Submitted by साजिरी on 5 October, 2012 - 04:05
समोरच्या त्या बंगल्यामध्ये खाली होती खोली
खाली खोली भरून गेली आली मुग्ध बाली !
त्या खिडकीचे दार उघडले सुंदर रमणीने
खिडकी होती भाग्यशाली ती स्पर्शित नियमाने !
रस्त्यावरच्या वळणावर त्या गेली मुग्ध बाला
वळण तियेने लावून दिधले माझ्या जीवनाला !
सोमवारचे व्रत धरिले मी पूजि शंकराला
पाव मला रे शंभो देवा! तूच आता उरला !
धीर धरोनी मी गेलो मग सुंदर रमणीकडे
बोलण्यास मग माझ्या जवळी शब्द नसे उरले !
दिधले तिजला लाल गुलाबी गुलाब पुष्प खास
क्षणभर थांबुनी वदली ललना रोखुनीया श्वास !
"वाण्याची रे मुलगी असे मी सोमवारी बंद
प्रेमाचा बाजार अरे मग कशास होशी धुंद?"
सोमवारच्या व्रतास मी मग शंकरास वाही
काही बाही सुमने आणिक साही लाही लाही !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माबोवर प्रथमच लिहित आहे !
माबोवर प्रथमच लिहित आहे !
छान आहे
छान आहे
छानच! मला 'प्रेमाचा गुलकंद'
छानच! मला 'प्रेमाचा गुलकंद' कविता आठवली
धन्यवाद Mhamaikar आणि
धन्यवाद Mhamaikar आणि विनिता.झककास !
छान जमलीय कविता.
छान जमलीय कविता.
खासच ! छान आहे !!
खासच ! छान आहे !!