सूचना :
===============================================================
१. आपण करत असलेले काम या बाफपेक्षा महत्वाचे आहे. ते आधी संपवावे.
२. आपली तब्येत या बाफपेक्षा महत्वाची आहे. रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल वाढेल असं काही करू नये. हे सर्व नियंत्रणात ठेवावे. डोक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे विश्रांती घ्यावी.
३. सतत तीन तास कठोर परिश्रम करून भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाची सिद्धी प्राप्त केली आहे. या विषयावर आपला वेळ वाया घालवू नये.
================================================================
अरविंद केजरीवाल यांनी ऑक्टोबर महिन्यात धुळवड सुरू केली आहे. त्यांचे आरोप काँग्रेसवर होत असताना भाजपवाले खुषीत होते. आज भाजपवर आरोप होत असताना काँग्रेस खुषीत आहे. राष्ट्रवादी पक्ष भाजपला मदत करत असल्याचे दृश्य दिसत आहे. कल्पनेपलिकडचे सगळे घडत असताना भाजपने आता केजरीवाल यांच्यावर आरोप करायला सुरूवात केली आहे.
या आरोपांबद्दल काय वाटतं ? राजकिय व्यवस्था काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे. केजरीवाल यांनी ते समोर आणले का ? भाजपवरचे आरोप लुटुपुटीचे आहेत का ? काँग्रेसवरच्या आरोपांबाबत ते कोर्टात जाणार का ? गडकरी संघाचे आणि केजरीवाल दमानियाही संघाचे, ही एक चाल असू शकेल का ? केजरीवालांचे हेतू काय असतील असं वाटतं ?
कि जे ते करताहेत त्याला वर दिलेले सगळे मुद्दे बाजूला ठेवून भारतातील बहुसंख्य जनतेचा मनातून पाठिंबा आहे ? तसं असेल तर नांदेडच्या निवडणुकीच्या निकालांचा अर्थ कसा लावायचा ?
कालच्या लोकप्रभात एक लेख
कालच्या लोकप्रभात एक लेख आलाय, अवश्य वाचा.
बिनआयडीचे खाते | 19 October,
बिनआयडीचे खाते | 19 October, 2012 - 18:00
>>मात्र शेवटच्या माणसाचे हित कशात आहे हे पाहणारी व्यवस्था आली तरच अराजक थांबू शकेल. त्या व्यवस्थेला आजच्या लाभार्थींचा नकार आहे.<<
सगळ्याच पक्षांचे जाहीरनामे 'शेवटच्या माणसाचे हित' पाहाणे हाच उद्देश असल्याचे सांगतात. कोणत्याही नव्या व्यवस्थेत ज्यांचे लाभ जाणार असतात ते सामान्यतः विरोध करतातच. हे कांही नवे नाही. उत्तम घटना असली तरी त्यातील तरतुदींचा दुरुपयोग झाल्याने आपण आजच्या स्थितीत आहोत. त्यासाठी प्रथम निवडणूक कायद्यांमधील बदल अत्त्यावश्यक आहेत. राईट टु रिजेक्टपेक्षा महत्वाचे बदल अपेक्षित आहेत.
अण्णांची बदनामी केल्याबद्दल
अण्णांची बदनामी केल्याबद्दल एक प्रतिसादक यांच्यावर कारवाई व्हावी का ?
Pages