तों.पा.सु. - केक आणि कॉफी - avatar

Submitted by avatar on 26 September, 2012 - 21:45

साहित्य- रांगोळी, वॉटर कलर, पाणी, toothpaste, crayon, shaving cream

sahitya.jpg

पिवळ्या रंगाच्या रान्गोळीत थोडे पाणी घातले. गोळा तयार होइल इतके. केकचा रंग यायला थोडा रंगही घालू शकतो.
तो गोळा मोल्डमधे दाबून बसवला आणी मोल्ड् उलटा करुन मोल्डमधून सोडवला. वर टुथपेस्ट्चे आयसिन्ग आणि चॉकलेटी रंगाचे चॉकलेट आयसिन्ग घातले.

cake.jpg

पांढर्‍या रंगात ब्राऊन रंग, पाणी मिसळून कॉफी केली. वर शेव्हिन्ग क्रीमचे क्रीम आहे. आणि crayons चे तुकडे.
(टुथपेस्ट खाण्या लायक नसते. Happy )

kaufi.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहित्य वाचुन खुप हसले.. त्यातुन तयार झालेली कलाकारी एकदम खास!!!
कॉफी तर मस्तच!!
काय काय आयडीया सुचतायेत !!!
परिक्षकांची परिक्षा आहे आता Happy

अर्रे व्वा. अभिनव कल्पना, अगदी हटके साहित्य वापरून बनवलयं.
आणि अगदी खर्यासारखे दिसत आहेत केक-कॉफी दोन्ही.
फारच सुरेख.

वॉव, फारच मस्त. दोन्हीही सुरेख जमलंय पण केक अफाट आवडला. केकवर आयसिंग नसतं तर आंब्याच्या शिर्‍याची मूदही वाटली असती ती Happy

सुं द र !!!! रांगोळीची कल्पना भारीच, त्यामुळे केकची जाळी अफलातुन दिसत आहे.

मस्त जमलय Happy
ह्याच्या उलटी गोष्ट म्हणजे, हे पाहिल्यानंतर मला स्टारबक्स च्या कॉफीत शेवींग क्रीम चा फोम दिसला Lol

वॉव ! सही. एक नंबर. ती कॉफी अगदी गट्टम करावी वाटतेय Happy अन केकची आयडिया मस्तच !
(मी सगळ्यांनाच पहिला नंबर देणार बहुदा Happy )

Pages