कुणी नसणार आई....

Submitted by वैवकु on 16 October, 2012 - 12:33

कसा दिसणार होतो म्हणा मी साजणीला
बिलगला चंद्र होता तिच्या त्या चाळणीला

तुला जाऊन आता किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला

इथे दुःखेच दुःखे कुठे जागाच नव्हती
तसे मग सूख बसले मनाच्या वळचणीला

'तुझा' मी शेर जेंव्हा मुळी केलाच नाही
गझल मुकलीच माझी खर्‍या साकारणीला

कसा जाऊ पुण्याला नि शोधू नोकरी मी
कुणी नसणार आई तुझ्या वेणी-फणीला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या तुमच्या खालच्या शेरात तुम्हाला कोण अभिप्रेत आहे?>>> हे माझ्या प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही बेफि,
आणि मला काय अभिप्रेत आहे हे सांगण्यापेक्षा किंवा कोणीही स्वतःला काय अभिप्रेत आहे हे सांगण्यापेक्षा वाचकाला काय अपील होते आहे ? आपल्याला हवा तसा आणि हव्या त्या परिणामासह आशय पोचत आहे का ?यावर विचार करावयास हवा. तसे होत असेल तरच तो कामियाब शेर होतो असे मला वाटते.

तुम्ही वैभवच्या त्या" शेरावर, प्राजूला, का सुमार वाटला? असा प्रश्न करताना
(आईचे कांबळे, गोधडी काव्यात चालते, तिच्या उबेने, गंधाने आई आठवते, मग पैठणी का नाही?) असा पुरवणी प्रश्नही जोडला. पण मला हे म्हणायचे होते की आईचा कसलाही उल्लेख नसताना तुम्ही तुम्हाला जे अपील झाले त्याला अनुसरून तो प्रश्न केला आहे पण प्रत्येकाला असेच अपील होईल किंवा व्हावे असे गृहीत धरणे चुकीचे नाही का?

इथे प्रत्यक्ष गझलकारालाही हा अर्थ अभिप्रेत होता की नव्हता कोण जाणे ? कारण मतल्या बाबत त्यांनी जसे लिहले आहे तसे येथेही असू शकते वा नसेलही.
त्यामुळे इथे वैभवचे
"पैठणीला ...चा शेर सुमार वाटणे हे वैयक्तिक आवडीवर अवलंबून असावे असे मला वाटते .काही प्राकाराचे शेर आपल्याला नेहमीच आवडतात काही अगदीच नाहीत असे अनेकांच्या बाबतीत होते .हे अगदी कॉमन आहे"
हे वाक्य महत्वपुर्ण ठरते.

बरसले दु:ख इतके परसदारी मनाच्या.....
सुखे बसली बिचारी मनाच्या वळचणीला!
>.............प्रा.सतीश देवपूरकर

वै.व.कु

तुला जाऊन आता किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला

मला हा शेर खूप आवडला

"तुला" मधल्या "तू" चा ज्याला त्याला अभिप्रेत अर्थ ज्याने त्याने घ्यावा .. आई , बायको किंवा अजून काही.

नोकरी वाला शेर सुध्दा खूप आवडला ... सच्चा भावना आहेत
विठ्ठल वाला शेर पण छानच .. तो तुमच्या "नियमित" वाचकांना नक्कीच समजेल.

आकाश

वैभवा!
तुझ्या या ‘मनाच्या वळचणीच्या’ शेरावर केलेल्या सखोल चिंतनानंतर(जवळपास रात्रभर) हा शेर अखेरीस आम्हास असा लिहावा वाटत आहे.......................
सकाळी ५ला उठलो ते हा शेर गुणगुणतच रे वैभवा!

बरसले दु:ख दारी, परसदारी मनाच्या.......
सुखे अडकून पडली मनाच्या वळचणीला!
.........प्रा.सतीश देवपूरकर

वैभवा, आईशपथ सांगतो, डोक्याचा भुगा झाला रे आमच्या, या शेरावर चिंतन करताना. पण आता आम्हास एकदम मोकळे मोकळे व आनंदी वाटत आहे!
वैभवा, हा शेर तुझा झाला आहे. माझा त्यावर काही अधिकार नाही, कारण खयालाचा मूळ जनक तू आहेस! घे बेट्या ऎश कर!

टीप: आम्ही आधी दिलेला शेर व आता दिलेला शेर यांची बारकाईने तुलना कर, म्हणजे आपल्याच शेराचा आपण कसा इस्लाह करू शकतो, चिंतनानंतर हे तुझ्या लक्षात येईल!
>..........प्रा.सतीश देवपूरकर

देवपुरकर >>> त्याने स्वतः किमान १० वेळातरी तो शेर बदलून पाहिला आहे. इथेही दोनदा पोस्ट केलाय. त्याच्या प्रयत्नांवरून त्याची चांगल्याचा शेरासाठीची धडपड दिसते आहे. मात्र आपण आपल्या कुबड्या देऊन त्याला पंगू करू पहात आहात. या चिंतनावरून असे लक्षात येते की आपल्या इस्लाह वाटप केंद्राची ज्याला गरज आहे त्यालाच त्याचा फायदा द्यावा... असे मोघम रात्री जागवण्यात काय तथ्थ्य आहे...?

बाकी तुमचा शेर तुमच्या नेहमीच्या पठडीतलाच आहे... अशी वृत्त हताळणी जमण्यासाठी आशीर्वाद असूद्या!

हे माझ्या प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही बेफि,
आणि मला काय अभिप्रेत आहे हे सांगण्यापेक्षा किंवा कोणीही स्वतःला काय अभिप्रेत आहे हे सांगण्यापेक्षा वाचकाला काय अपील होते आहे ? आपल्याला हवा तसा आणि हव्या त्या परिणामासह आशय पोचत आहे का ?यावर विचार करावयास हवा. तसे होत असेल तरच तो कामियाब शेर होतो असे मला वाटते.

तुम्ही वैभवच्या त्या" शेरावर, प्राजूला, का सुमार वाटला? असा प्रश्न करताना
(आईचे कांबळे, गोधडी काव्यात चालते, तिच्या उबेने, गंधाने आई आठवते, मग पैठणी का नाही?) असा पुरवणी प्रश्नही जोडला. पण मला हे म्हणायचे होते की आईचा कसलाही उल्लेख नसताना तुम्ही तुम्हाला जे अपील झाले त्याला अनुसरून तो प्रश्न केला आहे पण प्रत्येकाला असेच अपील होईल किंवा व्हावे असे गृहीत धरणे चुकीचे नाही का?

इथे प्रत्यक्ष गझलकारालाही हा अर्थ अभिप्रेत होता की नव्हता कोण जाणे ? कारण मतल्या बाबत त्यांनी जसे लिहले आहे तसे येथेही असू शकते वा नसेलही.
त्यामुळे इथे वैभवचे
"पैठणीला ...चा शेर सुमार वाटणे हे वैयक्तिक आवडीवर अवलंबून असावे असे मला वाटते .काही प्राकाराचे शेर आपल्याला नेहमीच आवडतात काही अगदीच नाहीत असे अनेकांच्या बाबतीत होते .हे अगदी कॉमन आहे"
हे वाक्य महत्वपुर्ण ठरते.

<<<

शाम, एक मुद्दा व चर्चा म्हणून हे सर्व योग्यच आहे. पण पैठणीवरून कोण आठवते हा माझा पहिला प्रश्न आणि मग तो शेर सुमार कसा ठरतो हा माझा आम वाचकाला दुसरा प्रश्न आहे. समजा, मी उत्तर पुरेसे देऊ शकलो नाही तर तुम्ही या दोन प्रश्नांचे पुरेसे उत्तर द्यावेत अशी विनंती

>>वैभवा, हा शेर तुझा झाला आहे. माझा त्यावर काही अधिकार नाही, कारण खयालाचा मूळ जनक तू आहेस! घे बेट्या ऎश कर!<<

ह्या वक्तव्यामागे असं एक गृहितक आहे की, "मी (आम्ही) सुचवलेला शेर सर्वोत्तमच आहे/ ह्याहून चांगला मूळ गझलकारास जमणे कठीणच आहे." खासकरून "घे बेट्या ऎश कर!" हा शेवटचा भाग तर अगदी असंच काही तरी बोलतो.

हाच प्रॉब्लेम आहे.
प्रोफेसर साहेब, आपण सुचवण्या करणं ह्यात प्रॉब्लेम नाही. पण -

१. त्या कुणीही न मागता करणं (हेही एक वेळ अ‍ॅक्सेप्टेबल !)
२. मी सुचवलेलं योग्यच आहे/ सर्वोत्तमच आहे/ ह्याहून चांगला मूळ गझलकारास जमणे कठीणच आहे. - हे त्या प्रतिसादातून प्रतिबिंबीत होणं.

- हे आवडत नाही.

रणजीता!
निदान तू तरी असे बोलू नकोस!
इथे निखळ काव्यापेक्षा कवीकडेच लोक जास्त बघतात व मग त्यांचा प्रतिसाद ठरतो.
हाच तर problem आहे!
टीप: रणजीता हे आम्ही ताडले आहे, कसे ते विचारू नकोस! पण दुर्दैवाने हे सत्य आहे!
...........प्रा.सतीश देवपूरकर

वैभव..
घोटीव याचा अर्थ.. घोटून घोटून चांगल्या दर्ज्याचे केलेले.
'आईने माझ्याकडून मराठी व्याकरण घोटून घेतले" याचा अर्थ जो निघेल तोच तुमच्या गझलेबद्दल मला म्हणयाचे आहे.

तुला जाऊन आता किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला

बेफि:
तो शेर मला सुमार वाटला. कारण पैठणी फक्त आईचीच असावी असा काही नियम नाहीये. बायकोची सुद्धा असू शकते. दुसरी गोष्ट, ही कल्पना खूप आहे. पण ती वेगळ्या रुपात मांडणे वैभव यांना सहज शक्य होते. त्यांनी त्यांची प्रतिभा तिथे पूर्ण वापरली नाही असे मला वाटले. पैठणीच्या जागी, घोंगडे, शाल, रजई, चौघडी यापैकी काहीही आले तरी त्या शेराचा अर्थ बदलेल असे वाटत नाही. जर पैठणीच लिहायची आहे.. तिच्या वैशिष्ट्याबद्दलचा उल्लेख आवडला असता. जसे पैठणीच्या पदरावर कशिदाकारी असते.. मोर असतात. त्यामुळे पैठणी ... हा शब्द केवळ काफिया म्हणून वापरला असल्याने सुमार वाटला असे माझे मत आहे. माझे चुकीचेही असू शकेल. पण 'पैठणी' या शब्दाला न्याय मिळाला नाहीये.

बायकोची सुद्धा असू शकते. <<<

तरीही पैठणीचा गंध ही संकल्पना ठीक आहे की? किंवा पत्नीचा गंध पैठणीला येणे इत्यादी!

पैठणीच्या अंगभूत सौंदर्यवैशिष्ट्यांपेक्षा ती परिधान करणार्‍या व्यक्तीचे ठसे त्या पैठणीत राहून गेले आहेत हे अधिक खोल आहे असे माझे वैयक्तीक मत!

"आईचीच असावी असा नियम नाही आहे म्हणून शेर सुमार वाटणे" हे पटले नाही.

पण पैठणीवरून कोण आठवते हा माझा पहिला प्रश्न आणि मग तो शेर सुमार कसा ठरतो हा माझा आम वाचकाला दुसरा प्रश्न आहे. >>> मी माझ्या अल्पबुद्धीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो बेफि.

पैठणी हे स्त्रीयांनी नेसण्याचे वस्त्र असल्याने पैठणीवरून उल्लेखलेली व्यक्ती स्त्री आहे हे कळते.

तुला जाऊन आता किती वर्षे उलटली >>> उला मिसर्‍यात वापरलेल्या "तुला" या शब्दाने तुला म्हणजे कोणाला हा प्रश्न निर्माण होतो आहे... त्याचे उत्तर सानी मिसर्‍यात शोधण्याचा प्रयत्न केल्यास ते मिळत नाही मात्र

अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला...>>> हे वाचून गेलेली व्यक्ती स्त्री असल्याचे समजते. मात्र ती आई, बहिण, प्रियसी, मावशी, आत्या, शेजारीन कोणीही असू शकते त्यामुळे आशय पोचला तरी अर्थ स्पष्ट होत नाही. शिवाय वरच्या ओळीत "आता" ने आणि खालच्या ओळीत "या"ने नाहक जागा खाल्ल्याने या शेराला वाचक सुमार म्हणत असावा.

तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ, शेर असा केल्यास येतो.

तुला जाऊन आई किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला >>> असे केल्यास वाचकाच्या हाती काहीतरी लागेल.. पण ज्याला आईच्या वेणीफणीची चिंता आहे तो असे कसे करू शकतो.

आणि मुख्य मुद्दा हा आहे की, आम वाचक या भानगडीत पडतच नाही त्याला शेर चांगला किंवा वाईट इतकेच म्हणायचे किंवा व्यक्त करायचे असते. त्याला ना कारणमिमांसेला, ना चिंतनाला वेळ असतो.

......................................

"तुला जाऊन अनेक वर्षे उलटली तरी तुझ्या या पैठणीवरचा कशिदा व हे मोर मला तुझी तीव्रतेने आठवण करून देतात"

हे विधान क्रमांक एक

व कवीने योजलेली कल्पना:

"तुला जाऊन अनेक वर्षे उलटली तरी तुझा सुगंध तुझ्या या पैठणीला अजूनही येतो"

हे दुसरे विधान!

(वाद म्हणून अजिबातच नाही, गैरसमज नसावा, पण) मला दुसरे विधान अधिक गझलेसारखे वाटते Happy

शिवाय वरच्या ओळीत "आता" ने आणि खालच्या ओळीत "या"ने नाहक जागा खाल्ल्याने या शेराला वाचक सुमार म्हणत असावा<<<

तुम्ही तुमचे मत सांगावेत शाम, प्राजू यांच्याशी चर्चा चालूच आहे Happy

==============================================

तुला जाऊन आई किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला >>> असे केल्यास वाचकाच्या हाती काहीतरी लागेल.. पण ज्याला आईच्या वेणीफणीची चिंता आहे तो असे कसे करू शकतो.<<<

गोंधळ होत आहे. गझलेच्या एका शेराचा दुसर्‍या शेराशी संबंध नाही. एक शेर करताना आई जिवंत आहे, दुसरा करताना नाही. (दुसरा वेणीफणीचा शेर आई वारल्यानंतरही जिवंत असल्याचा भास होऊन भानहीन अवस्थेत कवीने लिहिला आहे हीसुद्धा एक शक्यता).

तसेचः

तुला जाऊन राणी, किती वर्षे उलटली - अशी ओळ केली की लग्गेच आईची प्रेयसी होऊन काहीतरी वेगळे हाती लागेल. पण एक सूज्ञ गझलकार व वाचक म्हणून आपणही (आई, राणी असे कोणतेच शब्द नसतानाही, आपल्यापुरते) काहीतरी कल्पू शकतोच ना? Happy

================================

आणि मुख्य मुद्दा हा आहे की, आम वाचक या भानगडीत पडतच नाही त्याला शेर चांगला किंवा वाईट इतकेच म्हणायचे किंवा व्यक्त करायचे असते. त्याला ना कारणमिमांसेला, ना चिंतनाला वेळ असतो.<<<

आम वाचक 'वाहवा' करेल असा हा शेर वाटतो, कवीने मात्र शेर करताना आपल्यासारखेच दर्दी कवी हा शेर वाचणार आहेत हे गृहीत धरून करावा.

दुस-याची वकिली करणे व बोजड अनाहूत सल्ले देणे सोडा आता! >>> मलाही वेगळ्या अर्थाने तुम्हाला हेच म्हणायचे आहे....

वैवकु हे स्वतःच्या विवाहासाठी विठ्ठलाची आळवणी करिता आहेत हे त्यांच्या गझलेत वाचलेच आहे. ते तरुण आहे त्यांनी कित्येक वर्षापुर्वी गेलेल्या आईच्या पैठणी बद्दल लिहीले आहे हे थेट पोहोचते आहे.
बायकोच्या पैठणीचे वर्णन करणारा प्रेमवेडा कदाचित व्हायचा असेल.

मला शेर ठिकठाक वाटला .... मात्र तुम्हाला अपील झालेला अर्थ नाही लागला इतकेच सांगायचे आहे.

दुसरा वेणीफणीचा शेर आई वारल्यानंतरही जिवंत असल्याचा भास होऊन भानहीन अवस्थेत कवीने लिहिला आहे हीसुद्धा एक शक्यता) Rofl

आम वाचक 'वाहवा' करेल असा हा शेर वाटतो >>> कोणाच्याही वाटण्याला कोण काय करणार?

"आईचीच असावी असा नियम नाही आहे म्हणून शेर सुमार वाटणे" हे पटले नाही.

शेरातल्या 'आई' या नसलेल्या उल्लेखाला माझी अजिबात हरकत नाहीये. पण एक्स वाय झी .. वस्त्राला तुझा गंध येतो असेही चालले असते. पैठणीच घेतली आहे तर त्यात पैठणीच का ? इरकली, बेंगाली, बनारसी.. अशा सुद्धा साड्या (वस्त्र) किंवा, कांबळी, घोंगडी, रजई, ओढणी, गोधडी, वाकळ (पांघरूणे) असेही चालले असते. पण तिथे यापैकी काहीही न घेता जर पैठणीच घेतली आहे आणि ती फक्त काफिया जुळवण्यासाठि घेतली आहे.. तर मला ते आवडले नाही. पैठणी ही स्त्रीयांसाठी 'खास' साडी असते. .. त्यामुळे पैठणीच्या वैशिष्ट्या पैकी काहीतरी उल्लेख मला अपेक्षित होता. आणि ते वैभव यांना करणे शक्य होते.. हेच माझे मत आहे आणि राहिल.

पण तिथे यापैकी काहीही न घेता जर पैठणीच घेतली आहे आणि ती फक्त काफिया जुळवण्यासाठि घेतली आहे.. तर मला ते आवडले नाही. <<<

जगातील प्रत्येक गझल (मीर, गालिब, सुरेश भट आणि आपण सर्व यात आले) काफिये जुळवूनच झालेली आहे. वेगळे उदाहरण आढळल्यास अवश्य द्यावेत.

पैठणी ही स्त्रीयांसाठी 'खास' साडी असते. .. त्यामुळे पैठणीच्या वैशिष्ट्या पैकी काहीतरी उल्लेख मला अपेक्षित होता. आणि ते वैभव यांना करणे शक्य होते.. हेच माझे मत आहे आणि राहिल.<<<

हे तुमचे वै म असल्याने त्यावर काही बोलता येणार नाही.

तुला जाऊन आता किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला

हा शेर मला खरं तर खूप आवड्ला.

इथे पैठणी कुणाची आहे ? पैठणीच का? इतर कुठले वस्त्र/ पांघरूण का नाही ? हा विचार मला अप्रस्तुत वाटतो. कारण ते प्रतीक आहे. माझ्या मते जेव्हा एका शेरातून, किंबहुना कवितेच्याच कुठल्याही ओळीतून विविध अर्थ काढले/ लावले जाऊ शक्तात/ निघू शकतात, तेव्हा तो शेर/ कविता दर्जेदार म्हणायला हवी.

सर्वच प्रतिसादक अभ्यासू व सन्माननीय आहेत, मला कुणाला विरोध करायचा नसून माझं मत केवळ नोंदवायचं आहे.

अगदी बरोबर रणजीत ... मला ही तो शेर अर्थाने बहुपदरी वाटला आणि बेफिंनी बेफींनी आईचा उल्लेख केल्याने चर्चा केली बस्सं!

लिहिन या खयालावर एक शेर मी.. मला ज्या पद्धतीने तो काफिया निभवायचा आहे त्याप्रमाणे. ज्या शेरात फक्त 'पैठणी'च हवी इतर गोधडी .. घोंगडी पैठणीची रेप्लेस मेंट करु शकणार नाहीत.

शाम, हा काफिया या शेरात निभावून दाखवा ना? ... >>> हे अगदीच अनावश्यक आहे.
फारच आग्रह आसेल तर पुर्ण गझल लिहून देऊ का???

नाऊ वर्क टाईम... संध्याकाळी भेटू!!!!

प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही . वेणीफणीचा शेर आई हयात असताना केलेलाही असु शकतो. गझलाकार तो शेर कुठे वापरतो हा ज्याचा त्याचा प्रश्न.

हे अगदीच अनावश्यक आहे.

<<<

हे तोपर्यंत अनावश्यक आहे जोपर्यंत तुम्ही प्राजूच्या प्रतिसादांना पॉलिश करून येथे स्वतःचे मत म्हणून लिहीत नाही आहात. प्राजूंना जर म्हणायचे असेल की काफिया निभावला गेला नाही आणि ते तुम्ही नोंदवताय, तर तो काफिया कसा निभावला जाईल हे एक गझलकार सांगू शकेलच की?

हे तुमचे एक विधानः

>>>उला मिसर्‍यात वापरलेल्या "तुला" या शब्दाने तुला म्हणजे कोणाला हा प्रश्न निर्माण होतो आहे... त्याचे उत्तर सानी मिसर्‍यात शोधण्याचा प्रयत्न केल्यास ते मिळत नाही मात्र<<<

म्हणूनच मी तुमच्या एका शेराचे उदाहरण दिले होते की त्यात वाचकाने काय गृहीत धरावे? तोही शेर व्यामिश्र, बहुपदरी आहे, पण कोणी असे म्हणाले का की 'काहीच हाती लागले नाही'? (कारण कोणाबद्दल शेर आहे हेच कळले नाही?)

तुम्ही लहानपणीची सख्खी आई आणि मोठेपणीची सावत्र आई या संकल्पना क्षणभर स्वीकारल्या असत्यात तर दोन आईवरचे शेरही पटले असते.

पण असो!

Pages