सोमवारचे व्रत

Submitted by साजिरी on 5 October, 2012 - 04:05

समोरच्या त्या बंगल्यामध्ये खाली होती खोली
खाली खोली भरून गेली आली मुग्ध बाली !

त्या खिडकीचे दार उघडले सुंदर रमणीने
खिडकी होती भाग्यशाली ती स्पर्शित नियमाने !

रस्त्यावरच्या वळणावर त्या गेली मुग्ध बाला
वळण तियेने लावून दिधले माझ्या जीवनाला !

सोमवारचे व्रत धरिले मी पूजि शंकराला
पाव मला रे शंभो देवा! तूच आता उरला !

धीर धरोनी मी गेलो मग सुंदर रमणीकडे
बोलण्यास मग माझ्या जवळी शब्द नसे उरले !

दिधले तिजला लाल गुलाबी गुलाब पुष्प खास
क्षणभर थांबुनी वदली ललना रोखुनीया श्वास !

"वाण्याची रे मुलगी असे मी सोमवारी बंद
प्रेमाचा बाजार अरे मग कशास होशी धुंद?"

सोमवारच्या व्रतास मी मग शंकरास वाही
काही बाही सुमने आणिक साही लाही लाही !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users