आजकाल फेसबुकवर फिरताना कुठल्या कुठल्या अॅक्ट्रेस्/अॅक्टर्सचा फॅनक्लब, किंवा मी मराठी अभिमान गर्व, किंवा गडकिल्ले किंवा काय वाट्टेल ते नाव असलेल्या फॅनपेजवर गणपतीचा फोटो सापडतो. गणेशोत्सव चालूच आहे त्यामुळे सगळीकडे लोकांना बेस्ट गणपतीचा फोटो टाकायची इच्छा असतेच.. लोकं आपले टाकतात कुठून तरी ढापून. पण आपण मायबोलीकर हुश्शार! लगेच कळते तो फोटो कोणाचा? आपल्या मायबोलीचा द ग्रेट फोटोग्राफर 'बित्तुबंगा' उर्फ अभिजित धर्माधिकारी याचा हा फोटो इतक्या ठिकाणी फिरला आहे की त्या सगळ्याची रॉयल्टी जर त्याला मिळती तर तो millionaire होईल एव्हाना!!
(जिकडे तिकडे हा फोटो विदाऊट क्रेडीट दिसेल तिथे मी व अजुनही फ्रेंड्स कमेंट्स टाकतो, पण लोकं निर्लज्ज असतात! एका महाशयाने सुनावले की 'मग फोटोग्राफरने तो फोटो असा ओपनली वेबसाईटवर का टाकलाय?! (टाकला म्हणजे ढापायचा का??
)
कॉपीस्केप.कॉम जसे तुम्ही टाकलेल्या मजकुरावरून तो मजकुर अजुन कुठे वापरला आहे हे सांगते तसे गुगलवर फोटो टाकून सर्च करता यायला हवे असे मला फार काळ वाटत होते.
काल अचानक फोटोग्राफी प्लॅगिआरिझ्म बद्दल शोधताना सापडले. http://images.google.com/ वर तो पर्याय आहे उपलब्ध! (कधीपासून कोण जाणे.)
गुगल इमेजेसला गेले, की त्या बॉक्समध्ये कॅमेर्याचा आयकॉन येतो. त्यावर क्लीक केले की तुम्ही एकतर ब्लॉग/वेबसाईटवरील इमेजचा पत्ता(इमेज युआरएल) देऊ शकता किंवा आपल्या कंप्युटरवरून इमेज अपलोड करू शकता. असे केल्यावर गुगल विविध सर्च रिझल्ट्स दाखवते. त्यात 'व्हिज्युअली सिमिलर इमेजेस' असा ऑप्शन आहे. त्यात तुम्हाला कळेल किती लोकांनी तुमचा फोटो ढापला आहे.
वर दिलेला बित्तुचा फोटो किती लोकांनी ढापला आहे ते बघा(च)!! http://goo.gl/ZN4Uq
आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन निषेध नोंदवणे यापलिकडे काय/काही करू शकतो का? इतके सुंदर फोटो काढणार्याला क्रेडीट मिळालेच पाहीजे असं मनापासून वाटते. कुठलाच कायदा, काहीच संरक्षण नाही का आपल्यापाशी? लोकं स्वतःच्या वेबसाईववर डाउनलोड करायला ठेवत आहेत तो फोटो, कोणी बित्तूने काढलेला पोर्ट्रेट फोटो ग्रीक, तुर्की वेबसाईटवर टाकलाय.
बित्तुबंगाचा फोटो एक उदाहरण म्हणून घेतले आहे. तुम्ही गुगलची ती लिंक वापरून चेक करू शकता आपले फोटोज सुरक्षित आहेत ना? एकंदरीतच कसा आळा बसायचा याला?
अकू यूट्युबवरचे व्हिडीओज सहज
अकू यूट्युबवरचे व्हिडीओज सहज डाऊनलोड करता येतात
प्रकाशचित्रांना सहज काढता
प्रकाशचित्रांना सहज काढता येणार नाहित असे वॉमा टाकावे. अन्यथा तक्रार करुन सुद्धा उपयोग नाही.
http://dainiksanatanprabhat.b
http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2012/10/blog-post_2595.html
मुंबई, ३० सप्टेंबर (वार्ता.) - ‘टुस्टेप डॉट कॉम’ या संकेतस्थळावर हिंदू जनजागृती समितीने बनवलेले ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चित्र विनापरवाना बेकायदेशीररित्या वापरण्यात आले होते. त्या विषयी समितीचे विधीविषयक सल्लागार अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी संबंधित संकेतस्थळाला कायदेशीर नोटीस पाठवून ‘या चित्राचे सर्व हक्क हिंदू जनजागृती समितीकडे असल्याने ते चित्र अनुमतीशिवाय वापरल्याने कायद्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे आपण २० सहस्र रुपये हानीभरपाई द्यावी, असे कळवले. त्यानंतर या संकेतस्थळाने तातडीने हे चित्र काढून टाकले.
जिप्सीने काढलेला रायगडावरील
जिप्सीने काढलेला रायगडावरील शिरकाईदेवीचा आणि यो रॉक्सने काढलेला तोरण्यावरील मेंगाईदेवीचा फोटो या लेखात आहेत : http://www.lokprabha.com/lokprabha/20121019/navratri_09.htm
जिप्सी आणि यो रॉक्स, लोकप्रभेने तुमची परवानगी घेतली असेल अशी आशा आहे.
आ.न.,
-गा.पै.
वर दिलेला बित्तुचा फोटो किती
वर दिलेला बित्तुचा फोटो किती लोकांनी ढापला आहे ते बघा(च)!! http://goo.gl/ZN4Uq
>>>
visually similar images मध्ये करीना चा पण एक फोटो दिसतोय
आपल्या माबोवरील कितीतरी
आपल्या माबोवरील कितीतरी जणांचे लेख, कविता इ. लिखाणही त्या त्या लेखकाचे नाव न देता विपत्रांतून फिरत असते. असे झाल्यास मी माबो वरील त्या धाग्याचा दुवा उलट टपाली परत पाठवते व विनंती करते की ह्या पुढे हा लेख/ कविता फॉरवर्ड करताना त्या लेखकाचे नाव अॅड करावे.
पण खरोखरच अशी ढापाढापी निंदनीयच आहे!
Pages