प्रवेशिका - ३ (chetanaa - भूमिपुत्र हरला इतका....)

Submitted by kaaryashaaLaa on 29 September, 2008 - 01:30

मित्रहो,

ठरल्याप्रमाणे कार्यशाळेत निर्दोष ठरलेल्या प्रवेशिका तुमच्यासमोर सादर करत आहे.
तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहेच, पण आणखी एक जबाबदारीही आहे तुमच्यावर.
प्रत्येक गझलला तुम्ही १० पैकी गुण द्यायचे आहेत.
हे गुणांकन तुमच्या अभिप्रायातच नोंदवायला हरकत नाही.

तर सादर आहे आजची प्रवेशिका....

भूमिपुत्र हरला इतका मृत्यूस घाबरत नाही...
काळीज तुझे भगवंता का अजुन पाझरत नाही ?

अन्याय, प्रदूषण यांनी बजबजली सारी धरती...
माणूस माणसालाही का इथे सावरत नाही ?

जगणे तर फोलच येथे, ना किंमत सुख दु:खाला...
बेजार जीव, शांतीचा का मार्ग अनुसरत नाही ?

जखमा दहशतवादाच्या, नासूर खोल होताना...
झाली बधीर मानवता, का आज हादरत नाही ?

अर्जुन सापडता आता,सापळ्यात द्वेष दुहीच्या...
सांगाया फिरून गीता, का कृष्ण अवतरत नाही ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझीच की काय रे? Happy
_________________________
-A hand that erases past can create a new begining.

बी, गिरी,
नुसती टिपण्णी नको.. गुण पण द्या Happy

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

समकालीन विषयांचं प्रतिबिंब असलेले शेर आहेत, हे एक संवेदनशीलतेचं चिन्हच आहे असं वाटलं.
आणि इथे बहुधा मुद्राराक्षसाचे ठसे दिसताहेत - संयोजक मंडळाला विनंती की याकडे पाहावे.
त्यामुळे मला मात्रांचा हिशोब कळेना.
भूमीपुत्र = २+२+२+१ = ७ मात्रा हे बरोबर आहे का?
की तिथे 'भूमिपुत्र' असं टाइप व्हायला हवं (२८ मात्रांची प्रत्येक ओळ आहे ना?) तसेच 'फिरुन' हा शेवटच्या ओळीतला शब्द 'फिरून' असा हवा आहे का?
'बेजार जीव शांतीचा, ...' हे 'बेजार जीव, शांतीचा ...' असं हवं आहे का?
माझ्यामते गुण - ४
- सतीश

५ गुण

सतीशजी,

टंकलेखनातील चुका निदर्शनात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. बदल केले आहेत.

~ संयोजक समिती
==
विरहाची वर्षे सरली, ते मीलन दूर न आता
मृत्यूला खात्री आहे, मजलाही संशय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

कदाचित गझलेचा एक विशिष्ट बाज डोक्यात बसला असल्यामुळे ही गझलचे सगळे नियम जरी पाळत असली तरी कविता वाटते. गझल म्हणून इतकी भिडली. हा दोष माझ्या आकलन शक्तीचा असेल. मला वाटते २+१/२ गुण.

३ गुण

सामाजिक गजल. वेगळी म्हणून आवडली.
६ गुण
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!

गुण द्यायचे राहून गेले:

१) गझलचा विषय्/आशय - २ गुण
२) शैली - १ गुण
३) शब्दरचना - १ गुण
४) प्रवाह - २ गुण
५) शेर - १ गुण
============
ऐकून गुण - ०७

चांगली आहे गझल

अर्जुन सापडता आता,सापळ्यात द्वेष दुहीच्या...
सांगाया फिरून गीता, का कृष्ण अवतरत नाही ?>>>
मस्त....

५ गुण

अर्जुन, द्वेष-दुहीचा सापळा, अता सापडला हे सगळं मला जरा बंपर गेलं. महाभारतातला अर्जुन कोणत्या वेगळ्या सापळ्यात अडकला होता? कौरव पांडवाचा द्वेष करत होते आणि एकाच कुळात जन्मलेल्या या राजपुत्रांमध्ये दुही माजली होतीच की. तो जर 'सापळा' असेल तर द्वेष-दुहीचा नव्हता का?

'कात्री' ह्या अर्थाने इथे 'सापळा' हा शब्द वापरला आहे का? 'सापळा' नेहमी कोणीतरी अन्य व्यक्ति आपल्यासाठी रचून ठेवते. आपण त्यात अडकावे अशी त्या व्यक्तीची इत्च्छा असते. एकीकडे कर्तव्य आणि दुसरीकडे आप्तांविषयीचं ममत्व या दोन्हीमध्ये ' either or' अशी परिस्थिती निर्माण झाल्याने तो गडबडून गेला. कशाची निवड करावी हे त्याला कळेना. त्याच्यासाठी कोणी 'सापळा' रचून ठेवला होता असं मला नाही वाटत.

मला तरी वाटते की अर्जुन एका संभ्रमावस्थेत सापडला होता. राज्य मिळवायचे तर युद्ध करावेच लागणार पण ज्यांच्यांशी युद्ध करायचे त्यात बरेचजण आप्त-स्वकीय होते, पूज्य गुरुजनहि होते. त्यांची हत्या करून राज्य मिळवायचे या कल्पनेने तो गलित गात्र झाला होता, त्याच्या हातातली शस्त्रे गळून पडली होती. कर्तव्या-पालनाची एव्हढी भयंकर किंमत मोजायला त्याची तयारी होत नव्हती. त्याच्या पुढचा dilemna फार वेगळा होता. ते उदाहण देऊन इथे शायराला काय नेमकं म्हणायचं आहे ते समजलं नाही.

Hamlet सुद्धा 'To Be or Not To Be' अशा संभ्रमात पडला होता पण त्याची समस्या आणि त्याला पडलेल्या प्रश्नाचं philosophical dimensioan दोन्ही फारच वेगळी होती.

'आपण सारे अर्जुन' या पुस्तकात व.पु. काळ्यांनी याविषयावर अति-सुंदर आणि सविस्तर विवेचन केले आहे. [प्रत्येकाने - विशेषतः तरुण वर्गाने - ते पुस्तक मिळवून जरूर, जरूर वाचलं पाहीजे, हे माझं मत जाता जाता नोन्दवून ठेवण्याचा मोह आवरत नाही].

काय करावे, काय करू नये याविषयी मनाची निश्चिती न होणे हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला केंव्हा ना केंव्हा येतोच. अगदी मुम्बैहून पुण्याला जायचं आहे तर ट्रेन घ्यावी की बस.. याचाहि निर्णय घेताना गोंधळ उडू शकतो पण म्हणून तेंव्हा काही आपण 'अर्जुन' नसतो. पण इतर अनेक प्रश्नांच्या बाबतीत आपली अवस्था अर्जुनासारखीच झालेली असते आपण 'कृष्ण-जन्म' होण्याची वाट बघत, हाताला हात जोडून बसून रहायचे का? ['कोणताच निर्णय न घेणे' हाहि एक निर्णयच असतो म्हणा.]

'अर्जुन' दररोज हजारोंच्या संख्येने जन्माला येतात पण प्रत्येक अर्जुनाला गीता सांगण्यासाठी एकेक कृष्ण काही जन्माला येत नसतो. व्यास-मुनींनी ते काम काही हजार वर्षापूर्वीच करून ठेवलय की. आपण 'महाभारत' आणि 'गीता' नाही का वाचू शकत? किंवा जाणकार माणसाकडून गीतेचा अर्थ नाही का समजवून घेऊ शकत?

अर्थात आपण विचारी असलो तरच हे असले प्रश्न पडतात. कोणताच विचार न करता आणि कशाचाहि विधिनिषेध न बाळगता जगायचं म्हटलं तर कसलेच प्रश्न नाहीत आणि संभ्रमहि नाही. दुर्योधनाला नाही पडले कसले प्रश्न ते? असो.

एकूण, पाचवा शेर खूपच गोंधळ उडवून देणारा वाटला. गझल म्हटली की तीत पाच शेर हवेतच ह्या भूमिकेतून तर हा पाचवा शेर अवतरला नसेल ना, अशी शंका आल्यावाचून रहात नाही.

व्याकरणाच्या दृष्टीने ही गझल 'निर्दोष' ठरवली गेलीय खरी पण काव्य गुणाच्या काट्यावर, ती मला तरी वजनदार नाही वाटली.

बापू करन्दिकर

ह्या गजलेचा आशय आवडला पण वृत्त बर्‍यापैकी डोक्यावरून गेलं.
अन्याय प्रदुषण... मात्रा २८ होतायत का?
तसच ऊन्-हून प्रत्यय दीर्घ असतात असं वाचल्याचं आठवतं. मतल्यातला अजुन बरोबर आहे का?
(व्याक्रणात मी गोता खाऊ शकते.. तेव्हा आगाऊ क्षमा)
माझे ३.
-----------------------------------------------------
जान दी, दी हुई उसी की थी
हक तो यह है, के हक अदा न हुआ

>> माणूस माणसालाही का इथे सावरत नाही ?

छान!

३ गुण

.

बापू ,

इथे गझलकाराला उत्तर देण्याची सोय नसल्याने हा प्रपंच.

अर्जुन कुठल्या (जगा) वेगळ्या सापळ्यात (संभ्रमात) पडला होता असे नव्हे पण त्याच्या संभ्रमाला उत्तर म्हणून गीता सांगितली गेली ना? की कुठल्या कौरवाच्या तशाच(?) संभ्रमावर सांगण्यात आली होती? म्हणून ज्याला उदाहरण देताना , रूपक म्हणून वापरताना बेंचमार्क असे म्हटले जाते तसा हा संदर्भ आहे असे वाटते. आणि हेच गीतेत लिहून ठेवले आहे तर तेच वाचा की .. लिहायचे कशाला ???????? Happy

एकूण, पाचवा शेर खूपच गोंधळ उडवून देणारा वाटला. गझल म्हटली की तीत पाच शेर हवेतच ह्या भूमिकेतून तर हा पाचवा शेर अवतरला नसेल ना, अशी शंका आल्यावाचून रहात नाही.

आपल्या बहुतांशी प्रतिसादात हा मुद्दा दिसून येतो. गझल म्हटली की त्यात एखादा शेर अवांतर असणारच अशा भूमिकेतून आपण प्रत्येक गझलकडे पहात नसणार हा विश्वास आहे पण ...

असो

प्रतिसाद व प्रोत्साहनाबद्दल आभार

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

दाद,

२८ मात्रांचं गणित बरोबर आहे.
'अजुन' ही एक छोटीशी तडजोड आहे हे खरं.

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

पुनमला मोदक.
माझ्यातर्फे ५ गुण.

व्वा.. आशय खूप छान आहे..
अन्याय..चा शेरात प्रदुषण या शब्दाने पुर्ण अर्थसंगतीत काही विचित्र तर वाटत नाही ना...
बाकीचे सगळे शेरही खूप आशयघन आहेत....
माझे ५ गुण..

४ गुण

माझे गुण - ४
विषय वेगळा म्हणून आवडली...

*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

व्रूत्त आणि मीटर चा प्रॉब्लेम वाटला जरा..
आशय चांगला आहे..

४ गुण..

छान आहे ही गझल!
इथे शायराला काही सांगायचे आहे.
आशयासाठी लिहिलीत गझल रदीफसाठी नाही
मान गये उस्ताद तोरा जवाब नाही
गुण ६

भूमिपुत्र हरला इतका .. मस्त!
गुण? - मीच शिकायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे...

पुढील गझलेसाठी शुभेच्छा!

मतला आवडला,

गुण? नाय बा आपल्याला पावर नाय

सामाजिक भान असलेली गजल म्हणून आवडली.
थोडी सोपी करता आली असती तर जास्त आवडली असती !
पहिला आणि शेवटचा हे दोन शेर विशेष आवडले Happy
एकूण गुण -- ५

ही गझल आवडली.

शेवटचा शेर खास.

गुण- ६

प्राजु

'सापळा' आणि 'संभ्रम' हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत असं कार्यशाळेच्या संपादकांना वाटत असेल तर मला काहीच म्हणायचं नाही.

'रूपक' किंवा 'बेंचमर्क' म्हणून कुठे काय वापरावं याला काही ताळतंत्र नको का? "खाल्ला तेवढा मार पुरे झाला, आता पुन्हा म्हणून रेसवर बेटिन्ग करणार नाही," अशी मनाशी खूणगाठ कोणी बांधली तर त्याला "भीष्म प्रतिज्ञे" चा बेंचमार्क द्यायचा का?

'अवांतर' शेरालाच नव्हे पण कोणत्याही शेरातले काव्यगुण पटले नाहीत तर तसं मत नोंदवायला काय हरकत आहे?

केवळ गझलच नव्हे तर कोणताही फॉर्म स्वीकारताना, तंत्र आणि व्याकरणाचे नियम यांच्या वेदीवर काव्यगुणांचा बळी चढवला जाऊ नये, एवढीच माझी अपेक्षा मी नोंदवतो. गझलच्या बाबतीत हे जरा जास्त प्रमाणात घडतं असंहि माझं एक निरीक्षण आहे.

'गझलच्या काटेकोर नियमात बसवण्यासाठी म्हणून कराव्या लागतील त्या सर्व तडजोडी केल्या तरी चालेल पण व्याकरणदृष्ट्या 'निर्दोष' गझला लिहिल्या जातील' असं ठरवून गझला 'पाडणारी' कार्यशाळा चालवायची असेल तर त्याला माझा 'बापड्या'चा कोणता आक्षेप असणार?

कविवर्य मोरोपंतांनी एका अक्षरापासून सर्व श्लोक सुरु होणारं एक रामायण अशा प्रकारे १०८ रामायणं लिहिली होती असं मला कोणी सांगीतलं होतं. अर्थात वृत्त - मात्रांचं व्याकरण त्यांनी सांभाळलंच असणार. कोणीहि आश्चर्याने तोंडात बोट घालावं असाच हा पराक्रम म्हणावा लागेल पण .. काव्यगुण ही बाब त्या वैयाकरणी चमत्कारांपलीकडची आणि 'ट ला ट' जोडण्या पलीकडची असते. खरं ना?

काव्यलेखन [त्यात गझल आली, रुबाया आल्या, सुनीत आले, हायकू आले] म्हणजे केवळ एक 'खटाटोप' किंवा 'कसरत' नसते, हे सुद्धा कार्यशाळेत ठासून सांगीतले जावे, एव्हढंच माझं म्हणणं.

बापू करन्दिकर

Pages