लाकडी फ्रेम्सच्या पट्ट्या कुठे मिळतील?

Submitted by सावली on 26 September, 2012 - 00:08

नमस्कार,

चित्रासाठी फ्रेम करण्याच्या ज्या पट्ट्या असतात त्या हव्या आहेत. त्या घेऊन घरी फ्रेम करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा तयार पट्ट्या कुठे मिळतील?

शिवाय अतिशय चांगल्या फ्रेम्सही कुठे करुन मिळत असतील तर प्लिज सांगा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्यु सचिन गोरे. पण ते दुकानात फ्रेम्स विकतात. पट्ट्या विकणारी दुकाने मला अजुन दिसली नाहीत.

हल्ली लाकडी पट्ट्या कुणीच फ्रेमवाला वापरत नाही. सगळ्या लाकडासारख्या दिसणार्‍या फ्रेम फायबरच्या असतात. खुप मोठ्या दुकानात (उदा. सदगुरुज, ईंदु फ्रेम्स) तेच मटेरिअल वापरतात जे छोटे फ्रेमवाले वापरतात आणि किमतीही कमी असतात. फोर्ट भागात D kumar frames आहे जो चांगले काम माफक दरात करतो. फ्रेम बरोबर माऊंट मधे बरेच ऑप्शन मिळतील

अरे वा. पाटील उपयुक्त माहिती. Happy त्या फोर्ट मधल्या दुकानाचा पत्ता आणि सदगुरु किंवा इंदु फ्रेमचाही पत्ता देऊ शकाल का?
साधारण दिड बाय दोन फुटाच्या फ्रेमची किंमत किती होऊ शकेल?

बदल -
छोटे दुकानदार कामाचे फिनिशिंग चांगले करत नाहीत असा अनुभव आला आहे.
माउंट वाकडा / बेंट झालेला असतो. पाठची सेलोटेप अगदी खराब क्वालिटीची असते वगैरे.
त्यामुळे चांगल्या दुकानाच्या शोधात आहे.

कसल्या पट्ट्या?

त्याना बॅटनपट्ट्या म्हणतात, त्या तुम्हालाहव्या आहेत का? म्हणजे लाकडाच्या फळीचे लांबट कापलेले तुकडे? ते तुम्हाला सॉ मिलमध्ये मिळतात.

फोर्ट मधल्या दुकानाकरता पाटलांना अनुमोदन.

ठाण्यात हवे असेल तर श्रीराम बुक डेपोच्या बाजूला आणि पोंक्षे वॉच कंपनीच्या बाजूला अशी दोन दुकाने आहेत पण मर्यादितच पर्याय उपलब्ध आहेत त्यांच्याकडे.

तुला तू काढलेल्या फोटोंकरता फ्रेम्स हव्या आहेत का? तर फोर्ट मधे जाणेच योग्य.

लाकडाच्या फळीचे लांबट कापलेले तुकडे? >> यांना डेकोरेट आणि पॉलिश करायचे स्किल माझ्याकडे नाही. त्यामुळे साध्या लाकडी पट्ट्या नकोत.

माधव, फोटोसाठी नाही पण चांगल्या क्वालिटीच्याच हव्या आहेत. तुम्ही म्हणता त्या दुकानांचाही पत्ता देऊन ठेवाल का? मी पाहुन येईन
शिवाय फोर्टच्या दुकानाचा पत्ताही द्या. तिथे नक्कीच जाणार.

D kumar frames
Address: 4/18/24, Jijibhay Dadabhai Lane, Bootwala Building, Fort, Mumbai- 400001, Landmark: Behind Handloom House

बोरीवली राजेंद्र नगर भागात रिगल फ्रेम्स नावाचे येक दुकान आहे , तो बहुतेक त्या पट्ट्यांचा डिलर ही आहे. (Jignesh Bhai 9820580990), बल्क काम असेल तर त्याच्याशी बोलुन बघा.

किंमत डिझाईन प्रमाणे/माऊंट प्रंमाणे बदलते आणि रनिंग ईंच वर असते. साधारन ५ रुपये ईंच्च्या पुढे भाव असेल .
इंदु फ्रेम्स पार्ले ( s V rd) पण बरेच महाग आहे.

सावली... मला ठाण्यात एक दुकान माहिती आहे तो फोटो फ्रेमसाठी नाही पण लहान-मोठ्या सर्व प्रकारच्य नक्षिदार लाकडाच्या पट्या विकतो. एकदा जाउन बघ.

तुझ्या घरापासून निघुन >>> तीन हात नाका >>> सिग्नल पार करून हरीनिवास >>> सरळ एल.बी.एस. रोडवर वंदना टॉकिज कडे जायचे. >>>> एस.टी. डेपोच्या पुढे लगेच जो सिग्नल आहे. त्या सिग्नलला डाव्या कोपर्‍यावर हे दुकान आहे. Happy

नैतर मला अजुन एक अप्रतीम कारिगर माहित आहे. तो हव्या तश्या लाकडी नक्षी बनवून देतो... तो कळव्याला विटावा ब्रिज जवळ एका छोट्याच्या गा़ळ्यात बसतो.

सावली

सतगुरुज किंवा सत्यम कडे महाग मिळतिल पण एकदम छान फिनिशिन्ग. ठाण्याला सत्यम आहे विष्णु नगर मधे तसेच चिंतामणी ज्वेलर्स जांभळी नाका जवळ सारस्वत बँके समोर, एक मुसलमान फ्रेम वाला आहे. तो पण मस्त काम करतो. त्याच्या कडे मुंबईचे जुने फोटो आहेत. त्याने दिलेल्या फ्रेम्सच सध्या माझ्या घरी आहेत. पण तोही लाकुड नाही वापरत. फायबरच. त्याच्या कडे पेंटिंग पण असतात.

तसेच दादर ला शिवसेना भवना खाली एक मराठी फ्रेम वाला आहे. ( नवर्‍याच्या आठवणी प्रमाणे गेली ३०-४० वर्ष तरी त्याचं दूकान आहे) तो पण एकदम मस्त काम करतो. त्याच्या कडच्या काही पेंटेंगच्या फ्रेम्स पण माझ्या कडे आहेत. गेली १५-१६ वर्ष वापरते आहे, पण एकदम मस्त.

सतगुरुज ची लिंक
http://www.satgurus.com/index.php?option=com_content&view=article&id=53&...

सत्यम ची लिंक
http://www.askme.com/mumbai/thane-west-thane-gifts-novelties-satyam-stor...

सत्यम... कैच्याकै महाग आहे.>>>>

सेना हो पण त्यांचे काम एकदम चोख असते. एकदम सुंदर फिनिशिंग....

गाडी घेउन जाणार असलीस तर पेट्रोल पंप पासुन लेफ्ट लेन मध्ये ठेव.. कारण उजवी लेन कंपल्सरी उजवीकडे वळून राममारुती रोडकडे जातेवी:) बाजुलाच सिग्नल असल्याने दुकानाबाहेर पार्किंग नाहिये.

मीरा, धन्यवाद Happy इथेही पहाते.
सत्यम माहिती आहे. तिथे विचारुन आणि पाहुन येईन
जांभळी नाक्याचा फ्रेमवाला पण जाऊन शोधेन.

. कारण उजवी लेन कंपल्सरी उजवीकडे वळून राममारुती रोडकडे जातेवी:) बाजुलाच सिग्नल असल्याने दुकानाबाहेर पार्किंग नाहिये.>> हो हो. तो रस्ता बदल कायमचा केलाय ना? लक्षात आली जागापण. थँक्यु.

हे फिनिशिंग जे कारागिर करतात त्यांच्याकडुन आपल्याला स्वस्तात काम करून घेता येते Happy मी वर एक पत्ता लिहिला आहे तसा. Happy

ओके...

तु ठाण्यातून कळव्यात ब्रिजवरून प्रवेश केलास की उजवीकडे वळायचे... म्हणजे बेलापुर रोड. Happy
जरा पुढे गेलीस की उजव्या हाताला शिवाजी हॉस्पिटल आहे.
अजुन पुढे गेलीस की एक वॉक ओव्हर ब्रिज बांधलाय नव्याने तो लागेल.
तिथे उजव्या बाजुला बरेच छोटे छोटे गाळे आहेत. चहाच्या टपर्‍या, गाडी दुरुस्ती गॅरेज वगैरे..

त्यात त्याचे छोटेसे दुकान लपून गेलय. तिथे कोणाला विचारलेस तर कोणीही सांगेल. किंवा एक-एक दुकान नीट बघत गेलीस तर तो गाळा सहज दिसेल.. बाहेर लाकडाच्या वस्तु लटकवलेल्या दिसतील... Happy

हे फिनिशिंग जे कारागिर करतात त्यांच्याकडुन आपल्याला स्वस्तात काम करून घेता येते>>>

बरोबर आहे.. पण हे लोक साधारण पणे एखाद दुसरे छोटे काम असेल तर खुप अळंट्ळं करतात. खुप खेटे घालायला लावतात. मागे मी अशाच एका माणसाकडुन नेम प्लेट केली होती, त्या वेळेस त्याने मला अगदी जेरीला आणलं होतं. त्याच्या मनस्तापा पेक्षा सत्यम परवडला.......

होय दिनेशदा... तिथे काही कारगिर अजुनही आहेत पण ते घावुक काम करतात असे मला वाटते. Happy

कुठल्याही प्लायवुड, हार्डवेअच च्या दुकानात लाकडी, फायबर फ्रेम मिळतील ! >> मी दोन चार ठिकाणी विचारले पण मिळाले नव्हते.
माहिम कोळीवाडा.. हम्म इतक्या ठिकाणी मुंबईत फिरलेच नसल्याने काही माहित नाहीये. Happy

Pages