.
मीठ चवीप्रमाणे .
१ लहान गाजर अगदी बारीक चिरुन .
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
अंदाजे ३ टेबलस्पून तेल.
१ इनो चा पाऊच्.[यातला १/२ चमचा इनो वापरायचा आहे.
हिरवी मिरची व आले ,हे आपल्याला तिखट किती प्रमाणात हवे त्या प्रमाणात घ्यावे.

हे आप्पे पात्र--Aappe 004.JPG

क्रमवार पाककृती: 

बार्ली साधारण गव्हाच्या लहान दाण्याप्रमाणे ,थोडीशी पांढरट दिसते.
वाटीभर बार्ली व उडदाची डाळ एकत्र करुन पाण्याने धुवुन घ्यावी.बार्ली बुडेल इतक्या पाण्यात ४ ते ५ तास भिजवुन ठेवावी.
बार्ली व भिजलेली बार्ली अशी दिसते.
Aappe 001.JPG
आता भिजलेली बार्ली + उडदाची डाळ +लसुण पाकळी चिरुन घ्यावी + हिरवी मिरची चिरुन घ्यावी+ आले किसुन घ्यावे + दही असे एकत्र वाटुन घ्यावे.हे मिश्रण अगदी बारीक न वाटता थोडेसे रवेदार /जाडसर वाटायचे आहे.
गाजर व कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावी.वाटलेल्या मिश्रणात हळद ,गाजर व कोथिंबीर घालुन चमच्याने कालवुन घ्यावे.
Aappe 003_0.JPG
त्यानंतर आता या मिश्रणात चवीप्रमाणे मीठ व १ टेबल स्पून तेल व १ टीस्पून इनो घालुन चमच्याने कालवुन घ्यावे.
आप्पे पात्राच्या प्रत्येक खळग्याला आतुन छान तेल लावुन ते गॅसवर मंद आचेवर गरम करायला ठेवावे.
त्यात एक्-एक चिमुट तीळ घालावे.लगेचच त्या खळग्यात १-१ चमचा मिश्रण घालावे व वरुन पुन्हा १-१ चिमुट तीळ घालावे .
आता आप्पे पात्रावर एक झाकणी ठेवावी..
साधारण ३ ते ४ मिनिटाने झाकण काढुन आप्पे एका बाजुने खरपूस भाजले गेले आहेत का ते पहावेत.
सुरी चे टोक किंवा गोलाकार चमच्याने सर्व आप्पे उलटवुन घ्यावे व आता झाकण न ठेवता दुसरी बाजु भाजुन घ्यावी.
सर्व मिश्रणाचे असे आप्पे करावे. टोमॅटो सॉस , चटणी बरोबर आस्वाद घ्यावा..
Aappe 008.JPG

अधिक टिपा: 

तांदूळ व उडदाची डाळ तसेच जाड रव्याचे आप्पे आपण नेहमी करतो.यावरुन हे बार्लीचे आप्पे करण्याची कल्पना सुचली. लसूण अगदी थोडा वापरला आहे तरी त्याची चव जाणवते आहे.हे आप्पे बाहेरुन कुरकुरीत तर आतुन मऊसर लागतात.
मिश्रण वाटले कि लगेच त्याचे आप्पे करता येतात.मिश्रणाला खमीर आणण्याची आवश्यकता नाही.
बार्ली मधे फायबर व प्रोटीन भरपूर प्रमाणात असते.
बार्ली,किराणा दुकानातुन ४८ रुपये किलो या भावाने आणली..ज्वारी /बाजरी /डाळी जशी सुटी आणतो तशीच ही बार्ली आहे.पॅक /डब्यात पॅक केलेली नाही..मेडिकल स्टोर मधे मिळणारी फार महाग असते.[सांज्यापेक्षा थोडा मोठा दाणा असतो व पांढरी असते.]पण सुटी आणलेली नैसर्गिक स्वरुपातली असते.

माहितीचा स्रोत: 
स्व-प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेका,
फ्राय पॅन चा तळ पातळ असेल तर लेयर/तवा ठेवावा.
सायो,सशल भाजल्यावर हलका होण्यासाठी व फुगण्यासाठी खा.सोडा /इनो घालावे लागते.
डेलिया,बार्ली च म्हणतात.मराठीत जव .[बार्ली---जव च्या बाहेरचे कव्हर्/साल/टरफल काढलेले बी.] याला हिंदीत जौ म्हणतात.बिहार,बंगाल मधे सातू पिठ करताना गहू,चणाडाळ व जौ /जव भाजुन दळतात. हे जव पोटासाठी थंड ,पौष्टीक,सुपाच्य असते.आजारी व्यक्तिला हमखास देतात. मीठ,भाजलेले व कुटलेले जिरे ,थंड पाणी घालुन मोठ्या ग्लास मधे भरुन पितात.उन्हाळ्यात घराबाहेर पडण्याआधी पितात.लू /उन्हाळी लागत नाही.

छान आहे प्रकार. करून बघेन.
सुलेखाताईंचे प्रकार कायम हटके तर असतातच पण पाकृ पण एकदम व्यवस्थित लिहिलेली असते. चुकायची शक्यताच नाही Happy

बार्ली हे मराठी पण नाव आहे. वजन कमी करण्यासाठी बार्ली अत्यंत उपयुक्त आहे. बार्ली भारतात देखिल मिळते. स्वस्ता पण असते ! Happy
वजन कमी करानार्यन्नी
१. या पिठातच spouts / किस्लेल्या रंगीबेरंगी भाज्य घालाव्यात. मुलांना ही आवडते.
२.तेल घालताना सोयाचे तेल वापरल्यास स्वस्त आणि हेल्दी पण !
वेग्वेगली तेले वापरता येतील .
३. पण आरोग्याच्या दृष्टीने उत्तम रेसिपी. मी नक्की करूं बघेन .

पिहु,चालेल त्याबरोबर जाड रवा घे.दोन्ही सम प्रमाणात.बार्ली पिठ अगदी बारीक असेल त्याबरोबर रवा वापरला तर आप्पे फुगतीलल.गिच्च होणार नाहीत. जाड रवा किंवा इडली रवा [जो तांदळाचा असतो]यापैकी काहीही घेतल तरी चालेल..

आज केले, छान झालेत. इनो न टाकतात केलेत त्यामुळे जरा कमी फुगलेत , पण चव छानच. बार्ली खूप स्वस्त पण आहे इकडे . त्यापासून इकडे बिअर तयार करतात Happy

अर्पणा,बार्ली ला वेगळी पण छान चव आहे.फक्त फुगते कमी म्हणुनच खा.सोडा,इनो,सोडा वॉटर चे पाणी असे काहीतरी घालायचे.

सुलेखा,

आजच सकाळी केले हे आप्पे. खूप छान झाले होते. इतक्या छान पाकृ बद्दल धन्यवाद!

मी गाजर बारीक न चिरता किसून घातले. घरात आधीचा उरलेला अर्धा कांदा होता. तो ही पीठात घातला बारीक चिरून! आणि घरात खायचा सोडा होता. तो घातला. मस्त फुगले होते आप्पे. क्रिस्पी आणि छान झाले.

तीळाची आयडीया फार आवडली. नेहमीचे आप्पे करतानाही घालणार ह्यापुढे तीळ! Happy

अरे, एक सांगायचं राहिलंच!

ह्या पाकृ मध्ये दिलेल्या प्रमाणानुसार जिन्नस घेतले तेव्हा ३५ आप्पे झाले. वर वाढणी व प्रमान दिलेल नाहीये, त्यामुळे भिजत घालताना नक्की किती बार्ली भिजत घालावी असा प्रश्न पडायला नको म्हणून ही पोस्ट टाकत आहे.
(मी पाव किलो बार्ली आणली होती. त्याच्या निम्मी म्हणजे एक वाटी बार्ली मी घेतली होती.)

निंबुडा तुला बार्ली कोठे मिळाली?
>>>
आस, मला विक्रोळी (प.) इथल्या एका वाणसामानाच्या दुकानात मिळाली बार्ली.

मी काल हे आप्पे केले. इनो नव्हतं म्हणून बेकींग सोडा घातला थोडा. मिश्रण वाटल्यावर बारीक चिरलेला कांदाही घातला. पण आमच्याकडे फार हिट झाले नाहीत. का ते माहित नाही. आता थोडी थोडी बार्ली मु डा खि वगैरे मध्ये घालून संपवणार.

सायो, कदाचित कांदा बारीक चिरुन व थोडा जास्त घातला गेला असेल तर तयार आप्पे कांद्यामुळे ओलसर होतील.
बार्ली चवीला थोडी वेगळी किंचित उग्र लागते .भिजवुन वाटल्यावर किंवा शिजवल्यावर टेक्शर /पोत काहीसा बुळबुळीत असतो.
हे दोन्ही कमी करण्यासाठी त्यात रवा,तांदुळ,बेसन ,इतर डाळी--मुग,मसुर ,भाज्या असे घालायचे..कोणत्याही पदार्थाला कांदा चवीबरोबर ओलसर पणा देतो ..पण इथे बार्लीच्या वेगळ्या टेक्ष्चर मुळे गाजर,बीन्स,कॉर्न घातले पाहिजे व आप्प्याचे वाटलेले मिश्रण रवाळ जाडसर तसेच फार पातळ नको घट्टसर हवे..कारण बार्ली मधे रवा-तादळा इतका फुगण्याचा गुणधर्म नाही.म्हणुनच खा सोडा ,लिंबुरस हवाच.वैज्ञानिक कारणे मला फार माहित नाही पण बार्ली-प्रयोगातुन शिकल्याने हे सर्व लिहीत आहे.
बार्ली +तांदुळ किंवा मिक्स डाळींची धिरडी तुला करता येतील..

गाजरही घातलं होतं जोडीला. वाटताना रवाळ वाटलं होतं. कदाचित उग्र चवीमुळेच असेल.
धिरड्यांची आयडिया चांगली वाटतेय.

माझ्याकडे नॉनस्टीक आप्पेपात्र आहे, त्यात करुन बघेन. तीळाची आयडीया मस्तच.

रच्याकने मी एकदाच आप्पे केले होते डाळ्-तांदळाचे, पण ते भाजलेल्या इडलीसारखेच लागले होते, काय फरक असतो इडलीच्या नी आप्प्यांच्या पीठात?

काय फरक असतो इडलीच्या नी आप्प्यांच्या पीठात?
>>>
काही नाही. मी देखील इडलीला भिजवतो तसेच पीठ भिजवते आप्प्यांसाठी.

वाफेवर शिजवणे व तेलाचे कोटींग करुन भाजणे इतकाच फरक ..पण त्यामुळे मऊपणा व मऊ +कुरकुरीत अशी चव अनुक्रमे इडली व आप्प्यांना येते..बाकी पिठ दोन्हीचे सारखेच..

हे बरेच दिवस लिस्टवर होते. फायनली केले. मोठ्याला आवडले. मला उडिद सध्या झेपत नाहीत पण कधीतरी करता येतील. बार्ली खाण्याचा चांगला पर्याय आहे पण गरमगरम खाल्ले गेले. शिळ्याला गिर्‍हाइक नव्हतं Happy

आभार सुलेखाताई. तुमच्या रेसिपीज हटके असतात.

Appe.jpg

Pages