प्रवेशिका - ३ (chetanaa - भूमिपुत्र हरला इतका....)

Submitted by kaaryashaaLaa on 29 September, 2008 - 01:30

मित्रहो,

ठरल्याप्रमाणे कार्यशाळेत निर्दोष ठरलेल्या प्रवेशिका तुमच्यासमोर सादर करत आहे.
तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहेच, पण आणखी एक जबाबदारीही आहे तुमच्यावर.
प्रत्येक गझलला तुम्ही १० पैकी गुण द्यायचे आहेत.
हे गुणांकन तुमच्या अभिप्रायातच नोंदवायला हरकत नाही.

तर सादर आहे आजची प्रवेशिका....

भूमिपुत्र हरला इतका मृत्यूस घाबरत नाही...
काळीज तुझे भगवंता का अजुन पाझरत नाही ?

अन्याय, प्रदूषण यांनी बजबजली सारी धरती...
माणूस माणसालाही का इथे सावरत नाही ?

जगणे तर फोलच येथे, ना किंमत सुख दु:खाला...
बेजार जीव, शांतीचा का मार्ग अनुसरत नाही ?

जखमा दहशतवादाच्या, नासूर खोल होताना...
झाली बधीर मानवता, का आज हादरत नाही ?

अर्जुन सापडता आता,सापळ्यात द्वेष दुहीच्या...
सांगाया फिरून गीता, का कृष्ण अवतरत नाही ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापू,

तुमचं हे मत समजलं. धन्यवाद.
पुन्हा याहून वेगळं काही नवीन मत असेल तर जरूर मांडा.

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

मला आवडली...
७ गुण

गझल आवडली.

गुण ५.

बापू, तुमचं मत आवडलं..
आणि हेच करताना मोठी कसरत होते.. वृत्तातले शब्द पटापट सुचत जातात.. पण अर्थाच्या नावाने शंख नसला तरी शिंपला तरी असतोच.. Happy हा स्वानुभव आहे..

ही गझल मला जड वाटली.. वेगवेगळे संदर्भ वापरताना काही नवीन विचार मांडला आहे असे फारसे जाणवत नाही. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे गझलेचा बाज वाटला नाही. आशय चांगला आहे हे खरे. चूभूदेघे..

माझ्याकडून ४ गुण.

आफताब आणि बापूजी, तुमच्या मतांचा मी आदर करतो.

मायबोलिवर नियमित गझल लिहिणारे किती जण आहेत? प्रसाद, वैभव, नचिकेत आणि आणखी एक दोन जण असतील. या शाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यानी पुर्वी कधी गझल लिहिली नसावी. असलीच तर एक दोन गझलांच्या पलिकडे ते गेले नसतील. अशा विद्यार्थ्यांकडून मी तरी फक्त वृत्तबद्ध गझल अपेक्षित केलेली आहे. कारण मी जेंव्हा गझल लिहायला सुरुवात केली तेंव्हा माझा वेळ तर गेला आणि हाती फक्त घोर निराशा आली. अत्यंत कठिण वाटले वृत्त. तेंव्हा इथे ज्या कवींनी गझल लिहिण्याचा प्रयत्न केला तो कौतुकास्पद आहे. गझल मधे चुका नक्कीच असतील पण त्या चुका एखाद्या महान गझलकाराने कराव्यात आणि म्हणून त्याला तीव्र प्रतिक्रिया द्याव्यात असे मला तुमचे पोष्ट वाचून वाटले. पण ज्याला शिकायचे आहे तो नक्कीच प्रतिकुल/अनुकुल प्रतिक्रियांमधून पण शिकतो आणि शिकायलाच पाहिजे म्हणून माझे हे पोष्ट.

जगणे तर फोलच येथे, ना किंमत सुख दु:खाला...
बेजार जीव, शांतीचा का मार्ग अनुसरत नाही ?

हा शेर आवाडला...

६ गुण..

६ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

विषय वेगळा आहे पण मला थोडी जड वाटली गझल.

गुण - ५

हं... वेगळा विषय. लायकी नाही गुण देण्याची तरीपण जबाबदारी दिलिय ना तुम्ही...म्हणुन..
माझ्यातर्फे ४ गुण

करंदीकरांसारखाच विचार मी सुरुवातीला केला. पण हेही तितकेच खरे की एकदा लयबध्दतेची सवय लागली की आपोआपच जे सुचेल ते व्रुत्तातच सुचत जाते, हा कार्यशाळेत मांडलेला विचारही तितकाच पटला.

मीही मोठ्या उत्साहाने कार्यशाळेत भाग घेतला. गझलेच्या ४ ओळी लिहिल्या आणि शेवटी माझ्यातला पेशंस संपला म्हणा किंवा आळस जास्त म्हणा, पण गझल काही पूर्ण करु शकलो नाही. त्या मुळेच ज्यांनी ज्यांनी मोठ्या धैर्याने त्या पुर्ण केल्यात त्यांच्या धैर्याचे मी कौतुकच करतो. ही फक्त सुरुवात आहे बर्याच जणांसाठी आणि सुरुवातीलाच आपण काही भटांच्या तोडीच्या गझलेची अपेक्षा नाही ना करु शकत.

सगळे शिकताहेत हो. त्या मुळे आपण त्यांना प्रोत्साहन हे दिलेच पाहीजे. आणि जर काही दुरुस्ती सुचवली गेली असेल तर तीही तितक्याच खिलाडू व्रुत्तीने स्विकारली गेली पाहीजे. तसेच, काव्यलेखन ही कसरत जरी नसली तरी नविन शिकताना काही प्रयत्न, खटाटोप हा करावाच लागेल, नाही का? जसे, पोहणे हा जरी आनंद असला, तरी सुरुवातीला शिकताना जोरजोरात हातपाय मारणे, गटांगळ्या खाणे हे होतंच, असं माझं वैयक्तीक मत आहे.

माझ्यातर्फे या प्रयत्नाला ६ गुण !

सामाजिक भान आणि आशयघनता यामुळे वैशिष्ट्यपूर्ण गझल...

आशय आणखी टोकदार करता आला असता तर सुंदर झाली असती.

६ गुण द्यायला हरकत नाही.
======================
मी वैशाखातला दर्द, तू श्रावण हिरवागर्द..!

बरीच ओढाताण झालीय वृत्तात बसविण्यासाठी, पण प्रमाणिक प्रयत्नाचं कौतुक व्हायलाच हवं. प्रयत्नाचे ४मार्क्स

वेगळ्या धरतीची आणि प्रश्नार्थक असल्याने ,या गझलेचे वाचन केले तर ते अधिक चांगले होईल.(इफेक्ट्स साधता येतील).

छान आहे.

पहिला आणि शेवटचा शेर मस्त!!!

माझे गुण: ४

सामाजिक आशय म्हणून आवडली..
गुण ६

विषय-आशय छान आहे. पण शब्द बोजड वाटतात.. ३ गुण

Pages